कारे नक्की कांदे पोह्याचा कार्यक्रम नाही ठेवायचा ना.पण तशी प्रथाच आहे पूर्वीपासून ..पण तू नाहीच म्हणतोस.. जोशी काकांचा कालच फोन येऊन गेला, केव्हा येणार म्हणून, सुधाताई त्यांच्या मुलाला म्हणजे रोहित ला जरा समजावनीचा सुरात म्हणाल्या.
काय आई, एकच प्रश्न असे खूपदा विचारून उत्तरे बदलतात का? नाही ना? मग का तेच ते प्रश्न करतेस. रोहित वैतागून बोलत होता. हे बघ तरीही सांगतोय की मी आधी तिला बाहेर एकटा भेटेल पब्लिक प्लेस मधेच बरं का... अन आम्हाला पटले तरच एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटणार..
अरे पण ... आईला मध्येच थांबवत तो पुढे बोलू लागला.
तूच मला सांग ना तुला काय वाटते. मला नाही पटत ही प्रथा , मी ताईचा लग्नाच्या वेळीच पहिले आहे. मुलीची अन तिचा घरचांची किती धावपळ होते. ताई किती घाबरलेली होती त्यादिवशी अन त्यात साडी नेसून वगैरे. ती मुलगी अन तिचा घरचे किती उत्साहाने मुलाकडचा लोकांचे आदराने करतात, काहीतरी आशा ठेवूनच ना.... तेही ठीक पण जर काहीही कारणाने पुढे नाहीच काही जुळले तर किती मनस्ताप होत असेल त्यांचा. नकार कळवावा तरी किती दडपण येत असेल मुलाकडचा मंडळींना . म्हणजे आशेची निराशाच नाहीका?? अन इतर लोकांसाठी नविन विषय मिळतो. त्यापेक्षा अशी फक्त दोघांची भेट झाली तर काहीसा अवघडलेपणा कमी होईल अन मोकळेपणाने बोलता येईल.
सुधा रोहितकडे कौतुकाने पाहत होती. किती छान विचार आहेत माझ्या लेकाचे ... खरे सांगू का मलाही नाही पटत हे... म्हणजे बघना एखाद्या प्रदर्शनात नाही का त्या वस्तूला विशेष सजवले जाते अन तिचे गुणदोष सांगितले जाते तसेच काहीसे. पण अशा प्रकारात ती वस्तू नसून व्यक्ती आहे हेच सर्व जण विसरून जातात. कारण एकच प्रथा, परंपरा..आमच्या वेळी तर अशक्य होते हे सर्व. आता पटले हो मला तुझे बोलणे. ठीके, मग मी तुझ्या बाबांना सांगते. ते कळवतील राधाचा घरी मग ठरवा तुम्ही कुठे भेटणार ते.
खूप खूप धन्यवाद मातोश्री... माझाशी सहमत झाल्याबद्दल. रोहित ही जरा मिश्किल पणे म्हणाला.
रोहित एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. पगार ही ठीकठाक. त्याचे बाबा ही खाजगी कंपनीतच नोकरीला तर आई गृहिणी. असे हे अगदी मध्यमवर्गीय कुटुंब. पैशापेक्षा मनाने श्रीमंती मोठी.
रोहित जरी नोकरी करत असला तरी त्याचे स्वप्न जरा वेगळे होते. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा मानस होता. त्याचसाठी तो नोकरी करुन म्हणजे भांडवलाची सोय करू पाहत होता.अन सोबतच त्याने इंजिनीरिंगसाठी घेतलेलं लोन ही फेडत होता. अत्यंत स्वाभिमानी असल्यामुळे जे काही करायचे ते स्वतःचा हिमतीवर असे त्याचे मत. पण वय काही थांबून राहते का, म्हणून त्याचा आई बाबाचा हट्ट की आयुष्यात काही गोष्टी योग्य वयात झालेल्या केव्हाही चांगल्याच. एकदा लग्न होऊदेत मग पूर्ण आयुष्य पडलंय की स्वप्नांच्या मागे धावायला. एकुलता एक मुलगा असल्यामुळे रोहितलाही त्यांचे मन मोडता येईना. अन तो जरा बळजबरीच हे पहिलेच स्थळ पाहायला तयार झालाय. पण रोहितने मनाशी पक्के केलेय की जे आहे ते खरे सांगायचं अन त्याची समजूत आहे की जर मुलाची आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल, तो सेटल नसेल तर आजकालचा मुली नक्कीच नकार देतात लग्नाला. त्यामुळे तो जरा निश्चिन्त आहे.
तर पाहुयात तिकडे राधा मॅडमची काय अवस्था आहे. तिचा काय अपेक्षा आहेत तिचा भावी पतीदेव बाबत लवकर च जाणून घेऊया पुढच्या भागात.....
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा