Login

नाते जुळले ( भाग 2 )

हॉस्पिटलमध्ये ती काम करायला लागली.हळूहळू ती सगळ्यांची लाडकी झाली.कुठल्या रूग्णांना औषध द्यायचं असो,ऑफिसच कुठलं काम असो की कोणाला खूप त्रास होत असो मीनल सगळ्यांना मदत करायची.तिच्या गोड बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे कोणालाही ती पटकन आवडून जायची.त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकीच शिक्षण घेणारी मुलं नेहेमीच शिकायला यायची.तिकडेच तिची समरशी ओळख झाली.सगळा भेद विसरून दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते दोघांनाही कळलं नाही.समरच शिक्षण पूर्ण होऊन तो सेटल झाला की लग्न करायचं असं दोघांनीही ठरवलं होतं.हट्टाने त्याने मीनलला शिक्षण पूर्ण करायला तयार केलं होतं.ती खूप मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी व्हावी असं त्याचं स्वप्न होतं.दोघांच्याही घरच्यांना कुणकुण लागली होती.अर्थातच दोन्ही घरात त्यांचं प्रेम मान्य नव्हतं पण जास्त घाई न करता काही वर्ष थांबायचं आणि मग लग्न करायचं त्यांनी ठरवलं होतं.समरला पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं.मीनलने जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला.तो जाण्याआधी भावनेच्या भरात गुपचूप दोघांनी मंदिरात लग्न केलं.घरच्यांना काहीच माहिती नव्हतं.दोघं कधीच एकमेकांचे झाले होते.
मिनलने तिचे हात हातात घेऊन तिला निक्षून विचारले.तेव्हा कुठे तिने बोलायला सुरुवात केली.तिचे डोळे भरून आले होते.आपल्याला काहीतरी भयंकर झालंय हे मीनलला समजलं होतं.
"मीनल,मी काय सांगतेय ते नीट ऐक.पण कुठलाही अविचार करणार नाहीस आणि माझं सगळं ऐकशील असं वचन दे.हे बघ तुला कॅन्सर आहे गर्भाशयाचा.त्यामुळेच हा त्रास होतो आहे.पण आपण करू उपचार.त्रासदायक आहे पण होईल ते सगळं करू आपण.वेळ गेलेली नाही.तू बरी होशील."निशाच्या बोलण्यात अविश्वास होता.तिची नजर काहीतरी वेगळंच सांगत होती.
"मला काहीतरी भयंकर झालंय याची जाणीव होतीच ग पण का झालं असं?मी काय पाप केलं ग?गर्भाशय काढून टाक ना माझं म्हणजे सगळं ठीक होईल.चल लगेच करून टाक ऑपरेशन.होईल ना ग मी बरी?मला जगायचंय ग माझ्या मु साठी मला जगायचं आहे.तिचा आधार बनायचं आहे.खूप मोठी डॉक्टर करायचं आहे तिला अगदी तुझ्यासारखी.खूप मेहेनत करायची आहे .तिच्यासाठी बरं व्हावच लागेल मला."
तिचं बोलणं ऐकून निशाचे अश्रू अनावर झाले.इतकी मोठी डॉक्टर पण मीनलच्या कुशीत शिरून अश्रू ढाळत होती.त्यावरून मीनलला काहीतरी भयंकर असल्याचा अंदाज आला.
"निशा,खरं सांग.किती वेळ आहे माझ्याकडे?तूझ्या काव्यची शपथ आहे तुला."
"फार नाही ग.फार फार तर दोन वर्ष.मी तुला सांगणार नव्हते ग पण तू शपथ दिलीस.खूप प्रयत्न केले मी आणि समरने सुद्धा पण जेव्हा तू माझ्याकडे आलीस तेव्हाच परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती.मला माफ कर,मीनल एक डॉक्टर म्हणून आज मला हे तुला सांगावं लागतं आहे.पण आपण अजूनही प्रयत्न करूच.माझ्यावर विश्वास आहे ना?"निशाने शेवटी दुःखाचा डोंगर उघड केला.
मीनलच्या पायाखालची जमीन सरकली.तिच्या डोळ्यापुढे तिची इवलिशी अमृता आली.घरभर नाचणारी.गोड गोड बोलणारी.सारखी आपल्या मागे मागे फिरणारी.
"देवा!काय हा दिवस दाखवलास?ज्या लेकीसाठी इतकं काही सहन केलं,तिच्यासाठी जगले आता तिला सोडून कशी जाऊ?अजून चिमुरडी आहे रे ती.कशी जगेल माझ्याशिवाय?फक्त दोन वर्ष दिलीस मला?निदान अजून काही वर्ष तरी दे रे.माझी आमू थोडी मोठी होईपर्यंत तरी वेळ द्यायचा ना मला?इतका क्रूर कसा होऊ शकतोस तू देवा..."मीनलचा बांध फुटला.
सत्य स्वीकारणं अवघड असलं तरीही त्याशिवाय पर्याय नव्हता.दिवस जात होते.मीनल चांगली कमावत होती तिची इन्शुरन्स पॉलिसी चांगली होती त्यामुळे ट्रीटमेंटच्या खर्चाची काळजी नव्हती.आणि नंतरची सुद्धा पैशांच्या दृष्टीने काळजी नव्हती पण पण आपली इतकी लहान लेक कशी राहील?कोणाच्या आधारावर जगेल?या काळजीने तिला जास्तच पोखरल होतं.नकळत तिचं मन भूतकाळात हरवलं.
लहानपणीच आई मीनलला सोडून गेली.तिची सावत्र आई आधी तिच्यावर माया करायची पण नंतर मात्र तिने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली.तिचा जाच सुरू होता त्यातच अपघातात तिच्या बाबांचं छत्रही हरवलं.जात्याच समजूतदार असलेली मीनल परीस्थितीमुळे अजूनच शहाणी झाली.शिक्षण फारसं झालेलं नव्हतं पण नोकरीची मात्र खूप गरज होती.एका हॉस्पिटलमध्ये ती काम करायला लागली.हळूहळू ती सगळ्यांची लाडकी झाली.कुठल्या रूग्णांना औषध द्यायचं असो,ऑफिसच कुठलं काम असो की कोणाला खूप त्रास होत असो मीनल सगळ्यांना मदत करायची.तिच्या गोड बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे कोणालाही ती पटकन आवडून जायची.त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकीच शिक्षण घेणारी मुलं नेहेमीच शिकायला यायची.तिकडेच तिची समरशी ओळख झाली.सगळा भेद विसरून दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते दोघांनाही कळलं नाही.समरच शिक्षण पूर्ण होऊन तो सेटल झाला की लग्न करायचं असं दोघांनीही ठरवलं होतं.हट्टाने त्याने मीनलला शिक्षण पूर्ण करायला तयार केलं होतं.ती खूप मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी व्हावी असं त्याचं स्वप्न होतं.दोघांच्याही घरच्यांना कुणकुण लागली होती.अर्थातच दोन्ही घरात त्यांचं प्रेम मान्य नव्हतं पण जास्त घाई न करता काही वर्ष थांबायचं आणि मग लग्न करायचं त्यांनी ठरवलं होतं.समरला पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं.मीनलने जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला.तो जाण्याआधी भावनेच्या भरात गुपचूप दोघांनी मंदिरात लग्न केलं.घरच्यांना काहीच माहिती नव्हतं.दोघं कधीच एकमेकांचे झाले होते.
मीनलने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं.दोन महिने गेले आणि जे व्हायला नको तेच घडलं.मीनलला दिवस गेले होते.आता काय करायचं म्हणून तिच्या घरचे समरच्या घरी गेले.पण त्यांनी मीनलला दोष देऊन घरातून बाहेर काढलं.इकडे मीनलच्या आईने तिचा तिला घरात डांबून ठेवलं आणि समरच्या घरच्यांनी मीनलचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्याची खोटी बातमी त्याला सांगितली.आणि तो सैरभैर झाला.तो गावी आला तेव्हा त्याच्या आईने मुद्दाम समरचा फोन काढून घेतला.तिच्या आठवणी नको म्हणून त्याला नंबरसुद्धा बदलायला लावला.त्याला शपथ घालून परत पाठवलं.

पुढे काय होईल ? मीनल आपल्या बाळाला जन्म देईल का ? दोघांच्या प्रेमाचं काय होईल ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा .

🎭 Series Post

View all