नाती सांभाळताना
भाग तीन :
" मॅडम, मॅडम " च्या सहकाऱ्यांनी संयोगी ला जमिनीवर पडताना पाहिले. संयोगी चक्कर येऊन पडली होती. कल्पेश धावतच तिच्या जवळ आला, तोपर्यंत हेड कॉन्स्टेबल मंजू मॅडमने योगीच्या तोंडावर पाणी मारले. डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. अजूनही तिला गरगरत होते. कल्पेश नाही तिचे डोके मांडीवर घेतले.
संयोगी शुद्धीवर आली. काल रात्रीपासून तिला चक्कर येत होती आणि मळमळत होते. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी देखील तिने त्याच अवस्थेत स्वयंपाक केला. तिच्या सासूबाईंना सुनेने आजारी पडणे म्हणजे " काम नको " म्हणून केलेले नाटक वाटत असे. त्या बाबतीत कल्पेशच्या देखील आईच्या हातावर हात होता. संयोगिनी आजारीपणाबद्दल सांगितले की तो म्हणे, " काय धाड भरली तुला? चांगली इन्स्पेक्टर आहेस ना??? मग कशी काय आजारी पडू शकतेस? "
यावर बिचारी संयोगी मौन राहणेच पसंत करी. आता तर ती एक यंत्रमानवच होती सर्वांसाठी. सासू-सासर्यांची कामे, घरची सर्व कामे, कल्पेशची मर्जी सांभाळणे आणि ऑफिस. यापलीकडे तिचं काही अस्तित्वच राहिलं नव्हतं.
तिने तिची ही घुसमट, हा कोंडमारा माहेरी आईला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण आईने चार अनुभवाचे बोल सांगितले.
तिने तिची ही घुसमट, हा कोंडमारा माहेरी आईला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण आईने चार अनुभवाचे बोल सांगितले.
नाती जपण्यासाठी , ती टिकवण्यासाठी तडजोड स्त्रीलाच करावी लागते.
आई म्हणायची,
" नाती ही लोणच्यासारखी असतात. लोणच्या तिखट मीठ मसाला हवाच असतो, पण त्यासोबतच ती मुरण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणजे लोणचे चवदार लागते . तसेच नाते मजबूत घट्ट होण्यासाठी त्याला तडजोड ही हवी आणि वेळही हवाच. "
आईच्या याच शब्दावर विश्वास ठेवून संयोगी सहन करत होती. पण कल्पेश किंवा घरच्यांकडून मात्र प्रत्येक वेळी सहयोगीची निराशाच होत होती.
एवढे सगळे करून देखील संयोगी कशी बिनकामाची आहे, किती वेंधळी आहे, हे इतरांना सांगण्यातच ते धन्यता मानत.
अशातच सासूबाईंनी फॅमिली प्लॅनिंग करू नका असे बजावले होते. संयोगी आई होण्यासाठी अजून मानसिक दृष्ट्या तयार नव्हती. पण तिच्या मनाचा, तिच्या विचारांचा आदर करणार कोण??
आता ही पिरीयड्स वेळेवर न आल्यामुळे संयोगीला धाकधूक होतीच. चक्कर आल्यामुळे कल्पेशने संयोगी ला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टर मॅडमनी ती आई होणार असल्याची बातमी सांगितली.
आपल्या उदरात एक जीव आकार घेतो आहे या भावनेने संयोगी स्वर्ग सुखात न्हाहून निघाली.
आपल्या उदरात एक जीव आकार घेतो आहे या भावनेने संयोगी स्वर्ग सुखात न्हाहून निघाली.
बाळाची चाहूल, आई होणं, एका नव्या नात्याची सुरुवात तिला आनंदाच्या झुल्यावर झुलवत होती.
आता या नात्यामुळे सगळे बदलेल, सगळे व्यवस्थित होईल असे संयोगी ला वाटत होते. पण घरच्यांकडून तिचे डोहाळे, तिची काळजी घेणे तर दूरच परंतु गरोदरपणात जास्त हालचाल का करावी, आराम का करू नये, रिकामे कशी करावीत याचे डोस पाजले जात असत. उलटांमुळे हैरान झालेल्या संयोगिनी आराम केला तर,
" आमच्या वेळी असं नव्हतं बाई, आम्हालाही लेकरं झालीच ना.... आता तर सगळं नवलच आहे.. "
" आमच्या वेळी असं नव्हतं बाई, आम्हालाही लेकरं झालीच ना.... आता तर सगळं नवलच आहे.. "
अशी बोलणी तिला ऐकावी लागत होती.
जवळपास दोन अडीच महिने झाले होते. उद्या संयोगी ला माहेरी जायचे होते. आई चोर चोळीचा कार्यक्रम ठेवला होता. खूप दिवसानंतर माहेरी जाणार म्हणून संयोगी आनंदात होती. मध्यरात्री तिला उलट्या झाल्या, त्यामुळे सकाळी तिला जाग आली नाही.
आपल्याला उठायला उशीर झाला आहे, तिच्या लक्षात आले. थोड्या भीतीने तिने स्वयंपाक घरात पाऊल ठेवले.
आपल्याला उठायला उशीर झाला आहे, तिच्या लक्षात आले. थोड्या भीतीने तिने स्वयंपाक घरात पाऊल ठेवले.
सासुबाईंचा आवाज कमालीचा वाढलेला होता. संयोगीच्यां न उठण्यामुळे त्यांना स्वयंपाक करावा लागत होता. त्याचा राग त्या कल्पेश वर काढत होत्या.
रागाचे एक वैशिष्ट्य आहे कि, तू लगेच दुसऱ्याकडे जातो, आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. आताही संयोगी ला पाहिलं आणि कल्पेश च्या डोक्यात राग शिरला.
त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता संयोगी ला एक जोरदार झापड मारली. त्याबरोबर संयोगी फरशीवर कोसळली.
राग येताना एकटा येतो, पण त्याच्यासोबत तो संयम ,सत्सद विवेक बुद्धी संपवतो. आता ही रागाच्या भरात कल्पेश ला कशाचीही जाणीव राहिली नाही, आणि संयोगी नाटक करते आहे असे वाटून त्याने तिला लाथ मारली. एका इन्स्पेक्टरची लाथ, तीही रागाच्या भरात मारलेली . ती नेमकी संयोगीच्या पोटावर बसली.
कल्पेश, सासू-सासरे सर्व घाबरले, त्यांनी ताबडतोब संयोगिला हॉस्पिटल मध्ये नेले. तोपर्यंत रक्तस्त्राव सुरु झाला, आणि दुर्दैवाने तिचे अबोर्शन झाले. आणि ती परत कधीही आई होऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.
दोन तीन दिवसांनी तिला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. कल्पेश तिला घरी घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आला.
पण तिने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. जगातल सर्वात श्रेष्ठ नातं, तिच्यापासून हिरवलं गेलं होतं. ज्या माणसामुळे हे झालं, त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं नाही,
हा विचार करून संयोगी स्वतः च स्वतः शी असलेलं नातं निभावायला, फक्त कर्तव्यच्या दोराने बांधलेल्या नात्याला तोडून निघाली...
" आणि या वर्षीचा यंग अचिव्हर चा पुरस्कार मिळतो आहे, पी. एस. आय. संयोगी यांना..."
संयोगिचे नाव पुरस्कारासाठी जाहीर झाले. टाळ्यांचा आवाज आला तसे भूतकाळात हरवलेली संयोगी बाहेर आली.
कल्पेश ला आणि त्याच्या घराला सोडल्यापासून तिने मागच्या तीन वर्षात कौटुंबिक हिंसाचार विरोधात स्वतः झोकून देऊन काम केले होते. कितीतरी पीडित महिलांना आधार दिला होता. त्यांचे पुनर्वसन करण्यात मदत केली होती. आणि महत्वाचे म्हणजे पुरुषी अहंकार गाजवणाऱ्या विकृत पुरुषांना चांगला धडा शिकवला होता.
त्याचेच फळ म्हणून तिच्या आदर्श असणाऱ्या किरण बेदी जी यांच्या हस्ते तिचा सन्मान होत होता. कल्पेश मात्र तिच्या या सन्माना, कौतुकासाठी अपराधीपणे टाळ्या वाजवत होता...
त्याचेच फळ म्हणून तिच्या आदर्श असणाऱ्या किरण बेदी जी यांच्या हस्ते तिचा सन्मान होत होता. कल्पेश मात्र तिच्या या सन्माना, कौतुकासाठी अपराधीपणे टाळ्या वाजवत होता...
समाप्त.
©®गीतांजली सचिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा