Login

नात्यांची पारख भाग २(नातीगोती)

तोंडावर गोड गोड वागणारी माणस नेहमी खरीच असतात अस नाही.


"जाऊदे अग.. त्या मोठ्या आहेत. तस ही त्या कुठे रोज रोज येणार आहेत. नको त्रास करून घेऊ ठीक आहे आराम कर आता जरा."जान्हवी बाजू सावरत बोलत होती तोवर तिची नणंद बाहेर हॉल मधे निघून गेली.


"वहिनी..अहो पण हे बरोबर नाही."प्रमिला

"आपण या विषयावर नंतर बोलू, ठीक आहे! मला पण जरा काम आवरायची आहेत ती आवरून घेते. चल बाय." जान्हवी
जान्हवी बाहेर येते तर गीता गॅलरीत उभी राहून रडत असते.

"तुला पण हेच वाटत का ग? म्हणजे एवढी वर्ष तू पण माझ्याशी खोटच वागत आलीस का?" गीता

"या..बसा तुम्ही..आपण शांतपणे बोलू यावर आणि ते रडण थांबवा आधी. हे घ्या, पाणी घ्या जरा..बर वाटेल."जान्हवी

गीता पाण्याचा घोट घेते आणि ग्लास टेबल वर ठेवते. ते बघून जान्हवी हसते.

"काय झालं?"गीता

"काही नाही!"जान्हवी

"लग्न करून येऊन फक्त दोनच महिने झाले हिला आणि हिला आताच त्रास व्हायला लागला? बर एवढ्या वर्षात आई आणि साहिल कधीच काही बोलले नाहीत पण हिच्या हा मध्ये हा मात्र लगेच मिळवली. काय खर काय खोट काहीच समजेना. मान्य आहे मला की मी इकडे आले की काही काम करत नाही. माहेर हे हक्काचं ठिकाण आहे जिथे थोडा आराम मिळतो पण तिथेही हे अस!" दुखी स्वरात गीता बोलते.

"हो, आणि याला जबाबदार पण तुम्हीच आहात. जी गोष्ट तुला आता समजली आहे लवकरच ती आईला पण समजेल." दारातून आत येत जयेश बोलला.

"म्हणजे?" गीता

"ज्या गोष्टी आम्ही कधी केल्याचं नाहीत ते आरोप आमच्यावर लावण्यात आले. स्वतः पुरत करायच, फक्त दोघांचं करायचं या सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या आणि बाहेर बदनामी कोणाची हीची करायची. तोंडाला येईल ते सांगायचं आणि बोलायचं
...का? तर आम्ही काही बोलत नाही. या ज्या गोष्टी तू आता ऐकल्यास ना त्या आम्हाला आधी पासून माहीत होत्या. खरतर आम्ही कधी बदललोच नाही. सगळ करून सुद्धा आम्ही काहीच करत नाही. या ज्या गोष्टी बाहेर सांगितल्या गेल्या आणि बाहेरच्या लोकांनी जेंव्हा आम्हाला त्या विचारल्या तेंव्हा आम्हाला किती त्रास झाला असेल हे तुला आता चांगल समजल असेल. अरे माझ्या सोड रे, जान्हवी कशी आहे हे ही तू विसरलीस. आईने तुला लाख चुकीच्या गोष्टी सांगितल्या असतील पण त्या किती खऱ्या आहेत याची चौकशी केलीस? नाही ना! अग तेही सोड. जर का ही बदलली असती तर तुझी..तुझ्या मुलांची एवढी आवभगत तिने केली असती? तुझी बुद्धीचं भ्रष्ट झाली म्हणून या सगळ्याचा विचार नाही करू शकलीस. आम्ही काय करतो काय नाही करत याचे पुरावे आम्ही कोणालाही दिले नाही आणि देणारही नाही. जश्या खऱ्या गोष्टी तुला समजल्या.. तश्याच लवकर आईलाही समजतील आणि त्या माणसाना सुद्धा ज्यांच्या मनात आमच्या विषयी खोट्या गोष्टी भरल्या आहेत."एवढी वर्ष काही न बोलणारा जयेश आज एकदम एवढं सगळ बोलून गेला.

क्रमशः..
@श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all