Login

नाते जुळले ( अंतिम भाग )

पण रोहिणी?तिचं काय?तिला सत्य कळल्यावर ते शक्य नव्हतं.उलट दोघांचा संसार मोडाण्याची शक्यता जास्त होती.तिला अंधारात ठेवणं मीनलला मान्य नव्हतं आणि दोघांचा संसार मोडू नये असंही तिला मनापासून वाटत होतं.खूप विचार करुनही दोघांनाही कुठलाच मार्ग सापडलेला नव्हती.ती दोघांची शेवटची भेट ठरली.अकस्मात नसलं तरीही मिनलच जाणं सगळ्यांसाठीच मन विषण्ण करणारं होतं.काय चाललय ते न कळून भेदरून रडणारी अमृता साधना आणि रोहिणी मावशीला चिटकुन बसलेली होती.'झोपलेल्या आपल्या आईला सगळेजण मिळून कुठेतरी घेऊन जात होते आणि आईसुद्धा कितीही आवाज दिले तरी काही न बोलता आपल्याला सोडून निघून कुठे आणि गेली?ती कधी येणार?' असे अनेक प्रश्न ती विचारत होती.तिला उत्तर न देता प्रत्येकजण रडतच होता त्यामुळे ती बिचारी अजूनच बावरली होती.समर साधनामावशी आणि अमृताला घरी घेऊन आला रोहिणीने तिला प्रेमाने खाऊ घालून झोपवलं होतं.समर आपल्या खोलीत रडत बसलेला होता.रोहिणीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो तिच्या कुशीत शिरला. नेहेमी अगदी स्ट्राँग आणि प्रॅक्टिकल असणारा आपला नवरा असा ओक्साबोक्शी रडतो आहे हे तिच्यासाठी नवल होतं.रडत रडतच समरने तिला सत्य सांगितलं.रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकली.ती निश्चल बसून होती.तिचे डोळे वाहत होते.आता निर्णय सर्वस्वी तिचा होता.तितक्यात अमृताची हाक ऐकू आली.पण रोहिणी तशीच बसून होती.अमृता खोलीत आली."माऊ,माऊ मला सोडून का गेली तू?" "थांब अमृता,खबरदार मला यापुढे माऊ म्हणालीस तर" रोहिणीच बोलणं ऐकून समरच्या काळजात चर्र झालं.'आता मात्र आपला संसार मोडणार.अमृताचं कसं होणार?घाबरेल पोर' असे अनेक विचार त्याच्या मनात घाव घालत होते.तितक्यात अनपेक्षित घडलं.रोहिणीने अमृताला कुशीत घेतलं."अग आता माऊ नाही म्हणायचं.मला आई म्हणायचं.आजपासून मीच तुझी आई."दोघींना बघून समरने डोळे पुसले.एक नवं गोड नातं आकार घेत होतं.
इकडे मीनलवर अबोर्शन करायची जबरदस्ती तिच्या सावत्र आईने केली तेव्हा ती घरातून पळून आपल्या मावशीकडे गेली.आता तिला फक्त साधनामावशीचा आधार होता आणि तिला वाटत होता असा आधार मावशीने मीनलला दिला.दिवस भरले आणि गोंडस अमृता तिच्या आयुष्यात आली आणि तिचं आयुष्य बदलून गेलं.मावशीच्या मदतीने यशाच्या पायऱ्या चढत आज मीनल एक यशस्वी मॅनेजर होती.साधनामावशी एकटीच होती त्यामुळे एकमेकींच्या आधाराने त्यांचं आयुष्य आनंदात चाललं होतं.आणि अचानक काळाने घाव घालावा तसं हे जीवावरच दुखणं मीनलच्या नशिबी आलं होतं.समरला मिनलच्या मृत्यूची बातमी खोटी आहे हे समजल्यावर त्याने तिला शोधण्याचा जीवापाड प्रयत्न केला पण काहीच पत्ता लागला नाही.शेवटी तिची इच्छा पूर्ण करायची म्हणून त्याने अविरत परिश्रम घेतले आणि एक निष्णात डॉक्टर म्हणून त्याची ओळख झाली.आई वडिलांच्या इच्छेखातर त्याने रोहिणीशी लग्न केलं.अतिशय सालस गोड स्वभावाची रोहिणी त्याच्या आयुष्यात आली आणि समर पुन्हा एकदा आनंदाने राहायला लागला होता.सगळी सुखं पायाशी लोळण घालून होती पण खूप प्रयत्न करूनही रोहिणी आई होऊ शकत नाही ही खंत त्यांच्या संसाराला गालबोट लावून होती.निराश झालेली रोहिणी आपला वेळ घालवण्यासाठी पाळणाघर चालवत होती.त्या निरागस मुलांना माया लावताना तिची सल जरा कमी व्हायची.
समरला इतक्या वर्षांनी मीनलला बघून खूप आनंद झाला होता.पण तिचे रिपोर्ट्स बघून त्याच्या हृदयात कालवाकालव झाली.अमृताने त्यालाही खूप जीव लावला होता.तो मीनलची खूप काळजी घेत होता.रोहिणी सुद्धा मिनलची परिस्थिती ओळखून होईल तशी मदत करत होती.अमृताचा तिला खूप लळा लागला होता.मीनलची अवस्था काही ठीक नव्हती.दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती.समर आणि निशा डॉक्टर असून स्वतःला खूप असाहाय वाटत होतं.
एक दिवस मीनलने एकांतात समरला भेटायला बोलावलं.
"आता काय ठरवलं आहेस तू मिनू?अमृताची काहीतरी सोय करायला हवी.तिच्या वडिलांबद्दल तू काहीच सांगितलं नाहीस कधी.कोण आहे तो?मला सांग मी भेटेन त्याला.
खरंतर मला आणि रोहिणीला तिला दत्तक घ्यायची इच्छा आहे तुझी तयारी असेल तर सांग."समर म्हणाला.मीनलला तिच्या तब्येतीबद्दल खरं कळलं होतं त्यामुळे आता सत्य स्वीकारावेच लागणार होते.
"त्याची काही गरज नाही.तुला खरंच माहिती करून घ्यायचं आहे अमृताच्या वडिलांचं नाव?तर ऐक त्याचं नाव आहे समर जहागीरदार."
"काय?अमृता माझी मुलगी?खरं सांगते आहेस तू?आमु माझी लेक?म्हणूनच इतकं प्रेम वाटतं तिच्याबद्दल.पण हे काहीच कसं कळलं नाही मला?एकटीने भोगलास तू सगळं.मला माफ कर मिनू,मला माफ कर."समरने आणि मिनलने सुद्धा मग काय काय झालं ते एकमेकांना सांगितलं.दोघांचीही डोळ्यातून अश्रू ओघळले. नियतीने त्याची भेट इतक्या वर्षांनी घडवली पण ती सुद्धा अवघ्या काही दिवसांसाठी.
सत्य परिस्थिती समजून समरने अमृताला दत्तक घ्यायचा विचार केला होता.
पण रोहिणी?तिचं काय?तिला सत्य कळल्यावर ते शक्य नव्हतं.उलट दोघांचा संसार मोडाण्याची शक्यता जास्त होती.तिला अंधारात ठेवणं मीनलला मान्य नव्हतं आणि दोघांचा संसार मोडू नये असंही तिला मनापासून वाटत होतं.खूप विचार करुनही दोघांनाही कुठलाच मार्ग सापडलेला नव्हती.
ती दोघांची शेवटची भेट ठरली.अकस्मात नसलं तरीही मिनलच जाणं सगळ्यांसाठीच मन विषण्ण करणारं होतं.काय चाललय ते न कळून भेदरून रडणारी अमृता साधना आणि रोहिणी मावशीला चिटकुन बसलेली होती.'झोपलेल्या आपल्या आईला सगळेजण मिळून कुठेतरी घेऊन जात होते आणि आईसुद्धा कितीही आवाज दिले तरी काही न बोलता आपल्याला सोडून निघून कुठे आणि गेली?ती कधी येणार?' असे अनेक प्रश्न ती विचारत होती.तिला उत्तर न देता प्रत्येकजण रडतच होता त्यामुळे ती बिचारी अजूनच बावरली होती.समर साधनामावशी आणि अमृताला घरी घेऊन आला रोहिणीने तिला प्रेमाने खाऊ घालून झोपवलं होतं.
समर आपल्या खोलीत रडत बसलेला होता.रोहिणीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो तिच्या कुशीत शिरला. नेहेमी अगदी स्ट्राँग आणि प्रॅक्टिकल असणारा आपला नवरा असा ओक्साबोक्शी रडतो आहे हे तिच्यासाठी नवल होतं.रडत रडतच समरने तिला सत्य सांगितलं.
रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकली.ती निश्चल बसून होती.तिचे डोळे वाहत होते.आता निर्णय सर्वस्वी तिचा होता.तितक्यात अमृताची हाक ऐकू आली.पण रोहिणी तशीच बसून होती.अमृता खोलीत आली.
"माऊ,माऊ मला सोडून का गेली तू?"
"थांब अमृता,खबरदार मला यापुढे माऊ म्हणालीस तर" रोहिणीच बोलणं ऐकून समरच्या काळजात चर्र झालं.
'आता मात्र आपला संसार मोडणार.अमृताचं कसं होणार?घाबरेल पोर' असे अनेक विचार त्याच्या मनात घाव घालत होते.तितक्यात अनपेक्षित घडलं.रोहिणीने अमृताला कुशीत घेतलं.
"अग आता माऊ नाही म्हणायचं.मला आई म्हणायचं.आजपासून मीच तुझी आई."
दोघींना बघून समरने डोळे पुसले.एक नवं गोड नातं आकार घेत होतं.

🎭 Series Post

View all