Login

नाती गोती हरवत चाललो आहोत का ?

Nati Goti Haravat Chalalo Ahot Ka ?
*सत्य घटना*

*मी एके दिवशी काही कामानिमित्त त्या रस्त्याने निघालो होतो. तो रस्ता होता एका हॉस्पिटलचा. माझ्या समोर एक महिला व्हीलचेअर ढकलत होती. मला नेमके त्यांच्याच दिशेने पुढे त्याच रस्त्याने जायचे होते ,त्यामुळे मी त्यांच्याजवळुनच पुढे निघत असताना सहज त्या व्हीलचेअरवर नजर पडली. त्या व्हीलचेअर वर  एक ३५ शितील युवक बसलेला होता. त्याच्या उजव्या पायाला घुडघ्या पासुन ते घोट्यापर्यंत प्लास्टर केलेलं दिसत होते. मी पुढे गेलो तोच त्या तो युवक जोरात ओरडला हळू गं ~~~ हळू ढकल ना ?*
     *तो ओरडला. तो यासाठी ओरडला होता की, त्या रस्त्यावर छोटेसे खोदकाम करून पुन्हा माती टाकून ते खोदकाम बुजलेले होते. त्यावरील काही माती निघून गेल्याने तिथे थोडा गड्डा पडला होता.*
*_त्या गड्यात व्हीलचेअर अडकली आणि त्या महिलेने रागाने जोरात झटका देऊन ती व्हीलचेअर ढकलण्याचा प्रयत्न करत जीवावर आल्यागत केल्याचे दिसत होते. ,त्यामुळे त्याच्या पायाला जोरात झटका बसून त्याला दुखापत झालेल्या जागेवर धक्का लागला असेल म्हणून तो किंचाळला होता.  तो हळू ढकल म्हणाला तेव्हढ्यात ती महिला त्याच्यावर किंचाळली जा रे ! मला नाही जमत हे,मी नाही ढकलणार, काय करायचे ते कर , मी जाते घरी. बिचारा तो युवक काकुळती ला येऊन त्याचा सुर बदलवत म्हणाला मला लागल ग.. त्यामुळे दुखले ना म्हणून बोललो की हळू ढकल. मी काही तुझ्यावर रागावलो नाही._*
   *_मग ती महिला पुन्हा जोरात ढकलत त्या व्हीलचेअर बसलेल्या त्या युवकाला अगदी रागाने ढकलत घेऊन गेली. बिचारा तसाच पुन्हा रडत रडत त्रास सहन करत होता._*
*त्यांच्या संभाषणावरून ते दोघे पती-पत्नी असल्याचे वाटत होते. हा सगळा भाग लिहिला यासाठी की वरील विषयावरून असे दिसते आहे की, नात्यातील जवळीकता ,असलेला तो ओलावा, प्रेम ,आपुलकी कोठे तरी या आजकालच्या पिढीत हरवत चालली असल्याचे दिसते आहे.*

*मी असे का म्हणतो त्याचे कारण असे की, मला दोन वर्षापूर्वीची अशीच एक आठवण त्याच वेळी झाली होती. ती म्हणजे बाँम्बे हॉस्पिटल मधील. मला माझ्या ओळखीच्या साहेबांनी तिथे जाऊन आपले एक प्रमाणपत्र घेऊन या अशी विनंती केली होती. त्या कारणाने, त्यांचे ही पायाचे ऑपरेशन झालेले होते त्यांना ते सुट्टीचे प्रमाणपत्र घेऊन कार्यालयात द्यायचे होते. त्या प्रमाणपत्रासाठी मी गेलो होतो. त्यावेळी पाहिलेले हे दुसरे चित्र मला लगेच आठवले.*
*बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एक ५० वय वर्ष पेक्षा अधिक असलेले ते काका मी बसलो होतो तिथेच अगदी माझ्या नजरे समोर हॉस्पिटल मध्ये एका बाकावर बसलेले होते.मी डॉक्टरांना भेटलो होतो मात्र डॉक्टर पेशंट तापसणी करून मी बाहेर येते नंतर तुम्हाला देते. प्लीज थोडावेळ थांबावे लागेल तुम्हाला म्हणून डॉक्टर पुन्हा कामाला लागल्यामुळे मला ही वेळ लागणार असल्याने मी येऊन बाहेर एका बाकावर बसलो.*
*त्या काकांसोबत त्यांच्या पत्नी ही होत्या. ते काका भडकून त्या काकुंशी बोलत होते. उगाच घेऊन फिरविते मला सगळीकडे. त्रास होतोय मला, तरीही एकत नाही बावळट बाई. मात्र त्या काकू अगदी शांत व स्मित हास्य करून म्हणाल्या तुम्हाला त्रास आहे हे मलाही माहिती आहे हो. तो त्रास कमी व्हावा म्हणूनच आपण डॉक्टर कडे आलोय ना. थोडा त्रास सहन करावाच लागेल. मी आहे ना तुमच्यासोबत कशाला चिडता तुम्ही एव्हढे. होईल सर्व ठिक. तुम्ही आधी थोड काहीतरी खाऊन घ्या. मग बघू काय ते, त्या काकू त्यांच्या तोंडापर्यंत घास घेऊन जायच्या.काकू त्या काकांना काही तरी खाऊ घालायच्या नादात होत्या, काका मात्र फारच रागीट व तिरसट स्वभाव व वागणूक अंगी असणारे होते. वास्तविक त्रास काकांना होता हे जरी खरे असले तरी वेदना मात्र जणू काही त्या काकूच सहन करत होत्या.*
*काका भलतेच रागीट स्वभावाचे दिसत होते. काकु मात्र त्यांच्या भडकण्यावर अगदी शांत राहून हळू आवाजात काकांना समज देत होत्या, काकांना समजून घेत होत्या. काकांच्या वेदना त्या काकू समजत होत्या. क्षणात मलाही वाटले की, काका किती नशीबवान आहेत की त्यांना सांभाळणारी जोडीदार लाभली आहे. या वेळी मला प्रसिद्धव.पू काळे सर यांच्या काही ओळी आठवल्या. ते असे म्हणतात की, बायको कशी असावी तर ऑफिसमधील टेबलावर ठेवलेले सर्व पेपर्स पंख्याच्या हवेने जोरात फडफडत असतांना ते पेपर उडून जाऊ नयेत म्हणून ठेवलेल्या त्या पेपर वेट प्रमाणे बायको हवी. माणूस कितीही भडकला तरी बायको मात्र सर्वांना सांभाळून घेणारी हवी.*
*बाँबे हॉस्पिटल मधील हा सर्व प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो.*
*तेवढ्यात किन्होळकर म्हणून मला डॉक्टर मॅडम ने आवाज दिला मी आतमध्ये गेलो, डॉक्टर मॅडमने दिलेले प्रमाणपत्र घेऊन घाईघाईत घराकडे निघालो.*

*ह्या अगदी विरुद्ध घडलेल्या दोन घटना आहेत. यांचा मेळ घालताना मला बराच वेळ खर्ची घालावा लागलाहा तेव्हा कुठे मी *_संयम_* *या विषयाखाली सर्वांच्या वाचनास येईल असे काहीतरी लिहावे या विचारातून हे मांडले आहे. विचार मनात आला व तो सर्व विषय मांडण्याचे कारण की, आजकालच्या पिढीतील संयम हरवत चालला आहे. नाती जपली जात नाही. प्रेम,आपुलकी,त्या नात्यातील तो जिव्हाळा,तो ओलावा आता हरवत चालला आहे.*
*मराठी मध्ये वर्णमाला अभ्यासताना तिथे दिसते की, लृ हा शब्द लुप्त होत चालला आहे तो फक्त काहीच शब्दांना आता उरला आहे. तसेच नात्याचे झाले आहे. ओलावा,जिव्हाळा ,प्रेम,आपुलकी हरवत चालली आहे. नाती ही व्यावहारिक झाली आहेत.*
*वरील घटना ह्या मांडतांना वेळ लागला तसेच त्या वाचतांना ही वेळ लागेल मात्र ह्या घटना अगदी एक दोन मिनिटांत घडलेल्या विषयावरून मांडल्या आहेत.*
*या वरील विषयांशी अगदी कोणाचा काहीही संबंध नाही, यातून कोणाचे मन दुःखविने हा हेतू नसून सत्य प्रकार आपल्यासमोर यावा, जागृती होणे गरजेचे आहे, हाच हेतू. हा जर कोणाशी तंतोतंत विषय जुडला तर योगायोग समजावा. मी मांडलेल्या याविषयावर जर कोणाला वाटले की काही चुकीचे लिहिले आहे जे चुकीचे वाटते ते सोडून जे योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करावा. आजकाल असे विदारक चित्र दिसते की त्यातून मनाला वेदना होतात, म्हणून जिवाच्या या वेदनेतून वरील घटना मांडल्या गेल्या आहेत.*
*पुन्हा एकवेळ विनंती की, काही चुकीचे असेल ते चुकीचे सोडून ज्यासाठी हा विषय मांडला तोच अर्थ घ्यावा.*
?????

*आपलाच विश्वासू*
*श्री.सुदर्शन प्र. किन्होळकर*
*(9403255622)*
0