निदान बेडरूम ते त्या दोघांची होती. मग ती बेडरूम तरी तिच्या आवडी नुसार सजवू शकते. घरी येताना तिला काही पर्सेस आवडल्या. घरात होणाऱ्या कुंकुमार्चन च्या कार्य क्रमाच्या वेळी भजनी मंडळाच्या स्त्री यांच्या साठी तिने त्या पर्स खरेदी केल्या. ओटी भरताना ब्लाऊज पिस च्या ऐवजी एक छान उपयोगी भेट वस्तू म्हणून तिने त्या पर्स खरेदी केल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिची खोली आवरून ठेवताना नविन बेडशीट घातली. आज घरात श्री सुक्त म्हणायचा आणि कुंकूमार्चन याचा कार्यक्रम होता. तर तिची रूम छान दिसावी म्हणून तिने काल आणलेली बेडशीट घातली होती. वारली चित्र असलेली लव्हेंडर रंगाची बेडशीट आणि त्याचं प्रिंट चे उशीचे अभ्रे रूमला एक क्लासी लूक देत होते.
निदान स्वतःची खोली तरी मनासारखी सजवली. या आनंदात ती दुपारच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागली. तिने हळद , चुन्याची निवळी आणि लिंबाचा रस वापरून नैसर्गिक कुंकु घरीच तयार केल होत.
चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर तांदूळाने अष्ठदल कमळ रेखाटल होत. दारा समोर छान रांगोळी घातली होती. पंचामृत समई निरांजन बाकी सगळी तयारी केली होती.त्या बायकांच्या साठी मसाला दुध पण बनवून ठेवलं होतं.
रांगोळी काढून झाल्यावर ती तिची तयारी करायला तिच्या रूम मध्ये गेली. तिने साडी नेसली होती. ती बाकीच आवरतच होती की माधुरी बाई काही तरी विचारायला तिच्या रूम मध्ये आल्या. तर समोर बेड वरच बदलेल बेडशीट बघून तिच्यावर चिडल्याच.
" ईश्वरी काय ग ? हे काय आहे. हे कुठल बेडशीट घातल आहेस ?"
" मी तुला किती वेळा सांगू तू उगीचच तुझ्या मनाच करत नको जाऊस. तुला काही समजत नाही. तुझी टेस्ट खुप बेकार आहे. जरा माझ्या मुलीकडून अमृता कडून शिक काहीतरी.
ती बघ कस करते तिची चॉईस बघ. सासरच् घर असू दे किंवा माहेरच्या घरातील जबाबदारी असू दे. बघ कशी उत्तम सांभाळून घेते.
सगळे जण तिच कौतुक करत असतात. तू तिच्या कडून काहीतरी शिकायचं की स्वतःचच डोक चालु ठेवायचं.
उगाच कशाला तूझ्या नसलेल्या अक्कलेच अस प्रदर्शन मांडते ? ऑ ?"
" अग किमान ओमकरच्या कष्टाचा तरी विचार करायचा. हे बघ काय आणलं आहेस. कसली ती काडीचे हात पाय एका गोळ्याला जोडलेली माणसाची चित्र.
कस दिसत बघ जरा. असं माणसांच्या चित्रांच्या बेडशीट वर झोप तरी येइल का कोणाला ? सांग बरं ?"
" अमृताने बघ किती सुंदर प्रिंट ची बेडशीट आणली होती. घातल्यावर सगळ्यांनी किती कौतुक केलं होतं. तिच तिच्या चॉईस च.!
आणि आता तू बघ. काय हे असल कड्याच्या हात पाय असलेली माणसांची चित्र असलेले बेडशीट आणली आहेस. काय म्हणतील लोकं या बेडशीटला बघून.?
सगळे मलाच म्हणतील कसली मुलगी सून करून घरात आणली. तिला ना कशाची टेस्ट आहे ना कसली चॉईस आहे. त्यापेक्षा अमृता बघा. किती छान डिसिजन घेते.
नी किती पटकन घेते. अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेते. आता त्या लोकांनी हे सगळं बघितल तर काय बोलू मी ? सांग मला."
माधुरी बाई तिच्या वर ओरडत होत्या. त्यांना ईश्वरीचा रागच आला होता. का ही मुलगी तिच्या मनाच करायला जाते ?
तिला समजत नाही का या घरासाठी बेस्ट डिसिजन बेस्ट चॉईस फक्त अमृता करू शकते.
हिला काय होत तिला विचारल तर ?
माधुरी बाईंच्या एकेक शब्दांनी ती आतल्या आत तुटतं चालली होती. लग्नाला अजुन पुरते सहा महिने देखील झालेले नव्हते. ती या घरात आल्या पासुन एकच नाव ऐकत होती ते म्हणजे अमृता ताईंच.
त्या ताई नाही कोणत्या तरी महान देवी आहेत !
असच काहीसं वाटतं होत ईश्वरीला.
खाली मान घालून चूप चाप ती माधुरी बाईंच् बोलणं ऐकून घेत होती. पण तिचा संयम संपत आला होता. मनातील राग आवरत ती हळू आवाजात म्हणाली ,
खाली मान घालून चूप चाप ती माधुरी बाईंच् बोलणं ऐकून घेत होती. पण तिचा संयम संपत आला होता. मनातील राग आवरत ती हळू आवाजात म्हणाली ,
" आई मी पण आली आहे ना लग्न करून या घरात. हि बेडरूम तर आम्हा दोघांनची आहे ना !
मग मी इथ तर हि बेडशीट घालू शकते ना ?
बेडरूम मध्ये कोण येणार आहे बघायला ? "
बेडरूम मध्ये कोण येणार आहे बघायला ? "
" अस कस म्हणते तु. कोण येणारं आहे बेडरूम मध्ये ?
कोणाला दिसणार आहे हि बेडशीट ?
मी आले ना आता तुला विचारायला. मग मला तर दिसली ना हि बेडशीट. बघ कास दिसत हे ?
भिंतीचा रंग, पडद्याचा रंग आणि त्या विरूध्द हे जांभळ्या रंगाच बेडशीट. एकमेकांच्या विसंगतीत दिसतात."
" पण ओमकार आणि मी आम्ही दोघांच्या पसंती ने ही बेडशीट आणली आहे "
" ओंकार त्याला काय समजत का बेडशीट बद्दल ? त्याने कधी केली आहे का खरेदी ? नाही ."
" आई पण.."तिने बोलण्याचा प्रयत्न केला.
क्रमशः
©® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा