नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 20

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 20

©️®️शिल्पा सुतार

सुरभीने सौरभशी बोलून फोन ठेवला. दादा कधी सुखी होणार आहे काय माहिती? किती चांगला आहे तो. किती कष्ट त्याच्या मागे. एक ना एक सुरू असत. ती काळजी करत होती. खूप रडू येत होत. काही ठीक नाही.

सचिन आत आला. सुरभीने हळूच डोळे पुसले.

" काय म्हटला सौरभ?"

"काही नाही. ठीक आहे तो. सचिन मी आधी जॉब करत होती. तिथे मेडिकल सर्टिफिकेट दिल तर जॉब परत मिळेल का?"

"सांगता येत नाही. जावून बघ. काही नाही तर तुझा आधीचा पेमेंट. इतर पैसे तरी मिळतील."

काहीतरी कराव लागेल. दादाला सपोर्ट करावा लागेल. माझा जॉब चांगला होता तो पगार दादाला देता येईल. डॉक्टर कडे जाव लागेल सर्टिफिकेट घ्यायला. थोडे पैसे मिळाले तर बर होईल. थोडे दिवस तर निघतील. मला नोकरी हवी. कस करू आधी सारख काम जमायला हव. सुरभी विचार करत होती.

नंदा ताई आत आल्या." सुरभी ठीक आहेस का? "

"हो आई." ती थोडी अडखळली.

" आई आम्ही निघतो. मला खूप काम आहेत." सचिन त्याच सामान घेत होता.

" जेवण करा मग जा. हे बघ सुरभीला बर नाही. थोडे दिवस आजीला ने सोबत. तू ऑफिस मधे जाशील तर आजी राहतील सुरभी सोबत."

तो सुरभी कडे बघत होता.

"चल सुरभी जेवायला बस." नंदा ताई तिला घेवून गेल्या.

जेवतांना नंदाताई तिला खूप सूचना देत होत्या. "सुरभी एकटीने कुठे फिरू नकोस. खूप काम करत बसु नकोस. काळजी घे. सचिन तु हिच्याकडे लक्ष दे. वेळेवर घरी येत जा. एकमेकांना सांभाळून रहा पोरांनो. "

ती हो म्हटली. जेवण झाल ती सामान घेत होती. सचिन आत आला." झाली का तयारी?"

"सचिन आजींना नको ना घेवू सोबत. मला दादाकडे जायच आहे. त्या असतिल तर कस जाणार? "

" आई ऐकणार नाही. थोडे दिवस थांब. नाहीतर आई तुला पाठवणार नाही." सचिन बोलला.

सुरभी बाहेर आली. सगळ्यांच्या पाया पडली. नंदा ताईंना भरून आल होत. "येत जा ग. तब्येत सांभाळ."

सुरभी विचार करत होती अशी सासू असेल तर किती चांगल. नाहीतर राहुलच्या आईने मला किती त्रास दिला. अगदी नको नको केल होत. उठता लाथ बसता बुक्की होती तिथे. हे लोक चांगले आहेत. सचिन ही चांगला आहे.

आजी आणि ती कार मधे मागे बसल्या. सचिन पुढे होता ड्रायवर जवळ. ते घरी यायला निघाले. आजी खूप बोलत होत्या. सुरभीला नेहमी प्रमाणे झोप येत होती.
"ये इकडे माझ्या जवळ झोप."

आजीं जवळ सुरभी खुश होती. सचिन त्याच्या कामात बिझी होता. रस्त्यात एका ठिकाणी ते चहासाठी थांबले. सुरभी आजीं सोबत होती. सचिन शी ती विशेष बोलत नव्हती.

मनुचा फोन आला. "वहिनी भेटायला थांबली नाहीस? रागवली आहेस का माझ्यावर ?"

"नाही मनु यांना ऑफिसच काम होत म्हणुन निघालो लगेच. तु आता घरी आलीस का? आशिष आला का?"

" हो. आता तू नाही, आजी नाही किती बोर होईल मला. मी येईल तिकडे तुला भेटायला."

"नक्की ये."

"दादाकडे दे ना फोन"

"हो. " ती सचिन कडे बघत होती तो बिझी होता. "अहो फोन घ्या. " ती हळूच बोलली.

सचिनने तिच्याकडे बघीतल. आजी समोर होत्या काय करणार? तिला पुढच ठरे पर्यंत व्यवस्थित वागायच होत.

सचिनच फोन वर बोलून झाल. ते निघाले.

आजींना बंगला आवडला. त्या सगळीकडे फिरून बघत होत्या." छोटा आहे पण छान आहे तुमच्या दोघांपुरता. मी थकली थोडा आराम करते. "

सचिन आजींना आत घेवून गेला. सुरभी तिच्या रूम मधे गेली. सचिन त्याच सामान घेवून तिच्या रूम मधे आला. ती पटकन उठून बसली. हा का आला इथे? ती बघत होती. "सचिन तू इथे राहणार का?"

"हो आजी झोपेल माझ्या रूम मधे."

" मी कुठे राहू? "

" इथेच माझ्या जवळ. मी पुढे सोफ्यावर झोपलो असतो आजी घरी सांगून देईल."

तिला आता टेंशन आल होत. कस रहाणार याच्या सोबत? मला धडधड होते. ती काही बोलली नाही.

"सुरभी तुला मला अहो नसेल म्हणायच तर काही प्रॉब्लेम नाही. कोणी का असे ना समोर तू मला सचिन म्हण." सचिन बोलला.

"माझी पर्स मोबाईल तुझ्या कडे आहे का?"

"हो देतो." त्याने आणून दिल.

फोन खराब झालेला होता. फुटला होता. एका पिशवीत दागिने होते. ते बघून ती खुश होती. हे मोडून सौरभ दादाला मदत करता येईल. मला ही थोडे दिवस पैसे पुरतील.

"सचिन मला डॉक्टरच सर्टिफिकेट हव होत. उद्या ऑफिसला जावून बघेन. "

" मी करतो डॉक्टरांना फोन. पण तरी सांगतो सुरभी कामाच टेंशन घेवू नकोस. तुझी तब्येत अजूनही ठीक नाही."

"मी कस करणार माझ्या खर्चाच? नोकरी करावी लागेल ना. "

" माझ ऑफिस जॉईन करतेस का?"

ती विचार करत होती." आधी माझ्या ऑफिस मधे जावुन बघते. मला घेतल नाही तर येते. सचिन एक बोलू का? "

हो .

"माझ्या पेक्षा सौरभ दादाला नोकरीची गरज आहे. तो खूप हुशार आहे. मेहनती ही आहे. तुझ्या ओळखीने त्याला जॉब मिळाला तर बघ ना. प्लीज दादाला सांगू नकोस मी रीक्वेस्ट केली ते. मला ना त्याची खूप काळजी वाटते."

" काळजी करू नकोस. मी बघतो. "

" थँक्यू. "

" हे सगळ तुझ आहे सुरभी. तू म्हणशील ते होईल." तो तिच्याकडे बघत होता. ती गडबडली.

" मी थोडा वेळ ऑफिसला जावून येतो. "

" चहा करू का?" तिने नेहमी प्रमाणे विचारल.

"नको मी तिकडे घेईल. आजी कडे बघ. "

ती हो बोलली.

ती विचार करत बसली होती. काय करू सचिन सोबत राहू का? नाही पण मी सचिनच अस नुकसान करू शकत नाही. मी मॅरीड आहे. त्यांच्या घरच्यांना समजल तर खूप गोंधळ होईल. तिने थोडा वेळ आराम केला.

आजी संध्याकाळी बाहेर येवून बसल्या. सुरभीने त्यांना चहा दिला.

" छान आहे हे घर सुरभी."

"हो आजी." ती मावशींनी स्वयंपाक काय करायचा ते सांगत होती. आजी बघत होत्या छान काम करते सुरभी. शांत आहे. दोघ नवरा बायको नीट रहातात. "सचिन केव्हा येईल ग? "

"त्यांना उशीर होतो. खूप काम असत."

"करमत का तुला इकडे?"

"नाही ना कंटाळा येतो पण काय करणार. मी पण ऑफिसला जाणार आहे आजी." सुरभीने सांगितल.

"कर काम हुशार मुल तुम्ही. छान सचिनला साजेशी बायको मिळाली आहे."

सुरभीला एकदम कसतरी झाल. मी नाही सचिनच्या लायक. मी अशी मुलगी आहे जी माझ्या नवर्‍याला नको आहे. मला मूल होत नाही म्हणून माझा डिवोर्स होणार आहे. सचिन एक छान मुलगा आहे त्याला खूप चांगली मुलगी बायको म्हणून मिळायला हवी.
....

सचिन ऑफिस मधे बसला होता. शिंदे साहेब आले. " आनंदाची बातमी साहेब. परवाची तारीख मिळाली आहे कोर्टाची."

"ठीक आहे आम्ही येवू. शंभर टक्के काम होईल ना ."

"हो फायनल सही करायची आहे. दोघी पार्टीच्या सहमतीने डिवोर्स होतो आहे त्यामुळे वेळ लागणार नाही. काही देण घेण नाही आरोप प्रत्यारोप नाही."

" तेच बर होईल. "

" तेव्हा लग्नाचे पेपर बनवून आणतो. सुरभी मॅडमची पूर्ण माहिती नाव वगैरे सौरभने दिल आहे मला. "

" चालेल."

" काय झालं साहेब? तुम्ही उत्साही दिसत नाही. याच क्षणाची तुम्ही वाट बघत होता ना. " शिंदे साहेबांनी विचारल.

" थोड थकलो आहे. मी ठीक आहे. "

" घरी जा. आराम करा. " शिंदे साहेब गेले.

सचिनने सौरभला फोन लावला." उद्या या तुम्ही घरी. सुरभी वाट बघते आहे. तिच्या सोबत ऑफिस मधे जायच आहे."

" हो येतो. "

" आणि तुमचा बायो डेटा घेवून या. आपल्या कंपनी दोन तीन जागा आहेत इंटरव्यू घेवून टाकू तुमचा. हे काम झाल तर इकडे शहरात शिफ्ट व्हा."

"नक्की येतो सचिन साहेब." तो खूप खुश दिसत होता.

" सौरभ मी तुम्हाला परका आहे का?"

"नाही साहेब. अस का म्हणताय. तुमच्या वर खूप विश्वास आहे. माझी बहीण आहे तुमच्या कडे. "

" मग मला हक्काने का सांगितल नाही जॉब बद्दल. या पुढे अस करु नका. "

" हो खूप धन्यवाद."

" पूजा उद्या एका ठिकाणी इंटरव्यू आहे." सौरभ आत येत बोलला.

पूजा खुश होती. सौरभ तयारीला लागला. सचिन साहेबांची कंपनी असली तरी इंटरव्यू दुसर कोणी तरी घेईल. आपण नीट उत्तर दिले नाही तर ते लोक घेणार नाही. मला हा चान्स घालवायचा नाही.
...

थोड्या वेळाने सचिन घरी आला. आजी, सुरभी टीव्ही बघत समोर बसलेल्या होत्या. त्या छान बोलत होत्या. सुरभी खूप छान दिसत होती. गळ्यात छोट मंगळसूत्र होत. मोठ काढून ठेवल वाटत. सचिन आल्यामुळे ती थोडी सावध झाली . तिने ओढणी नीट घेतली. उठून पाणी दिल.

सचिन आत गेल.

"जा सुरभी त्याला काय हव ते बघ." आजी बोलल्या.

"आजी ते आवरतील." सुरभी गेली नाही. कस वाटत अस? का त्या सचिनच्या मागे मागे करा. मला भीती वाटते.

"अरे काय अस? जा ना. नवर्‍याची अपेक्षा असते ऑफिस हून आल्यावर बायकोने समोर असाव. उठ लवकर." आजी ओरडल्या.

सुरभीचा नाईलाज झाला ती आत गेली. सचिन बाथरूम मधे होता. तो बाहेर आला. सुरभी समोर उभी होती.

"काय झालं?" त्याने विचारल.

"काही नाही आजींनी मला आत पाठवल. तुला काय हव नको ते बघायला. मी नाही म्हणू शकले नाही. "

" आजी पण ना. पण थँक्यू सुरभी तू आजीच मन जपल. चल जेवू."

सुरभीने मावशींना आवाज दिला. त्यांनी गरम भांडी बाहेर आणून दिले. सुरभी ताट करत होती.

"आजी तू जेवली का नाहीस? किती वेळ झाला." सचिन आजीं जवळ बसत बोलला.

" मग तू घरी लवकर का येत नाही. "

"अस करु नकोस आजी. उद्या पासून आठ वाजता जेवत जा."

" हो सुरभी म्हटली होती. तुम्हाला वाढून देते. मीच थांबली."

"आजी बसा. अहो चला."

सुरभी आतून पाणी घेवून आली. तिने सचिनला ताट दिल. आजी खुश होत्या." सुरभी तू बस बेटा. किती काम करते."

सुरभी शांततेत जेवत होती. ती त्या दोघांना व्यवस्थित वाढत होती.

"सुरभी मी घेईन मला हव ते रीलॅक्स. " सचिनने भाजी घेतली आजींना दिली.

" वाढू दे ना तिला. ती प्रेमाने करते तर अस करतो. नवर्‍याने व्यवस्थित जेवण केल तर बायकांना समाधान वाटत." आजी बोलल्या.

सुरभी लाजलेली स्पष्ट दिसत होती. तिने लगेच स्वतःला सावरल. नाही मला या सचिन मधे गुंतायचं नाही.

जेवण झाल. आजी खूप बोलत होत्या. सुरभी शांत बसलेली होती." आजी झोप आता. गोळ्या घेतल्या का? "

" हो घेते. सचिन आत रूम मधल्या टीव्ही वर काही दिसत नाही. बघ जरा."

" चल मी बघतो. " आजी सचिन आत गेले. सचिनने टीव्हीच सेटिंग बघितल. थोड्या वेळाने टीव्ही सुरू झाला.

"आजी कोणत चॅनल लावू?"

"जूने गाणे लाव ." सचिन तिथे बसला होता.

" उठ इथून तुझ्या बायको कडे जा. एक तर किती उशिरा घरी येतोस तू. " आजी ओरडल्या.

सुरभी रूम मधे बसली होती. पुस्तक हातात होत. सचिन आत आला. तो कुठे झोपू बघत होता. "सुरभी मी कॉटवर झोपू का?"

हो. ती थोडी बाजूला सरकली. सचिन तिच्या बाजूला बसला.

"काही प्रॉब्लेम नाही ना? "

नाही. चांगला आहे हा.

" सुरभी उद्या सौरभ येईल. त्याचा सोबत हॉस्पिटल मध्ये जा. सर्टिफिकेट रेडी आहे. तिथून ऑफिस मधे जा. ते लोक हो म्हटले तर ठीक आहे नाहीतर माझ ऑफिस जॉईन कर. कोणत्याही गोष्टीच टेंशन घ्यायच नाही. " सचिन पटापट सांगत होता.

सुरभीला बर वाटल उद्या दादा येईल. आमची भेट होईल.

" तुझ्या सौरभ दादाचा ही इंटरव्यू आहे आपल्या कंपनीत. काळजी करू नकोस. "

" पण तो तिकडे गावाकडे रहातो. तिकडे नाही होणार का काम? "

" नाही तो शहरात शिफ्ट होईल. मी करतो व्यवस्था. "

" सचिन थँक्यू. तू खूप चांगला आहेस."

" तुझ्या साठी काहीही."

सुरभी लाजली खर आहे अगदी मी म्हटली ते सगळं केल या सचिनने.

" मी काय सांगतो ते नीट ऐक सुरभी परवा कोर्टात जायच आहे. फायनल सही करायला मनाची तयारी करून ठेव. डिवोर्स पेपर वर सही करायची. हो नाही करायच नाही. त्या लोकां पासून जितक दूर रहाता येईल तेवढं बर आहे तुझ्यासाठी."

ती काही म्हटली नाही चेहरा उतरलेला होता. त्याला कसतरी झाल." गोळ्या घेतल्या का? "

" नाही. "

तो उठला.

" असू दे सचिन मी घेते."

तरी त्याने तिच्या बॅग मधून गोळ्या काढल्या. तिच्या हातावर दिल्या. पाणी दिल. ती छान हसली. थँक्स.

वेलकम.

हा खूप प्रेमाने वागतो माझ्याशी. हा असा आहे का इतका चांगला. कॉलेज मधे असतांना तरी हो म्हटलं असत याला . नकळत ती सचिन आणि राहुलच कंप्पेरीजन करत होती. दोघ बर्‍या पैकी चांगल्या घरचे होते. सचिन जरा अजून जास्त श्रीमंत. राहुलकडे शेती वाडी जास्त होती.

पहिल्या पासून राहुल तिच्याशी फटकून वागत होता. विशेष लाड करायचा नाही. प्रॅक्टिकल लाइफ होत. घरात सगळ आहे म्हणजे झाल अजून काय लागत बायकोला अशी राहुलची विचारसरणी होती . त्यात ही सुरभी खुश होती. सगळ्यांना सांभाळून होती.

पूर्वी पासून अति चांगला स्वभाव. कशाची तक्रार करायची नाही. म्हणून तिला गृहीत धरल गेल. घरचे अशिक्षित. सासुबाई बोलतील ती पूर्व दिशा. त्यांना आपल्या मुलाला मुल होवू शकत नाही हे मान्य नव्हतं. समोर दिसली ही साधी भोळी सुरभी. तिच्यावर आरोप करून त्या मोकळ्या झाल्या . त्यात तिला आई बाबा नाहीत. सपोर्ट नाही. सौरभ ही लहान आता तर लग्न झालं त्याच. काय करतील हे बहीण भाऊ. त्यांनी सहज सुरभीला घराबाहेर काढल.

त्या लोकांचा विचार करून सुरभीला कसतरी झाल. काय करू सही करावी लागेल. मला ही आता आयुष्यात थोडी शांती हवी आहे. तिला खूप रडू येत होत. संपल सगळं.


🎭 Series Post

View all