Login

नात्यांचे नाजूक बंध भाग २

नात्यांचे नाजूक बंध भाग २
मागच्या वेळी पण ते कसले तरी रंगी बेरंगी कॉफी चे कप घेउन आली. ना त्यांना काही एक ठराविक रंग. ना कोणता आकार. सहा रंगाचे सह कप. ते पण हे एवढे हातभर मोठे. तोंडाशी निमुळते. घासायला किती त्रास. पण तिला पटेल तेंव्हा ना !

त्यावेळीं माझाच चुकलं. तिला सांगायला हवं होत ते कप दुकान दाराला परत करून दे.

पण यावेळी मी तिला ठणकावून सांगितल आहे. ते कसलेशे जाळीचे पडदे आणले आहेत ना, ते परत कर. म्हणजे पुढच्या वेळी स्वतः डोकं नाही चालवणार.

आता या घरात काय हवं काय नको काय चांगलं दिसत काय नाही हे तूझ्या पेक्षा अजुन कोणाला माहित आहे का ?

नाही ना ! मग कशाला काहीतरी करायला जाते. नी माझ्या मुलाचे पैसे वाया घालवते ? "

माधुरी बाईंच्या बोलण्यातून तिला अंदाज आलाच. त्या नक्की अमृता ताईंशी बोलत असतील. तिला एक गोष्ट समजुन चुकली होती. माधुरी बाई या घरातील छोटयातील छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट अमृता ताईंना सांगतात. ताई देखील आईंना फोन करून घरातील अप डेट घेत असतात.

माधुरी बाईंचं तिच्या विषयीच मत ऐकून कडवट झालं तिच मन. उदास मनाने ती किचन मधे कामाला निघुन गेली. तिने मनाशी काहीतरी खुण गाठ बांधली. या घरात अमृता ताईंच्या मर्जी शिवाय काहीही होत नाही. तिला समजत होत हे योग्य नाही. कदाचित या मुळे नात्यात गाठ पडू शकते. कधीही न सुटणारी गाठ.

ईश्वरी आणि ओमकारच्या लग्नाला आता कूठे चार महिने पूर्ण होत होते.त्यांच्या लग्ना आधी घरात हे दोघच होते. माधुरी बाईंना एक मुलगी होती. तिच नाव अमृता. तिच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली होती. तिच सासर पण त्यांच्या घराच्या जवळच होत.

तीन वर्षांपूर्वी माधुरी बाईंच्या गूढघ्याचे ऑपरेशन झालं होतं. तेंव्हा पासून त्यांच्या बाहेर हिंडू फिरण्या वर मर्यादा आल्या होत्या. त्यातुन ओमकार एका आय टी कंपनीत नोकरीला होता. त्याच काम हे दिवस भर बाहेर असायचं. सकाळीं आठ साडे आठला घरातून निघून गेला की रात्री नऊ वाजता तो घरी यायचा.

साहजिक घरातील बाहेरच्या कामांची जबाबदारी ही अमृता ताईंच्या वर आली होती. त्यामुळें घरातील किराणा सामान आणायचं असु दे किंवा भाजी पाला आणायचं कान असू दे. ते सगळं काम अमृता ताईच बघायच्या.

ओमकारला तर त्याच्या नोकरी मुळे हि काम करायला जमत नसत. अमृता आईला दवाखान्यात नेऊन आणायची. कधी तरी काही गरज असेल तर त्यांना बाहेर घेउन जायची. मग त्यांचे कपडे, घरातील पडदे ,बेडशीट ,सोफा कव्हर , कटलरी वगेरे गोष्टीची खरेदी अमृता ताईंच करायच्या.

अस म्हणल तर चुकीचं नाही ठरणार या घरात अमृता ताईंच राज्य चालत होत. ओमकार ने ईश्वरी सोबत लग्न करायला होकार पण अमृता ताईच्या ग्रीन सिग्नल नंतर दिला होता.

पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक होता. त्यावेळी माधुरी बाईंच्या मदतीला अमृता ताईंच्या मदती शिवाय कोणीच नव्हत. पण आता सून आली आहे. पण ही गोष्ट माधुरी बाईंच्या लक्षात येत नव्हती. त्यांचं स्पष्ट मत होत. या घरासाठी सर्व काही निवडण्याचा ठरवण्याचा अधिकार फक्त अमृता ताईंच्या कडेच आहे.

त्या या घराच्या भल्या साठी सर्वात चांगले निर्णय घेऊ शकतात. तर ईश्वरी ने उगीचच तिच डोक लावण्याची गरज नाही.मुळात तिने त्या दोघींना विचारल्या शिवाय काहीही करूच नये.

असाच काहीसा समज अमृता ताईंचा स्वतः बद्दल पण होता. ती तिच्या स्वतः च्या घरासाठी म्हणजे सासरच्या घरासाठी आणि माहेरच्या घरासाठी सर्व उत्तम डिसिजन घेऊ शकते. तिच्या शिवाय हुशार या जगात कोणीच नाही.

अमृता ताई माधुरी ताईंना त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला दररोज एक तरी फोन करायची. मग त्या नेहमी प्रमाणे ताईंना दररोज घरात काय झालं ते सांगत. अगदी भाजी कोणती बनवली पासुन ते आज किती वेळ ईश्वरी तिच्या रुम मध्ये बसली होती इथ पर्यंत.

संध्याकाळी ओमकार ऑफिस मधून परत आला. वीक एंड होता. तर कधी नव्हे तो संध्याकाळी साडे सहा वाजताच घरी आलेला.त्यामुळे ते दोघं मार्केट मध्ये गेले. ईश्वरी ने ते पडदे दुकानदाराला परत केले. पण एकदा विकलेली वस्तू परत घेणार नाही. या नियमा मुळे तिने पडद्याच्या बदल्यात तिच्या रूम साठी बेडशीट खरेदी केले.

बेडरूम तरी तिच्या आवडी नुसार सजवू शकते. घरी येताना तिला काही पर्सेस आवडल्या. घरात होणाऱ्या कुंकुमार्चन च्या कार्य क्रमाच्या वेळी भजनी मंडळाच्या स्त्री यांच्या साठी तिने त्या पर्स खरेदी केल्या. ओटी भरताना ब्लाऊज पिस च्या ऐवजी एक छान उपयोगी भेट वस्तू म्हणून तिने त्या पर्स खरेदी केल्या.