नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 29

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 29

©️®️शिल्पा सुतार

सुरभीने जूने दागिने सोबत घेतले. ती आणि पूजा रेडी होत्या. मार्केट मधून इतरही वस्तू घ्यायच्या होत्या.

"कुठे जाता आहात तुम्ही दोघी?" सौरभ विचारत होता.

" आम्ही दागिने घ्यायला जात आहोत."

" मार्केट मधे सामान सांभाळा." सौरभ रेडी होता तो ऑफिस साठी निघाला.

हो.

सुरभीने जुने दागिने देऊन दोन नेकलेस सेट आणि चार बांगड्या घेतल्या. अजून साड्या घेतल्या. सौरभ दादासाठी कपडे घेतले. पर्स, मेकअपच सामान, चपला. बर्‍याच वस्तू घेतल्या. त्या दोघे घरी आल्या.

दोन नेकलेस मधील सेट मधला एक सेट तिने पूजाला दिला. चार बांगड्या मधुन दोन बांगड्या दिल्या.

" मी घेणार नाही हे. " पूजा दचकली.

"वहिनी तुला घ्याव लागेल. " सुरभी आग्रह करत होती.

"नको हे ओरडतील."

"तू दादाची काळजी करू नको. मी त्याला सांगते." तिने समजावल.

"सध्या असू दे. नंतर बघू."

"याला काय अर्थ आहे वहिनी. मी कशी हक्काने तुमच्याकडे येते जाते तसं. तू आणि दादा करत नाही. मी दिलेल काही घेत नाही." तिने राग आला आहे अस दाखवल.

" मला तर घ्यायची खूप इच्छा आहे पण तरीसुद्धा हे वेगळं पडतं. जरा समजून घे. सौरभ ओरडतील. तुला माहिती आहे ना आमच आता थोड नीट होत आहे. इतके दिवस भांडणात गेले. " पूजा काळजीत होती. सौरभ गैरसमज करून घेतील. मला ओरडतील म्हणतील तूच घेतले असतिल सुरभीचे दागिने. नको यांच्या मनाविरुद्ध वागायला.

" वहिनी तुझ बरोबर आहे. दादा आला की मी बोलते त्याच्याशी. "

सौरभ संध्याकाळी घरी आला. चहा झाला. सुरभीने एक नेकलेस सेट ने दोन बांगड्या त्याच्याकडे दिल्या.

" काय आहे हे?"

" आज आम्ही खरेदीला गेलो होतो. जुने दागिने देऊन नवीन दागिने घेतले. कसे आहेत?"

" अरे एवढेच आले का? "सौरभ बघत होता. छान आहे डिझाईन.

"नाही अजून असाच एक सेट आहे. तो माझा आहे हा वहिनीचा आहे." सुरभीने सांगितल.

" नाही आम्हाला नको. पूजा काय आहे हे?" तो दागिने वापस करत होता.

" असं चालणार नाही दादा, वहिनी पण अशीच करते तुम्हाला घ्याव लागेल कंपल्सरी आहे. माझी इच्छा आहे. करू दे ना मला वहिनी साठी. प्लीज. " सुरभी सौरभला रीक्वेस्ट करत होती.

"ठीक आहे. " त्याने पूजाकडे दागिने दिले.

" वहिनी आता बांगड्या रोज वापर."

पूजा खुश होती. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या खूप सुंदर दिसत होत्या.

" नुसतं एवढंच आणलेलं नाही सुरभीने. हे तुमच्यासाठी कपडे आणि माझ्यासाठी साडी सुद्धा घेतलेली आहे." पूजा सांगत होती.

सुरभी सगळी खरेदी दाखवत होती.

सचिनचा फोन आला. सुरभी आत रूम मधे गेली." काय करते आहे सुरभी?"

"आज आम्ही खरेदीला गेलो होतो."

"अरे वा कालच झाली आपली खरेदी तरी आज काय घेतलं?" सचिन मुद्दाम बोलला.

"आज आम्ही अजून दागिने घेतले. पूजा वहिनी आणि सौरभ दादाला कपडे घेतले. अजून बरच बाकी होत पर्स चप्पल वगैरे. "

" तू नाही घेतली का साडी? "

" एक घेतली जरा मॉडर्न आहे. मी एक नेकलेस सेट आणि बांगड्या घेतल्या. वहिनी साठी पण नेकलेस सेट आणि बांगड्या घेतल्या. " सुरभी उत्साहाने सगळं सांगत होती.

