नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 27

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 27

©️®️शिल्पा सुतार

सुरभी विचार करत होती हे लोक किती चांगले आहेत. मला उगीच वाटल आई नकार देतील. सॉरी आई.

सचिन बोलत होता. "आई राग मानू नको. सुरभीच आधी लग्न झालं आहे किंवा नाही झालं ते महत्त्वाचं नाही. मी तिच्या बरोबर सुखी आहे ते जास्त महत्त्वाचा आहे. सुरभीच आधी जरी लग्न झालं असलं तरी मला त्यांने काहीच फरक पडत नाही. तिला आधी किती त्रास होत होती हे मला माहिती आहे आणि ती डिवोर्स मुळे यातून सुटली. मी तिच्या सोबत खुश आहे. ती माझ्यासोबत खुश आहे. आम्ही लग्न करणार आहोत. आधी तिला काही आठवत नव्हत म्हणून घरी सांगितल नाही. आता ही सुरभीने आग्रह केला म्हणून बोलतो आहे . "

" बघितल का कस बोलतो आहे हा? याला मला काही सांगायच नव्हत. " नंदा ताई सुरेश रावांना बोलल्या.

" आई अस नाही. मला तू महत्वाची आहेस. माझ्यात बोलायची हिम्मत नव्हती. अस बोलतो आहे मी. " सचिन बोलला.

"ठीक आहे ना नंदा. ही काही विशेष गोष्ट नाही. ते दोघ मोठे आहेत त्यांना सोबत रहायच आहे. काय हरकत आहे? त्या साठी सगळ्यांना कश्याला सांगायला हव. ते दोघ खुश तर झाल ना काम. सुरभी सचिन आम्हाला काही हरकत नाही. " सुरेशराव बोलले.

" अस कस हरकत नाही या सगळ्यात सचिनचा दोष आहे. त्याने आधीच आपल्याला विश्वासात घेऊन सगळं सांगायला पाहिजे होतं. सुरभीला आठवत नव्हत याला तर माहिती होत ना. " नंदा ताई परत एकदा त्याला रागवल्या.

" आई माझ चुकलं. तुला हव ती शिक्षा दे. " सचिनने हार मानली.

नंदा ताईंनी त्याला जवळ घेतल." मला तुला शिक्षा वगैरे नाही द्यायची. मला फक्त वाटत होत तू मला का नाही सांगितल. हे बघ बेटा सुरभीच आधीच लग्न झालेल आहे."

"आई मला काही फरक पडत नाही त्याने. " सचिन मधेच बोलला.

" मी काय म्हणते ऐकुन तरी घे सचिन . मला काही हरकत नाही पण समाज तुम्हाला नाव ठेवेल. खूप ऐकुन घ्याव लागेल. तयारी आहे का? सचिन तू आता प्रेमात आहेस. त्यामुळे तुला काही समजत नाही. हे जरी सुरभीच दुसऱ्या लग्न असलं तरी तुझ पहिल लग्न आहे. थोड्या दिवसांनी हे प्रेम अस राहील ना? कारण सुरभी ऑलरेडी खूप त्रासातून गेली आहे. तिला अजून मुश्किल मधे टाकू नकोस. " नंदा ताई बरोबर बोलत होत्या. त्यांना आपल्या मुळे दुसर्‍याला त्रास होवु नये एवढच वाटत होत.

" आई मी सुरभी वर कॉलेज पासून प्रेम करतो. ते कधीच कमी होणार नाही. विश्वास ठेव. "

" तुम्ही मूल लहान आहे. आता नाही हे समजत. नंतर लक्ष्यात येत. " नंदा ताई अनुभवी होत्या.

" आई तुम्हाला माझ्या बद्दल काही शंका असेल तर तुम्ही होकार देण्या आधी विचार करू शकत. मला वाटत होत लग्ना आधी तुम्हाला सगळ सत्य सांगाव. कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही. सॉरी सचिन तू परत एकदा विचार कर. माझी काही हरकत नाही . " सुरभी परत एकदा तेच बोलली.

" सुरभी काय चाललं आहे हे? तुझं माझ्यावर प्रेम नाही का? काय बोलतेस?" सचिन तिच्यावर चिडला.

" माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तरी जर या नात्यामुळे तुझं नुकसान होत असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे. मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहील." सुरभी हळूच बोलली.

"मला जगाशी काही देण घेण नाही. मी समाजात जाईल की नाही हे माहिती नाही. मला फक्त सुरभी सोबत रहायच आहे." सचिन ठाम पणे बोलला.

" काही हरकत नाही. पण मनु आशिषला प्रॉब्लेम येणार नाही ना. हे नुसत लव मॅरेज नाही. " नंदा ताई बोलल्या.

" नंदा तू काळजी करू नकोस. काही होणार नाही अस. लग्न हा नशिबाचा भाग आहे. मी मागे पण तुला सांगितल होत. आपल्या मुलांना काही प्रॉब्लेम येणार नाही." सुरेश राव बोलले.

" मला खूप कसतरी वाटत आहे. माझ्या मुळे खूप प्रॉब्लेम येवू शकतात. तुम्ही सगळे खूप चांगले आहात. सचिन तू तुझ्या घरचे म्हणतात ते ऐक." सुरभी खाली मान घालत बोलली.

" सुरभी गप्प एकदम. एक तर ती होकार देत नव्हती. आता अजून हे अस ऐकुन ती घाबरते आहे. आपण ठरल्या प्रमाणे लग्न करणार आहोत सुरभी आणि यात कुठलाही बदल मला चालणार नाही. वाटल तर मनु आशिषच लग्न होई पर्यंत मी घरी येणार नाही. त्यांच होऊ दे व्यवस्थित. तुम्ही लोकांना सांगा आमचा सचिनचा काही संबंध नाही." सचिन बोलला.

" सचिन अरे काही प्रॉब्लेम नाही. आपण ही कोणतीच गोष्ट लोकांपासून लपवून ठेवायची नाही. ज्याला पटेल तो बोलेल आपल्याशी. नाहीतर राहील. मनु आशिष सोबत तू पण महत्वाचा आहेस आमच्या साठी. " सुरेश राव बोलले.

" हो तू घरी येणार नाही हे चालणार नाही. मला इथे आठ पंधरा दिवस तू दिसला नाही तर माझ मन हळव होत. मला काही प्रॉब्लेम नाही. सुरभी सचिन तुम्ही लग्न करा. " नंदा ताई सुरेश रावांकडे बघत होत्या.

त्यांना आनंद झाला. " नंदा योग्य निर्णय घेतला. आपण मुलांच्या पाठीशी उभ रहायला हव. शेवटी आपले मूल आपल्या कामात येणार आहेत. समाज नाही. "

" खर ना आई बाबा. " सचिन खुश होता.

" हो. अजिबात काळजी करायची नाही. " सचिन नंदा ताई जवळ उभा होता त्याने त्यांना मिठी मारली.

"घरच्यांनी नाव ठेवले तर बाकीचे बोलतील. आम्ही ठाम पणे तुमच्या सोबत आहोत. " सुरेश राव बोलले.

सुरभी सचिनने त्या दोघांचे आशीर्वाद घेतले.

" आई बाबा समाजात सगळे नेहमी म्हणतात की तुम्ही दोघ खूप मोठ्या मनाचे, पुढारलेला विचाराचे आहात. मला आज समजल याचा अर्थ. परत एकदा थॅंक्यु. " सचिन भारावून गेला होता.

" हो आई बाबा, एका डिवोर्स झालेल्या मुलीला तुम्ही स्विकारल. तिला आधार दिला. मी कायम हे लक्ष्यात ठेवेल." सुरभी बोलली.

"अरे आम्ही काही विशेष केल नाही. त्यात तुझी काय चूक आहे सुरभी बेटा . दुसर्‍याची वेळ असली की आपण म्हणतो पुनर्विवाह करायला हवा. आपल्या मुलाची मुलीची वेळ आली की आपण वेगळे वागतो. जस बोलतो तस करायला हव. तू खूप चांगली आहे. आम्ही शोधून अशी मुलगी मिळाली नसती सचिनला. मग लग्न कधी करताय? " नंदा ताई बोलल्या.

"अजून ठरवल नाही."

" मी काढू का मुहूर्त? की तुमच अजून काही ठरतंय? "

" आई तू काढ मुहूर्त. "

" सुरभी तुझ्या भावाला बोलवून घे. "

तिने फोन केला. थोड्या वेळाने सौरभ, पूजा आले.

"किती मोठा सुंदर बंगला आहे. खूप श्रीमंत दिसता आहेत सचिन साहेब. सुरभी साठी मी खुश आहे. ती लकी आहे तिला इथे रहायला मिळेल. ही फुलझाडे किती छान आहेत हो. किती छान वाटत असेल इथे रहायला. बागकामासाठी लोक आहेत. वाह . " पूजा इकडे तिकडे बघत होती.

" पूजा आपण इथे का आलो आहोत आणि तुझ काय सुरू आहे. जरा गप्प बस. आत कस वातावरण आहे अजून माहिती नाही." दोघ आत आले.

सुरभी त्यांना भेटली. त्याने हळूच विचारल " ठीक आहे का वातावरण? "

" हो काही प्रॉब्लेम नाही. "

" आई बाबा माझा दादा आणि ही पूजा वहिनी."

"छान आहे पूजा ये बस. "

आतुन मावशी चहा घेवून आल्या. सगळ्यांचा चहा झाला. आता ते सगळे एकत्र बसले होते.

नंदा ताई फोन वर बोलत होत्या. गुरुजींनी दोन तीन तारखा दिल्या." या तारीख आहेत निवडा आता. आणि अजून एक आपल्या घरून फक्त आम्ही दोघ येवू. बाकीच्यांना माहिती आहे की तुमच लग्न झालं. त्यांना या जास्तीच्या गोष्टी सांगायच्या नाही."

"चालेल आई."

"बरोबर आहे अस करु." सुरेश राव बोलले.

सचिनने तारीख सांगितली. अगदी दहा दिवसात लग्न होत.

जेव्हा सगळे बोलत होते तेव्हा सुरभीने दोन तिनदा सचिन कडे बघितल. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केल.

" काय झाल आता? बहुतेक हा चिडला आहे का? पण का? ओह माय गॉड ते मी म्हणत होती ना तुमचा होकार नसेल तर सचिन तू आई बाबा म्हणतात तस कर. झाल आता. याला वाटत असेल मी तेव्हा लग्नाला नकार देत होती. याचा रुसवा काढावा लागेल." तिला थोड हसू आल.

अस फक्त म्हणतात. मी थोडी लगेच लग्नाला नकार देत होती. मी फक्त मोठ्यांना मान देत होती. बरोबर आहे सचिनला अजून लग्नाचा अनुभव नाही. घाबरून जातो तो. किती चिडला आहे. काय करू?

सौरभ, सुरेश राव बोलत होता." तू काय करतो. "

" मी आधी दुसरीकडे होतो कामाला. आता तुमच्या कंपनी मधे आहे." सौरभ बोलला. त्याला कसतरी वाटल.

"अरे आम्हाला कंपनी चालवायला हुशार लोकांची गरज आहे. तुमच्या शिवाय आमचे काम कसे होणार. तू हुशार दिसतो आहेस . " सुरेश राव बोलले.

नंदा ताई सचिन बोलत बसले होते. "दोघांनी खरेदी वगैरे करून घ्या. पैसे हवे तर सांग. "

" आई तु येणार नाही का खरेदी साठी. तुला माहिती आहे मला कपड्यातल काही समजत नाही. "

" येईल ना बेटा. मी तुला कधी एकट सोडणार नाही. "

नंदा ताई डायनिंग टेबल जवळ आल्या. सुरभी, पूजा काम करत होत्या. त्या तिथे दोघींशी बोलत बसल्या. त्यांना पूजा आवडली." छान आहे तुझी वहिनी. "

"आई तुम्ही रागावल्या नाहीत ना माझ्या वर?" सुरभीने विचारल.

"नाही बेटा तुझ्यावर हा प्रसंग आला काय करणार? "

" आई मी लकी आहे तुमच्या सारखे समजूतदार लोक मिळाले."

सचिन पाणी घ्यायला टेबल जवळ गेला. सुरभी तिथे उभी होती. तिने पाणी दिल. त्याने घेतल नाही. दुसर स्वतः घेतल. तिच्याकडे अजिबात बघितल नाही.

"सचिन काय झाल?" तिने विचारल.

तो निघून गेला.

दुपारी जेवण झालं.

" सुरभी पूजा शॉपिंगच ठरवा तेव्हा मी येईल. आम्ही निघतो आता."

"काळजी करायची नाही सुरभी. आनंदात रहायच." सुरेश राव बोलले. ती बाबांना भेटली. "बाबा थँक्यू."

"सुखी रहा बेटा. लग्न करून लवकर घरी ये. "

ते निघाले.

सौरभ, पूजा, सचिन, सुरभी बाहेर उभे होते.

"मी पण ऑफिसला जातो. पूजा चल तुला घरी सोडतो. " सौरभ बाईक काढत होता.

" सुरभी तू येते का? " पूजा बोलली.

ती सचिन कडे बघत होती. याचा रुसवा काढावा लागेल. किती चिडला आहे हा. " वहिनी मी थोड्या वेळाने येते."

चल पूजा . ते दोघ निघाले.

सचिन, सुरभी आत आले. सचिन जाऊन सोप्यावर बसला. त्याला राग आलेला स्पष्ट दिसत होता. तो सुरभी कडे बघतच नव्हता. त्याचा त्याचा मोबाईल मधे बघत होता. सुरभी त्याच्या जवळ जाऊन बसली. तो बाजूला सरकला. "काय झालं आहे सचिन. माझा राग आला का? "

"तु का गेली नाहीस वहिनी सोबत? तुला इथे माझ्या जवळ रहायच नाही ना. जेव्हा बघावं तेव्हा तुझा नकार असतो. माझ्याशी अजिबात बोलू नकोस. तू सामान घे आणि नीघ. टॅक्सी बोलवू का?" सचिन तिला फाडफाड बोलला.

सुरभीला खूप कसतरी झाल. ती रडायची बाकी होती. तिने कंट्रोल केल. "अरे काय झालं सचिन ते तरी सांग? सॉरी ना. मोकळ बोल. "

" सुरभी तू माझा कधी विचार करणार आहेस? मनाला येईल ते बोलतेस. आता सुद्धा सगळ्यां समोर बोलत होती की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी लग्न करत नाही. तू असं कसं एकटीने ठरवलं. मला हे अजिबात आवडल नाही. मी का लास्ट चॉइस आहे. तुला माझ्या सोबत रहायच नाही का? "

"सचिन अस नाहिये. ते मी फक्त नावाला म्हणत होते. "

" नावाला तरी का? मला किती भीती वाटते तुझ्या पासुन दुर जायची. एक तर कॉलेज मधे ही तू मला नकार दिला होता. त्या मूर्ख राहुलशी लग्न केल होत. "

" त्याचा विषय नको ना इथे. सचिन राग मानू नकोस ना. सॉरी. मी परत अस कधी बोलणार नाही. पण तू माझी परिस्थिती समजून घे ना. माझे हे दुसरे लग्न आहे माझ्यावर सामाजिक दबाव जास्त आहे. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो ना तेव्हा असं वाटतं की त्याचं नुकसान नको व्हायला. मला असं वाटत होतं की माझ्यामुळे तुमच्या हसऱ्या खेळत्या कुटुंबामधे प्रॉब्लेम नको यायला. आई बाबा तुझ्याशी बोलले नसते म्हणजे? "

" अस कधी होणार नाही. बाबा मोठ्या मनाचे आहेत. आईच वाटत होत. तिने खूप लवकर समजून घेतल. "

" त्या आधी चिडल्या होत्या. मी घाबरली होती. म्हणून मी माघार घेत होती. "

" यापुढे असा स्वप्नतही विचार करायचा नाही."

" नाही करणार. "

"यापुढे जर माझ्यापासून दूर जायचा विचार केला कींवा अस बोलली तरी तर माझ्याहून कोणी वाईट नाही. मी काय करेल मला माहिती नाही."

" हो नक्की मी लक्ष्यात ठेवेल. " सुरभी थोडी घाबरली होती. सचिन माझ्या वर खूप प्रेम करतो या पुढे विचार करून बोलू.

त्याने तिचा हात धरला. दोघ आत आले. दोघ शांतपणे एकमेकांच्या मिठीत होते.

सुरभी रडत होती.

" सुरभी सॉरी नको ना रडू. मी उगीच चिडलो. " सचिनला कसतरी वाटल.

"तुझ्या मुळे नाही रडत. आपल निर्विघ्न लग्न जमलं म्हणून रडते आहे." सुरभी बोलली. तिच्यासाठी ही मोठी गोष्ट होती. तिला असा आधार प्रेम आधी मिळाल नव्हत.

" अच्छा आनंदाश्रू आहेत का?"

हो.

" मग ठीक आहे. काहीही म्हणा तुझ्या जवळ खूप छान वाटत. " त्याने तिला अजून जवळ घेतल. सुरभी त्याच्या मिठीतून सुटायची धडपड करत होती.

" सुरभी काही उपयोग होणार नाही माझी पकड पक्की आहे. इथे या रूम मध्ये माझ्या मनाप्रमाणे सगळं चालणार. सवय करून घे. "

सुरभी लाजली होती." सचिन अस केल तर बघ."

" सुरभी लव यु. "

सुरभी गप्प होती.

"बोल ना."

"नाही बोलणार. तू का माझ्यावर इतका चिडला. मी जावु का आता घरी?" आता चिडायची तिची वेळ होती.


🎭 Series Post

View all