"नाही ग,बोल ना! काही काम होत का?" जान्हवी
"ताई कुठे आहेत? म्हणजे तुमच्या बाजूला नाहीत ना? जरा बोलायचं होत." जान्हवी एक नजर तिच्या शेजारी उभ्या असलेल्या नंदेवर टाकते आणि स्पिकरवर असलेला फोन नॉर्मल वर करण्यासाठी हात धुवायला सिंककडे वळते. एवढ्यात नणंद तिला इशारा करूनच सांगते फोन स्पीकर वर राहूदे काढू नको. नाईलाजाने जान्हवी फोन स्पीकर वर ठेऊनच पुढे बोलू लागते.
"बाहेर आहेत त्या बोल ना, काय झालं? काही काम होत का त्यांच्याकडे?" जान्हवी
"अहो वहिनी..ताई अश्या का ओ? म्हणजे त्या चार दिवस इकडे होत्या. चार दिवसांत एकदाही कुठल्याच कामाला हात नाही लावला वर काम आवरलेली असली की दहा वेळा चमचा काढ टाक घासायला,प्लेट काढ टाक घासायला. वहिनी खर सांगू का..मला हे अजिबात आवडल नाही हा.. माझ्या पण भावाच लग्न झालं आहे पण त्याच्या बायकोला आम्ही एवढा त्रास नाही देत. घरातील काम करायची नसतील तरी निदान स्वतःची काम तरी आम्ही स्वतः करतो. माझी मोठी ताई तिच्या मुलांचं आणि नवऱ्याच सगळ स्वतः बघते. ताई तर स्वतःच पण आवरत नाहीत आणि मुलांचं पण. माहेरी आहोत म्हणजे अस कसही वागायचं का? घरच्या सुनेला एवढं कामाला लाऊन काय बर आनंद मिळतो. त्यांच्या घरी गेले होते तेंव्हा कस त्यांनी सगळ्या गोष्टी बरोबर जागच्या जागी ठेवल्या मग इकडे माहेरी आल्यावर का तस वागत नाहीत. माहेरची माणस नोकर आहेत का? आईना पण ताईंच हे वागणं पटत नाही. मी बोलले त्यांना तुम्ही बोलायचं तर बोलतात मोठ्याने आणि त्याच्या बायकोने लाडावून ठेवलं आहे तिला. माहेरी येते तेंव्हा अक्कल गहाण ठेऊन येते, म्हणून तुम्हाला फोन केला मी. वहिनी हे योग्य नाही हा. मला नाही पटत हे. यावेळी ठीक आहे पुढच्या वेळी मी सरळ सांगणार आहे मला जमणार नाही सगळ करायला. जरा म्हणून इकडची वस्तू तिकडे उचलून ठेवणार नाही." प्रमिला रागातच बोलत होती.
तिचा एकेक शब्द गीताच्या जिव्हारी लागत होता आणि तिच्या बद्दल तिच्या लहान भावाच्या बायकोच्या मनात किती राग आहे हे गीताच्या डोळ्यात दिसत होत. प्रमिलाचे शब्द तिच्या डोळ्यात आसव उभी करत होती.
क्रमशः..
@श्रावणी लोखंडे..
@श्रावणी लोखंडे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा