Login

निसर्गाची किमया

निसर्गाची किमया


निसर्गाची किमया
कळलीच नाही कोणाला
कधी होतो शेवट
अन कधी होई सुरूवात

तोच करता अन
तोच करविता
मनुष्याचा जन्म आहे
फक्त पाहण्यासारखा

प्रकाश हा सूर्याचा
होई लखलखता ज्वाला
मंद शितलता ही चंद्राची
देई मनाला गारवा

दिसामागे रात
येती आपोआप
चक्र हे निसर्गाचे
करती ऋतू चे आगमन

संथ वाहती हवा
देते जीवाचे ते दान
वाहे सुसाट गारवा
करी विध्वंस हे जग

एका क्षणात पालटे
जग हे मानवाचे
आहे विसंबून त्याच्यावर
आहे वरदान निसर्गाचे

तरी रुबाब मानवा
किती वाढला तो माज
गुर्मीत आपल्या
करतो निसर्गाचा ऱ्हास

जग बदलतो तो
नाही क्षणाचा विलंब
कर आदर त्याचा
निसर्गापुढे नाही कोणी आज

✍️स्वागंधरा