" बरं झालं, पण मला तर काही मेसेज आला नाही पैशाचा. कार्ड वापरल नाही का? "

" नाही, मी ते माझे जुने दागिने देऊन नवीन दागिने करून घेतले. मला ते जुने दागिने, कुठली आठवण सोबत नको ."

"ठीक आहे बरोबर केलं. वापस केले असते ते दागिने. आपल्याला काही गरज नाही त्याची." सचिन सहज बोलला.

"नको, माझ्या आई बाबांचा त्या वेळी किती खर्च झाला. तेव्हा त्या लोकांनी हुंडा ही घेतला होता. त्यांना का सोडा. वाहिनीला दिले मी अर्धे दागिने."

"खर आहे चांगले लोक असते तर दिले असते वापस. "

दोघ बराच वेळ बोलत होते. पूजाने हाक मारल्यावर सुरभीने फोन ठेवला.

आता लग्नाला अगदी चार दिवस बाकी होते. सुरभी पूजा खूप कामात होत्या. सगळं तयारी त्यांनी करून ठेवली होती. पार्लरला जावं लागेल. मेहंदी काढावी लागेल.

लग्नाच्या दिवशी बाकीचे कार्यक्रम होते. तसे कोणी विशेष येणार नव्हतं. साध्या पद्धतीने लग्न होत.

सचिन संध्याकाळी सुरभी कडे आला. चौघेजण मिळुन डिनरला गेले. खूप मजा आली खूप गप्पा रंगल्या होत्या. घर आल्यानंतर सौरभ पूजा घरी आले. सुरभी अजूनही सचिनशी बोलत होती.

" सचिन उद्यापासून मला भेटायला यायला जमणार नाही."

"अरे असं कसं चालेल? बिझी आहेस का?"

" उद्या आम्ही पार्लरला जाणार आहोत. परवा मेहेंदी आणि त्यानंतर आपलं लग्न." ती उत्साहात बोलत होती.

"अरे हा तीनच दिवस राहिले. मग सुरभी माझ्या जवळ रहायला येणार." त्याने तिच्या कडे बघत बोलल.

ती लाजली होती.

"सुरभी तू खूप सुंदर आहेस. तुला पार्लरला जायची गरजच नाही. "

" अस कस? मी लग्नात छान दिसायला नको का? छान केस सेट करणार आहे. तयारी करायची ऑर्डर देणार आहे."

"चालेल जाऊन ये केस सांभाळ. डोक्याला टाके होते लक्षात ठेव. " सचिन बोलला.

"हो मी माझे केसांना कोणालाच हात लावू देत नाही. "

" डॉक्टरांनी दिलेला ब्रश सोबत ने टाक्यांची काळजी घे. "

सुरभीला खूप बरं वाटलं. सचिन तिची किती काळजी घेतो.

मी निघतो. सुरभी घरी आली. ती खूप आनंदात होती. सौरभ आणि पूजा तिला बघून खुश होते." सचिन साहेबांचा स्वभाव खूप चांगला आहे. "

" हो राजा माणूस आहे. आपण लकी आहोत आपल्या आयुष्यात ते आले. " सौरभ बोलला.

दुसर्‍या दिवशी भराभर आवरून सुरभी आणि पूजा पार्लरमध्ये गेल्या. खूप छान वेळ गेला. त्यांना घरी यायला उशीर झाला. सौरभ किचनमध्ये काम करत होता. त्याने छान मसालेभात केलेला होता आणि कढीची तयारी करत होता.

दोघी येऊन सोफ्यावर बसल्या. तो पाणी घेऊन आला.

"अरे वा दादा छान काम करतो आहे तू. " सुरभीने चिडवलं.

" हो मला सगळं येत. मला पूजाने छान ट्रेन केलं आहे. "

पूजा आणि सुरभी दोघ हसत होत्या.

" करायलाच पाहिजे घर काय तिचे एकटीच आहे का? तुझं पण आहे ना. " सुरभी बोलली.

" हो मी कुठे काय म्हणतो आहे. नारीशक्ती तुमची लगेच एकजुट होते." हसत खेळत वातावरण तयार झालेलं होतं.

सचिनचा फोन आला. पूजा सौरभ दोघ हसत होते. मी आलेच.

" लग्ना आधीचे दिवस भारी असतात." सौरभ बोलला.

"हो ना आता तर तुम्ही माझ्याशी जास्त बोलत नाही." पूजा ने चान्स घेतला त्याला बोलून घेतल.

" अस का सांगतो नंतर. "

" सचिन आलास का ऑफिस हून?"

"हो, तू काय केल पार्लर मधे?"

"विशेष काही नाही."

