नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 18

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 18

©️®️शिल्पा सुतार

संध्याकाळी सुरभी, मनु, नंदाताई, आशिष मंदिरात पोहोचले. अतिशय सुंदर परिसर होता. वेगळीच शांतता होती. आजुबाजुला खुप झाड होते. छान गारवा होता. किती प्रसन्न वाटत आहे इथे. सावकाश दर्शन झाल. ते मंदिरात बसले होते. सुरभी डोळे मिटून देवाची प्रार्थना करत होती. तिने सचिन आणि सौरभ दादाच चांगल होण्यासाठी प्रार्थना केली. मंदिराच्या बाजूने नदी वहात होती. नंतर ते घाटावर जावून बसले.

" मला खूप आवडल इथे."

" वहिनी जागृत देवस्थान आहे हे. दिवसा बोटिंग असते. आम्ही नेहमी येतो." मनु माहिती देत होतो.

आशिष भेळ घेवून आला. खूप मजा आली. उशिरा ते घरी आले.

सुरेशराव, आजी हॉल मध्ये बसलेले होते.

"सुरभी तुझ्या नवर्‍याचा दोन तीन दा फोन आला. तू फोन उचलत नव्हती म्हणून इकडे केला होता. तो काळजीत होता. फोन करून बघ." आजी बोलल्या.

हो. सुरभी पटकन त्यांच्या रूम मधे गेली. तिने फोन लावला. सचिन अजून ऑफिस मधे होता.

"सुरभी कुठे होती तू. फोन का नाही उचलला?"

" मी आई, मनु, आशिष सोबत मंदिरात गेली होती. फोनचा आवाज आला नाही. सॉरी. "

" काही हरकत नाही. डॉक्टर कडे का गेली होतीस?" त्याला काळजी वाटत होती.

"कोणी सांगितल?"

"आजीने."

"चक्कर येत होती. मला ना अर्धवट काही तरी आठवत आणि डोक्यातून कळ येते. "

" आता ठीक आहेस का? "

" हो. डॉक्टरांनी टॉनिक लिहून दिले. धावपळ नाही करायची सांगितल." सुरभी बोलली.

"ते तर मी कधीच सांगतो आहे. " सचिन हसत बोलला.

" अहो मी आधी ऑफिसला जायची का? "

" नाही. काय झालं?"

" मला आज तस आठवत होत की मी काम करायची ."

सचिन काही म्हटला नाही. हिला आधीच थोड आठवत की काय? काय करेल ती आठवल तर. तो घाबरला.

" तुम्ही अजून ऑफिस मधे आहात का?"

हो .

"घरी जा ना ."

"काय करू घरी जावून. तू नाही घरी. तू का नाही आलीस माझ्या सोबत? मनु सोबत मुद्दाम राहिली ना." सचिनने अस विचारल्यावर. सुरभी छान हसत होती.

"सुरभी हसू नकोस. मला समजली आहे तुझी आयडिया. या पुढे अस चालणार नाही. मी उद्या येतो. आपण घरी येवू मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही." सचिन सिरियस होवुन बोलला.

"तुमची महत्वाची मीटिंग होती ती झाली का?"

"हो झाली. ते काम झाल की मी रीलॅक्स होईल. होईल ना आपल काम?" त्याच्या आवाजात ही काळजी होती. ही केस लवकर सोडवता आली पाहिजे. मग सुरभी माझी होईल.

"हो होईल. तुमच्या मनाप्रमाणे सगळ होईल. कारण तुम्ही खूप चांगले आहात. " सुरभी प्रेमाने बोलली.

" अजून सांग माझ्या बद्दल? "

सुरभी लाजली. ती छान हसली.

" नुसत हसून उपयोग नाही सुरभी . मी तिथे असलो की सुधा प्रेमाने वागायच. आराम कर आता. "

" हो. तुम्ही घरी जा."

"सुरभी लव यू."

ती काही म्हटली नाही.

"मी काहीतरी म्हंटल."

सुरभी पुन्हा हसत होती. "मनु आली मी ठेवते फोन."

"अरे हे काय अस? उद्या बघतो तुझ्याकडे." सचिनने फोन ठेवला.

सुरभीने फोनवर ओठ टेकवले. ती बाहेर येवून बसली.

जेवण झाल्यावर सुरभी मनु सोबत होती. "वहिनी उद्या आपण इथे शेतावर जाऊ." दोघी खूप गप्पा मारत होत्या.

सकाळी आवरून झाल्यावर सुरेशराव, नंदाताई कामा निम्मत बाहेर गेले होते. आशिष ऑफिस मधे बिझी होता. आजी घरी होत्या. तिघींनी जेवून घेतल.

"आजी आम्ही दोघी बाहेर आहोत." मनु बोलली.

"आता कुठे जाताय? आराम करा. "

"इथे झोक्यावर आहोत. " त्यांनी ऐकल नाही. दोघी खूप गप्पा करत होत्या. आधी मनु झोक्यावर बसली होती. नंतर सुरभी. ती झोका घेत होती. खूप मजा येत होती.

काय झालं माहिती नाही फांदी कडकड आवाज करत तुटली . झोका तुटला. सुरभी जोरात झोक्यावरून खाली पडली. डोक्यावर. जोरात आवाज आला. ती बेशुद्ध पडली.

वहिनी.. मनु खूप घाबरली. "वहिनी उठ. काय झालं तुला. बापरे काय करू मी?" तिने शेतावरच्या दोन तीन लोकांना बोलवलं.

"वहिनी उठ कुठे लागल? डोक्याला लागल का?"

सुरभी शुद्धीत नव्हती.

बापरे हिला आधीच लागलेल होत. टाके होते आता काय झाल असेल. मनु खूप धावपळ करत होती. तिथल्या लोकांच्या मदतीने त्या घरी आल्या. सुरभीला तिच्या रूम मधे झोपवल.

आजी घाबरल्या. "काय झालं ग?"

"वहिनी झोक्यावरून पडली. अशी एकदम जोरात पुढे फेकली गेली. डोक आपटल. ती बेशुद्ध आहे." मनु घाबरली होती.

"तरी मी म्हणते होती की इकडे तिकडे करू नका. ती सुरभी अशी नाजूक. तिला नेहमी चक्कर येतात. झोपाळ्यावर का बसाव. ह्या दोघी अजिबात ऐकत नाही."

मनुने नंदाताईंना फोन केला. "आई बाबा घरी या वहिनी पडली झोक्यावरून. ती बेशुद्ध आहे. डॉक्टरांना फोन करा."

" मनु काय बोलतेस. का करता तुम्ही मुली अस? का गेला तुम्ही दोघी तिकडे? एक तर ती पोरही नाजूक. आम्ही येतो तो पर्यंत सुरभी जवळ थांब." नंदाताई काळजीत होत्या.

" मनु सुरभी साठी पाणी आण. "आजींनी सांगितल.

सुरभी थोडी उठली. ती इकडे तिकडे बघत होती. ती एकदम गप्प झाली होती.

नंदाताई डॉक्टरला घेवून आल्या. त्यांनी सचिनला फोन केला होता. तो खूप घाबरला होता." किती लागल आहे? "

" काही माहिती नाही आम्ही पण बाहेर आहोत. "

तो हातातलं काम सोडून घाईने निघाला. म्हणून या सुरभीला मी म्हणत होतो तिकडे राहु नकोस. तो पॅनीक झाला होता. आता मी सुरभीला पाच मिनिट सोडणार नाही. काय झालं असेल? काका थोडी जोरात गाडी चालवा ना. त्याने नंदा ताई फोन केला. "कुठे आहेस आई? घरी पोहोचली का? "

"मी घरा जवळ आहे. डॉक्टर येतील पाच मिनिटात. "

"आई डॉक्टरांचा फोन नंबर दे." त्याने डॉक्टरांना फोन लावला. सुरभीची हिस्ट्री सांगितली. "डॉक्टर ती परत डोक्यावर पडली. काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना."

" मी जातो आहे घरी. बघतो मग सांगतो."

मनु सुरभी जवळ बसलेली होती." वहिनी ठीक आहे का तू? "

सुरभी मानेने हो बोलली.

नंदाताई, सुरेशराव आले. "आई बाबा वहिनी बोलत नाही काही. एकदम गप्प झाली."

"घाबरली असेल ती. मी बघते." नंदा ताई आत आल्या.
"सुरभी अग ठीक आहे ना तू? काय झाल बेटा? "

ती सगळीकडे बघत होती. काही बोलत नव्हती.

डॉक्टर आले. सोबत नर्स होती. "सगळ्यांनी बाहेर बसा. नंदाताई तुम्ही थांबा इथे. ते तपासत होते. ओके आहेत मॅडम काळजी करू नका."

मनूने सचिनला फोन लावला." दादा डॉक्टर आले आहेत वहिनी ओके आहे. "

" बर झाल. येतो आहे मी."

"खूप काळजीत करू नकोस हळू ये. "

घरातले सगळे सुरभी जवळ बसले होते.

सुरभीला सगळं आठवत होत. पण तरी ती गप्प होती. मी इथे काय करते आहे? ही मनु आहे ह्या आई. मी त्या दिवशी ऑफिस मधून निघाली. नंतर काय झाल होत? मला मधल विशेष आठवत नाही. एक्सीडेंट झाला होता खूप लागल होत. राहुलच्या घरच्यांनी मला घराबाहेर काढल. सौरभ दादा कुठे आहे? ती गप्प होती. एकदम डोक दुखत होत.

"काय झालं वहिनी?"

"काही नाही. मला पाणी हव आहे." तिने पाणी दिल.

मी हिची वहिनी नाही. मला इथे रहायच नाही. शांत राहू. मी इथे कशी आली. ती खूप विचार करत होती. तिला सचिन आठवला. बरोबर कुठे आहे सचिन.

बाकीचे काय बोलतात ती ऐकत होती. मनुने तिला चहा करून आणला. नंदाताई डोक्याला काही लागल का ते बघत होत्या. खूप काळजीत होत्या. आजी हळू चालत आल्या. तिची नजर काढली.

हे लोक किती चांगले आहेत. पण मला माझ्या घरी जायच आहे. हे माझ घर नाहिये. मला रहायला जागा नाहिये. राहुलने मला घराबाहेर काढल. कुठे राहू मी? इतके वर्ष केल त्या लोकांच. शेवटी त्यांनी मला बेघर केल. मुलींना त्यांच घर नसत हेच खर आहे . थोडे पैसे साठले की आधी छोट का होई ना घर घेवू.

मी सचिनच्या घरी नाही राहणार. सौरभ दादा त्याच्या कडे जाते. ती पूजा वहिनी चिडते पण. माझ्या जॉबच काय झालं? इतक्या दिवसात त्यांनी मला काढून टाकल असेल. जावून बघाव लागेल. मला नोकरी सोडून चालणार नाही. पैसे लागतील. कोणाचा आधार नाही. माझ पुढे कस होईल? मी नंतर होस्टेल मध्ये शिफ्ट होईल. तिला आता विचार करून टेंशन आल होत.

आधी आठवत नव्हत तर आयुष्यात काही प्रॉब्लेम नव्हता. मी एकदम आनंदाने सचिन सोबत रहात होती. आता आठवत तर किती त्रास आहे. नक्की काय चांगल. समज नव्हती तेच बर होत. सचिन सोबत राहू का. नको.

बाहेर सुरेशराव डॉक्टरां सोबत बोलत होते. सुरभीची चौकशी करत होते.

आजी, मनु आणि सुरभीला रागवत होत्या. "ह्या सुरभीला सचिन बरोबर जावू द्यायला हव होत. तोच नीट सांभाळतो तिला. मनु पण तशीच. ह्या मुली दिवसभर नुसत्या खेळत बसतात. तुमच्या वयाच्या आम्ही होती तर दोन दोन लेकरं होती आम्हाला. काही करता काही झालं असत म्हणजे? सचिन चिडणार आहे तुमच्या दोघींवर. आता तयार रहा बोलणे ऐकायला. "

सचिन आला. मनु सांगायला आली. तो बाहेर डॉक्टरांशी सोबत बोलत होता.

"काही प्रॉब्लेम नाही सचिन. मॅडम ओके आहेत. तरी तुम्हाला वाटत तर आपण अर्जंट टेस्ट करून घेवू." डॉक्टर बोलले.

" चालेल मला रिस्क घ्यायची नाही."

तो आत आला. आजी सुरभी जवळ बसलेल्या होत्या. त्या उठत होत्या.

"आजी बस कुठे जातेस. चल सुरभी."

"कुठे चालले."

"हॉस्पिटल मधे. काही टेस्ट करायच्या आहेत."

ती सचिन कडे बघत होती. त्याला तिची नजर वेगळी वाटली.

" काय झालं सुरभी? मी आलो ना आता काळजी करायची नाही. काही झालं नाही तुला. सहज टेस्ट करायच्या आहेत. आपण लगेच येवू एका तासात. मी तिथे तुझ्या सोबत असेल. ओके. चल आता. " सचिन प्रेमाने समजावत होता.

सुरभी फक्त ऐकत होती. काय सुरू आहे याचा ती अंदाज बांधत होती. ती त्याच्या सोबत निघाली. त्याने तिचा हात धरला. तिने हात सोडवून घेतला.

" राहू दे हातात हात सुरभी. चल लाजू नकोस. "

नंदाताई, सुरभी, सुरेशराव, सचिन हॉस्पिटल मधे आले. सचिन तिला आत घेवून गेला तो पूर्ण वेळ तिच्या सोबत होता. तिला हॉस्पिटल मधे आवडत नाही त्याला माहिती होत. तिला छान सांभाळत होता. टेस्ट झाली. थोड्या वेळाने त्यांना आत बोलवलं. सुरभी सचिन आत गेले.

"काही प्रॉब्लेम नाही सुरभी. सगळ ठीक आहे." सचिन डॉक्टर सोबत बोलत होता.

" आजच्या दिवस आराम करा काळजी सारख काही नाही."

तो तिला हाताला धरून बाहेर घेवून आला. सुरभी त्याचा जवळून हळूच बाजूला झाली. कार मधे ही ती नंदाताईं जवळ बसलेली होती. घरी आल्यावर ती रूम मधे जावुन झोपली.

मनु समोर बसली होती. "सॉरी दादा."

"कुठे गेल्या होत्या तुम्ही दोघी? घरचे काही सांगतात ऐकण्याची पद्धत नाही का? " सचिन थोड चिडला होता.

" समोर ते काय झाड आहे तिथे माझा झोका होता लहानपणीचा. त्यावर वहिनी बसली होती. आम्ही तिथे होतो."

"बघून घ्यायचा ना झोका पक्का आहे की नाही. इतके वर्ष कोणी वापरत होत का त्याला? "

"दादा तू चिडला का? " मनुला ही कसतरी वाटत होत.

" नाही. सुरभीला आधीच खूप लागल होत म्हणुन काळजी वाटते आहे. बाकी काही नाही. " सचिन बोलला.

" सचिन आत जा. थोड सुरभी कडे बघ. ती घाबरली आहे. " नंदाताई बोलल्या.

सचिन आत आला. सुरभी नुसती बसलेली होती. तो पुढे आला. तिला पटकन तिला मिठीत घेतल. ती दचकली.

" सुरभी काळजी करायची नाही. सगळ ठीक आहे. डॉक्टर बोलले तशी काळजी घ्यायची . भरपूर जेवायच आरामात रहायच. समजल ना मी काय म्हणतो ते. " ती केव्हाची नुसती गप्प होती. त्याच्या कडे बघत होती.

"तू ठीक आहे ना सुरभी. काही बोलत का नाही? तुला धक्का बसला का? काय झालं?" तो थोडा घाबरला. तिच्या कडे बघत होता.

" सुरभी बोल ना. तुला काही झाल तर मी काय करणार? माझा विचार करत जा ना थोडा. स्वतः ची काळजी घेत जा. तू पडली हे ऐकुन मला खूप भीती वाटली होती. या पुढे अजिबात इकडे तिकडे करायच नाही. माझ्या जवळ राहायच. एक तर आधी डोक्याला किती टाके होते. बघू कुठे लागलं." तो तिची खूपच काळजी करत होता.

हा सचिन मला किती सहज हात लावतो आहे. काय आहे हे? मला कसतरी वाटत आहे. सुरभी पटकन बाजूला सरकली. "मला हात लावू नको सचिन. "

" काय झालं सुरभी? तू ठीक आहे ना. काही होत का? "

" तू सचिन आहे ना. मी तुझ्या सोबत का रहाते? " ती बोलली.

सचिन तिच्याकडे बघत होता." सुरभी तुला आठवत. "

" हो आधीच आठवत आहे. आपण एका कॉलेज मधे होतो. "

" आणि आत्ताच काही आठवत का ?"

" हो ते ही थोडं आठवत आहे. काय सुरू आहे हे सगळं? मला इथे रहायच नाही. मला माझ्या घरी जायच. सौरभ दादाकडे जायच. " सुरभी हळूच बोलली.

सचिन खूप घाबरला. सुरभी मला सोडून जावु शकत नाही. मी तिला जावू देणार नाही. ती माझी आहे.

काय करेल सुरभी? इथे राहील की सचिनला सोडून जाईल?


🎭 Series Post

View all