तर दुसरीकडे ईश्वरी च्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कोणी तरी तिच्या निवडीच कौतुक करत होत. ती पण उत्साहात त्यांना त्या बद्दल माहिती देत होती.
त्या दोघींना असं बोलताना बघुन अमृताला रूचल नाही. तिने तिच्या फटकळ स्वभावा नुसार विचारलेंच ,
" आई पण तुम्हाला तर मी आणलेल्या वस्तू आवडतात ना ? मग तुम्ही तिला का आणायला सांगता ? "
" अमृता तुझी चॉईस चांगली आहे ग. पण हीची पण छान आहे." त्या अमृताला म्हणाल्या. मग माधुरी बाईंच्या कडे बघून त्यांना म्हणाल्या,
" माधुरी वहिनी निदान आता तरी अमृताला या माहेरच्या जबाबदारी मधून मुक्त करा. आता तुमच्याही घरात सुन आली आहे. आता तिच तर आहे या घरची गृहलक्ष्मी.
पुढे जाऊन तिलाच तर सगळं घर सांभाळायचं आहे. अजुन किती दिवस आमची अमृता दोन्ही घरच्या जबाबदाऱ्या एकटीच्या खांद्यावर पेलणार ?"
सुषमा बाईंच्या बोलण्यावर माधुरी बाईच तोंडच पडलं. आता लेकीच्या सासू बाईच असं म्हणतात मग त्या तरी पुढे काय बोलणार ? इतक्यात बेल वाजली. ईश्वरी दरवाजा उघडायला बाहेर गेली.
तिला बाहेर गेलेल बघून सुषमा बाई म्हणाल्या,
" माधुरी वहिनी तुम्हीचं अमृताला सांगा. तिने तिचा स्वभाव बदलला पाहिजे. सगळ्या ठिकाणी मी म्हणेन तेच बरोबर अस नसत."
" अमृता तू ठरव तुला काय हवं आहे ? तुला तूझ्या भावजय सोबतचे संबंध कसे ठेवायचे आहेत ?
तु तिच्यात चुका शोधत राहिली तर तू तिच्या मनात तुझी नकार अर्थी इमेज तयार करशील. तुमच्या नात्यात गाठ पडेल.
जी सोडण आणि सोडवण दोन्ही अवघड होइल किंवा अशक्य तरी.
आता तू ठरव तुला तुझ्या भावजय सोबतच नात कस हवं आहे. आज आई आहे तर तुझ माहेर आहे. उद्या भावजय असेल तर तुझं माहेर असणार आहे .
त्यामुळे आता तरी सुधार ग. दररोज आईला तिच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या बहाण्याने या घराचे अप डेट घेणं बंद कर. नाहीतर तू तूझ्या माहेरला परकी होशील."
सुषमा बाईंनी तिला समजावलं. तसचं माधुरी बाईना पण समजावलं. आज त्या आहेत तो पर्यंत मुलीला माहेर आहे. पण त्यांच्या पश्चात ईश्वरीच आहे जी अमृताच माहेर पण जपेल. सत्य आहे हे.
अमृताला सुद्धा तिची चुक समजली होती. आता ती एक सासुर वाशीण आहे. इतके दिवस आईला मदत करत होती. त्यामुळें घरात तिचंच राज्य चालत होत. त्यावेळीं आईला तिच्या मदतीची गरज होती. आता परिस्थिती बदलली आहे.
पण आता तिची भावजय आली आहे. आईची जबाबदारी सांभाळायला. या घराची गृहलक्ष्मी आहे. तर तिलाच चालवू दे या घराची जबाबदारी. ईश्वरी असेल तर तिला आईच्या पश्चात माहेर राहील.
" आई मी ईश्वरीला मदत करते." अस म्हणत अमृता किचन मध्ये गेली.
त्या खोलीत सुषमा बाई आणि माधुरी बाई दोघीच होत्या.
" सुषमा वहिनी, खुप छान समजावलं आम्हाला. आम्ही करत असलेल्या चुका पासुन आम्हाला सावध केलं. त्या बद्दल तुमचे आभार कसे मानू तेच समजत नाही." माधुरी बाई सुषमा बाईंचे हात हातात घेऊन भिजलेल्या स्वरात म्हणाल्या.
" वहिनी आभार कसले मानता. हे तर आपले संस्कार आहेत जे आपल्याला एका पिढी कडून पुढच्या पिढी कडे सोपवायचे आहेत."
" हो. बरोबर बोलत आहात. आता सूनां ना त्याचं घर सांभाळायची जबाबदारी सोपवली पाहिजे. त्यांनाच ठरवू दे त्यांना त्याचं नात कस जपायच आहे. की ज्यामुळे नात्यात कटूता येणार नाही."
सुषमा बाईंनी माधुरी बाईंच्या हातावर हात ठेवलें. दोघींचे डोळे अश्रूंनी भिजलेले होते.
सुषमा बाईंनी माधुरी बाईंच्या हातावर हात ठेवलें. दोघींचे डोळे अश्रूंनी भिजलेले होते.
थोडया वेळाने कुंकूमार्चन आणि श्री सुक्त पठणाच्या कार्य क्रमाला सुरवात झाली. ईश्वरी तिच्या आवडीची साडी नेसून देवीला कुंकूमार्चन करत होती. या घराच्या सुख समृध्दी भरभराट आरोग्य शांती साठी या घरची गृह लक्ष्मी पूजा करत होती. देवीची प्रार्थना करत होती.
यावेळी अमृता ने ईश्वरीला हा कार्यक्रम कसा करायचा या विषयावर एकही सल्ला दिला नाही. किंवा तिने केलेल्या कोणत्याही गोष्टीला नाव ठेवल नाही.
ईश्वरी ने तिच्या पसंती ने आणलेल्या भेटवस्तू तिने भजनी मंडळाच्या बायकांना दिल्या. त्यावर माधुरी बाईंनी कोणतीही टीपणी केली नाही.
ईश्वरी ने तिच्या बेडरूम मधल बेडशीट बदललं नाही. आज ती खुश होती. कारण तिच्या मना प्रमाणे आजचा देवीच्या कुंकूमार्चन कार्यक्रम साजरा झाला होता. भजनी मंडळाच्या बायकांनी तिने दिलेल्या भेट वस्तूची स्तुती केली होती.
आज खऱ्या अर्थाने या घराला त्याची गृह लक्ष्मी लाभली आहे.
आज खऱ्या अर्थाने या घराला त्याची गृह लक्ष्मी लाभली आहे.
देव्हाऱ्यातील देवी कुंकूमार्चनाच्या कुंकवा आड प्रसन्न हसत होती.
समाप्त.
©® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा