तुझे माझे नाते, शब्दांच्या पलीकडले
न बोलता ही सगळे समजून जाणारे
कधी हसतं वाऱ्यासारखे हलके,
कधी रडतं पावसासारखे बरसणारे
तुझ्या नजरेतले भाव
माझे मन लगेच घेई ठाव
न बोलता ही सगळे समजून जाणारे
कधी हसतं वाऱ्यासारखे हलके,
कधी रडतं पावसासारखे बरसणारे
तुझ्या नजरेतले भाव
माझे मन लगेच घेई ठाव
कधी उष्ण, कधी थंड सावली छान
कधी अबोल, कधी बोलणे मनभरून
कधी दूर राहून कधी सोबत असून
समजून घेणे स्वतःहून
कधी अबोल, कधी बोलणे मनभरून
कधी दूर राहून कधी सोबत असून
समजून घेणे स्वतःहून
तुझे माझे नाते असेच कायम राहो,
प्रत्येक क्षणाला नवीन फुलासारखे फुलत राहो
देवा तुझे आभार किती मानावे ह्या नात्यासाठी
हे गोड आपले नाते जपणार मी आयुष्यभरासाठी