नाते जुन्या मैत्रीचे
ईशा आणि अमन लहानपणापासूनचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजमध्ये दोघे नेहमी एकत्र असायचे. हसणं, बोलणं, गप्पा सगळं शेअर करायचे. ईशाच्या मनात मात्र एक गुपित होतं. तिला अमन आवडत होता… पण तिने कधीच त्याला सांगितलं नव्हते .
अमनला ईशा आवडायची पण फक्त एक जिवलग मैत्रीण म्हणून.

काळ पुढे सरकत गेला. अमनचं मामाच्या मुलीसोबत लग्न ठरलं आणि झालंही. त्याच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललं होतं. दोघं खूप आनंदी होते.
ईशा मात्र अजूनही अविवाहित होती. तिची आई आजारी होती, त्यामुळे ती नोकरी करत घरही पाहायची. लग्नाचा विचार तिने मागे टाकला होता. पण मनाच्या कोपऱ्यात अमनचं स्थान अजूनही होतं… विसरायचा प्रयत्न केला, पण शक्यच झालं नाही.

एक दिवस अमन वडिल होणार असल्याची बातमी समजली. तो खूप आनंदी होता.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
डिलिव्हरीनंतर त्याची पत्नी या जगात राहिली नाही.
अमनच्या आनंदावर काळोख पसरला. छोटा बाळ हातात होतं, पण डोळ्यांत पाणी होत. आईही वृद्ध होती, बाळाची काळजी घेणं तिच्या आवाक्याबाहेर होतं.

त्याच काळात ईशाचंही जग उद्ध्वस्त झालं. तिची आईही गेली. ती पूर्णपणे एकटी झाली होती.
एके दिवशी अमन आणि ईशा पुन्हा भेटले, अगदी योगायोगाने. अमनच्या डोळ्यांत थकवा होता, पण मनात ओळखीचं आपलेपण उमटलं., दोघांनी गप्पा केला. एकमेकांना विचारले.. कसे काय चालू आहे? ईशाने सगळं सांगितले.. अमन काही बोलला नाही..

ईशा घरी चालते का? अमन एवढाच म्हणाला..
ईशाने पण होकार दिला..
अमन ईशाला घरी घेऊन गेला. छोटं बाळ अखंड रडत होतं. आईच्या प्रयत्नांनंतरही काही फरक पडत नव्हता.

ईशाने बाळ उचललं. प्रेमाने जवळ घेतलं, त्याला हळूवार गात राहिली, हाताने हलवत फेऱ्या मारल्या. थोड्याच वेळात बाळ शांत झालं आणि तिच्या कुशीत झोपलं. अमन आणि त्याची आई स्तब्ध उभे राहिले, जणू घरात पुन्हा जीवन परतलं होतं.
थोड्याच वेळाने अमनच्या आईने विचारलं,
“ईशा… तू आमचं बाळ सांभाळशील का? अमनसोबत लग्न करशील का?”

ईशा काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने अमनकडे पाहिलं.
अमन नजरेतून सगळं बोलून गेला.
अमन नजरेतून सगळं बोलून गेला.
“अमन… तू करशील का माझ्यासोबत लग्न?”
अमन शांतपणे म्हणाला, “ईशा, हे नातं फक्त जबाबदारीचं नाही, मनाचं आहे. हो… करतो तुझ्याशी लग्न.”

काही दिवसांनी साध्या विधीत दोघांचं लग्न झालं.
त्या छोट्या बाळाच्या हसण्यात आता दोघांनाही नवीन आयुष्य दिसू लागलं.

नातं जुना मैत्रीचं, पण आता त्याला नाव मिळालं होतं
"नाते तुझे माझे."
"नाते तुझे माझे."