"फोटो पाठव. मी केव्हाची वाट बघत आहे. "

सुरभीने फोटो पाठवले. "बघ. साधेच फोटो आहे पार्लरला जाऊन आली म्हणजे मी काही एकदम परी झाली नाही. "

" तशी तू माझ्यासाठी परीच आहे. मी तर म्हटलं होतं काही जाऊ नको पार्लरला. "

" तिकडे काय सुरू आहे? झाली का लग्नाची तयारी? "

"बहुतेक आई बाबा येतील उद्या. मग करु तयारी. "

" तु नवीन घरी शिफ्ट झाला का?"

हो.

"माझ सामान कुठे आहे? " ती काळजीत होती.

" ते ही नेल. "

" नीट ठेवल ना?"

"हो माझ्या कडे आहे. "

"मला बघायच ते घर. कस आहे?"

" आता लग्ना नंतर सासरी यायच. सरप्राईज आहे. "

पूजा सौरभ जेवायला बोलवत होते.

" चल मग आता लग्नानंतर बोलू. मी जाते. "

" काय अस सुरभी? थोड तरी बोल. "

" अरे वहिनी बोलवते आहे जेवायला. "

" ठीक आहे. एन्जॉय दोन तीन दिवस आहेत माहेरी राहून घे." त्याने फोन ठेवला.

सुरभीला कसतरी झाल. एकदम मन भरून आल. सचिन खूप प्रिय आहे तरी सौरभ दादा, पूजा वहिनीला सोडून जायच. चालायचंच जनरीत आहे.

सकाळी पूजा वहिनीचे आई बाबा आणि बहीण आले. सगळे खुश होते. तिची बहीण छान होती. ती कॉलेजमध्ये होती.

थोड्यावेळाने मेहंदी काढणाऱ्या ताई आल्या. पूजा झाल्यानंतर मेहंदी काढायला सुरुवात झाली.

आज सचिन कडे नंदाताई आणि सुरेशराव राहायला आले. नंदाताईंनी पण पूजा ठेवली होती

सचिन रात्री खूप वेळ सुरभीशी बोलत होता. "उद्याचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण आपल्या प्रेमाच्या जगात प्रवेश करू."

"हो ना सचिन मला तर खूपच आनंद होतो आहे. देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत."

"उद्या आपण खूप एन्जॉय करायचं कोणाचाच विचार करायचा नाही."

"हो. थँक्स माझ्या आयुष्यात तु आलास. "

" उलट तुझ्यामुळे मी खुश आहे. माझ स्वप्न उद्या पूर्ण होईल. "

" एवढ प्रेम करतोस तू माझ्या वर? "

" या पेक्षा जास्त. सांगता येत नाही. उद्या भेटू लग्नात. "
.....

सकाळी सुरभी तयार होती. तिने तीच सगळ सामान घेतल का ते बघितल. पूजा, सौरभ ही खूप कामात होते. ते बाकीच्या पाहुण्यां सोबत हॉटेलवर आले. त्यांना त्यांची रूम मिळाली होती. तिथे सुरभीची तयारी सुरू होती.

सचिन, नंदाताई आणि सुरेशराव ही घरातन निघाले. ते पण हॉटेलमध्ये आले. सौरभ स्वागताला आलेला होता.

सुरभी पिवळी साडी नेसून तयार होती. गजरे लावून खूप छान दिसत होती. हातावरची मेहेंदी खूप सुंदर रंगली होती.

सचिनने ही तयारी केली. पांढरा कुर्त्या मध्ये तो प्रचंड हँडसम दिसत होता. दोघांची सोबतच हळद होती.

तो बाहेर आला. सुरभी त्या तिघांना भेटली. तिने सचिनला इकडे ये अस खुणावल. सचिन आनंदात होता. दोघ बाजूला गेले.

"काय अस सुरभी? सगळ्यांमधुन तू मला अस साईडलाला बोलवलं. बाकीच्यांना काय वाटेल." तो मुद्दाम बोलला.

"मला तुला मेहेंदी दाखवायची होती. हे बघ."

त्याने तिचे हात हातात घेतले. "किती छान रंगली तुझी मेहंदी . वाह वाह फोटो काढले का?"

सुरभीचा चेहरा खुलला होता. " नाही तुला फर्स्ट दाखवायची होती. "

"सकाळ पासून कोणी बघितली नाही का? "

" नाही मी हात लपवत होते. "

" वेडा बाई. आता फोटो काढून घे."

फोटोग्राफर आला. दोघांचे सुंदर फोटो काढले. सुरभीचे रंगलेले हात सचिनच्या हातात होते. दोघ एकमेकांकडे बघत होते. चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता. त्यांना एकमेकांशिवाय काही सुचत नव्हतं. दोघ हळू हळू बोलत होते. बघण्यार्यांना समजत होत त्यांच्यात किती प्रेम आहे.

"फोटो काढून झाले का लव बर्डस? हळदीला उशीर होतो आहे." पूजा बोलवायला आली.

आधी सचिनला हळद लागली. मग सुरभीला हळद लागली. हातात चूडा भरला.

थोड्या वेळाने लग्नाचा मुहूर्त होता. थोडे जण होते म्हणून सगळेजण कार्यक्रमात सहभागी होते. खूप हास्य विनोद सुरू होत. ते एकदम एन्जॉय करत होते.

नंदाताई, पूजा आणि तिच्या घरच्यांमध्ये मिसळून गेल्या होत्या.

"पूजा इकडे ये जरा माझ्या मदतीला." पूजा गेली.

"हे काय घातल कानात ते काढ. हे घाल."

"नेकलेस वरचे कानातले होते. घाईत मी घातले नाही." तिने बघितले नंदा ताई तिला अतिशय सुंदर झुमके देत होत्या. "हे त्या दिवशी घेतले ना? सुरभीचे आहेत ."

"तिचे वेगळे आहेत हे तुझे. घाल कानात. "

"नाही काकू मला नको." पूजा बोलली. परत सौरभ ओरडतात.

"ऐकाव लागेल. आटोप खूप काम पडले आहेत." नंदा ताईंनी हुकूम सोडला.

"काकू सुरभी सोबत माझ ही किती करता आहात तुम्ही. ही एवढी सुंदर साडी ही घेतली. पुरे ना. कानातले नको. " पूजा बोलली.

"तू माझी लेक आहेस. हक्क आहे तुझा. आटोप कानात घाल. दे मी मदत करते."

सचिन आणि सुरभी तर वेगळ्या जगात होते. त्यांना कोणाशी काही घेणे नव्हतं. सगळीकडे ते हात धरून फिरत होते. एकमेकांशी बोलत होते. जवळ जवळ बसले होते.

पूजा त्यांच्या जवळ आली. " सुरभी चल आता लग्नाची तयारी करू. हे बघ तुझ्या सासुबाईंनी दिले. "

" वाह वहिनी किती सुंदर दिसते आहेस तू. हे असे झूमके खूप छान दिसतात."

"हे काही म्हणणार नाही ना. मला तर भीती वाटते आहे." पूजा बघत होती सौरभ कुठे आहे.

"दादा काही म्हटला तर त्याला आईं समोर उभ कर."

सुरभी आत तयार व्हायला गेली.

सचिन ही तयार होत होता. शेरवानी मध्ये खूप भारी दिसत होता. नंदा ताई त्याला तयार करत होत्या. सौरभ, सुरेश राव तिथे आजुबाजूला होते." आई मला आजी, आशिष, मनु ची खूप आठवण येते आहे."

"काय करणार. ते दोघ लहान आहेत त्यांना जास्त काही सांगायला नको." नंदा ताई बोलल्या.

"बरोबर आहे."

पूजा घाईने इकडे तिकडे जात होती. ती तयार झाली होती.

" पूजा इकडे ये. " सौरभने बोलवलं. " वेगळी दिसते आहेस तू."

"हो ना ओळखा बर काय घातल आहे ."

"खूप छान तयारी झाली आहे. नवीन नेकलेस, बांगड्या. आणि हे कानातले कोणाचे आहे?" सौरभ तिच्या कडे नीट बघत होता.

"चला बर बायको कडे थोड तरी लक्ष गेल. कसे आहेत कानातले? " पूजाने विचारल.

"खूप छान तुला घ्यायचे का असे."

"हे माझे आहेत. "

" कधी घेतले?" सौरभ विचार करत होता सुरभीने दिले की काय.

" आता त्या काकूंनी दिले."

"तु का घेतले."

"त्या ऐकत नव्हत्या."

नंदा ताई बाजूने जात होत्या.

"काकू तुम्ही दिले ना कानातले. "

" हो. काय झाल? "

तिने सौरभकडे बघितल.

" पूजाला काहीच बोलायच नाही आधीच सांगते सौरभ. ती माझी मुलगी आहे. "

"बर, आता तुम्ही सगळे एका बाजूने आहात. मी काय बोलणार?"

गुरुजी हाका मारत होते. चला लवकर.

सौरभ सुरभीला घ्यायला गेला. सुरभी तयार होती." वाह सुरभी किती सुंदर दिसते आहेस."

तिने उठून पटकन त्याला मिठी मारली. "दादा हे सगळं खरंच होतं आहे ना? "

" हो सुरभी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. अजिबात काळजी करायची नाही आणि यापुढे सगळं चांगलं होणार आहे. चल लवकर सचिन साहेब वाट बघत आहेत."

"दादा आई बाबांची आठवण येते आहे. "

" मला ही. त्यांचे आशिर्वाद नेहमी आपल्या सोबत आहेत. तुझ चांगल होत आहे. ते खूप खुश असतिल. "

सौरभ सोबत सुरभी बाहेर आली. सचिन समोरून तिच्याकडे बघत होता. जणू काही कोणी अप्सरा समोरून येत होती. अतिशय सुंदर तयारी झाली होती. सिम्पल तरी छान.

लाल शालु चापून चोपून नेसला होता. त्यात सुरभी खूप गोड दिसत होती. केसांची छान वेणी घातली होती. त्याच्यावर गजरे लावलेले होते. माफक दागिने घातलेले. नाकात नथ, कानात झुमके, लाल टिकली, डोळ्यात काजळ, हातात हिरवा चुडा. तिच्या पायातले पैंजण थोडे वाजत होते.

वाह. माझी नजर व्हायची. इतक सुंदर रूप. तो तिला डोळ्यात साठवून घेत होता.

मंडपातले सगळे शांत झाले होते. तिने हळूच समोर बघितल. सचिन तिच्या कडे बघत होता. ती थोडी हसली. तो मंत्ररल्या सारखा उभा राहिला. त्याने हात पुढे केला. सुरभीने त्याच्या हातात हात दिला. दोघे स्टेजवर उभे होते. कोणी काही बोलत नव्हत. त्यांची एकमेकांच्या चेहर्‍यावरून नजर हटत नव्हती. जसे ते दोघ त्या ठिकाणी होते.

"सुरभी गुरुजी सांगतात ते नीट ऐक. एकूण एक मंत्र पूजा आपल्या साठी महत्वाची आहे. आपण कायम लक्ष्यात ठेवू." सचिन बोलला.

हो.

मुहूर्ताची वेळ जवळ आली. दोघांना समोरासमोर उभं केल. मध्ये अंतर पार धरला. मंगलाष्टके झाली. दोघांनी एकमेकांना हार घातले. सचिनने पुढे होवुन तिला मिठी मारली.

सगळ्यांच्या चेहर्‍यावर हसू होत. बाकीचे लग्न सोहळा आरामात बसून बघत होते.

थोड्यावेळाने लगेच पूजा सुरू झाली. सुरभी सचिनची अर्धांगिनी म्हणून अगदी आनंदात होती. त्याच्या हाताला हात लावून बसली होती. सचिन मनापासुन पूजा करत होता. मंगळसूत्र घालून झाल. कुंकू भरा आता. सचिन सुरभी कडे बघत होता. ती भारावून गेली होती. सचिन तिला विचारत होता. "काय झालं. "

" काही नाही, मी खूप खुश आहे."

सगळ्या पूजा झाल्या. सात फेरे झाले. खूप सुंदर वातावरण तयार झाल होत.

ही जोडी खूप छान जमली आहे. सगळे सचिन सुरभी कडे बघून समाधान व्यक्त करत होते.

दोघ मोठ्यांच्या पाया पडायला आले. नंदा ताई, सुरेश राव खूप खुश होते. "खूप सुखी रहा. एकमेकांच मन जपा. तुमच्या मनाप्रमाणे सगळं होईल. तुमच्या संसारात कोणतीही अडचण येणार नाही." त्यांनी आशीर्वाद दिले.

"आई बाबा खुप थँक्यू. तुम्ही दोघ खूप चांगले आहात. " सुरभी बोलली.

सुरभी, सचिन... सौरभ, पूजा जवळ आली. ते एकमेकांना भेटले. तुमच खूप अभिनंदन.

" सचिन साहेब सांभाळा आमच्या सुरभीला. ती खूप समजूतदार चांगली आहे प्रेमळ आहे." सौरभने दोघांना जवळ घेतल.

"आनंदाने रहा. एन्जॉय करा. मी खूप खुश आहे. " पूजाने सुरभीला जवळ घेतल.

हॉलमध्ये जेवणाचा कार्यक्रम होता. हास्यविनोद सुरू होते. सगळे दोघांना चिडवत होते. दोघांनी एकमेकांना गुलाबजाम खाऊ घातले.

" जेवा आता की एकमेकांकडे बघून पोट भरलं?" पूजा चिडवत होती.



🎭 Series Post

View all