नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 26

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 26

©️®️शिल्पा सुतार

सुरभीला सोडून सचिन निघाला. तो खूप खुश होता. अजून आठ पंधरा दिवस. नंतर सुरभी माझ्या सोबत राहील. घरात किती छान वाटेल. पण त्या आधी घरी सांगाव लागेल. ते मोठ काम आहे.

नुकतच जेवण झाल होत. नंदा ताई रूम मध्ये आल्या. सुरेश राव बसलेले होते. मनु, आशिष त्यांच्या रूम मधे होते. आजी त्यांच्या रूम मधे टीव्ही बघत होत्या.

"नंदा सचिनला फोन लाव थोड कामाबद्दल बोलायच आहे."

"हो." त्यांनी सचिनला फोन लावला. सचिन नुकताच घरी आला होता. सुरेशराव, सचिन ऑफिस बद्दल खूप बोलत होते. सचिनला ही एक दोन डीसीजन घ्यायला त्यांची मदत हवी होती. तो विचारत होता.

" तुमच जेवण झालं का बाबा?"

" हो. तुझ?"

" हो. आता घरी आलो." त्याने सांगितल.

"कुठे गेला होतास सचिन?"

" सुरभी सोबत डिनरला."

"अरे वाह दे तिला फोन."

"ती तिच्या भावा कडे आहे."

" अरे वाह. माहेरी गेली का सूनबाई. तुझ्या आई सोबत बोल."

"बोल रे सचिन." नंदा ताईंचा आवाज आला. त्याला खूप धडधड झाली. बोलू का? सांगाव तर लागेल. उगीच घरच्यांना सांगायच आहे म्हणून लग्नाला उशीर नको.

" आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या सुरभी बद्दल. "

" काय झालं रे. बोल. भांडलात की काय तुम्ही दोघ. ती माहेरी गेली म्हणून म्हटलं." त्या हसत बोलल्या.

"अस नाही. उद्या तुम्ही दोघ इकडे याल का? मनुला आणू नकोस. थोड बोलायच होत. मी तिकडे आलो असतो पण तिकडे मोकळ बोलता येणार नाही. " सचिन सिरियस आवाजात बोलला.

"काय झाल आहे?" आता त्या ही काळजीत होत्या.

"आहे तस महत्वाच. भेटून बोलू. "

"नीट सांग. मला रात्र भर झोप येणार नाही. नाहीतर मी आत्ता तिकडे येते. "

" आई मनु आणि आजी नाही ना तुझ्या सोबत. "

" नाही. "

" कोणाला बोलू नकोस पण माझ सुरभीच लग्न झालं नाही. आम्हाला लग्न करायच आहे. " त्याने श्वास रोखून हळूच सांगितल. काय होत आता. आई मला अस सोडणार नाही.

" काय? तू काय बोलतो आहेस हे? "

" हो खर आहे. "

" मग हे आधी नाही का सांगीतलं. "

" तेव्हा परिस्थिती तशी होती. मला खर बोलता आल नाही. तु उद्या ये मग आपण बोलु. "

" काय सुरू आहे हे सचिन? सुरभी तुझ्या सोबत रहाते ना?" नंदा ताई गोंधळून गेल्या होत्या.

" नाही ती तिच्या भावाकडे आहे."

"काल तर घरी होती."

"ती तुम्ही येण्या आधी आली होती. रात्री निघून गेली."

"का करताय तुम्ही अस?"

"आई उद्या सांगतो. फक्त गैरसमज करू नकोस. इकडे ये माझ म्हणण ऐक. मग काय बोलायच ते बोल." सचिन विनंती करत होता.

" ठीक आहे. पण अजून धक्के नका देवू आम्हाला. ठेवते फोन. " नंदाताई सुरेश रावांना सचिन काय म्हटला ते सगळं सांगत होत्या.

" काय आहे आता हे नवीन? आधी तर सचिन म्हटला होता की त्यांचं लग्न झालेलं आहे आणि आता म्हणतो आहे की लग्न झालेलं नाही. " नंदा ताई रागात होत्या.

" उद्या जावून बघू आपण तिकडे. मग ठरवू. तू त्रास करून घेवू नकोस."

"तरीच इकडे आली तेव्हा त्या सुरभीच्या अंगावर काही दागिने नव्हते. "

" पण गोड आहे पोरगी. " सुरेश राव बोलले.

" हो ती छान आहे. मला तिचा राग येत नाहिये. आपला सचिन का अस करतोय. ते समजत नाही." नंदा ताई विचार करत होत्या.

"तोच तिला घेवून फिरतो. ती पोरगी तरी काय करेल?"

"मला तर सकाळ कधी होते. तिकडे कधी जावु अस झाल आहे. सचिनची चांगलीच कानउघडणी करणार आहे मी. " नंदा ताई चिडल्या होत्या.

"हो पण जरा आरामात. तुला या घरात सगळे खूप घाबरतात लक्ष्यात ठेव. " सुरेश राव हसत होते.

" तुम्हाला थोड ही टेंशन येत नाही का हो ? "

" त्यात काय तरुण आहेत मुल. प्रेम करत असतिल एकमेकांवर. त्या दिवशी तू तिकडे अचानक गेलीस. सुरभी घरी होती. सांगितल असेल चुकून की लग्न झाल. आता खरच लग्न करायच असेल. "

" छान आहे बाबा आहेत पाठीशी. काहीही करा म्हणा लग्न शिवाय सोबत रहा. तिला घेवून फिरा. मला तर हे काही पटत नाही. " दोघ झोपले. पण त्यांना ही झोप येत नव्हती.

सचिनने सुरभीला मेसेज केला. " उद्या आई बाबा येणार आहेत. मी सांगितल आपल लग्न झाल नाही ते. तू ये उद्या."

" मला भीती वाटते आहे सचिन." तिने रीप्लाय दिला.

" मला पण. मी तुझ्या सोबत आहे. काहीही झाल तरी आपण सोबत रहाणार आहोत. काळजी करू नकोस. "

" सचिन तू माझ्या सोबत असशीलच. पण तरी टेंशन येत आहे. "

"आराम कर. रात्रभर जाग राहू नकोस. "

हो.

सचिन विचार करत होता. तरी पूर्ण सत्य सांगितल नाही. सुरभीचा डिवोर्स झाला आहे हे अजून घरच्यांना माहिती नाही. त्याला टेंशन आल होत.

सुरभीला रात्री झोप येत नव्हती. दादा वहिनीशी बोलू का? परीक्षा असल्या सारख धडधड होत आहे. ती उठली सौरभच्या रूम जवळ गेली.

" दादा वहिनी झोपले का तुम्ही? मला थोड बोलायच होत."

" ये ना सुरभी." त्याने बोलवलं.

"नाही तुम्ही हॉल मधे या. "

ते येवून बसले. "काय झालं ग?"

"उद्या सचिनचे आई बाबा येणार आहेत. आम्ही त्यांना सत्य सांगितल आहे. काय होईल मला फार भीती वाटते आहे."

" बरोबर केल तुम्ही .लग्नानंतर समजल तर चांगल होणार नाही. विश्वास घात केल्यासारख होत." सौरभ बोलला.

"तेच तर. मला हे नात खर सांगून सुरू करायच आहे. त्यांना पटल तर हो म्हणतील नाही तर राहील. "

"हेच योग्य आहे."

"मला भीती वाटते आहे ते लोक माझा स्विकार करतील का? माझा डिवोर्स झाला आहे. " सुरभी काळजीत होती.

" का नाही करणार? एवढी गोड हुशार आहे आमची सुरभी. कोणी काही म्हटलं तरी सचिन साहेब तुझ्या सोबत आहेत ना. मग का काळजी करतेस. " पूजा बोलली.

" वहिनी माझ्या मुळे सचिन आणि त्याच्या आई बाबा मधले संबंध खराब नको व्हायला. ते सगळे खूप आनंदाचे प्रेमाने राहतात. खूप हॅप्पी फॅमिली आहे. माझा उगीच त्या सचिनच्या कारने एक्सीडेंट झाला." सुरभी काळजीने अगदी गप्प झाली होती.

" अस काही होणार नाही. सुरभी शांत हो. त्या लोकांना तू पसंत आहेस. " पूजा तिच्याजवळ येवून बसली.

" ते आधी. जेव्हा माझा डिवोर्स झाला हे त्यांना माहिती नव्हत. आता काय होईल? अशी लग्न झालेली मुलगी चालेल का त्यांना सून म्हणून? "

" जा झोप. काळजी सारख काही वाटत नाही. उद्या ते लोक तुला एक्सेप्ट करतील. सगळ नीट होणार आहे. कारण तू खूप चांगली आहेस सुरभी. जो चांगला असतो त्याच्या बाबतीत चांगल होत. " पूजा मनापासून बोलली.

पूजा तिच्या सोबत रूम मधे आली. "वहिनी तू जा तुमच्या रूम मधे. मी झोपते."

"मी आहे इथे. थोड्या वेळाने जाते."

सुरभी झोपली.

सौरभ काळजीत होता. पूजा रूम मधे आली.

"सुरभी काय करते?"

" ती झोपली आहे. अहो मला खूप काळजी वाटते आहे ." पूजा बोलली.

"मला ही. किती त्रास आहे सुरभीच्या आयुष्यात. आता तरी तीच नीट व्हाव. ती सुखी रहायला हवी. पूजा होईल ना सगळं नीट? "

" होईल. मला मनातून वाटत आहे. तुम्ही काळजी करू नका."

" सचिन साहेबांनी आज मला ऑफिस मधे भेटायला बोलवलं होत. लग्न लवकर असेल. आपल्याला खरेदीच बघाव लागेल. तू म्हणशील तर ती आपली एक फिक्स डीपाॅझीट मोडू या का?" सौरभ हळूच बोलला. काय माहिती ही काय म्हणते.

" काही हरकत नाही."

" पूजा आपल लग्न झाल्या पासून मी तुला एक ही दागिना केला नाही. ही फिक्स डीपाॅझीट मी तुझ्यासाठी केली होती. "

" असू द्या आता नोकरी चांगली आहे. सुरभी मुळे मिळाली आहे आपल्याला. या पेक्षा पुढे चांगल होईल. काळजी करू नका. आता हे लग्न होण महत्वाच आहे." पूजा बोलली.

" मी उद्या बँकेत जावून येतो. "

सकाळी नाश्ता करतांना सुरभीच लक्ष नव्हतं." दादा मी जावून येते तिकडे. "

" चल मी सोडायला येतो. " सौरभ उठला.

" नको मी टॅक्सीने जाते. तू ऑफिसला जा. "

समोर बँकेच पास बूक पडल होत. " बँकेत कोण जात आहे? "

मी.

" दादा माझा ही पेमेंट झाला आहे. बाकी पैसे ही मिळाले आहेत आपल्याला कामा येतील."

"हो असू दे. ते पैसे तुझ्या जवळ ठेव."

" एक बोलू का दादा ? सगळ नीट झाल तर आपल्याला खरेदीला जाव लागेल. माझे जुने दागिने काही कामाचे नाहीत. मला नको आहेत. ते मोडून टाक. थोडी फार मदत होईल. हे घे. मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, चेन, कानातले असे चार पाच प्रकार होते. तीन चार लाख रुपये सहज येतील. सोन्याचा भाव किती आहे. " नशीब त्या दिवशी तिने ते घातले होते. नाहीतर काहीच मिळाल नसत.

" सुरभी तू काळजी करू नकोस. होईल बरोबर. हे दागिने तुझे तुला राहू दे. आतमधे नीट ठेव. "

" नाही. मला राहुलची कोणती आठवण सोबत नको. मला मोडायचे ते दागिने." सुरभी ऐकायला तयार नव्हती.

" ठीक आहे आपण खरेदीला जावू तेव्हा सोबत घे. "

" वहिनी हे घे दागिने आत कपाटात ठेव. " ती पूजा जवळ उभी होती.

" पूजा नको. " सौरभ बोलला.

" दादा काय अस करतोस . वहिनी घे."

पूजा सौरभ कडे बघत होती. " घे आत ठेव नंतर बघू काय करता येईल ते. आता सुरभी तू बाकीचा विचार सोड आणि नीघ. "

" हो टॅक्सी बूक केली आहे येईल आता. जर त्या लोकांनी तुम्हाला बोलवलं तर तिकडे येणार ना. " सुरभी बोलली.

हो.

" वहिनीला पण घेवून ये."

हो.

सुरभी निघाली. ती घरी आली. सचिन तिची वाट बघत होता. "आई बाबा अजून आले नाही येतीलच. "

" काल काय म्हटले ते? "

"आई चिडलेली होती. चहा घेते का?"

" काहीच नको. तू काही खाल्लं का?" तिने विचारल.

"हो नाश्ता केला आहे. तुला जर माझ्या घरचे काही म्हटले तर राग मानू नकोस त्यांचा मूड कसा आहे मला माहिती नाही. " सचिनने आधीच सांगून ठेवल.

" सचिन ठीक आहे ना. एवढ सांगू नकोस. मला राग येणार नाही. आता ते माझ्या ही घरचे आहेत. आई खूप चांगल्या आहेत."

दोघ बोलत होते. आई बाबा आत आले. ते दोघ उठून उभे राहिले.

सुरभी घाबरली होती. ती आतून पाणी घेवून आली. त्या दोघांनी पाणी घेतल. ते तिला काही बोलले नाहीत.

सचिन समोर बसला होता. एका सोफ्यावर आई बाबा होते. सुरभी उभी होती. तिला काय कराव ते सुचत नव्हतं.

" काय आहे हे सगळं सचिन? तुमच लग्न नाही झाल का? सुरभी बस सचिन जवळ. नको लाजूस. असे ही तुम्ही सोबत रहातात." नंदा ताईंनी सुरवात केली. बाबा, सचिन, सुरभी तिघे घाबरले.

"आई बाबा सॉरी. मी सुरुवाती पासून सांगतो." सचिन बोलला.

"काही गरज नाही त्याची."

"नंदा अग ऐकून तरी घे तो काय म्हणतो ते." सुरेश राव मधे बोलले.

"कार मधे तुम्ही माझ्या बाजूने होता ना? आता का पार्टी बदलली? बोल बाबा आता काय सांगतो ते. "

" तुम्ही नाश्ता केला का?" सुरभीने विचारल.

" हो खाल्ल आहे. "

सचिन उठला नंदा ताईं जवळ येवून बसला. "आई सुरभीचा माझ्या कारने एक्सीडेंट झाला होता. तेव्हा तिला डोक्याला खूप लागल होत. तिची मेमोरी गेली. तिला काही आठवत नव्हत. मला खूप अपराधी सारख वाटत होत. त्यात नर्सने फाईल वर तीच नाव सुरभी सचिन मोहिते लिहील. त्यामुळे गैरसमज झाला. सुरभी मला नवरा मानत होती. तिला कुठल्या प्रकारचा धक्का द्यायचा नाही अस डॉक्टरांनी सांगितल. नाही तर ती कोमात जाणार होती. एक तर माझ्यामुळे तिचा एक्सीडेंट झाला मला ही गोष्ट खूप मनात खात होती. मला वाटलं की तिची मेमरी परत आल्यावर मी तिला खर सांगेल. मानते नवरा तर मानु दे काही हरकत नाही. आणि तसही मला सुरभी आधीपासूनच आवडत होती. आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो. "

नंदाताई आश्चर्याने ऐकत होत्या. त्यांनी सुरेशरावां कडे बघितलं. "मग आता आठवत आहे का तिला सगळं? "

हो.

"कधीपासून?"

" आपल्याकडे झोपाळ्यावरून ती पडली ना तेव्हापासून आठवत आहे."

"मग आता काय ठरवलं आहे तू सुरभी? तुला सचिन सोबत राहायचं आहे का? " त्यांनी विचारल.

" हो मला सचिनशी लग्न करायचं आहे. पण त्याआधी ही गोष्ट एवढीच नाही. अजून आहे." ती हिम्मत करून बोलली. सचिन तिच्याकडे बघत होता.

"काय झालं आहे आता?" नंदा ताई तिच्या कडे बघत होत्या.

" माझं चार वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं आणि माझा आत्ताच डिवोर्स झालेला आहे." ती एकदम बोलली.

" सचिन मुळे झालं का डिवोर्स? तुम्ही सोबत आहात म्हणून? "

" नाही. एक्सीडेंट झाला त्या दिवशी मला घरातल्यांनी घराबाहेर काढलं होत. मी दादाकडे जात होती. मनस्थिती नीट नव्हती. रस्ता ओलांडताना समजल नाही. तेव्हाच माझा एक्सीडेंट झाला. मी म्हणत होती सचिनला मी लग्न करत नाही. पण तो ऐकत नाही. तुम्हाला जर हे पसंत नसेल तर मी माझी बळजबरी नाही." सुरभी बोलली.

" सुरभी अस बोलायच नाही. आपण सोबत राहणार आहोत. " सचिन बोलला.

" जर तुमचं आधी पासून सगळं ठरलं आहे तर आता का सांगता आहात? तुला तुझ्या सासरच्या मंडळींनी का घरा बाहेर काढल? एवढी तर चांगली आहेस? काम व्यवस्थित. वागण गोड. " नंदा ताई बोलल्या.

" ते मूल बाळ नव्हतं म्हणून. "सुरभीने घाबरत सांगितल. झाल आता काही खर नाही. या पॉईंट वरून ह्या आई नकार देतील. सगळ्यांना बाळ हव असत.

" तुझ्यात दोष आहे का? तपासणी केली का? "

" नाही तपासणी केली नाही."

"मग त्यांना कस समजल की तुझ्यामुळे बाळ होत नाही. लोक ना कसे ही वागतात. सायन्स वगैरे काही माहिती की नाही त्यांना. डॉक्टर कडे जायची काही पद्धत. उगीच मनाला वाटेल त्याला दोषी मानतात." याही परिस्थितीत नंदा ताईंनी सुरभीची बाजू घेतली.

तिला बर वाटल. खरच चांगल्या विचाराचे लोक आहेत हे. सॉरी आई मी तुमच्या बद्दल चुकीचा विचार केला. ती मनातल्या मनात खुश होती.


🎭 Series Post

View all