नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 33 अंतिम

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 33 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

सुरभी ही आता हल्ली बिझी होती. दुपारी ऑफिस काम सुरू होत. मध्ये मध्ये ती ऑफिस मधे ही जात होती. सौरभ पूजा ही येत होते. चौघांच छान पटत होत.

सचिन सुरभी सोबत खूप खुश होता. लग्नाला एक महिना झाला होता. दोघ सेलिब्रेट करायला डिनर साठी गेले होते. घरी आल्यावर रूम पूर्ण फुलांनी सजवलेली होती.

"अरे हे काय आता सचिन?"

"आपली ही हौस राहिली होती ना. " दोघांनी छान वेळ घालवला.

मधे एकदा दोनदा ते गावाला जावून आले. लग्नाला सहा महिने झाले होते.

आज नंदा ताई, मनु येणार होत्या. सुरभी सकाळ पासून बिझी होती. स्वयंपाक झाला का ती बघत होती. तिला थकल्या सारख वाटत होत. अस का होत आहे तिने कॅलेंडर बघितल. तारीख उलटून गेली आहे. काय असेल हे? ती खुश होती. तिने कोणाला सांगितल नाही. मला वाटत तशी आनंदाची बातमी असावी.

थोड्या वेळाने दोघी आल्या. नंदा ताई कामा निमित्त गेल्या. सुरभीने किचन मधे जावुन सरबत पिल. आता थोड बर वाटत होत. मनु खूप बोलत होती. तिला झोपावंस वाटत होत. ऑफिसच काम खूप बाकी होत. काही करावसं वाटत नव्हत.

सचिन जेवायला आला. नंदा ताई सोबत होत्या. जेवण झाल.

"आम्ही सुरभीला नेतो घरी पूजा आहे." त्या बोलल्या.

"ठीक आहे."

सुरभीला जावसं वाटत नव्हत. प्रवास झेपेल की नाही समजत नव्हतं पण नाही कस म्हणणार. ते थोड्या वेळाने निघाले. पूर्ण रस्ता ती झोपलेली होती.

"काय झालं सुरभी बेटा. बर वाटत नाही का?"

"माहिती नाही आई. कसतरी होत आहे . "

" ये इकडे. " ती त्यांच्या जवळ झोपली. घर आल्यावर ती रूम मधे निघून गेली. थोड्या वेळ आराम केल्यावर तिला बर वाटत होत.

ती संध्याकाळी बाहेर आली. नंदा ताई कामात होत्या. आजी किचन मधे बसलेल्या होत्या. " ये बेटा. मजेत आहेस ना?"

" हो आजी. "

" वहिनी तू वेगळी दिसते आहे. एकदम सुंदर ." मनु बोलली.

"मनु जा तुझ्या बाबांना चहा देवून ये." नंदा ताई ही सुरभी कडे बघत होत्या. .

आजी छान हसत होत्या .

सुरभी स्वयंपाक करायला मदत करत होती. आराम झाल्यामुळे ती फ्रेश होती. जेवण झाल्यावर तिने सचिनला फोन केला." मला खूप त्रास होतो आहे. "

" कश्यामुळे?"

"माहिती नाही. "

" आईला सांग. वाटल तर डॉक्टर कडे जावून ये."

"उद्या त्रास झाला तर बघते, तू येणार आहे का पूजेला?"

"हो येईल." तिला बर वाटल. आजकाल सचिन नसला की तिला करमत नव्हत. तो आला की त्याच्याशी बोलून बघू ती विचार करत होती.

दुपारी जेवण झाल." चल सुरभी मार्केट मधे जावु थोडी शॉपिंग करायची आहे . "

" कसली पूजा आहे आई?" तिने विचारल.

"आपल्या कडे दर वर्षी असते आपल्या देवाची. "

ओके.

त्या शॉपिंगला गेल्या. तिथे सुरभी सगळीकडे बसुन घेत होती. खूप दमली होती.

"आई ज्यूस पिऊ या का? घसा कोरडा पडला आहे."

"काय होतय तुला? थकल्या सारख होत का? काम करावास वाटत नाही का? झोपावंस वाटत का?"

" हो आई. "

त्या छान हसत होत्या." काय झालं आई? "

" आपण डॉक्टर कडे जावू या."

डॉक्टर चेक करत होत्या. "शंका बरोबर आहे या बहुतेक प्रेग्नंट आहेत. आपण टेस्ट करून बघू. "

सुरभी लाजली होती. नंदा ताईंनी तिला जवळ घेतल.

" आई डॉक्टर काय म्हटल्या? "

" तू बरोबर ऐकल. "

" हे खर आहे का?"

"हो बेटा. " ती खूप आनंदात होती. डॉक्टरांनी इतर माहिती विचारली. टेस्ट केली पाॅझीटीव आली." अजून खूप सुरुवात आहे. काळजी घ्या. " डॉक्टरांनी टॉनिक वगैरे लिहून दिले. "आनंदी रहा, धावपळ नको सुरभी."

ती हो बोलली.

नंदा ताई, सुरभी निघाल्या. त्यांनी तिला कार मधे जवळ घेतल.

" आई हे खर असेल का?"

"हो मला वाटत होत तुझ्याकडे बघून." त्यांनी सचिनला फोन लावला. तो कामात होता.

" आई काही महत्त्वाच आहे का? मी मीटिंग मधे आहे."

"हो खूप महत्त्वाची बातमी आहे. ऐक तरी आनंदाची बातमी आहे. सुरभी प्रेग्नंट आहे."

"काय?"

"हो आम्ही आता डॉक्टर कडे गेलो होतो. "

सचिन मीटिंग मधून बाहेर आला." आई खर का?"

"हो थांब तिच्याशी बोल."

सुरभी नाही बोलत होती.

" बोल अग लाजते काय. " तिने फोन हातात घेतला.

सुरभी.

हमम.

" खूप आनंदाची बातमी दिली. खर आहे का हे?"

हो.

" मला वाटल होत. तुझी डेट मिस झाली ना . चला छान झाल. बघ तू उगीच टेंशन घेत होती. आपल खूप अभिनंदन मी येतो तिकडे. "

" सावकाश ये."

त्याने फोन ठेवला. ते घरी आले. आजी पुढे बसलेल्या होत्या, सुरेश राव होते. नंदा ताई खुश होत्या." सुरभी देवाला नमस्कार जा."

हो.

सुरभी आत गेली, नंदा ताई आजीं जवळ बसल्या. त्यांच्या चेहर्‍यावर हसू होत. " काय झालं?"

" आनंदाची बातमी आहे. सुरभी प्रेग्नंट आहे."

आजी खुश होत्या. सुरेशराव नंदाताईं कडे बघत होते. खर?

हो.

"देव पावला."

हो ना.

सुरभी रूम मधे आराम करत होती. आजी आल्या. ती उठून बसली. त्यांनी तिची नजर काढली.

थोड्या वेळाने सचिन आला. तो मिठाई घेवून आला होता. सगळे खुश होते ." सुरभी कुठे आहे? "

" ती आराम करते आहे."

तो आत आला. आल्या आल्या त्याने सुरभीला जवळ घेतल. ती रडायला लागली. "काय झालं सुरभी? खुश ना आता. देवाने तुझ ऐकल."

" हो खूप खूप खुश. "

"बघ बर तु उगीच टेंशन घेत होती."

"मला काही सुचत नाही सचिन. हे खर आहे ना."

"हो एकदम खर आहे आता काळजी घ्यायची. ही स्टेज एन्जॉय ही करायची."

" मला त्रास होतो आहे. वीक वाटत आहे. "

"होईल ठीक थोड आराम कर. मेडिसिन दिल असेल ना."

हो.

" घाबरू नकोस. आराम कर."

तिला त्याचा खूप आधार वाटला. तो आल्यामुळे ती खुश होती. संध्याकाळी जेवायला खीर केली होती. देवाला नैवेद्य दाखवला.

" आजी चल आता तिकडे. " सचिन हसून बोलला.

" हो येईल पुढच्या आठवड्यात मला डॉक्टर कडे जायच आहे. त्या नंतर येते. सुरभीला राहू दे इथे." त्या बोलल्या.

"सुरभी रहाते का?"

हो.

सचिन वापस गेला. घरी पूजा होती. कोणी सुरभीला धावपळ करू दिली नाही. सगळे तिची काळजी घेत होते. मनु तिच्या सेवेला हजर होती. पुढच्या आठवड्यात ती आजी सोबत घरी आली.

