"नाही.त्याने कधीच असल काही खरेदी केल नाही. म्हणजे बेडशीट पडदे वगेरे.त्याला तर साधा चहाचा कप देखील खरेदी करायला येत नाही.माझी अमृताच सगळ खरेदी करायची त्याच्या साठी " माधुरी बाईंनी त्याचंच टुमण वाजवल.
त्या पुढे अजून काही बोलणार त्या आधीच दरवाज्याची बेल वाजली. ईश्वरी ने जाऊन दरवाजा उघडला. तर अमृता ताई आणि तिच्या सासू बाई सुषमा बाई आल्या होत्या.त्यांच्या सोबत काही सामानाच्या पिशव्या होत्या.
ईश्वरी ने अमृता ताईंच्या हातातील पिशव्या तिच्या हातात घेतल्या. त्यांना घरात बोलावलं. अजुन बाकीचा कार्यक्रम सुरू व्हायला उशीर होता. अमृता ताई आणि सुषमा बाई सकाळीच त्यांच्या घरी मदतीला आल्या होत्या.
घरात आल्या आल्या अमृता ताईंनी विचारलं.
" ईश्वरी आई कुठं आहे ग ?"
" आई आमच्या रूम मध्ये आहेत."
" बर या पिशव्या किचन मध्ये ठेव. मी आलेच."
" ईश्र्वरी तू अजुन तयार नाही झालीस.? अग काय हे. भजनी मंडळाच्या बायका येतच असतील. आणि हि आई काय करते आहे.?"
अमृता ने ईश्वरीला विचारलं. तिच्या उत्तराची वाट न बघता तिने ईश्र्वरीच्या तयार न होण्यावर टिपणी केली.
" चला आई बघु काय झालं आहे ते "
अमृता ने ईश्वरी च्या हातात त्या पिशव्या दिल्या. सुषमा बाईंचा हात हातात घेऊन ती तडक ईश्वरीच्या रूम कडे निघाली. ईश्वरीला काही बोलण्याचा काही विचार करायचा वेळ पण नाही मिळाला.
असो. ईश्वरी ने सामानाच्या पिशव्या बाजूच्या टेबल वर ठेवल्या. ती पण त्या दोघींच्या मागे तिच्या रुम मध्ये गेली.
" आई तु कुठं आहेस.? इथ काय करते ? अजुन तयार नाही झालीस.?
बाहेर पण काहीचं तयारी दिसत नाही. बायकांना बसायला गालिचा अंथरलेला नाही. पूजेची तयारी केली नाही. बाहेर
सगळ काम बाकी आहे आणि तु इथ काय करत आहेस ?" अमृता ताई माधुरी बाईंना विचारत होती.
" अग करतच होते ग. पण हे बघ ना. हि ईश्वरी कशी वागते ? नेहमी काहीतरी घोळ घालुन ठेवते ? आता हेच बघ ना.!
हे कसल काड्याच्या हात पाय असलेली माणसं असली कसली तरी चित्र विचित्र चित्र असलेली बेडशीट आणली आहे.
आता चार लोकं येतील घरी. तेव्हा ते हे सगळ बघून काय म्हणतील ?" त्या वैतागत म्हणाल्या.
माधुरी बाई ईश्वरी च्या केलेल्या गोष्टीवर वैतागलेल्या होत्या. त्यात अजुन काम पूर्ण झालं नव्हत. तर त्यांची चिडचिड होत होती.
बेडशीट कडे निरखून बघत अमृता ने पण आईच्या होकरात होकार दिला.
" तेच जरा तिला समजावत होती. हे बेडशीट बदल म्हणून."
" हो ग आई. तू बरोबर बोलत आहेस. हि बेडशीट तितकीशी चांगली नाही दिसत. हा रंग पण किती गडद रंग बेडरूम मध्ये सुट नाही करत."
" असू दे ना आई. आता नाही तिला समज बेडशीट खरेदी करायची तर असू दे. आता पुढच्या वेळी मी तिला माझ्या सोबत घेउन जाईन तेव्हा शिकवीन."
" ईश्वरी अग बेडरूम मध्ये असे माणसांची चित्र असलेले बेडशीट नाही घालत. बेडरूम मधे मस्त फिकट रंगाची फुलं पानाच्या डिझाईन ची बेडशीट घालायची असते." अमृता ईश्वरीला समजावत म्हणाली.
सुषमा बाईंना समजायला वेळ लागला नाही. या दोघी मायलेकी ईश्वरीला नेहमी असच काहीतरी बोलतं असतील. तिच्या निवडीला कायम टिका करत असतील. तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतील. तिच्या चुकांवर बोट ठेवत असतील.
त्यांना अमृताच्या माझ म्हणणं ते खरं वागण्याच्या स्वभावाची कल्पना होती. अमृता देखील लग्न करून सासरी आल्यावर अशीच वागायची. पण ही वृत्ती चांगली नाही ना ! तिला समजा वायला हवं . हि चांगली संधी आहे. अमृताला समजावण्याची . सुषमा बाईंनी असा विचार केला.
" अग ईश्वरी किती छान आहे ही बेडशीट. आणि हि वारली चित्र ती तर खूपच छान दिसतात. कोणता तरी सण साजरा करण्यात येत आहे. असा देखावा खुप छान आहे. प्रिंट पण छान आहे."
" ईश्वरी तु पुन्हा कधी खरेदी करण्यासाठी गेलीं तर माझ्या साठी पण असच काहीतरी युनिक घेउन ये. सध्या तर वारली चित्र असलेली बेडशीट ट्रेंड मध्ये पण आहे. हा रंग पण किती खुलून दिसतो आहे. यात अजुन कोणते कोणते रंग आहेत ग ? ."
सुषमा बाईंनी ईश्वरीच्या चॉईस ची स्तुती केली. शिवाय तिला त्यांच्या साठी पण बेडशीट आणायला सांगितल. ते बघून या दोघी मायलेकींचे चेहरे पडले.
क्रमशः
©® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा