नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 22

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 22

©️®️शिल्पा सुतार

सुरभी, सौरभ घरी आले. आजी पुढे बसलेल्या होत्या. " झाल का काम?"

"नाही आजी त्या लोकांनी मला नाही सांगितल." सुरभी नाराज होती.

"जावू दे दुसर काम कर. तू हुशार आहेस. नाराज होऊ नकोस." आजी बोलल्या.

" सुरभी मला निघाव लागेल इंटरव्यू आहे. " सौरभ घाई करत होता.

" दादा तू फ्रेश होवुन ये आपण जेवू. " ती किचन मधे गेली.
स्वयंपाक झाला होता. ती ताट करत होती. सचिनचा फोन आला. ती नाराज होती. फोन घेवून ती आत गेली.

" झाल का काम सुरभी? "

"मला नाही घेतल. माझ्या जागेवर दुसरी मुलगी घेतली."

" काळजी करू नकोस तुला या पेक्षा मोठ काम करायच असेल. सौरभला ऑफिसला पाठवून दे. " सचिन बोलला.

बर झाल सुरभीला घेतल नाही. उगीच ती दुसर्‍याच्या ऑफिस मधे काम करेल मला आवडणार नाही. आपली एवढी मोठी फॅक्टरी काय कामाची. माझ्या सोबत कर काय काम करायच ते.

" आम्ही आता जेवण करतो मग येईल सौरभ. अर्धा तास दे . सचिन तू जेवला का?" तिने सहज विचारल.

" नाही अजून. "

" घरी येणार का जेवायला?" तिने हळूच विचारल.

"नाही मी बिझी आहे. लगेच एक मीटिंग आहे. "

" सचिन वेळेवर जेवून घे. "

त्याला खूप छान वाटल." सुरभी थँक्स माझी इतकी काळजी केल्या बद्दल. पण एक सांग. मी जेवलो काय कींवा काही नाही खाल्ल तरी तुला का फरक पडतो? "

सुरभी गप्प होती. तिला कसतरी वाटत होत. हो ना आपण का काळजी करतोय? हा काही लहान नाही.

" सुरभी ऐकते ना? सांग ना का करतेस माझी काळजी?" त्याने परत विचारल.

"नाही ते अस नाही. मी ठेवते फोन. " ती गडबडली. या सचिन सोबत बोलायला नको.

" आज रात्री बोलू आपण या विषयावर. तेव्हा तू मला सांग तुला माझी किती काळजी वाटते." सचिन हसत होता.

सुरभी थोडी घाबरली. तिने पटकन फोन ठेवून दिला. तिला सचिनचा राग आला होता. काहीही बोलतो हा. जनरली आपण बोलतो ना की जेवून घे. त्यात काय एवढं? सचिनच्या विचाराने तिला धडक भरली होती.

मी आज सचिन सोबत बोलणार नाही. लवकर झोपून घेईन. हा माझ्याशी जास्त बोलला तर मी होकार देवून टाकेन. नको अस. ती बाहेर आली. ताट केल.

तिघ जेवायला बसले. सौरभ छान बोलत होता. "चला मला निघाव लागेल. मी तिथून घरी जाईल. मी फ्रेश होवुन येतो." तो आत गेला.

"सुरभी तुझा भाऊ छान आहे." आजी बोलल्या.

"हो तो मला खूप सांभाळून घेतो. समजूतदार आहे. "

सौरभ त्याच सामान घेत होता.

"चांगला दे इंटरव्यू. मला फोन कर." सुरभी खूप सूचना करत होती.

हो.

"दादा उद्या येशील ना?" कोर्टात जायला सुरभीला कंटाळा आला होता. भीती वाटत होती. नको वाटत होत.

"हो काळजी करू नकोस. हिम्मत ठेव." तिच्या कडे बघत सौरभ बोलला.

" मला खूप धडधड होते आहे."

" घाबरली का तू इतकी. उलट जे होत ते चांगल्या साठी होत हे लक्ष्यात ठेव. लवकर सुटली तू त्या लोकांच्या ताब्यातून. जास्त विचार करू नकोस. आयुष्यात पुढे जायला हव."

" दादा सचिनच काय करू?"

"माझ ऐकशील तर सचिन साहेबांना हो बोल."

"दादा मला थोडा वेळ हवा होता. "

" काय करणार वेळ घेवून उगीच दुःखी होत बसशील. एकदा नीट विचार कर . मला पण तू सुखी झालेली हवी आहे. "

" मी विचार करते."

तो निघाला. ऑफिस मधे आला.

थोड्या वेळाने इंटरव्यू झाला. सौरभने छान उत्तर दिले. हुशार होता तो.

"एक दोन दिवसात ऑफिस मधून फोन येईल. मग ठरवू पुढच ." मॅनेजर बोलला.

" ठीक आहे सर. "

जातांना तो सचिनला भेटला." माझा इंटरव्यू झाला . मी निघतो. "

"उद्या या. सुरभीला तुमची गरज आहे. " सचिन बोलला.

हो.

" तिला काही सुचत नाही. ती या कोर्ट प्रकरणांमुळे घाबरली आहे. "

" हो ना. हे डिव्होर्स वगैरे तिला आवडत नाही. पण काय करणार? ते लोक कसे खराब आहेत ."

"बरोबर आहे त्रास होतो. ती हळवी आहे. माझ्या बद्दल काही म्हटली का? सौरभ मला सुरभीशी लग्न करायच आहे. ते ही लवकर. तुम्ही समजवून सांगा तिला. "

" मी पण बोललो आज तिच्याशी. तिला सांगितल की तीच तुमच्या सोबत चांगल होईल."

" ती काय निर्णय घेते काय माहिती." सचिन काळजीत होता.

"मी समजावेल तिला तुम्ही काळजी करू नका. ती साधी आहे. उद्या भेटू मी निघतो. "

सौरभ घरी आला. पूजा पटकन बाहेर आली." झाला का इंटरव्यू?

हो.

" हे काम व्हायला हव."

" होईल."

" सुरभी भेटली का? तुम्ही गेले होते का तिच्या होस्टेल वर?"

" पूजा तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण तू कोणाला बोलू नकोस. सुरभी होस्टेल वर नाही." तो सगळ सांगत होता. सचिन सुरभी बद्दल.

" अहो हे लग्न झालं तर खूप चांगल होईल. मला ही सुरभी खुश असलेली हवी आहे."

" खूप चांगले लोक आहेत. त्यांच्या फॅक्टरीत माझा इंटरव्यू होता. "

" श्रीमंत आहेत का ते. "

" हो खूप. मनाने खूप चांगले आहेत. त्यांच्या घरच्यांना वाटत सुरभी सचिन साहेबांची बायको आहे. कधी जर भेटले ते तर शांत रहायच. "

" हो. मी लक्ष्यात ठेवेन. "

" एवढ्यात कुठे बोलु नकोस तुझ्या माहेरी ही नाही. "

" मी लक्ष्यात ठेवेन. "
....

सचिन संध्याकाळी घरी आला. रूम मधे निघून गेला. सुरभी कुठे गेली? तो बघत होता.

आजी, सुरभी देवा जवळ बसलेल्या होत्या. आजी तिच्याशी बोलत होत्या.

" आजी तुम्ही किती चांगल्या आहात. कधीच चिडत नाही." सुरभी बोलली..

"सुरभी आपण चांगल तर जग चांगल. तू पण गोड आहेस. नीट वागते. तुझ्या आयुष्यात चांगले लोक आहेत. "

सुरभीला उद्याच वाईट वाटत होत. ती विचार करत होती कुठे आहेत ते चांगले लोक? सगळे मला त्रास देतात. माझ अजून कशात काही नाही. सगळी अस्थिरता. ना घर, ना दार, ना नोकरी, ना आई बाबा, ना पैसे. मनाप्रमाणे काही होत नाही. आजींना वाटत तेवढी ही मी सुखी नाही. मी चांगली आहे तर माझ चांगल का होत नाही.

" आजी मला हे नाही पटल. आपण किती चांगल असल तरी समोरचा जस वागायचं तस वागतो. त्याला काही घेण नसत तुमच्या स्वभावाशी. अतिशय स्वार्थी लोक आहेत या जगात." तिच्या डोळ्यात पाणी होत. ते तिने पटकन पुसल.

" बेटा पण अश्या स्वार्थी लोकांच कधी चांगल होत नाही. त्या वेळेपुरता त्यांना जिंकल्याचा आनंद मिळतो. पण त्या नंतर त्यांच कर्म त्यांना बरोबर शिक्षा करतो. आणि जे चांगले असतात त्यांना निरपेक्ष आनंद प्रेम मिळतो." आजी सहज बोलल्या.

"आजी खरच चांगल्या लोकांना कधी तरी न्याय मिळतो का? "

" हो बेटा देव बघत असतो. "

" आपल चांगल कोणत्या गोष्टीत आहे हे कस समजेल?" सुरभीने विचारल.

" डोळे उघडे ठेवून बघायच. आपल्या साठी काय चांगल आहे हे देव सुचवत असतो. ते घ्यायच. मागचा पुढचा विचार करायचा नाही. नाही तर देव देतो आणि कर्म नेत अस होत."

सुरभी तिचा विचारात होती. तिने डोळे मिटून घेतले. देवा मला तूच योग्य मार्ग दाखव. मी काय करू? माझ्यासाठी जे योग्य असेल ते समोर दिसेल. मी काय विचार करते आहे हा? अस थोडी असत. ती थोडी हसली. तिने हळूच डोळे उघडले. सचिन तिच्या बाजूला बसलेला होता. तो तिच्याकडे बघत होता. तिला आश्चर्य वाटल. देवाच काय म्हणण आहे? सचिन माझ्यासाठी योग्य आहे. ती लाजली.

आजी आरती करत होत्या. ते दोघ एकमेकांकडे बघत होते.

" चला आरती घ्या. बर झाल सचिन तू आज लवकर आलास. आम्हाला काही करमत नाही बघ तुझ्या शिवाय."

" हो का? तुला ही माझ्या शिवाय करमत नाही का?" त्याने सुरभी कडे बघत विचारल.

सुरभी उठली. पटकन किचन मधे निघून गेली.

सचिन ती गेली तिकडे बघत होता.

"सचिन प्रसाद घे. मी राहिले दोन चार दिवस. मला या रविवारी घरी सोडून दे. "

" आजी रहा ना अजून. काय अस? मला करमणार नाही."

"आहे ना तुझी बायको सोबत. छान रहा. चांगली आहे ती शांत एकदम. तिकडे माझा भजनी मंडळाचा ग्रुप आहे. माझ मन रमत तिकडे."

ठीक आहे.

सुरभी डायनिंग टेबल जवळ काम करत होती. सचिन समोर बसला होता. त्याच लक्ष तिच्याकडे होत. ती किचन मधे निघून गेली. ग्लास भर पाणी पिली. तिची धडधड थांबत नव्हती. हा सचिन माझ्याकडे काय बघतो आहे . जावु दे आजी गेल्या की मी दादाकडे जाईन.

जेवण झाल. आजी आत निघून गेल्या.

सचिन सुरभीच्या मागे रूम मध्ये आला. ती मुद्दाम आवरल्या सारख करत होती. खर तर दोघांना काही सुचत नव्हत.

" सुरभी इकडे ये मला बोलायचं आहे तुझ्याशी." त्याने आवाज दिला.

ती आली नाही.

"सुरभी इकडे ये." तो उठला. ती घाबरली. पटकन बाहेर जात होती. त्याने पुढे होवुन दार लावून घेतल.

"सचिन मला जायच आहे."

"तू घाबरते का इतकी. मी काय करणार आहे . ये इकडे बस. हे बघ उद्या कोर्टात कोणाशी बोलायच नाही. राहुलशी पण नाही नाही. "

"का अस? "

"काय करणार तू बोलून. उगीच शब्दाने शब्द वाढतात. "

" त्या राहुलने का अस केल अस ते विचारायच होत. "

"काय फरक पडणार आहे विचारून . जे व्हायचं ते होणार आहे ना. मला माहिती आहे तू त्रास करून घेशील. म्हणून आता सांगतो तिकडे कोणाशी बोलु नको. झोप आता. "

सुरभी झोपली. तिला वाटल दुपारी सचिन बोलाल होता की मी जेवलो नाही तर तुला काय फरक पडतो. ते बोलेल म्हणून ती घाबरली होती.

अकरा वाजता कोर्टात जायचं होतं. सुरभी गप्प होती. तिने कसातरी नाश्ता चहा घेतला. सचिन वाढत होता. ती नुसती बसली होती.

" काय झालं ग सुरभी? बर वाटत नाही का? " आजी बोलल्या.

" काही नाही आजी मी ठीक आहे."

"आजी सुरभीला सोबत नेतो. आम्ही दुपारी येवू." सचिन आजींना चहा देत होता.

"ठीक आहे जावून या."

"जा सुरभी देवाच्या पाया पड." सचिन बोलला. ते निघाले कोर्टात आले. सुरभीला दडपण आल होत. "सचिन तू माझ्या सोबत रहा."

" हो सौरभ येई पर्यंत मी इथे आहे .काळजी करायची नाही. नंतर तू सौरभ सोबत रहा. "

"का अस?"

"नंतर सांगेन. "

सुरभी बाकावर बसली होती. सचिन शिंदे साहेबांसोबत बोलत होता.

" काही काळजी करू नका साहेब आता सही होऊन जाईल. मॅडम ठीक आहे ना आता. "

"हो तिला आठवत आता जुन्या गोष्टी. "

थोड्यावेळाने राहुल त्याच्या वकीला सोबत आला .त्यांने सुरभी कडे बघितलं. सुरभी उठून उभी राहिली .

राहुल....

तो पुढे निघून गेला. किती दिवसानी बघितल राहुलला. किती कोरडा चेहरा. यांना काही वाटत नाही का माझ्या बद्दल? तिचा चेहरा उतरला होता.

" सुरभी काय झालं?" सचिन बघत होता ती डिस्टर्ब आहे.

"सचिन मला बोलायचं आहे राहुल सोबत."

"नाही सुरभी अस करता येणार नाही. घरी काय सांगितल होत. शांत बस बर."

ती नाराज होती. सौरभ आला.

"दादा राहुल आला. आत गेला. तू बोलून बघ ना त्याच्याशी. दादा एकदा विचार ना की त्यांनी का केल अस?"

" काही उपयोग नाही सुरभी .ते लोक चांगले नाहीत. सही कर मोकळी हो ."

" सुरभी चल आत बोलवलं आहे. "

सचिन तिच्या जवळ आला सुरभी हिम्मत हारू नको सौरभ बघा हिच्याकडे.

" हो मी पण आत जातो. "

" सचिन मला एकदा राहुलशी बोलायचं आहे." सुरभी परत हट्ट करत होती.

"सुरभी परत सांगतो. काही उपयोग नाही. ते लोक चांगले नाही. सत्य स्विकार. तुला राहायचं आहे का त्याच्यासोबत?"

"नाही."

" दगडावर डोकं आपटून उपयोग नाही आपल्यालाच लागतं. जा आत. "

शिंदे साहेबां सोबत सुरभी आत गेली. राहुल समोर बसलेला होता. सुरभी राहुल पुढे या. म्युचल अंडरस्टँडिंगने सह्या झाल्या. सुरभी सारखी राहुल कडे बघत होती .त्याला काही वाटत नव्हत.

सुरभी बाहेर येवून बसली. सचिन सौरभ कडे बघत होता. हो झाली सही. त्याने हळूच सांगितल.

ती कोणाशी बोलत नव्हती. सचिन तिच्याकडे लक्ष देवून होता.

शिंदे साहेब बाहेर आले. "साहेब झाली सही. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघा मॅडम कडे. मी आत बघतो थोड काम आहे."

सचिन तिच्या जवळ जावून बसला. "सुरभी काय झालं?"

"सचिन त्या राहुलला सही करतांना काहीच वाटल नाही. तो खुश होता. हे मला नाही सहन होत आहे."

"तू उगीच त्रास करून घेते आहेस सुरभी प्रॅक्टिकल हो."

"मी बघत होती कसे कसे लोक असतात. खूप स्वार्थी. त्या राहुलला मी नको आहे. मला दुसर्‍या बायको साठी सोडल. उद्या दुसरी कोणी आली आयुष्यात तर तिला ही सोडेल का हा? "

" आता तो काही का करेना आपल्याला काय? जास्त विचार करू नकोस. " सचिन सोबत तिला बर वाटत होत सौरभ बाजूला येवून बसला.

" पाच मिनिट थांबायला सांगितल. "

राहुल बाहेर आला. सुरभी सचिन जवळ बसलेले होते. सुरभी काहीतरी बोलत होती. सचिन तिला समजावत होता. त्याच डोक फिरल. तो तिच्या जवळ आला.

" हाच आहे का तुझा नवीन यार. फार भारी भरतो हा. श्रीमंत आहे वाटत. याच्या मुळे मला नोकरीवरून काढून टाकल. माझी नोकरी गेली. पण मला काही फरक पडत नाही. समजल ना. गडगंज आहे माझ्याकडे. तुझ अभिनंदन सुरभी. छान सुरू आहे. याचा सोबत राहते ना तू बिना लग्नाची. तुला काय वाटल मला काहीच माहिती नाही का? मी याची पूर्ण चौकशी केली आहे. तेव्हा समजल तुमच प्रकरण. लग्न करणार का? की अस राहणार. लीव इन रिलेशनशीप. तू फार फॉरवर्ड झालीस. "

सगळे शॉक होवुन ऐकत होते.

" काय बोलतोस तु राहुल? शट अप. किती घाणेरडे विचार आहेत तुझे. " सुरभी रागाने बोलली.

"अरे तू आता मला अरे कारे करते."

"मान मागून मिळत नाही राहुल. वागण एवढ घाण. शी. दुसर्‍या कडे बोट दाखवतांना स्वतः काय करतो ते बघ. इथून नीघ. तुझा माझा काही संबंध नाही. " सुरभी जोरात बोलली.

सचिन तिला घेवून बाजूला गेला. तिथे राहुल मागे आला. तो तिला काही बोलणार तेवढ्यात सचिनने त्याला हाताने थांब सांगितल. "राहुल गप्प बसायच. इथून निघायच. या पुढे सुरभीला काहीही बोलायच नाही. तीच नाव घ्यायच नाही. तुझा तिचा काही संबध नाही. "

" अस का? कोण रे तू मधे बोलणारा. तिचा यार का की होणार नवरा? " राहुल अजूनही काहीही बोलत होता.

" तुला काय करायच आहे. नीघ आता. नाही तर असा त्रास देईल ना तुला चांगल लक्ष्यात येईल मी कोण आहे ते. " सचिनने धमकी दिली.

" सुरभी हा मुलगा वापरुन घेतो आहे तुला. आरामात एवढी छान मुलगी हातात आली. का सोडेल तो. अजूनही सावध हो. थोड्या दिवसा नंतर हा तुला सोडून देईल. श्रीमंत लोक असे असतात. तरीच तुला डिवोर्स घ्यायची घाई होती. आता रान मोकळ. खूप आरामात दिसते आहेस तू याच्या सोबत. तेज आल तुझ्या चेहर्‍यावर. नेमकं कशामुळे? " राहुल काहीही बोलत सुटला होता.

सुरभीने कानावर हात ठेवले.

" सुरभी नको ऐकु. काहीही बोलतो हा. म्हणून म्हणत होती मी की इकडे कोणाशी बोलायच नाही. इतके दिवस कशी रहात होती तू अश्या घाणेरड्या माणसा सोबत. " सचिनला काळजी वाटत होती सुरभीने त्रास नाही करून घ्यायला हवा.

" फार काळजी आहे तुला तिची . काय रे सौरभ तुला पटत का हे? कोण आहे हा? " राहुलने परत विचारल.

" माझ आणि सुरभीच काय नात आहे ते तुला समजणार नाही. आणि मला ते तुला सांगायची गरज नाही. तुझी पोहोच नाही तिथे पर्यंत. नंतर भेट दाखवतो तुला. आज हे जे काही तू बोलला ना राहुल मी सोडणार नाही तुला. कोर्टाच्या बाहेर नाही वाजवला ना तुला नाव बदलून टाकेन. " सचिन खूप चिडला होता. सुरभी सौरभ दोघ घाबरले होते.

सुरभी पुढे आली. " सचिन शांत हो. नको बोलू याच्याशी. हा राहुल अतिशय मूर्ख माणूस आहे. तुला चांगले वाईट लोक समजता का रे? समजल असत तर आज तू अस बोलला नसता. स्वतः दुसर लग्न करायच आणि बायकोने दुसर्‍या कोणाशी बोलायच ही नाही. वाह काय कोती मनोवृत्ती आहे. आज मी खरच आनंदी आहे माझ तुझा डिवोर्स झाला. तुझ्या पासून दूर जातांना आधी मला वाईट वाटत होत. पण आता मी खुश आहे. माझ्या आयुष्यातले चार वर्ष तुझ्या सोबत वाया गेले. जे होत ते चांगल्या साठी होत. आमच्याशी बोलायची गरज नाही. नीघ. "

सौरभने राहुलला जायला सांगितल. तो जात नव्हता बडबड करत होता.

सचिन सुरभीला घेवून पार्किंग मधे आला. " कार मधे बस सुरभी मी आलोच. "

" नाही सचिन नको भांडु. माझ्या सोबत रहा. प्लीज. मला खूप भीती वाटते आहे. ते लोक असे आहेत. लांब थांब त्यांच्या पासून. " सुरभी कडे बघून सचिन गप्प बसला.


🎭 Series Post

View all