नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 19

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 19

©️®️शिल्पा सुतार

सुरभी विचार करत होती मी इथे काय करते आहे. सचिन सोबत अस रहाण चुकीच आहे.

तिच्या बोलण्याने सचिनला टेंशन आल होत. सुरभी इथून जायच म्हणते आहे. मी ऐकणार नाही.

"सचिन तू मला इकडे का घेऊन आला आहेस? हे तुझ घर आहे का? " सुरभी विचार करत होती. मधेच थोड आठवत तर काही विसरायला होतं.

" आपण दोघ सोबत आहोत ना सुरभी. तू तुझ्या मनाने माझ्या सोबत आली आहेस. " तो शांततेत बोलला.

"नाही मी अस करणार नाही. मला इथून जायच आहे."

" सुरभी शांत हो. घरचे सगळे आहेत आजुबाजुला. झोपते का तू थोड. बर वाटेल. इतक टेंशन का घेतेस. " सचिन तिच्याकडे बघत होता.

ति ऐकत नव्हती . " मला माझ्या भावाकडे सोडून दे. आत्ता. "

"हो जावू उद्या. आता नाही. " तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. शांत हो.

" तु मला हात लावू नकोस प्लीज. " ती घाबरली होती.

" नाही लावणार. पण गप्प एकदम. हे घे पाणी पी. "

तिने पाणी पिल ती मंगळसूत्रा कडे बघत होती. सचिनच्या रूम मधे आहे का मी? काय आहे हे? थोड आठवत होत इथे आलो ते. " सचिन आपल लग्न झाल का?"

"नाही. पण इथे सगळ्यांना वाटत आपण पती पत्नी आहोत. "

"अस कस झाल? " ती काळजी करत होती.

" तूच सांगितल ना आईला तू माझी बायको आहे. " सचिन बोलला.

" आता काय करू या ? "

" काही नाही शांत रहायच."

"मला नाही रहाता येणार इथे. मला माझ्या घरी जायच." तिने परत हट्ट धरला.

"कुठे आहे तुझ घर?"

तिच्या चेहर्‍यावर दुःख होत. खरच मला घर नाही. राहुल तिच्याशी भांडला ते तिला आठवत होत. त्याला मी नको आहे. आता त्याला दुसर्‍या लग्नाचे वेध लागले. त्याने मला सहज आयुष्यातुन बाजूला फेकल. घराबाहेर काढलं . दादा कडे जायच तर त्याला त्याचा संसार आहे. त्याची परिस्थिती खास नाही. ती गप्प झाली. बरोबर आहे कोणी नाही मला. ना घर ना दार. इतके वर्ष वाया गेले. कुठे जावू मी? अगदी एकटी पडली आहे.

"सुरभी काय विचार सुरू आहे?"

"सचिन मला थोडे दिवस मदत लागेल. जर मला दादाकडे रहात आल नाही तर मला नोकरी होस्टेल मिळे पर्यंत मदत करशील का? मी तुझा जो खर्च होईल ते पैसे वापस करेन." ती बघत होती सचिनने हो बोलायला पाहिजे. थोड सेटल होई पर्यंत कोणी तरी सपोर्ट केला तर बर होईल.

"काय बोलतेस तू सुरभी? मला सोडून तू कुठे जायचं नाही. होस्टेल वगैरे अजिबात नाही. "

" मी इथे अस राहू शकत नाही. मग मला माझ्या भावाकडे सोडून दे ."

"सुरभी शांत हो. करू आपण काहीतरी." सचिन बोलला.

" आत्ता सांग काय झालं नक्की. मी अस कस तुझ्या सोबत रहाते? तस मला थोड आठवत आहे. "

सचिन तिला एक्सीडेंट झाला ते सांगत होता. कसा गैरसमज झाला तू मला नवरा समजत होती.

"मला तेव्हा समजत नव्हतं, पण तुला तर समजत होतं ना. तू मला सांगायच ना अस बरोबर नाही. आपण एकत्र रहातो का? म्हणजे पती पत्नी प्रमाणे. " ती हळूच बोलली.

"नाही इथे येण्या आधी तू दुसर्‍या रूम मध्ये होती. आपल्यात काही संबध नाही."

तिला थोड बर वाटल. कठिण आहे माझी परिस्थिती पुढे काय होणार आहे काय माहिती. कोणाचा आधार नाही. ना घर ना दार.

"हे दागिने माझे नाहीत. कोणी दिले? "

" आईने. सुरभी आपण नंतर बोलू प्लीज मी रीक्वेस्ट करतो. कोणी ऐकेल. तु आराम कर. डोक्याला इतका ताण देवु नको आणि मी तुला लागेल ती मदत करेल उगीच विचार करत बसू नकोस." सचिन बोलला.

ती थोड्या वेळ पडली. सचिन समोर बसुन त्याच काम करत होता.

मनु आली. " वहिनी ठीक आहे का?"

" हो मनु तू मला सुरभी बोल ना. "

" काय झालं वहिनी?"

"काही नाही. "

सचिन घाबरला. सुरभी मनुला बोलली तर की मी तुझी वहिनी नाही. घरी समजेल. जावू दे आता जे होईल ते होईल. पण मी सुरभीला जावू देणार नाही .माझ प्रेम आहे तिच्यावर. मी समजावेल तिला.

"चल वहिनी जेवायला की तुला इथेच देवू. भूक लागली असेल ना. चल दादा." मनु बोलली.

"मी येते."

"चल हात धर." मनु तिला हळूच घेवून गेली.

सचिन रूम मधे डोक धरून बसला होता. त्याला खूप भीती वाटत होती. सुरभीने नकार दिला तर? माझ काय होईल? मला हे सहन होत नाही. काहीही झाल तरी मला सुरभी हवी. तीच ही लग्न मोडल आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? का अशी करते ही. परक असल्या सारखी लांब लांब रहाते.

नेहमीप्रमाणे सुरभीने ताट करायला घेतले. सगळे नाही म्हणत होते. "सुरभी शांत बस. तब्येत सांभाळ. जेवून घे आराम कर."

सचिन लांबून तिच्याकडे बघत होता.

नंदाताईंनी तिला खाली बसवलं. ताट वाढून दिल.

आशिष, मनु तिच्याशी बोलत होते. "वहिनी तुझी आयडिया छान आहे. तुला थोड लागल तर दादा लगेच पळत आला तुझ्यासाठी. अस किती बोलवलं तरी तो येत नाही."

ती हसत होती. थोडी लाजली होती. तिला ही सचिन आवडत होता. पण हे योग्य नाही. माझ लग्न झाल आहे. मला या पासून लांब थांबल पाहिजे.

सचिन विचार करत होता. चला बर झाल सुरभीने सगळ सांभाळून घेतल. ती इथे काही बोलली नाही.

जेवण झालं. थोड्या वेळ बाहेर थांबून ते दोघ रूम मध्ये आले.

सचिनने तिला औषध दिले. तिने घेतले.

" मला सौरभ दादा कडे जायच आहे ." ती परत बोलली.

"हो जावू. तोच येईल तुला भेटायला."

"तुला माहिती आहे माझा दादा?"

हो.

"कस काय? "

"तो तुला भेटायला आला होता."

"सचिन थँक्स तू खूप केल माझ." सुरभी बोलली.

"सुरभी माझ्या सोबत रहातेस का? आता तुला मागच आठवत तर हे ही माहिती असेल तुझा नवरा दुसर लग्न करतो आहे. तुझा लवकर घटस्फोट होणार आहे. मला तू खूप आवडते. माझ्याशी लग्न करणार का?" सचिन तिच्या कडे बघत बोलला.

सुरभी खूप गडबडली. इकडे तिकडे बघत होती. रूमच दार बंद होत. सचिन सोबत आपण अस. नको वाटत होत. काय करणार पण? ती खाली बघत होती.

"बोल ना सुरभी. घाबरू नको तुला वाटत ते बोल. "

राहुलने तिला घराबाहेर काढल या विचाराने तिला कसतरी होत होतं. का केल यांनी हे? कोणाशी लग्न करत आहेत ते. नक्की त्या मामाच्या मुलीशी लग्न ठरलं असेल. आजकाल ते लोक खूप वेळा घरी येत होते. एवढच प्रेम होत का आमच? राहुलला या दिवसात माझी आठवण आली नसेल का? मी का नकोशी आहे त्यांना. ती रडत होती.

"बापरे सुरभी. हे काय सुरू आहे . का रडते आहेस?" तो तिच्याजवळ येवून बसला.

"सचिन मला ना खूप त्रास होतो आहे. मी एकटी पडली. राहुल कुठे आहे? त्यांनी मला अस का घराबाहेर काढल. माझी काय चूक होती यात. इतके दिवस मी कुठे आहे हे विचारल का त्यांनी?"

सचिनने नाही मान हलवली.

"माझी चौकशी केली का?"

"नाही. त्या लोकांना लवकर घटस्फोट हवा आहे. " सचिन बोलला.

" सचिन तू खोट सांगतो आहे." ती उगीच चिडली.

"मान्य कर सुरभी. त्या लोकांना तू नको आहे. जेवढ लवकर एक्सेप्ट करशील तुला कमी त्रास होईल."

"अस का आहे सचिन? लोक इतके स्वार्थी का होतात."

" अस असत सुरभी म्हणून म्हणतो विसर सगळं माझ्या सोबत नवीन आयुष्य सुरु कर."

"मला थोडा वेळ हवा आहे. मला राहुलशी बोलायच. माझी त्यांची भेट घालून दे ना."

"नाही सुरभी. तो राहुल चांगला नाही. आता काय बोलणार आहात तुम्ही. तुलाच त्रास होईल याचा. ते लोक पुढे निघून गेले आहेत. तू ही प्रॅक्टिकली विचार कर. माझ्याशी लग्न कर आपण खूप खुश राहू. "

" मला एकदा प्रयत्न करायचा आहे . माझा चार वर्षाचा संसार होता." सुरभीला खर तर काही सुचत नव्हत.

" एकतर्फी काळजी करतेस तू. त्या राहुलला तुझ्याकडून लवकरात लवकर सुटका हवी आहे. त्याला दुसर लग्न करायच आहे. "

सुरभी परत रडत होती.

" अश्या फालतू माणसासाठी रडून उपयोग नाही सुरभी. जरा प्रॅक्टीकली विचार करत जा. त्याला तुझी किम्मत नाही. त्याच्या मागे मागे करू नकोस. माझ्या सोबत रहा. नाहीतर इतके दिवस हक्काने माझ्या जवळ होतीस ना तू. " तो तिच्या कडे बघत होता.

" मला कोणी नको. मी माझी माझी राहील. "सुरभी नजर चोरत बोलली.

" नाही सुरभी. हे जमणार नाही. मी तुला अस सोडू शकत नाही. "

" सचिन आपला काही संबध नाही. मी जाणार इथून.
मला माहिती आहे राहुलला दुसर लग्न करायच आहे तरी ही मला एकदा त्यांच्याशी बोलायच आहे." सुरभी रडत बोलली.

"काय मिळणार नाही तुला यातून. सही कर मोकळी हो. उगीच त्रास करून घेवू नकोस. "

" कोणाला आपण आयुष्यात नको आहे ही भावना खूप त्रास दायक आहे. " सुरभी दुःखाने बोलली.

" तुझ्या आजूबाजूला असे ही लोक आहेत त्यांना तू हवी आहेस. डोळे उघड बघ जरा. सुरभी माझा विचार कर. मला होकार दे आपण छान राहू. माझ खूप प्रेम आहे तुझ्या वर. कॉलेज मधे ही मी विचारल होत तुला. आठवत का. "

सुरभी थोडीशी हसली. " सचिन तुझ अजून लग्न नाही झाल का? "

नाही.

" तु चांगला मुलगा आहेस. तुला दुसरी चांगली मुलगी मिळून जाईल. माझ्यात खूप दोष आहेत. एक तर माझा घटस्फोट होईल आणि अजून एक. मला माहिती नाही मी आई होवू शकते की नाही. त्या साठी राहुल मला सोडता आहेत. मी तुझ्याशी लग्न करणार नाही सचिन. " ती सिरियस होत बोलली.

" सुरभी मला काही प्रॉब्लेम नाही. प्लीज अस करु नकोस मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय. मला नको मुल बाळ. फक्त तू हवी. "

" सुरुवातील सगळे असे म्हणतात. थोड्या दिवसानी प्रेम कमी होत. मग सगळं आठवत. सचिन तू दुसर्‍या मुली सोबत लग्न कर. उद्या सकाळी मला दादा कडे सोडून दे. थँक्स इतक केल त्या बद्दल. "

तो सुरभी जवळ येवून बसला." मी माझ्या आयुष्यात काय करायच ते तू मला सांगू नको सुरभी. मी लग्न करेन तर तुझ्याशी नाहीतर तस राहीन. मला तू हवी आहेस. त्यासाठी मी काहीही करेन. "

सुरभी त्याच्या विचाराने घाबरली." हा मला सोडणार नाही वाटत. पण मी सचिन सोबत राहू शकत नाही."

"झोप आता."

"तू कुठे झोपणार? "

" तुझ्या जवळ. "

" नाही. मी इथे राहणार नाही. मला दुसरी रूम हवी. " ती थोडी घाबरली होती.

" ते शक्य नाही. माझ्या घरच्या लोकांसाठी आपण पती पत्नी आहोत. आणि रोज आपण अस रहातो. काळजी करू नकोस मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. विश्वास ठेव शांत पणे आराम कर." तो बाथरूम मधे निघून गेला. येवून त्या बाजूला झोपला. मधे उशी होती.

सुरभी घाबरली होती. मला अशी झोप येणार नाही. मनु जवळ जावु का? नको ती झोपली असेल. कधी जावु इथून. ती सचिन कडे बघत होती तो आरामात झोपलेला होता. बर्‍याच उशीरा ती झोपली.
ती सकाळी उशिरा उठली. सचिन बाजूला नव्हता. आजी खुर्चीवर बसल्या होत्या. "ठीक आहे का ग?"

"हो आजी."

"चक्कर येत नाही ना."

नाही.

"जा आंघोळ कर मग आपण नाश्ता करू."

तिला वाटल होत विचाराव सचिन कुठे आहे? पण तिने मन आवरल. आपल्याला काय तो कुठे ही असे ना. आज मी सौरभ दादा कडे जाईल. या माझ्या फोन मधे त्याचा नंबर का नाही. माझा जुना फोन कुठे गेला.

ती बाहेर आली. सचिन नव्हता. नंदाताई होत्या. "बाकी कुठे गेले?"

मनु, आशिष कॉलेजला गेले आहेत. सचिन आणि तुझे बाबा कामानिमित्त बाहेर गेले आहेत.

तिने नाश्ता केला. ती आत येवून बॅग भरत होती. थोड्या वेळाने सचिन आला.

"आपण निघायच का?" तिने विचारल.

हो.

"मला सौरभ दादाशी बोलायच."

त्याने फोन लावला. तो बाहेर गेला. रूम मधे सुरभी होती.

"दादा मी सुरभी. " ती रडत होती.

"सुरभी कशी आहे तू."

पूजाचा आवाज येत होता. "सुरभी आहे का मला बोलू द्या."

"दादा तू या वेळी घरी कसा? ऑफिस नाही का?"

पूजाने फोन घेतला. "सुरभी कुठे होती तू ?आम्ही खूप काळजी करत होतो . खूप शोधल तुला. तू घरी ये. मला माफ कर त्या दिवशी मी उगीच वेड्या सारख बोलली ते खर्च वगैरे. तू ते डोक्यातून काढून टाक. मला इतके दिवस माझ मन खात होत. आम्हाला तू जड नाहीस. "

" वहिनी माझ्या मनात काही नाही. तू काळजी करू नकोस. एक सांग दादा घरी कसा? त्याची नोकरी. " सुरभीने विचारल.

" गेली. त्यांना कामावरून काढून टाकल. "

" काय? कश्या मुळे?"

" तुला शोधण्यासाठी खूप सुट्ट्या झाल्या म्हणून. "

" बापरे आता कस सुरू आहे. घर खर्च कसा करता तुम्ही? " सुरभीला खूप वाईट वाटत होत.

" करतो आहे तसच. "

सौरभने फोन ओढून घेतला." सुरभी पूजा कडे लक्ष देवू नकोस. मी करतो अकाऊंटच काम. "

"अशी किती कमाई होते त्यातून." मागून पूजा बोलली.

"पूजा जरा शांत बस." सौरभ ओरडला.

" दादा तुझी नोकरी गेली का? " सुरभी रडत होती.

सचिन नेमक आत येत होता. त्याने ऐकल. तो बाहेर थांबला.

" ते सोड तू कुठे आहेस? तुला आठवत का सगळ?" त्याने हळूच विचारल.

"सचिन कडे आहे. हो दादा मला आठवत आहे. दादा मला तिकडे यायच आहे. इथे नाही रहायच. "

"सचिन साहेब काय म्हणता आहेत. ते हो म्हटले का?" सौरभने विचारल.

" त्याच काय दादा? मी म्हणते ना मला यायच आहे."

" ठीक आहे चिडू नकोस. इकडे शहरात आली की फोन कर. मी येतो तुला घ्यायला. "

" नक्की ना दादा. मी थोडे दिवस राहील. नंतर माझी सोय करेल. तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. " सुरभी बोलली.

" अस का बोलतेस सुरभी. तू का मला जड आहेस. तू माझ्या जवळ राहणार आहेस. " सौरभ भावूक झाला होता.

" दादा मी फोन ठेवते. "

सुरभी गप्प बसुन होती. दादाला नोकरी नाही. कस होईल? मला तिथे जास्त दिवस रहाता येणार नाही. माझा जॉब आहे की गेला माहिती नाही. काय करू ? सगळ कठिण झाल आहे. जून मंगळसूत्र असत तर ते मोडून त्याला पैसे दिले असते. नाहीतरी आता मला त्याचा काही उपयोग नाही. हे आत्ताच मंगळसूत्र सचिनच असेल. ते वापस द्याव लागेल. माझी पर्स, दागिने कुठे गेले काय माहिती? मी तिकडे गेले तर दादा वर अजून भार होईल. कठिण परिस्थिती आहे. तिच्या डोळ्यात पाणी होत.


🎭 Series Post

View all