नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 24

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 24

©️®️शिल्पा सुतार

सुरभी, पूजा किचन मधे बोलत होत्या. त्या दोघी चहा घेवून बाहेर आल्या. सौरभ, सचिन काही तरी महत्वाच बोलत होते. पूजाने चहा दिला.

"वहिनी छान झाला चहा. चला सौरभ येतं आहात ना ऑफिस मधे? "

हो. तो तयार होवुन आला. सौरभ, सचिन ऑफिसला गेले.

सुरभी पूजाला सामान लावायला मदत करत होती. इकडे येवून ती खूप खुश होती.

" आता सांग सुरभी आधी काय झालं होत?" पूजा विचारत होती.

सुरभी तिला त्या दिवशीच सांगत होती कस राहुलच्या घरच्यांनी तिला घरात घेतल नाही. तो एक्सीडेंट. सचिन भेटला ते. घरातून बाहेर काढल्या पासूनच सगळ सांगत होती.

" किती कठिण होते राहुलच्या घरचे. अस कोण करत?" पूजा बोलली.

" तेच ना वहिनी तू विचार कर इथे कोणी तुला अस केल तर. "

" कठिण आहे हे. कस सहन केल? सचिन साहेब भेटले नसते तर आज आपली परिस्थिती किती वेगळी असती. त्यांनी खूप सपोर्ट केला." पूजा बोलली.

"हो वहीनी खूप चांगला आहे सचिन."

"तू त्यांच्याशी लग्न कर. कोणाचा विचार करू नकोस. लोक तर काय काहीही केल तरी बोलतात. आपण आपल चांगल कश्यात आहे ते बघायच."

" वहिनी आपण डॉ कडे जावू या का? माझी तपासणी करून घेवू. " सुरभी विचार करत होती आधी बघू माझ्यात दोष आहे का ते.

" काही हरकत नाही पण तरी एकदा सचिन साहेबांसोबत बोलून बघ. "

" वहिनी अस कस बोलणार? "

" मला वाटत त्यांना काही अडचण नाही. तूच उगीच अति विचार करते आहेस."

" वहिनी काल काय झाल माहिती का? सचिनच्या आजी बोलल्या गुड न्यूज लवकर दे. मला अस टेंशन येत. अस वाटत मी सचिनच नुकसान करते आहे. मी म्हणून म्हटलं. घरचे आशा लावून आहेत."

"पाॅझिटीव्ह विचार कर. तुझ्यात दोष नसेलच. मला खात्री आहे. लग्न कर आनंदाने रहा. आपोआप होईल बघ. " पूजा बोलली.

" वहिनी अस असेल तर खूप बर होईल."

" तुझ्या मनाप्रमाणे होईल. "

सुरभी लाजली होती. " मग देवू का होकार? "

" हो दे. " दोघी खुश होत्या.

" तुला माझा राग नाही ना आला? " पूजाने विचारल.

"का येईल?" सुरभीने विचारल.

" ते मी बोलत होती त्या दिवशी मागून की इथे घरी आधी काही नाही त्यात अजून एका माणसाची भर ते तुझ्यासाठी नव्हतं. यांच्यावर राग होता. एकंदरीत परिस्थितीचा राग आला होता. अग जॉब धड नाही. हे ऐकत नाही. म्हणून वैतागले होते."

"होत अस वहिनी. मला ही समजत. आता अजिबात काळजी करू नकोस. एकमेकांना जपा. "

सौरभ घरी आला. तिघ गप्पा मारत जेवायला बसले. जेवण झाल.

" मी आराम करते. " ती तिच्या रूम मधे निघून गेली.

इकडे घरी सचिनला अजिबात करमत नव्हत. फोन करून बघू का सुरभीला? गेली तर तिकडेच गेली. या पुढे मी तिला कुठे जावू देणार नाही.

त्याचा फोन वाजला. सुरभी होती. त्याला खूप आनंद झाला होता.

" हॅलो सचिन. "

" बोला आत्ता आठवण झाली का आमची? काय चालू तुमच?"

" काही नाही आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तू काय करतो आहेस? " सुरभी बोलली.

" मी तुझी आठवण काढत होतो."

सुरभी छान हसत होती.

" काय केल मग आज? " ती सांगत होती.

" आपल्या बद्दल विचार केला का? "

सुरभी काही बोलली नाही. तिला वाटत होत हो बोलाव. पूजा वहिनी सोबत झालेल बोलण सांगाव. पण हिम्मत झाली नाही. अस नको भेटू तेव्हा बोलू. ती गप्प होती.

" सुरभी तू सगळ बोलते आपल्या लग्नाच सोडून. का अस? "

"अस काही नाही सचिन."

"मला ना अस टेंशन येत. "

" तु टेंशन घेवू नकोस. सगळ चांगल होणार आहे."

" सुरभी तू घरी कधी येणार आहेस?"

"काय काम आहे? " ती त्याला मुद्दाम चिडवत होती.

"मला करमत नाही."

ती लाजली होती.

" सांग ना कधी येणार? "

" आजच तर आली इकडे. अजून दादाशी नीट बोलली ही नाही थोड्या दिवसांनी येते. "

" याला काय अर्थ आहे." सचिन चिडला होता.

" मी फोन ठेवते. गुड नाइट."

" सुरभी ऐक. "

तिने फोन ठेवून दिला. सचिनला राग आला होता. उद्या मी हिला घ्यायला जातो. हिला जावू नव्हतं द्यायला हव होत. आता ती अजिबात ऐकत नाही. तो रागाने झोपला.

सुरभी खूप हसत होती. सचिन किती चिडतो. पण माझी वाट बघतो. तिला छान वाटत होत. लग्न करायला प्रॉब्लेम नाही पण मला सचिन सोबत रहायच टेंशन येत. मला जमणार नाही ते. जुन्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत. कश्या विसरू त्या.

राहुल बद्दल आता काही वाटत नाही. सचिन बद्दल खूप रीसेप्ट आहे मनात. त्याच्या सारखा आयडियल जोडीदार शोधून सापडणार नाही. त्याच दिसण छान आहे. तो श्रीमंत आहे. वागायला किती चांगला आहे .

काही असल तरी लगेच सचिन सोबत नाही राहू शकत. मला धडधड होते. त्याला कस सांगू मी हे? दुसर लग्न करण खूप अवघड असत. ती विचार करत बसली होती .तिला एकटीला झोप येत नव्हती. रोज सचिन सोबत असायचा. छान वाटायच.

आठ दहा दिवस होवुन गेले. सचिन रोज विचारत होता केव्हा येणार सुरभी? ती हो नाही करत होती. तो एकटा खूप कंटाळला होता. तो संध्याकाळी सौरभ कडे आला. सुरभी त्याला बघून खुश होती. दोघ एकमेकांकडे बघत होते. जेवायला छान बेत होता. चौघांच जेवण झालं. चल सुरभी त्याने एकदा दोनदा सांगितल. सुरभीने दुर्लक्ष केल.

"मला निघाव लागेल. तो सुरभी कडे बघत होता." ती त्याच्या सोबत बाहेर आली.

"सुरभी घरी येणार ना? प्लीज चल ना. अस काय? मला नाही करमत तिकडे. "

"नाही मी आता येणार नाही. नंतर येते ." म्हणजे तिला म्हणायच होत लग्नानंतर येते. सचिनला ते समजल नाही.

" सुरभी तू शब्द पाळला नाही. तू बोलली होती दोन दिवसात लगेच घरी येते. "

" आपण अस कस सोबत रहाणार." सुरभी बोलली.

" मग काय झालं. आपण थोडी काय करतो आहोत. आपल प्रेम पवित्र्य आहे. " सचिन समजावत होता.

" हो ते आहे. तरी मला आता येता येणार नाही. "

सचिन चिडला होता. तो निघून गेला.

सुरभी घरी आली. सचिन चिडला म्हणून तिला ही वाईट वाटत होत. उगीच त्याची गम्मत केली. तिला झोप येत नव्हती. सचिनशी बोलू का? त्याला सांगू की आपण लग्न करू. तिचा त्याच्या साठी जीव अर्धा होत होता. आता नको उद्या नीट बोलून घेते. सकाळी ती फोन बघत होती सचिनचा काही मेसेज नव्हता.

सकाळी मनुचा फोन आला. "वहिनी आम्ही घरी येतो आहोत. आईच काहीतरी काम आहे दादा कडे. तू घरी आहेस ना?"

"हो घरी आहे तू ये. मी मार्केटमध्ये आहे. लगेच येते." पूजाला सांगून सुरभी पटकन निघाली. घरी आली. तिला इकडे बंगल्यावर येवून खूप छान वाटत होत. तिने सगळीकडे फिरून बघितल. थोडी तयारी केली. आज मी बोलते सचिन सोबत ती खुश होती.

थोड्यावेळाने नंदा ताई, मनु आल्या. दोघी खुश होत्या. नंदा ताईंनी सुरभी साठी साड्या आणल्या होत्या. "मी ऑफिस मधे जाते. मनु इथे राहील."

दोघी खुश होत्या. सुरभी खूप रमली होती मनु सोबत. दोघी खूप गप्पा करत होत्या.

"वहिनी दादा केव्हा येईल?"

"बहुतेक आई आणि हे सोबत येतील. "

" तुला बोर नाही का होत इथे? तुम्ही दोघ असता."

" तू थांब इथे माझ्या जवळ . "

" नाही मला कॉलेज असत."

सुरभी स्वयंपाकाच बघत होती. मावशी तिच्या जवळ आल्या. " सुरभी मॅडम भाज्या नाहीत. "

" का रोज स्वयंपाक होत नव्हता का?"

"नाही साहेब ऑफिस मधून खावून येतात तुम्ही नव्हत्या तर मन लागत नव्हतं."

"शु गप्प बसा. जा थोड सामान आणा. आटपा. "

संध्याकाळी सचिन, नंदाताई घरी आल्या. "सुरभी पाणी आण."

ती पुढे गेली. सचिन तिला बघून खुश होता. सुरभी बिझी होती. खूप काम करत होती. ती घरच्यांच खूप नीट करत होती. चला. ताट तयार होते.

जेवताना सचिन, नंदा ताई ऑफिस बद्दल बोलत होते. त्याची भाजी संपली होती.

" अहो भाजी देवू का?" सुरभीने एक दोनदा विचारल. त्याने लक्ष दिल नाही.

"दादा वहिनी काय म्हणते आहे?"

"काय?" त्याने विचारल.

"तुम्हाला भाजी देवु का?"

"मी घेतो."

बापरे अजून राग गेला नाही वाटत. सुरभी विचार करत होती.

जेवण झालं. नंदा ताई आवरत होत्या. " आम्ही निघतो."

" खूप रात्र झाली. आता नका जावू. " सुरभी बोलली.

"आम्ही दोन तासात पोहचू. सकाळी कॉलेज आहे. तू ये तिकडे वहिनी " मनु बोलली.

हो.

सचिन ड्रायवर काकां सोबत बोलत होता. त्या गेल्या.

दोघ आत येवून बसले. त्यांच्यात अगदी अबोला होता. सचिनला राग आलेला स्पष्ट दिसत होता. सुरभी पसारा आवरत होती.

"सुरभी तू काय करते आहेस इथे?" त्याने जोरात विचारल.

ती दचकली. "ते मनु आली होती ना म्हणून पटकन आली."

" मग काय झालं मनु आली तर? "

"तिने बोलवलं. तिला, आईंना सगळ समजल असत तर. मी इथे रहात नाही ते. म्हणून आली."

"समजू दे. जे व्हायच ते होऊ दे. तू का काळजी करतेस." सचिन अजून रागात होता.

"सॉरी मी आलेली तुला आवडला नाही वाटत . मला जायच. या पुढे अस करणार नाही. " तिने तिची पर्स घेतली.

सचिन उठून तिच्या जवळ आला. "तुला समजत नाही का मला काय म्हणायच असत ते? तू माझी माझ्या परिवाराची काळजी करतेस. तुला आमच्या सोबत आवडत. तुला माझ्या सोबत रहायच आहे. मग का स्वतःला थांबवते. तुझ्या मनात काय आहे. माझ्यासोबत लग्न करायच की नाही?"

"मला माहिती नाही. मी काय म्हणते सचिन आपण एकदा माझी टेस्ट केली असती. माझ्यात दोष आहे की नाही ते समजेल. "

" याची काही गरज नाही. मला काही प्रॉब्लेम नाही. मी आधी ही तुला सांगितल आहे. सुरभी मला अस वाटत तू गोंधळलेली आहेस. माझ ऐक या पेपर वर सही कर ."

"कसले पेपर आहेत?"

"आपल्या लग्नाचे ."

" अस घाईघाईत लग्न .नाही नको. "

" तुला मी आवडत नाही का? "

" तो प्रश्नच नाही. तू चांगला आहेस. माझा प्रॉब्लेम आहे. "

" तू माझा ऐकणार आहे की नाही. हे बघ तू माझा ऐकलं नाही तर मी सौरभला नोकरीवरनं काढून टाकीन. खूप नुकसान करेन. मी पण स्वतः कुठेतरी निघून जाईन." सचिन चिडला.

"अशी चिडचिड करून काय होईल सचिन. शांत हो. "

" मग काय करू मी सुरभी? तू माझा ऐकत नाहीस. रोज काय होईल? मला हा विचार करून किती त्रास होतो. एक तर नीट रहा, नाही तर कायमची चालली जा." सचिन बोलला.

" तुमच्या घरचे चिडतील माझा स्विकार करणार नाही. "

" अस काही होणार नाही त्यांना तू आवडते. "

" ते आधी आवडत होती त्यांना सत्य समजल तर काय होईल?" सुरभीला सासरच्या लोकांचा चांगला अनुभव होता.

" काहीही झाल तरी मी तुझ्या सोबत रहाणार. "

" ठीक आहे दे पेपर सही करते. "

" मनापासून होकार दे सुरभी अस नको . जा तू इथून मला बळजबरी नाही आवडत." त्याने टॅक्सी बोलवली.

सुरभी जात नव्हती .

"काय झालं? जा ना. "

" मला तुझ्याशी लग्न करायच आहे." ती बोलली.

तो तिच्याकडे बघत होता." खरच का? बघ एकदा हो म्हंटल तर मी तुला जावु देणार नाही. "

" हो. सचिन. अगदी मनापासून सांगते. मला तुझ्या सोबत रहायच. या आठ दिवसात तुला खूप मिस केल."

तो खूप खुश होता. सुरभी लाजली होती.

खर?

हो.

" एकदा मिठीत ये ना. "

इथे?

"आत चल. इथे मावशी येतील."

दोघ आनंदात होते. सचिन जवळ सुरभी एकदम आनंदी होती." सुरभी कोणत प्रेशर नाही ना तुझ्या वर? मी पण उगीच चिडचिड करतो. मी सौरभला कामावरून काढणार नाही. तुला विचार करायचा असेल तर कर. सॉरी."

"नाही सचिन मला तू खूप आवडतो. मी मागेच ठरवल होत आपल्या बद्दल. आपण लग्न करू."

" मग इतके दिवस सांगितल का नाही. लव यु."

"सोड ना मला घरी जायच."

" लव यु च उत्तर दे. "

" आता नाही. नंतर. "

" ठीक आहे आता काय म्हणणार मी. लवकर लग्न करून ये इकडे. मी सौरभशी बोलतो. पुढचे कार्यक्रम ठरवून घेवू. ज्या दिवशी लग्न करू त्या दिवशी लग्न रजिस्टर करू. चालेल का. "

" हो. कुठे असेल लग्न."

" मी करतो अरेंज. सुरभी थँक्स. मला काही सुचत नाही. "

" मला पण. "

" चल उशीर झाला. मी तुला घरी सोडून देतो."

"मी जाते टॅक्सीने."

" गेला तो टॅक्सीवाला. चल. "

कार मधे दोघ गप्प होते. सचिन बघत होता सुरभी काहीतरी विचार करत होती.

" सचिन तू घरी जेवत नाही का? "

"नाही उशीर होतो घरी यायला."

"अस करु नकोस. तब्येत सांभाळ."

"तू येशील आता माझी काळजी घ्यायला. आपण लवकर मुहूर्त काढू. खरेदी वगैरे करून घे."

" तुमच्या घरी कधी सांगायच? " सुरभीने विचारल.

"त्यांना काहीही सांगायच नाही. आहे अस चालू द्यायच."

" मला हे पटत नाही त्यांना माझ्या बद्दल खर सांगायला हव. आधी. "

" मला त्याची गरज वाटत नाही."

" सचिन अरे असेच गैरसमज होतात. अस का? सांगू ना खर. निदान आई बाबांना तरी सांगू . "

"मी विचार करतो. "

" उद्या सांग तुझ काय ठरत ते. हे बघ टेंशन घेवू नकोस. पण आधी सांगितलेल बर असेल. मी निघू?"

"हो मला काय रीयॅक्ट व्हाव तेच समजत नाही. आज तु लग्नाला हो बोललीस. त्यात घरी सांगायच. अजून एक आई बाबांच टेंशन. "

" त्यांना बाहेरून समजण्यापेक्षा आपण सांगितलेल बर. तस ही राहुल गप्प बसणार नाही तो तुझी माहिती काढतो आहे. आणि चोरून एखादी गोष्ट करण्या ऐवजी सांगून करू. "

" बरोबर आहे तुझ पण मला आईची भीती वाटते. " सचिन बोलला.

आता सुरभी खूप हसत होती.

" काय झालं? "

" ऑफिस मधले, बाहेरचे तुला घाबरतात तू आईंना घाबरतो. "

" अरे डेंजर आहे ती. "

" अस हव पण. मी निघू. "

" हो गुड नाइट. "

" घरी पोहोचला की फोन कर. "

हो.


🎭 Series Post

View all