प्रिय वाचक,
मनापासून सॉरी, काही वैयक्तिक कारणामुळे लिखाणास विलंब झाला. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते.
धन्यवाद ????
नातं तुझे अन माझे
भाग 1
https://www.facebook.com/581606972323826/posts/954685665015953/?app=fbl
नातं तुझे अन माझे
भाग 2
https://www.facebook.com/581606972323826/posts/957582101392976/?app=fbl
भाग 3
राधा आनंदातच घरी आली अन आईला मिठी मारत म्हणाली, आई मी तयार आहे लग्नाला रोहितसोबत... तू तेवढे सांग बाबांना...
अग पण त्याच्यापेक्षा तर आधीचे स्थळ चांगले होते ना, तर ते नाही पटले तुला.तो मुलगा चांगला कमावता आहे, घरदार, गाडी सर्वकाही होते.अगदी राणी बनून राहिली असतीस..आई म्हणाली.
काय ग आई, इतरवेळी तर तुम्हीच म्हणतात ना की कष्टाने, आपल्या आवडीनिवडीने सजलेले घर एक अनोखे समाधान देते मनाला.तो एक माणूस म्हणून मला चांगला वाटला म्हणून...पण मग तुम्हीच असे बोलणार का आता... राधा जरा वैतागुन म्हणाली.
बरं बाई, अन तुला खरं सांगायचे तर आम्हाला दोघांनाही तुझा स्वभाव पाहता, वाटलेच होते की तू हयांनाच होकार देणार.शेवटी मुलाचे कर्तृत्व महत्वाचे...
मी फोटो पाहिला आहे त्यांचा स्मार्ट आहे आमचे जावईबापू....
यावर राधा गोड हसली अन तिने रोहित बद्दल आईला सांगितले.
पण तरी काळजी वाटते ग, आई आहे मी.ते म्हणतात ना, बाकी सर्व सोंग करता येते पण पैशाचं सोंग नाही घेता येत. सोपे नसते सर्व निभावून नेणे....
आई काळजी नको करुस, अन काही वाटलेच तर तू आहेसच की माझे मनोबल वाढवण्यासाठी....
आईने तिला मायेने जवळ घेतले अन होकार दर्शवला. मला खात्री आहे, तू प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहशील.
हो, आम्ही तर सदैव असणार तुझ्या सोबत...
पण बाबा ऐकतील का? राधाने टेन्शनमध्ये येत विचारले.
तसे आईने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला...अग आम्हीही लग्नानंतर बरेच वर्ष कष्ट करून हे स्वतःचे हक्काचं घर घेतले. त्यामुळे मी समजवून सांगेल त्यांना..तू नको काळजी करू...बस तुझा जोडीदार एक माणूस म्हणून चांगला हवा.. इतकीच अपेक्षा .. कोणत्याही नात्यात आकडे आले तर गणित हे चुकणारच...
तशी राधा खुश झाली.
रोहितने घरी सांगितले, त्याच्या घरचे तर विशेष खुश होते. त्यांना वाटले होते की रोहित आता तरी डोक्यातले व्यवसाय करण्याचं खूळ काढेल.रोहितही पूर्वीपेक्षा खुश राहत होता. इकडे रोहित नोकरी करता करता काही छोटे मोठे प्रोजेक्ट्ससाठी जास्त प्रयत्न करत होता अन बनवून विकत होता.
एकदिवस रोहितचे बाबाही त्याला म्हणाले,
नोकरीचे जमले तर बघ दुसरीकडे, दुसऱ्याची मुलगी येणार आता आपल्या घरी, आपल्या घरची लक्ष्मी बनून. तिला काही कमी पडायला नको याची जबाबदारी आता तुझी...
रोहितने यावर होकारार्थी मान हलवली. बाबा तुम्ही नका काळजी करू,मी नीट करेल सर्व.
राधा अन रोहित ने आपापल्या घरी आपले निर्णय कळवले दोघांच्या निर्णयामुळे सर्वजण खुश होते.दोघांच्या घरचे एकमेकांना भेटले अन रीतसर बोलणी झाली. दोघांचं नवं नातंही हळूहळू छान आकार घेत होतं.
काही दिवसातच त्यांचा साखरपुडा पार पडला अन पाच महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला गेला .
साखरपुडा खूपच थाटामाटात पार पडला.रोहितला खरंतर साधेपणा आवडत असे. त्याला तर कोर्टमॅरेजच करायचे होते... पण राधासाठी तो गप्प होता. राधाला आवडत असेल तर, उगाच माझ्यामुळे तिने तडजोड करू नये असे त्याचे मत होते.
एकदिवस राधा कंपनीतून निघत असतांना रोहितने तिला फोन केला.
बोल..
निघालीस का?
हो निघतेय लगेच.. काय रे, काय झाले?
मी येतोय ... तिथेच थांब.. बोलून लगेच त्याने फोन बंद केला.
राधाला काही कळेना... तिला तो जरा रागातच वाटला .
पाचच मिनिटात तो तिथे हजर झाला. काय झाले? राधाने विचारलं.
हो मी खूप चिडलोय तुझ्यावर...मी आज दिवसभर वाट पाहतोय तुझ्या फोनची..
आपण बोललोय की ब्रेकमध्ये... मग?
हो पण सकाळी बोललीस गाडी बिघाडलीय अन बसने आलीस... सकाळी ठीके मी कंपनीत असेल म्हणून नाही सांगितले, पण मला अपेक्षा होती की तू आत्ता हक्काने मला बोलवून घेशील.घरी सोडवायला सांगशील. मी दिवसभर वाट पाहतोय तुझ्या फोनची.तो वैतागून बोलत होता.
आता मात्र राधाला हसू आले.हाच स्वभाव आवडला होता त्याचा... सॉरी, मला वाटले तुला उगाच का त्रास द्यायचा... मला माहितीये तू काही प्रोजेक्ट्सचे काम करत असतोस.
अग पण फोन करुन विचारायचं तरी मला... एकतर माझ्या शिफ्ट असल्यामुळे आपल्याला जास्त भेटायलाही जमत नाही...
ती लगेच त्याच्या बाईकवर बसली.
ठिक आहे, आत्ता सांगते हक्काने आधी काहीतरी नाश्ता करू अन मग मला घरी सोड, प्लीज....
ओके, दॅट्स लाईक माय गर्ल....तोही हसतच म्हणाला, दोघेही निघाले.
असेच अधूनमधून दोघेही भेटत होते.एकमेकांना समजून घेत होते.. त्यांचे नातेही हळूहळू बहरत होते.
तीन महिने राहिले होते आता फक्त..राधाच्या घरी आता सर्व तयारी जोरदार चालू होती. लग्नासाठीचा हॉलची बुकिंग, इतर किरकोळ खरेदी, इतर तयारी .... राधाही तिच्या बाबांना जमेल तशी मदत करत होती.
असेच एकदिवस राधा बाबांना म्हणाली, बाबा किती दगदग होतीये तुमची.फक्त माझ्यामुळे...मला खूप वाईट वाटते.मागच्याच महिन्यात बीपी वाढल्याने तुम्ही ऍडमिट होतात, नीट आरामही नाही मिळाला तुम्हाला.. अन तिचे अश्रू ओघळले.
बाबांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. अग वेडाबाई, मी एकदम ठणठणीत आहे आता.... हा त्रास असतो का? मुलींसाठी प्रत्येक बाप हे कर्तव्य अगदी आनंदाने पार पाडतो.. माझी लाडाची लेक आता सासरी जाणार, मी तर अगदी राजेशाही समारंभ करणार आहे हा... कुणाला नाव ठेवायला जागाच नाही ठेवणार...
बाबा खरं सांगा, रोहितच्या घरच्यानी सांगितले का असे काही...
नाही ग बेटा, तू ना अगदी तुझ्या आई ची कॉपी आहेस, खूप विचार करतेस छोटया गोष्टींचा... माझी एकुलती एक लेक आहे माझेही काही स्वप्न आहेत ना? तुझ्यानंतर तुझा भाऊ आहे जो की अजून शिकतोय..त्यालाही बराच वेळ आहे अजून...पैशाची काही कमी नाही.मी अन तुझ्या आईने अगदी तुझ्या जन्मापासून तुझ्या भविष्यासाठी तरतूद केलीये ..मग तू उगाच चिंता करू नकोस..
राधा यावर फक्त हसली. पण तरी तिला त्यांचे म्हणणे फारसे पटले नाहीच. कारण इतक्या कष्टाने अन इतक्या वर्षापासून यांनी माझ्यासाठी कमवलेले, बचत केलेले पैसे असे एका दिवसात खर्च करायचे. मलाही हौस आहे अन असतेच मान्य पण त्यासाठी असा मोठेपणा हवाच का अन या सर्वात लग्न, प्रत्येक विधी संस्कार महत्वाचा.ती बराच वेळ विचार करत राहिली.
लग्नाची तयारी चालू असतांना राधाच्या डोक्यात एक कल्पना आली अन आज तिने रोहित ला भेटायला बोलावले.आतातर ते अगदी सहजपणे आपली मते मांडायचे.
कायग इतक्या घाईत बोलावले, तू ठिक आहेस ना?
हो खूप महत्वाचे काम आहे.मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते , मला सांग तुला लग्न कसे व्हायला हवे...मोठा समारंभ हवा की आटोपशीर कार्यक्रम हवा.?
माझे असे काही नाही... मलातर थोडक्यातही चालेल...पण तुझी हौस असेल तर... म्हणून मी गप्प बसलो.
त्याचे बोलणे ऐकून राधाच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली.खरंच आपले विचार खूपच जुळतात, देवाची खूप आभारी आहे मी की तू माझ्या आयुष्यात आलास. मग दोघांनीही बराच वेळ बोलून ठरवलं की लग्न अगदी साधेपणाने होईल,खूप झकपक नसेल. सर्व विधी होतील त्यात अगदीच जवळच्या अन मोजक्या नातेवाईकांना आमंत्रण असेल. असेही दोन्ही कडचे लोक निम्मा निम्मा खर्च करणार असे पूर्व बैठकीत आधीच ठरले होते. मग बाकी रकमेतून काही रक्कम एखाद्या सामाजिक संस्थेला देऊया अन काही रक्कम त्यांच्याच भविष्यासाठी राखून ठेवायची त्यांनी ठरवलं.
तुझी कल्पना खूप छान आहे. खरच थँक्स, मी तर इतका विचारही केला नव्हता. म्हणजे माझी इतकीच अपेक्षा होती की लग्न साधेपणाने व्हावे. हो पण भविष्याची काळजी तू नको करुस. मी तुला काही कमी पडू देणार नाही. रोहित
यावर गोड हसली अन म्हणाली. हो माझा विश्वास आहे तुझ्यावर पण भविष्याची काळजी म्हणून नाही तर एक तरतूद म्हणून असावे पैसे. त्या एका दिवसात आवाजवी खर्च करण्यापेक्षा तेच पैसे आत्ता फिक्स मध्ये ठेवून जेव्हाही आपण आपले स्वतःचे घर घेऊ त्याकरिता वापरू शकतो.संसार वाटतो तितका सोपा नक्कीच नसतो असे माझी आई नेहमी म्हणते.
हो तेही आहेच की.अन एक सामाजिक कार्य म्हणून त्यादिवशी आपण एखाद्या संस्थेला अन्नदान देऊ शकतो.काही महिन्यासाठीचे धान्य पुरवू शकतो.
नक्कीच.
चला मग निघूयात. आता घरच्यांना तयार करावे लागेल यासाठी, म्हणून दोघेही हसले अन निघाले.
दोघांनीही आपापल्या घरी समजावून सांगितले. घरच्यांना तर अभिमान वाटला त्यांचे विचार ऐकून.सर्वजण तयार झाले.
काहीच दिवसात त्यांचा शुभविवाह पार पडला. राधाच्या वडिलांनी लग्नासाठी एक छानसे आकर्षक हॉटेल घेतलेलं. अगदी 50 लोकांमध्ये त्यांचा शुभविवाह आनंदात पार पडला. रोहित अन राधा दोघेही आज खूप खुश होते.दोघेही आज लग्नबंधनात अडकले. आता त्यांना हे रेशमी नाते अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत टिकवायचं होते.
अगदी सुरुवातीलाच रोहितची आई दोघांना म्हणाली , सांभाळून घ्या एकमेकांना .दोघेही सुखाचा संसार करा.एकमेकांना समजून घ्या. आम्ही गावालाच राहणार कायम पण काही सणावाराला एकत्र येऊ तेवढेच.कधी काही लागले,आमची गरज लागली तर मात्र निसंकोचपणे सांगा.
दोघांनी फक्त होकार दर्शवला.
सर्व करा पण स्वतःच्या हिमतीवर, जिद्दीने करा. आमची गरज कमीच पडावी ही अपेक्षा.मग जास्त आनंद होईल आम्हाला. रोहितचे बाबा म्हणाले. ते जरा जोर देतच बोलले शेवटचं वाक्य.
सुनबाई माझ्या मुलाची काही तक्रार असेल तर मला सांग फोन करून. मी चांगलाच समजावेल त्याला...
त्यांना खरतर मुलाकडून खूप अपेक्षा होत्या.तो त्या पूर्ण करू शकत नाही असेच त्यांना वाटे . ते साधे एका गावात शिक्षक होते. जेमतेम पगार होता. तिथेच थोडी शेती होती. त्यामुळे तिथेच गावाकडे ते राहत. पण मुलाने मात्र शहरात राहावे, छान अशी नोकरीच करावी. महिन्याची मिळकत फिक्स राहते, नफा अन तोट्याचे गणित मांडावे लागत नाही. आपण मराठी माणसं काय व्यवसाय करणार... गावात लोकही त्यांना मुद्दामून रोहितवरून टोमणे मारत अन त्यामुळे त्यांचा सर्व राग रोहितवर निघत असे.
तुम्ही दोघेही निश्चिन्त राहा... तुम्ही तुमची काळजी घ्या. राधा त्यांना आश्वस्थ करत म्हणाली.
दोघेही काही दिवस राहून परत गावी गेले.
दोघांचाही संसार अगदी सुखाने चालू होता. दोघेही समंजस असल्यामुळे मतभेद झाले तरी जास्त टिकत नसे.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा