Login

नात्यांची दुभंगलेली नजर

सून आणी मुलीला एक सारखे समजा.
नात्यांची दुभंगलेली नजर

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

"बाई मनु आली माझी. किती वाळली गं?  सासरी खूप काम करतेस का? आता आली आहे ना, मस्त आराम कर” आशा म्हणाल्या

" मनीषा ताई आलात तुम्ही? कश्या आहात?” धनश्री म्हणाली.

“वहिनी, मी मस्त आहे. तुम्ही कश्या आहात?” मनीषा म्हणाली.

“तिला कायं धाड भरणार आहे? दोन टाइम्स मस्त खाते घरात मस्त आरामात राहते” आशा म्हणाल्या.

धनश्री तिथून निघून गेली.

“आई, तू वहिनीला असे का बोलतेस? ती घरातलं काम करते ना? तुला खायला देते नाही का?” मनीषा म्हणाली.

“मनु, तू माझी मुलगी आहेस ना. तिचं कायं गुणगान गात आहेस?” आशा रागात म्हणाल्या.

मनीषा काही बोलली नाही.
“धनश्री, मनीषाला पाणी आणून दे,” आशा म्हणाल्या.
धनश्री पाणी देऊन लगेच चहा करायला निघून गेली.

आशा आणि मनीषा बोलत होत्या. धनश्री आपलं काम करत होती. शुभम स्कूलमधून आला.

“आई, मला जेवण दे,” शुभम म्हणाला.

“लगेच वाढते. हात-पाय धुवून ये "धनश्री म्हणाली.

“आई, लगेच येतो” शुभम म्हणाला. रूममध्ये निघून गेला.

धनश्री मनीषा जवळ गेली.
“ताई, तुम्ही पण जेवायला बसा” धनश्री म्हणाली.

“सकाळचं तिला खायला देतेस का? तिला नवीन जेवण बनवं काही तरी चांगलं बनवं” आशा म्हणाल्या.

“वहिनी, जे असेल ते मी खाईन. आई, कशाला वहिनीला नवीन बनवायला सांगतेस?” मनीषा म्हणाली आणि हात-पाय धुवायला निघून गेली.

शुभम आला, जेवायला बसला. मनीषा पण आली, जेवायला बसली.

“शुभम, अभ्यास कसा चालू आहे?” मनीषा म्हणाली.

“मस्त चालू आहे. आत्या, आपण मस्त मूव्ही बघू” शुभम म्हणाला.

“चालेल, रात्री बघू. आता जेवण करून घे”  मनीषा  म्हणाली.

शुभम आणि मनीषा जेवण करून घेतात. मनीषा जेवण करून आशा जवळ गप्पा मारत बसते. शुभम झोपायला निघून धनश्री सगळं आवरून ठेवते, भांडी पण घासून घेते. सगळं आवरून झाल्यावर ती पण रूममध्ये निघून जाते.

“बघ, आता तुझ्यासोबत बोलावं तर रूममध्ये निघून गेली” आशा म्हणाल्या.

“आपल्याला बोलता यावं म्हणून निघून गेली असेल. तू त्या वहिनीच्या खूप मागे लागतेस” मनीषा म्हणाली.

“तुला माहिती नाही, ती कशी आहे” आशा म्हणाल्या.

“आई, मला आता झोप येत आहे. मी आता थोडा वेळ झोपते ” मनीषा म्हणाली. तिने तिथेच अंग टाकलं आणि झोपून गेली. आशा पण बेडवर आडव्या झाल्या.

धनश्री उठली, लगेच फ्रेश झाली. तिच्या मिस्टरांच्या येण्याची वेळ झाली होती. ती लगेच किचनमध्ये गेली. चहा ठेवला. बाकी पण उठले. मनीषा आणि आशा लगेच फ्रेश होऊन आल्या. शुभम पण उठून आवरून, अभ्यासाला बसला होता.

पराग आला. धनश्री लगेच किचनमधून बाहेर आली. परागच्या हातातला डब्बा घेतला. किचनमध्ये गेली. पाणी घेऊन आली. परागने पाणी घेतलं. तो आशा जवळ बसला. त्याच लक्ष मनीषाकडे गेलं.
“मनीषा कधी आली? कशी आहेस?” ते म्हणाले.

“मी मस्त आहे, दुपारीच आले”  मनीषा म्हणाली.

धनश्री चहा घेऊन आली. तिने सगळ्यांना चहा दिला. तिने पण घेतला. शुभमला दूध बनवून दिलं.

“धनश्री , आज मनीषा आली आहे तर जेवणाचा चांगला बेत कर. काही आणायचं असेल तर मला सांग, मी घेऊन येतो” पराग म्हणाला.

आशा खूप खुश झाल्या.मनीषाला तिच्या नवऱ्याचा कॉल आला होता. ती बोलत होती.

धनश्रीने परागला बाहेरून पनीर, गुलाबजामून आणायला सांगितलं. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. तिला कोणीच मदत करत नव्हतं. ती एकटी सगळं करत होती. आशा आणि मनीषा मस्त गप्पा मारत बसल्या होत्या. धनश्री तिच्या घरच्यांविषयी सांगत होती. आशा मन लावून ऐकत होत्या.

धनश्रीने सगळं जेवण बनवलं. ती पण आशा आणि मनीषा जवळ जाऊन बसली. आशाला आवडलं नव्हतं. त्यांना धनश्रीला त्यांच्या जवळ बसू द्यायचं नव्हतं. पराग बसला होता. धनश्रीला बोलल्यावर त्याला राग येतो, म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. मनीषा आणि धनश्री मस्त गप्पा मारत होत्या.

“धनश्री, जेवण झालं असेल तर कशारा थंड करतेस? आपण जेवण करून घेऊ” पराग म्हणाला.
धनश्री किचनमध्ये गेली. जेवण घेऊन आली. सगळे जेवायला बसले.

गप्पा मारत त्यांच जेवण झालं. सगळे उठून गेले. धनश्री  सगळं आवरते, भांडी घासते, तिच्या रूममध्ये निघून जाते. ती आज दमली होती. ती लगेच झोपून गेली.

“बघ, कशी आहे? तू आली आहेस, तुझ्यासोबत बोलायचं तर कशी रूममध्ये निघून गेली, लगेच झोपून पण गेली” आशा म्हणाल्या.

“आई, दमली असेल. उद्या सकाळीच मी घरी जाणार आहे. त्यांची बहीण आली आहे”  मनीषा म्हणाली.

“तू अजून दोन दिवस थांब. घरी गेल्यावर तुला सगळं काम करावं लागेल. इथे आरामात राहा,” आशा म्हणाल्या.

“आई, मी दिवसभर बघते आहे. वहिनी सगळं काम करत आहे. तू काहीच मदत करत नाहीस. मला पण लक्षात आलं नाही. वहिनीला थोडी मदत करायला हवी होती. तू तर करायलाच पाहिजे होतं ना. तिने सगळं काम केलं. माझ्यासाठी चांगलं जेवण पण बनवलं. एक भांड आपण उचललं नाही. मस्त जेवण केलं, उठून गेलो. ती एक शब्द बोलत नाही. सगळं काम करते. तू बोलतेस, ते पण सगळं ऐकते. तुला काही त्रास आहे का? तुला वहिनी सगळं हातात देते. अजून तुला कायं हवं? अजून मला सांगते. नणंद येत आहे तर घरी जाऊ नको. आई, मुलीला चांगलं शिकवायचं तर तू कायं शिकवत आहेस? आता वहिनीसोबत अशी वागली तर नंतर वहिनी तुझं काही करेल का? मी वहिनीसमोर तुला बोलली असती, पण मला तुला वहिनीसमोर काही बोलायचं नव्हतं. तिच्यासोबत चांगली रहा. ती पण तुझ्यासोबत चांगली राहील. मला शेवटपर्यंत माहेर राहील. तू अशी वागली तर दादा पण वहिनीची बाजू घेईल. तू एकटी पडशील. मी पण माझं घर सोडून सारखी इथे येऊ शकणार नाही. तेव्हा दादा वहिनींच तुझ्यासोबत राहतील,” धनश्री म्हणाली.

आशा विचार करायला लागल्या. विचार करत झोपून गेल्या.

सकाळी मनीषा तिच्या घरी निघून गेली. आशा  धनश्री सोबत नीट राहू लागल्या. नंतर मनीषा आली तर त्या धनश्रीला मदत करत होत्या. तिला पण चांगलं जेवण बनवून देत होत्या. आता धनश्री पण आनंदात रहायला लागली.