Login

नाते जुळले

हॉस्पिटलच्या त्या जीवघेण्या उपचारांना मीनल खरंतर खूप वैतागली होती.नको वाटायचे ते त्रास त्यापेक्षा देवाने आपल्याजवळ बोलावलेले बरे असे वाटायचे तिला.पण आपल्या लेकीला बघितले की नव्या उर्मीने ती उपचार घ्यायला जायची.आजकाल जास्तच त्रास व्हायचा तिला.'असला कसला आजार दिलास रे देवा तू मला?माझा नाही पण माझ्या अमुचा तरी विचार करायचास ना?त्या निरागस जीवाने कोणाकडे बघायचं?काय होतंय काहीच कळत नाही.आज डॉक्टरांना खरं काय ते विचारायचच.'मीनल विचारांमध्ये हरवली होती.तितक्यात डॉक्टर निशा आल्या.अतिशय निष्णात डॉक्टर निशा मीनलची अगदी खास मैत्रीण होती."काय म्हणतोय आमचा पेशंट?अमु काय म्हणतेय?""हे बघ निशा,आता बास झालं.किती दिवस लपवणार आहेस माझ्यापासून?दरवेळी काहीतरी उडवा उडवीची उत्तरं देतेस.परवा त्या मोठया डॉक्टरकडे पाठवले होतेस ना माझे रिपोर्ट ते काय म्हणाले?आज खरं काय ते कळलं पाहिजे मला."ती काही बोलणार इतक्यात डॉक्टर समर तिकडे आले.पूर्ण भारतात एक्स्पर्ट म्हणून त्यांचा नावलौकिक होता.म्हणून निशाने त्यांना सेकंड ओपिनियनसाठी बोलावलं होतं.ते येताच निशा बाहेर आली.दोघांचं बराच वेळ बोलणं सुरू होतं.मीनल आतुरतेने वाट बघत होती.शेवटी न राहवून ती बाहेर आली.निशा खूप टेन्शनमध्ये वाटत होती.समोर समरला बघून ती स्तब्ध झाली.त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती.

©®स्मिता भोस्कर चिद्रवार.

नाते जुळले

हॉस्पिटलच्या त्या जीवघेण्या उपचारांना मीनल खरंतर खूप वैतागली होती.नको वाटायचे ते त्रास त्यापेक्षा देवाने आपल्याजवळ बोलावलेले बरे असे वाटायचे तिला.पण आपल्या लेकीला बघितले की नव्या उर्मीने ती उपचार घ्यायला जायची.आजकाल जास्तच त्रास व्हायचा तिला.'असला कसला आजार दिलास रे देवा तू मला?माझा नाही पण माझ्या अमुचा तरी विचार करायचास ना?त्या निरागस जीवाने कोणाकडे बघायचं?काय होतंय काहीच कळत नाही.आज डॉक्टरांना खरं काय ते विचारायचच.'मीनल विचारांमध्ये हरवली होती.तितक्यात डॉक्टर निशा आल्या.अतिशय निष्णात डॉक्टर निशा मीनलची अगदी खास मैत्रीण होती.
"काय म्हणतोय आमचा पेशंट?अमु काय म्हणतेय?"
"हे बघ निशा,आता बास झालं.किती दिवस लपवणार आहेस माझ्यापासून?दरवेळी काहीतरी उडवा उडवीची उत्तरं देतेस.परवा त्या मोठया डॉक्टरकडे पाठवले होतेस ना माझे रिपोर्ट ते काय म्हणाले?आज खरं काय ते कळलं पाहिजे मला."
ती काही बोलणार इतक्यात डॉक्टर समर तिकडे आले.पूर्ण भारतात एक्स्पर्ट म्हणून त्यांचा नावलौकिक होता.म्हणून निशाने त्यांना सेकंड ओपिनियनसाठी बोलावलं होतं.ते येताच निशा बाहेर आली.दोघांचं बराच वेळ बोलणं सुरू होतं.मीनल आतुरतेने वाट बघत होती.शेवटी न राहवून ती बाहेर आली.निशा खूप टेन्शनमध्ये वाटत होती.समोर समरला बघून ती स्तब्ध झाली.त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
"मिनू ?तू ?"
"स...समर डॉक्टर समर?"
दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं.हृदयात काहीतरी होत होतं.इतक्या वर्षांनी एकमेकांना बघून काय वाटत होतं ते काहीच समजण्यासारखी दोघांचीही अवस्था नव्हती.
"अरे,तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना?"
"हो,जुनी मैत्री आमची.पण खूपच वर्षांनी भेटतोय."समर म्हणाला.
"अरे व्वा.छानच.समर हीच तुझी नवी पेशंट.तुम्ही बोला मी आलेच."असं म्हणून निशा बाहेर गेली.
दोघेही निःशब्द होते.थोड्या वेळात समर भानावर आला.ते रिपोर्ट्स मीनलचे आहेत हे समजल्यावर मनातून तो हादरून गेला.
"कुठे होतास इतकी वर्ष?आणि आज अचानक भेटलो आपण.कधी भेटू असं वाटलंच नव्हतं रे.कसा आहेस?लग्न केलंस?"
"मी पण तुला किती आणि कुठे कुठे शोधलं?पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं."
दोघं बोलत असताना निशा परत आली.
"हे बघ अजून काही टेस्टचे रिपोर्ट उद्या येतील.तू उद्या ये आणि जमलं तर अमृताला मावशीकडे सोपवून ये काही दिवस.तुला ऍडमिट व्हावं लागेल काही दिवस.काळजी करू नकोस पण काही दिवस इकडे राहा म्हणजे काळजी नाही."निशा म्हणाली.
"अग पण काय झालंय ते सांगशील का?समर तू तरी सांग.मला काळजी वाटते आहे.अग अमू इतकी लहान आहे कशी राहील माझ्याशिवाय?"मीनल काळजीने म्हणाली.
"अग मावशीच्या घराजवळच समरच्या पत्नीच म्हणजे रोहिणीचं छानस पाळणाघर आहे.तिकडे सोड तिला.खूप छान राहील बघ अमृता तिकडे.हो ना समर?"असं म्हणून निशाने रोहिणीचा नंबर आणि पत्त्ता दिला.समरने ही तिला नक्की ये म्हणून सांगितलं.
आता मात्र मीनलचा नाईलाज झाला.ऍडमिट तर होणं जरूरी होतं आणि मावशीला दिवसभर अमृताला सांभाळणं झेपणार नव्हतं.दुसरी सोय करायची तर वेळही नव्हता.आणि समरची बायको म्हणजे विश्वासाची नक्कीच होती.दोन चार दिवस काढू कसेतरी मग बरं झालं की काही प्रोब्लेम राहणार नाही म्हणून मीनल दुसऱ्या दिवशी मावशी आणि अमृताला घेऊन समरकडे आली.
खूप मोठा बंगला होता त्यांचा.त्यातच वरच्या मजल्यावर रोहिणीचं छोटंसं पाळणाघर होतं.हसतमुख रोहिणीने अगदी प्रेमाने त्यांचं स्वागत केलं.' समरची जुनी मैत्रीण ' म्हणून मीनल आणि तिच्या मावशीचं आदरातिथ्य अगदी छान झालं.अमृताची तर रोहिणी मावशिशी अगदी लगेच गट्टी जमली.अमृता एकदम एकटी राहणार नाही म्हणून मीनलची मावशीसुद्धा तिकडे थांबणार होती.समरने मीनल बद्दल सांगितल्यामुळे रोहिणीने आनंदाने परवानगी दिली होती.अमृता आणि साधनामावशी दिवसभर राहणार होत्या आणि रात्रीचं जेवण इथेच करून जाणार होत्या.मीनल हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत अशी सोय झाली होती त्यामुळे ती निश्चिंत मानाने ऍडमिट झाली.अमृताला अर्थातच 'आई ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाणार आहे ' असं सांगण्यात आलं होतं.
मीनल ऍडमिट झाली.दोन दिवस सतत कुठल्या ना कुठल्या टेस्ट सुरू होत्या.तिला काहीच कळत नव्हतं.कोणी काहीच सांगत नव्हतं.निशा तर तिला काहीच बोलायला तयार नव्हती.सारखी गडबडीत निघून जायची.समरच ही तेच सुरू होतं.नाही म्हणायला अमृता आनंदात होती.सारखं सारखं फोनवर रोहिणी मावशीच्या गोष्टी सांगत असायची.साधना मावशी सुद्धा आनंदात होती.दोघीही ठीक आहेत हीच काय ती चांगली गोष्ट होती.पण मीनलशी मात्र कोणी काहीच बोलत नव्हतं.घरी जायचा विषय काढला की ' उद्या बघू ' म्हणून टाळलं जात होतं हे तिच्या लक्षात आलं होतं.
आठ दिवस तसेच गेले.शेवटी मीनलने ' मला निशाला भेटायचंच आहे त्याशिवाय औषध घेणार नाही ' असा घोषा लावला तेव्हा कुठे निशा आली.

काय झालं असेल नक्की ? मीनल बरी होईल ना ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा

🎭 Series Post

View all