नातीगोती
"हॅलो , दादा हे कसे आहे? त्यांना नीट झोप लागली ना? काही पाहिजे तर नाही ना?"
"अगं, समिधा तू काळजी करू नकोस. तो शांतपणे झोपलाय आणि तुही विश्रांती घे आता. उद्या सकाळी ये."
असे म्हणत सचिनने फोन कट केला.
पण, ती अस्वस्थ झाली होती. कशीबशी रात्र काढली. आयुष्यात सात जन्माची सोबत करण्याचे वचन दिलेली समिधा मात्र अस्वस्थ झाली होती. कधी एकदाची सकाळ होते आणि सतिशला बघते असे होऊन गेले. सकाळी लवकर ती दवाखान्यात गेली. सतिशचा चेहरा फार थकल्यासारखा दिसत होता. त्याचा खोकला आणि ताप थोडा कमी झाला होता. तिने सतिश आणि सचिनला नाश्ता दिला. दहा वाजता सगळ्या टेस्टला सुरूवात झाली. दिवसभरात सर्व रिपोर्ट येणार होते.

"समिधा, जर मला काही झाले तर ,तू आपल्या मुलांचा नीट सांभाळ कर."
"अहो, असं नका बोलू. तुम्हांला काही होऊच देणार नाही मी आणि डॉक्टर आहे. घरचे सगळेजण आपल्या सोबत आहे. तुम्ही नका काळजी करू."
सचिनला काही तरी शंका आली होतीच.
रात्री सात वाजता डॉक्टरांनी सचिन आणि समिधाला बोलावले. समिधाला फार टेन्शन आले होते.
"डॉक्टर, काय आहे रिपोर्ट?"
सचिनला काही तरी शंका आली होतीच.
रात्री सात वाजता डॉक्टरांनी सचिन आणि समिधाला बोलावले. समिधाला फार टेन्शन आले होते.
"डॉक्टर, काय आहे रिपोर्ट?"
"मला सांगताना खरंच वाईट वाटत आहे. की सतिशला कॅन्सर झाला आहे. पण त्याची अगदी सुरवातच आहे त्यामुळे आपण योग्य ती ट्रीटमेंट करू या. "
" काय कॅन्सर आणि कशाचा कॅन्सर?"
समिधाच्या आवाजात कापरे भरले होते.
"त्यांच्या फुफ्फुसात एक छोटीशी गाठ आहे आणि लवकरच ती काढून टाकावी लागेल. अजुनही काही टेस्ट करूनच मग तारीख ठरवू या. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोलून घ्या.
"त्यांच्या फुफ्फुसात एक छोटीशी गाठ आहे आणि लवकरच ती काढून टाकावी लागेल. अजुनही काही टेस्ट करूनच मग तारीख ठरवू या. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोलून घ्या.
समिधाच्या डोळ्यात आलेले अश्रू अनावर झाले होते.
"डॉक्टर खर्च किती?"
"समिधा काय करतेस? तू पैशाची काळजी करू नकोस आणि असं रडून कसं जमेल ? तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना! चल बाहेर जाऊ या आधी. मग बोलू."
तेवढ्यात घरचे सगळेजण आले.
समिधा आणि सचिन बाहेर आले. ती अचानक खाली वाकली आणि सचिनच्या पाया पडली.
समिधा आणि सचिन बाहेर आले. ती अचानक खाली वाकली आणि सचिनच्या पाया पडली.
"दादा, तुम्ही आहात म्हणून यांची ट्रीटमेंट नीट होणार आहे. नाही तर मी काय केले असते. मला माहिती नाही. मी आजपर्यंत सगळ्यांशी जे लागले ते विसरून तुम्ही मला मदत करीत आहात. मी तुमचे आभार...."
"समिधा अगं काय करते? पाया का पडतेस? ऊठ बघू. कल्याणी सांभाळ तिला. हे बघ आपण काही वेगळे आहोत का? अगं, तो जसा तुझा नवरा आहे. तसाच माझा भाऊ सुध्दा आहे. नात फक्त पैशांच्या जोरावर टिकवायचे नसते. आपुलकी आणि जिव्हाळा
जिथे असतो ना. तिथे आभार प्रदर्शनाची गरज नसते."
जिथे असतो ना. तिथे आभार प्रदर्शनाची गरज नसते."
"तू काहीच काळजी करू नकोस समिधा. सगळं काही नीट होईल. आम्ही सगळे असतांना तू स्वतः ला एकटी का समजते ? अगं, नाती गोती उगाचच कोणी नावाला नाही लावत." सासुबाई बोलत पुढे आल्या. त्यांनी समिधाला जवळ घेतले.
आई, असे म्हणत समिधा त्यांच्या गळ्यात पडून अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
आई, असे म्हणत समिधा त्यांच्या गळ्यात पडून अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
सतिश आणि समिधा मनातून दुःखी झाले होते. पण, त्यांच्यासाठी कुटुंबाचा आधार मोठा दिलासा देऊन गेला.
लवकरच सतिशचे ऑपरेशन केले गेले. हळूहळू सतिशच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसून आली. यामुळे सतिश आणि समिधा यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानलेच. नात्यांचा गंध पुन्हा एकदा दरवळत होता.
लवकरच सतिशचे ऑपरेशन केले गेले. हळूहळू सतिशच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसून आली. यामुळे सतिश आणि समिधा यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानलेच. नात्यांचा गंध पुन्हा एकदा दरवळत होता.
©® अश्विनी मिश्रीकोटकर