आजी दोन महिने होत्या. आता सुरभीची तब्येत थोडी ठीक होती हे बघून त्या घरी गेल्या. आता पूजा इकडे रहायला आली होती. ती होती तर सुरभी खुश होती. ती लाड पुरवत होती.

आज नंदा ताई सुरभीला घ्यायला येणार होत्या. तिला सातवा महिना लागला होता. गावाकडे डोहाळे जेवण होत. तिकडे डीलेव्हरी होणार होती.

सुरभी बसलेली होती. सचिन तिला बॅग भरायला मदत करत होता. "मला करमणार नाही सुरभी तुझ्या शिवाय."

"तू पण चल तिकडे."

"हो सुट्टी असली की येईल."

" काळजी घ्यायची आई सोबत बाहेर जायच." सचिन काळजी घ्यायला सांगत होता.

"हो त्या खूप चांगल्या आहेत माझे लाड करतात." सुरभी खुश होती.

"अरे हो आठवल. बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत. मी मनु आशिषला सांगणार आहे काही आणून द्यायच नाही. "

" मला मंदिरा जवळचे वडे हवे." सुरभी मधेच बोलली.

" अरे? आता काय सांगितल लक्ष्यात आल नाही का."

" एकदा फक्त प्लीज. "

" ठीक आहे आज जावू मंदिरात." काय करू सुरभी अजिबात ऐकत नाही.

नंदा ताई आल्या. त्या खूप कामात होत्या. संध्याकाळी ते मंदिरात गेले.

" आधी दर्शन मग वडे. " सचिन बोलला.

" कोणते वडे? हे? " नंदा ताई विचारत होत्या.

" हो आई सुरभी ऐकत नाही. "तो तीच नाव सांगत होता.

" अजिबात मिळणार नाही मी घरी करेन तुझ्यासाठी." त्या बोलल्या.

"आई एक फक्त. आजच्या दिवस. प्लीज सचिन." तिने पोटा कडे बोट दाखवल.

"अस आहे आई."

"ठीक आहे एक वडा घ्यायचा. "

सुरभी खुश होती ते देवळात गेले.

"आता बाळ घेवून दर्शनाला येईल. माझ्या पाठीशी रहा." तिने मनोभावे प्रार्थना केली.

सचिन देवा जवळ डोळे बंद करून हात जोडून उभा होता. सुरभीची नीट डीलेव्हरी होऊ द्या. त्याने तिच्या कपाळावर देवाची रक्षा लावली. ते बाहेर येत होते.

समोर राहुल त्याचे आई वडील होते. ते सुरभी कडे बघत होते. ती सचिनचा हात धरून सावकाश बाहेर येत होती. नंदा ताई तिची काळजी घेत होत्या.

तिने समोर बघितल सचिन कडे बघितल. राहुल. ते बाजूने पुढे गेले.

"सुरभी कशी आहेस?" राहुलने आवाज दिला. ती थांबली.

"तू आई होणार आहेस. मी खुश आहे तुझ्यासाठी." तो त्याच्या घरचे आश्चर्याने बघत होते.

"काय आहे राहुल आता तु का बोलतोस आमच्याशी? सुरभीला त्रास होईल अस काही वागू नको. जा इथून. तिची तब्येत महत्वाची. मंदिरात आम्हाला भांडायच नाही." सचिन बोलला.

"कोण आहेत हे?" नंदा ताई विचारत होत्या.

" राहुल माझा आधीचा नवरा, सासुबाई, सासरे." सुरभीने सांगितल.

ओह.

"सुरभी बेटा तुझ्या घरचे आहेत का हे?" राहुलचे बाबा बोलले.

" हो बाबा या सासुबाई आहेत, हे माहिती आहेत तुम्हाला माझे मिस्टर सचिन . "

छान.

सासुबाई लांबून बघत होत्या. त्यांना त्यांच्या प्रश्नच उत्तर मिळाल होत. त्या कांडावल्या सारख्या झाल्या होत्या. त्या बोलल्या नाही.

"सुरभी सॉरी. " राहुल बोलला.

" आता का?"

"तुझ्यावर अन्याय केला आम्ही. दोष माझ्यात आहे. "

" आता या गोष्टी बोलून काही उपयोग आहे का राहुल. नशीब मान्य केल तू."

" तु छान सुखी रहा. "

" तुझी बायको कुठे आहे? " सुरभी बघत होती ती सोबत नाही आली वाटत.

" ती वापस माहेरी गेली. "

का?

" मुल बाळ होत नाही म्हणून आई त्रास देत होती. "

"मग तू काय करत होता? तुझी आई तुझ्या बायकोला विनाकारण त्रास देते. समजत नाही का. तू तिची बाजू घ्यायला हवी होती. मग आता काय तिसर लग्न का?"

"अस नको बोलू सुरभी."

"तुला समजायला हव राहुल, माझ्या सारख्या निर्दोष मुलींचे आयुष्य खराब करतांना काही वाटत नाही का? त्या पेक्षा डॉक्टर कडे जा नीट ट्रीटमेंट कर. बायकोला वापस घरी आण. आनंदने रहा.
मला देव माणस भेटली. पण सगळ्या मुलींच नशीब अस नसत. तुझ्या सारख्या मुलांमुळे त्यांच कायमच नुकसान होत. त्यांचा काही दोष नसतो. त्यांना खूप सहन कराव लागत.
अश्या लाडवलेल्या मुलांनी खर तर लग्न करायला नको. चुकीच असो की बरोबर नेहमी डोळे झाकून आई वर विश्वास ठेवायच असेल तर आई सोबत रहायच.
त्यांना स्वतः चा डीसीजन घेता येत नाही. आई म्हणेल ते करतात.
आई ही कशी काहीही झाल तरी माझ्या मुलात दोष नाही. अरे त्या पेक्षा डोळे उघडून आहे त्या परिस्थितीला तोंड द्या. स्वतः त प्रॉब्लेम असण म्हणजे काही कमी पणाची गोष्ट नाही. त्यात काय आहे?
ट्रीटमेंट घ्यायची. सर्दी ताप आल्यावर घेतो ना आपण औषध तस आहे हे. पण नाही साध्या गोष्टी पटत नाही त्यांना. आपल्या सोबत दुसर्‍याच आयुष्य उध्वस्त करायच." सुरभी खूप बोलली त्याला.

"सुरभी मला माफ कर. मी चुकलो."

"माझ्या मनात काही नाही आता. मी माझ्या संसारात सुखी आहे." ती बोलली.

"चल सुरभी या लोकांशी बोलून काही उपयोग नाही. त्रास होईल अस करु नकोस." सचिनने तिचा हात धरला.

"हो बरोबर. चला आपण निघू." ती सचिन नंदाताईंना बोलली.

ते निघाले.

राहुल अजून त्या तिघांकडे बघत होता. त्याने काय गमावलं ते त्याला समजल आणि या पुढे काय करायच ते ही समजल. या आधी सुरभीच ऐकल असत तर बर झाल असत.

ते बाहेर आले.

" आई वडे घेवू या. छान दुकान आहे. " सुरभी बोलली.

त्यांनी दोन वडे पार्सल घेतले. " इथे खायचं."

"नाही घरी चल."

"नाही इथे." तिने एक वडा खाल्ला. ते निघाले.

घरी येवून सुरभीच आवडत जेवण होत.

" सुरभी ऐकत नाही आई तिला ओरड तिकडे. काहीही मागते खूप हट्ट धरते." सचिन तिला रागवत होता.

"हो मी बघेन तिच्या कडे."

" मनु सोबत फिरायच नाही शेतात वगैरे. समजत ना सुरभी. "

"बर झालं आठवल. मला तिकडे गार्डन जवळ पाणी पुरी खायची आहे." सुरभी खुश होती.

" ते पाणी चांगल नसत." सचिन बोलला.

" मी बघते सचिन. शांत हो. आपण घेवू सुरूभी. जा तू आराम कर." नंदा ताई बोलल्या.

ती आत गेली.

" मी करेन बरोबर सचिन. घरी करुन देईल सांगेल बाहेरची आहे. " नंदा ताई बोलल्या.

" आई सुरभी खूप हुशार आहे तिला बरोबर समजत घरचे आणि बाहेरचे पदार्थ. " सचिन बोलला.

नंदा ताई हसत होत्या." होत अस या दिवसात. खावसं वाटत. मी सांभाळेल तिला."

"सचिन पुढच्या आठवडय़ात डोहाळे जेवण आहे तू ये."

"हो आई."

सचिन रूम मधे आला. सुरभी टीव्ही बघत होती." तू उद्या जाणार मला बोर होईल."

"हो मी थोड्या दिवसांनी आपल्या बाळाला घेवून येईल. "

सचिन तिच्या जवळ बसला. "काळजी घ्यायची काही लागल तर लगेच सांगायच. तस मी नंतर तिकडे असेल. "

सकाळी त्या दोघी गावी गेल्या. ड्रायवर हळू कार चालवत होता म्हणून पोहोचायला थोडा वेळ लागला.

आज डोहाळे जेवणाचा प्रोग्राम होता. मामा, मामी, सौरभ, पूजा, सचिन आलेले होते.

सुरभी आराम करत होती. बाहेर जेवण सुरू होते. सचिन आत आला." तू जेवली का? "

" हो पहिला नंबर. आई मला रोज आधी वाढून देतात. मी जेवे पर्यंत सोबत बसतात. इतक्या कश्या चांगल्या आहेत. मला वाटत त्या माझी आई आहे." सुरभी खुश होती.

"हो आई चांगली आहे नवीन विचाराची. तिने कधीच कोणाला त्रास दिला नाही."

हिरवी साडी, फुलांचा साज घालून सुरभी रेडी होती, तिच्या चेहर्‍यावर खूप तेज होत, खूप फोटो निघत होते, छान कार्यक्रम झाला.

" सुरभी चल आता एक वाटी निवड. " सचिन तिच्या सोबत होता.

"कोणती वाटी घेवू. " तिने सचिनला विचारल.

" कोणती हि घे. जे होईल ते. नाहीतरी तीन चार वर्षांनी परत चान्स घ्यायचा आहे." तो सुरभी जवळ जात हळूच बोलला.

तिने डोळे मोठे केले. "किती मुल हवे तुला?"

"चार तरी. "

" अजिबात नाही, सचिन मला जमणार नाही."

सचिन हसत होता.

आटपा वाटी निवडा. सगळे बोलत होते.

तिने बर्फीची वाटी निवडली. सगळे आनंदात होते. कार्यक्रम झाल्यावर सचिन सुरभी छान सोबत होते.

तो दुसर्‍या दिवशी वापस गेला.

सुरभीचा नववा महिना संपला होता. कोणत्याही क्षणी डीलेव्हरी होईल अशी परिस्थिती होती. सचिन आलेला होता. तो इकडून काम करत होता.

सुरभी आज सकाळ पासून शांत होती. विशेष बाहेर येवून बसली नाही. आजी तिच्या बरोबर आत बसलेल्या होत्या. आजी बाहेर आल्या. सुरभीला त्रास होतो आहे.

तिला अ‍ॅडमिट केल. बराच त्रास होत होता. पाच सहा तासाने नर्स आत आली. मुलगी झाली आहे घ्या. सगळे कौतुकाने बाळाकडे बघत होते. किती गोड आहे ही. सौरभ पूजा ही आलेले होते. पूजा तिच्या सोबत होती. " बापरे खूप त्रास होतो ग सुरभी."

" तू कधी चान्स घेते वहिनी."

" आता शी नीट होत आहे आमच बघू." ती लाजली.

नंदा ताई, सचिन डॉक्टर जवळ आले. "सुरभी कशी आहे?" दोघांनी एकदम विचारल.

"ठीक आहे तुम्ही भेटून या."

"जा तू सचिन."

"तू पण चल." दोघ आत गेले. पूजा उठून उभी राहिली.

"सुरभी कशी आहेस." नंदा ताई तिच्या जवळ बसल्या.

"ठीक आहे." ती खुश होती. दमली होती.

"आई बाळ कस आहे?"

"गोड आहे तुझ्या सारखी."

सचिन अजून बाजूला उभा होता. नंदा ताई, पूजा बाहेर गेल्या. सचिन तिच्या जवळ बसला. त्याने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले." सुरभी थँक्यू खूप सुंदर गिफ्ट दिलस. मी खूप खुश आहे. "

नंदा ताई, सुरभी बाळाची खूप काळजी घेत होत्या. पाचव्या दिवशी बाळाला घरी सोडल. घरी खूप सुंदर स्वागत झाल. सगळे बाळाच्या आजुबाजूला होते.

" आता सारख यायच नाही इकडे. सुरभी बाळाला आराम करू द्या." आजी ओरडल्या.

आज बाळाच बारस होत. नाव काय ठेवायच सगळे एक एक नाव सुचवत होते. त्यांनी सुचवलेल नाव किती चांगल हे समजावून सांगत होते. जवळ जवळ भांडण सुरू होत.

"गप्प बस बाळाच नाव त्याचे आई बाबा ठरवतील." आजी बोलल्या.

सुरभी आत होती. बाळ झोपलेली होती.

" काय ठरवल सुरभी? " सचिन विचारत होता.

" तू सांगशील ते."

"सानवी कस वाटत."

चालेल.

सुंदर कार्यक्रम झाला. सानवी नाव खूप आवडल सगळ्यांना. तिने कार्यक्रमात अजिबात त्रास दिला नाही.

सानवी तीन महिन्याची झाली. सचिन आला होता. सुरभी खुश होती.

"सुरभी चल ना आता घरी. तुला माहिती नाही मला किती बोर होत तिकडे. प्लीज. माझ बाळ, माझी बायको मला सोबत हवे." सचिन बोलला.

" आपल्याला सानुला सांभाळायला जमेल का? " सुरभी काळजीत होती.

" का नाही, चल ना. आपण तिला सांभाळायला एक केअर टेकर ठेवु. मी पण आहे. "

" आईंना विचाराव लागेल. "

नंदा ताई आत आल्या.

" आई मी सुरभीला घेवून जातो." सचिन बोलला.

"कुठे?

" तिकडे घरी. "

" अजिबात नाही आम्हाला करमणार नाही. माझी सानू कुठे ही जाणार नाही. आजी कडे रहाणार. " त्यांनी तिला उचलून घेतल. सगळ्यांना बाळाचा लळा लागला होता.

"तू पण चल तिकडे."

"थोड्या दिवसांनी जा. मला करमणार नाही."

"नाही आता नेतो तिला. "

सचिन सुरभी सानवी सोबत घरी आले. पूजा आली होती. ती खूप मदत करत होती. केअर टेकर ताई खूप अनुभवी होत्या. सानवीची छान काळजी घेत होत्या. दोन तीन दिवसांनी सुरभी सानवी छान एडजेस्ट झाल्या.

सचिन थोड लवकर घरी येत होता. सानवी त्याला बघून खूप खुश असायची. दोघ खूप प्रेमाने सोबत होते. सचिन साठी सानू म्हणजे पूर्ण जग होत. सुरभी त्या दोघांकडे बघून खूप खुश होती.

सानु झोपली की सचिन नेहमी प्रमाणे सुरभीच्या मागे असायचा. ती हसत होती. "सचिन आता आपण आई बाबा झालो. अस नको करू."

"आपण वयस्कर झालो तरी मी अस करेन."

घरून नंदा ताई, आजी नेहमी येत होत्या. पूजाला सानु शिवाय करमत नव्हत. मनु परीक्षा झाल्यावर इकडे येवून राहिली. ते सगळे खूप खुश होते.

आपल्या समाजात अशा किती मुली आहेत ज्यांचा काहीही दोष नसताना त्यांना घराबाहेर काढले जात. त्यानंतर त्यांचं काय होत असेल? याचा विचार कोणीच करत नाही. सुरभी सारख्या बऱ्याच कमी मुली असतात ज्यांचं नंतर खूप चांगलं होतं. बाकीच्यांचे हाल होतात. अस करु नका.

हीच व्यथा मला या कथेतुन मांडायची होती. चांगले विचार आपण नेहमी दुसऱ्यासाठी ठेवतो. स्वतः पण कृती करताना ते लक्षात ठेवावे .प्रगतीची सुरुवात नेहमी स्वतः पासून करावी.

किती सुंदर आधार दिला सचिनने सुरभीला. सुरभीने खूप प्रेम दिल त्याला .दोघांनी एकमेकांना समजून घेतल. आता त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

समाप्त.

वाचकांचे खूप आभार.