नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 28

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 28

©️®️शिल्पा सुतार

"सुरभी लव यु." सचिन तिच्या कानात हळूच बोलला.

सुरभी गप्प होती.

"सुरभी अस का मी जेव्हा लव यु बोलतो तेव्हा तू काही बोलत नाही. मला कस समजणार तू माझ्या वर प्रेम करते की नाही." सचिन कंप्लेंट करत होता.

तिला थोड हसू आलं. पण तिने ते चेहर्‍यावर दाखवल नाही. "मी कशाला काही बोलू. तू मला आता किती ओरडला. माझा काही दोष नव्हता. मी घरी जाते. " सुरभी मुद्दाम निघाली.

" सुरभी नाही. सॉरी. नको ना जावू. आपण छान सोबत वेळ घालवू. मी रात्री तुला घरी सोडून देईल. ठीक आहे का? आता आली तर थांब. मी पण घरी आहे. काय करू या? " सचिन उत्साहाने बोलला

" मग तू या पुढे अस चिडायच नाही. थोड समजून घ्यायच. मोठ्यां समोर वेगळ वागावं लागत." सुरभीच म्हणण सचिनला पटल.

" हो ते समजल मला. मी विचार करून बोलेल." सचिन विचार करत होता काही खर नाही. काहीही झाल तरी मला सॉरी बोलाव लागत. हीच जिंकते नेहमी. सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होतात. तो थोड हसला.

सुरभी आता खुश होती. " आपण आपल्या लग्नाच ठरवू."

"चालेल. मी तर खूप उत्सुक आहे. " तो सुरभीच्या मागे मागे करत होता.

" सचिन तू एका जागी बस. माझी ओढणी सोड ना. प्लीज."

"मला एन्जॉय करू दे ना सुरभी. तुझ्या मागे फिरायला छान वाटत."

सुरभी खूप हसत होती. "बर ठीक आहे. तुझ्या मनाप्रमाणे कर. "

" कोणते कोणते कार्यक्रम असतिल?" सचिनने विचारलं

"मेहेंदी, हळद, लग्न."

"आई बहुतेक घरी सत्यनारायण आणि रीसेप्शन ठेवेल. मग आपण फिरायला जावू." सचिन सुरभी कडे बघत बोलला.

सुरभी लाजली होती. ती हळूच हसत होती.

" काय झालं सुरभी का हसते आहेस? " सचिन तिला मुद्दाम चिडवत होता.

" काही नाही. "

" आपण फिरायला जावू अस म्हटलं म्हणून हसते ना. मला माहिती आहे. "

" नाही सचिन. "

मला असच आयुष्य हवं होतं सुरभी सोबत. एकदम आनंदी. उशिरा का होईना देवाने ऐकलं. सुरभी अस हसत रहायला हवी. सचिन खुश होता.

सुरभी काहीतरी कागदावर लिहीत होती. " सचिन या सगळ्या प्रोग्राम साठी साड्या लागतील. "

" सुरभी तू साडीत खूप छान दिसतेस. "

"तुला काय काय घ्यायचं ते सांग सचिन."

"सुरभी नेहमी साडी नेसत जा आणि ते झूमके घाल."

"सचिन मी काय म्हणते तू काय म्हणतो आहेस. माझ्या कडे लक्ष दे." सुरभी वैतागली.

"तुझ्याकडेच तर लक्ष आहे माझ. आपण तुला दागिने घेवू. आणि अनारकली ड्रेस घेवू. त्या दिवशी सारखा गुलाबी पंधरा. अजून काय काय लागेल?" सचिन मुद्दाम तिच्या जवळ येवून बोलत होता.

"सचिन बाजूला हो. मी सिरियसली नोट घेते आहे ना. काय अस."

" अरे मला तु दिसली की काही सुचत नाही. आपण वेळेवर ठरवू खरेदीच आता छान सोबत वेळ घालवू."

" काय करायच? " सुरभीने कागद पेन बाजूला ठेवला.

" मुव्ही बघु या का?"

"चालेल."

सचिन खायला पॉपकॉर्न चिप्स सरबत घेवून आला. दोघ छान रमले होते. आज दोघ खूप रीलॅक्स झाले होते. आता कसल टेंशन नव्हत.

रात्री स्वयंपाक झाला. मावशी तयारी करत होत्या. सुरभी सचिन जेवायला बसले. " आपण त्या घरी शिफ्ट होऊ या."

"कुठे आहे ते घर? "

" इथून जवळच आहे. मालू काकू आहेत तिथे केअर टेकर. तिथे चार बेडरूम आहेत. कोणी आल तरी अडचण येणार नाही."

"चालेल. इथल्या या मावशी त्यांना नेवू या का सोबत. त्या चांगल्या आहेत. गरजू आहेत." सुरभी बोलली.

"हो चालेल." त्याला माहिती होत सुरभी अगदी हळवी आहे. या घरात तीच मन लागल होत. तरी हे घर आपल नाही सोडव लागेल.

"लग्नाआधी मी सामान शिफ्ट करतो."

हो.

सचिन तिला सोडायला घरी आला. "आज सोबत छान वाटल ना."

" हो खूप. "

" फक्त दहा दिवस. मग आपण अस रोज सोबत राहू ." सचिन हळूच बोलला.

सुरभी थोडी लाजली होती.

"तू खरेदीच ठरव सचिन. खूप काम बाकी आहेत."

" आई येणार आहे. तिचे दुकान ठरलेले असतात. बर झाल आठवल हे घे. " त्याने बँकेच कार्ड दिल.

" काय आहे हे? "

" तुझ माझ जॉइन्ट अकाऊंट काढल आहे . खरेदी वगैरे करायला बर पडेल. तस मी असेल सोबत तरी इतर वेळी काही घ्यायच असेल तर हे वापर. "

" माझ्या कडे ही थोडे पैसे आहेत ते या अकाऊंट मधे टाकू का? " सुरभी बोलली.

" नको ते सौरभ दादाला दे. "

" तो घेत नाही."

"असू दे तुझ्याकडे मी लागले तर सांगतो. "

सुरभी घरी आली. पूजा तिच्याकडे बघत होती." मला वाटल आज येते की नाही."

" अग काय अस वहिनी. " दोघी हसत होत्या.

" काय केल मग?" ती चिडवत होती.

" सचिनला राग आला होता. त्याला समजवाव लागल. "

मग?

" काही नाही आता ठीक आहे. थोड बोलली त्याच्याशी. म्हणून थोड्या वेळ थांबली होती. दादा आला का?"

"हो आमच जेवण ही झाल. "

"माझ ही. आम्ही मूवी बघितला ." सुरभी खुश होती.

कुठे ?

"घरीच ग कुठे गेलो नाही. "

"बर झाल बर्‍याच दिवसांनी तुम्ही ही रिलॅक्स झाले. " पूजा बोलली.

"हो ना आता काही टेंशन नाही .त्या राहुलने कोणालाही सांगितल तरी काही हरकत नाही. "

" त्याच नाव नको घेत जावु आपल्या चांगल्या घरात. " पूजा चिडली.

" बरोबर आहे. "

दुसऱ्या दिवशी सुरभी नाश्ता करत होती. सौरभ, पूजा काहीतरी बोलत होते. पुढे टेबलवर परत बँकेच पासबुक ठेवलेलं दिसलं." आपल्याकडे रोज बँकेत कोण जात? "

दोघ काही म्हटले नाही.

" दादा वहिनी इकडे या बरं. काय चाललं आहे तुमच्या दोघांचं? तुम्ही पैशाचा हिशोब करता आहात का?"

"काही नाही."

" आता जर तुम्ही सांगितलं नाही तर मी सामान घेऊन सचिन कडे निघून जाईल. इथे राहणार नाही." सुरभी चिडली.

" तुला तर तिकडे जायचं चान्सेस हवा आहे सुरभी." पूजा चिडवत होती.

" तसं नाही वहिनी. मी रागाने जाईन. परत येणार नाही." सुरभी सिरियस होवुन बोलली.

" काय बोलते आहे तू सुरभी तुला तरी समजत का ? शांत हो. तू सापडत नव्हती. मला ओळखत नव्हती तेव्हा इतके दिवस मी कसा राहिलो माझं मला माहिती. यापुढे असं बोलायचं नाही. तू कधीच आमच्या पासून दूर जाणार नाही. " सौरभ रागवला.

" दादा सॉरी. मला अस नव्हत म्हणायचं. " ती त्या दोघांना भेटली.

"सुरभी तू माझ्या साठी खूप महत्वाची आहे. मी गेलो होतो बँकेत. आम्हाला थोडं काम आहे. "

" हे बघ दादा जर तू लग्नासाठी पैसे वगैरे काढत असशील तर थांब जरा. आहेत पैसे. माझा पगार झाला आहे. बाकीचे पैसे मिळाले आहे आणि मी आणि सचिनने जॉईंट अकाउंट काढलं आहे. हे बघ मला कार्ड मिळाला आहे. त्यातून खरेदी करणार आहे." सुरभी कार्ड दाखवत होती तिला सौरभची परिस्थिती माहिती होती नवीन नोकरी त्यात लगेच लग्न आल. म्हणून दादा वहिनी टेंशन मधे असतिल.

"अरे पण भाऊ म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? आम्हाला जे करायचं ते थोडं फार करू दे. " सौरभ ऐकत नव्हता.

"चालेल तुम्हाला जे हवं ते करा. पण तुमच्या भविष्याची तरतूद असलेली एफडी वगैरे मोडू नका. एवढा खर्च होणारच नाही. आम्ही साधंच लग्न करणार आहोत आणि सचिनने ऑलरेडी हॉटेल बुक केलं आहे. छोटा हॉल आहे आणि बाजूला दोन रूम आहेत. एक रूम त्यांना एक रूम आपल्याला मिळणार आहे. साध्या पद्धतीने लग्न होईल. " सुरभी काय काय प्रोग्राम आहे ते सांगत होती.

"पण त्याआधी काही खरेदी करायची आहे की नाही. कपडे दागिने घेवू. " सौरभ पूजा कडे बघत बोलला.

हो ना. पूजा ही बोलली.

"तुम्ही दोघं ऐकणार नाही. काहीही करा शेवटी तुमच्या दोघांमध्ये मी कसं बोलणार. " सुरभी रागाने आत जाऊन बसली.

सौरभ, पूजा तिच्या मागे आले. "असं का बोलते आहे सुरभी? "

" मी सांगते आहे ना तुम्हाला की तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे मोडू नका. तरी तुम्ही ऐकत नाहीत."

" बरं मी एफडी काढत नाही. आहे त्या पगारात होईल आपला खर्च."

"हो आणि मी म्हणते आहे ना मला ते जुने दागिने नको आहे त्याचे पण भरपूर पैसे येतील त्यातून आपण दागिने करून घेऊ. आपली तिघांची खरेदी करून घेऊ. वहिनी तू येशील ना माझ्या सोबत. "

" बघू नंतर ठरवू." सौरभ ऑफिसला गेला.

सुरभी आणि पूजा मिळून काय काय घ्यायचं ते ठरवत होत्या. किती कार्यक्रम आहे त्यानुसार साड्या घ्याव्या लागतील. इतरही साड्या लागतील.

" घरात घालायला खूप साड्या आहेत. आधी घेतल्या होत्या आणि सचिनच्या आईंनी खूप साड्या आणल्या आहेत. " सुरभी सांगत होती.

" चांगले आहे तुझ्या सासरचे लोक सुरभी. तू खूप छान रहा त्यांच्या सोबत. प्रसंगी थोड ऐकुन घे. प्रेमाने वाग."

" हो वहिनी. "

" मी सुरुवातीच्या काळात खूप चुका केल्या तोंडाला येईल ते प्रत्येकाला बोलत सुटले. तू अस करु नकोस. " पूजाला वाईट वाटत होत.

"वहिनी तू चांगली आहेस. आई बाबा होते तेव्हा तू कुठे त्यांना काही म्हणत होती." सुरभीला आठवल.

"हो ना. आता यांच्या कामाच होत नव्हत म्हणून माझी चिडचिड होत होती. त्यात हे अति भोळे. कोणी मागितली की केली मदत. आपल्याला काही आहे की नाही ते ही बघत नाही. "

" हो ना. दादा खूप साधा आहे. आता ही माझ्या साठी किती करतो आहे. "

" तु आहेच तेवढी चांगली. आता तुझ्या सासरचे खूप चांगले आहेत. " पूजा बोलली.

" मला खूपच सांभाळून घेतलं त्यांनी."

"तुमचं घरही खूप छान आहे."

"आमच दुसरं घर आहे. लग्नानंतर आम्ही तिकडे रहायला जाऊ आणि एक घर गावाकडे आहे."

छान.

दुपारी सचिनचा फोन आला. ते दोघ खूप बोलत होते. " सचिन अरे सौरभ दादा अजिबात ऐकत नाही त्याची सेवींग केलेली फिक्स डीपाॅझीट मोडत आहे."

का?

" खरेदीसाठी, लग्नासाठी. "

" ओह माय गॉड. "

" काय करू या? मला खूप काळजी वाटते आहे. "

" मी बोलतो त्यांच्याशी. " सचिनने सौरभला आत बोलवलं. थोड ऑफिस कामा बाबतीत बोलण झाल. घरचा विषय निघाला.

" लग्नासाठी हॉटेल बूक केल आहे. उद्या आम्ही खरेदीला जावु." सचिन सगळा प्लॅन सांगत होता.

सौरभ विचार करत होता पूर्ण तयारी झाली आहे." मी काय करू? मला ही काहीतरी काम द्या. "

" काही नाही. मी पण काही करणार नाही काॅन्ट्रेक्ट दील आहे."

सौरभने फिक्स डीपाॅजीट वीड्राल करायचा निर्णय मागे घेतला.

आज ते खरेदीला जाणार होते त्यामुळे नंदाताई सकाळीच आलेल्या होत्या. सुरेश राव आले नव्हते. ते बिझी होते.

सचिनचा फोन आला. सुरभी पूजा नाश्ता करत होत्या." मी तुम्हाला घ्यायला अर्ध्या तासात येतो. मी सांगेन तेव्हा तुम्ही खाली येवून उभ रहा . "

"वहिनी आपण माझे जुने दागिने सोबत घेऊ या का?"

"नको या लोकांसमोर. आपण सेप्रेट जाऊ." पूजा बोलली.

"अग पण आता खरेदी करायची असेल तर."

"माझ्याकडे आहेत थोडे पैसे."

"माझ्याकडे पण आहेत तसे. " सुरभी तिचा अकाउंट बॅलन्स चेक करत होती. लग्नाची खरेदी होऊन भरपूर पैसे उरत होते. चला बरं आहे. तस सचिन सोबत आहे.

"वहिनी नंतर नक्की येशील ना तू माझ्यासोबत मला थोडे दागिने घ्यायचे आहेत. "

" हो आपण जाऊया दोघी. "

सचिन, नंदाताई आले. एका मोठ्या मॉलमध्ये ते आले. "आधी साड्यांचीच खरेदी करून घेऊ म्हणजे त्यावर मॅचिंग सचिनचे कपडे घेता येतील."

ते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेले. साड्या दाखवण्यात आल्या. सुंदर सुंदर साड्या नंदा ताईंनी बाजूला काढल्या होत्या. त्या प्रत्येक साडी सुरभीच्या पसंतीने घेत होत्या. लग्नासाठी शालू घेतला. रिसेप्शन साठी लेहंगा घेतला.

सुरभी सचिन कडे बघत होती. त्याच लक्ष नव्हतं. नंदा ताई पूजा त्या बाजूला अजून साड्या बघत होत्या. तिने सचिनला चिडवायच ठरवल.

"सचिन ही साडी घेवू का?"

"हो घे. "

"ती घेवू का ?"

"हो घे. "

"सचिन काय आहे हे ?तुझ लक्ष नाही माझ्याकडे. मी केव्हाच बघते आहे ." ती चिडली.

"काय करू मी. दाखव कोणत्या साड्या."

"आता का?"

"हे अस आहे मी म्हणतो ना दाखव. पटकन दाखवायच्या. तस ही तुला कोणताही रंग छान दिसतो. कोणतीही घे. "

" तुझे कपडे घेतांना मी चॉईस सांगणार नाही. " सुरभी रागात होती.

" राग सोड ह्या दोन घे. " आता पासून माझे किती हाल आहेत.

त्यानंतर सचिनची खरेदी झाली.

"स्वतःचे कपडे घेण्यात बरोबर इंट्रेस्ट आहे तुला." सुरभी बोलली.

सचिन हसत होता.

" चला आता दागिने घेऊ. मला सारखं यायला जमणार नाही. " नंदा ताई बोलल्या.

ते दागिन्यांच्या दुकानात गेले.

" आई तुम्ही मला आधीच भरपूर दागिने दिले आहेत. आता का परत. एवढे कुठे घालून जाणार आहे. " सुरभी बोलली.

" असू दे आता नेकलेस सेट बांगड्या वगैरे घे. "

" सुरभी त्या दिवशी सारखे झूमके घे." सचिन बोलला.

"नको सचिन. सोन्याचे एवढे मोठे कानातले किती महाग जातील. "

" काय झालं? " नंदा ताई विचारत होत्या.

"आई हिला झूमके छान दिसतात. "

" घेते का? " त्यांनी तिच्या साठी सुंदर कानातले घेतले. पूजाच्या कानात अगदी छोटे कानातले होते तिच्या साठी ही घेतले. त्या ते तिला लग्नात देणार होत्या.

ती खरेदी झाली. त्यांनी जेवण केलं. खरेदी घेऊन नंदाताई घरी गेल्या.

सुरभी पूजा घरी आल्या. सचिन ऑफिसला गेला.


🎭 Series Post

View all