"अहो..शांत व्हा तुम्ही. आधीच त्या दुखावल्या आहेत."जान्हवी त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती.
"मी शांतच आहे अग..पण काही गोष्टींची जाणीव हिला व्हायला हवी होती. चल मी मान्य केलं की तुला त्याच्याकडे चार दिवस रहायचं होत पण तू तिकडे चार दिवस राहणार आहेस हे सांगायला जेंव्हा मला फोन केलास तेंव्हा काय बोललीस आठवत? नसेल आठवत तर मी सांगतो. \" जयेश.. यावर्षी मी काही तुझ्याकडे येत नाही हो.. महेश कडे जाते. तुझ्या संसारात आमची अडचण नको उगाच..\" जरा सांगशील का ग..आम्ही कधी तुला आमची अडचण बोललो आहे ते? अग हातात पैसे नसले ना तरी दागिने ठेवले आहेत आम्ही; का? तर तुला काही कमी पडू नये. तुला हवं ते चार दिवसात सगळ मिळावं. भाऊजी तर सगळ करतात तुझ्यासाठी पण बापानंतर तुला कशाचीच कमी पडू नये म्हणून लहान असून तुझा बाप व्हायला बघत होतो पण तू आणि आई दोघांनी आम्हाला फक्त लहान नाही ग परक केलत आणि त्याचा दोष पण आम्हालाच दिलात. दोन महिन्यांपूर्वी आलेली नवीन भावजय तुझ्याबद्दल बोलली तर तुला वाईट वाटल आणि आम्ही सगळ करून पण आम्हाला तुम्ही वाईट ठरवलंत तेंव्हा आम्हाला काय वाटल असेल याचा विचार केलात का कोणी? माझा बाप असता ना तर आज कोणाची हिम्मत नसती झाली आमच्या बद्दल अश्या चुकीच्या गोष्टी बाहेर पसरवायची. " जयेश
"माफ कर मला जयू..मी चुकले.. घरातला कर्ता पुरुष तू आहेस माहीत असूनही मी गेली चार वर्ष चुकीची वागले. मला जे समोर दाखवलं गेलं मी तेच पाहिलं पण एवढी वर्ष जे सुख अनुभवलं ते पार विसरले. जान्हवी.. माफ कर मला.. मी तुझ्याशी पण चुकीची वागले. प्रमिला फक्त गोड बोलायचं..वागायचं..नाटक करत होती हे मला समजलच नाही. चार दिवसात मी नकोशी झाले त्यांना. एवढी वर्ष आई पण कधी काही बोलली नाही पण आता तर तिने माझी अक्कल काढावी. आम्ही सगळेच तुला आणि जयू ला गृहीत धरत आलो पण इथून पुढे तस नाही होणार. दोन्ही मुलं तिकडे रहायला नकोच म्हणत होती पण माझ्या हट्टापायी ती तिकडे राहिलीत. जेवढी खुश ती इकडे आल्यापासून आहेत त्यापेक्षा शांत तिकडे होतीत. मनु तेवढा खेळला पण समीर मात्र शांत होता. आता इकडे आल्यापासून नुसत आपल मामी मामी चालू आहे." गीता
"त्यासाठी मनात आपलेपणा असावा लागतो आणि तो ही खरा.. मी तुला आधीपासून सांगत होतो. जयेश आणि जान्हवी बद्दल नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. ती दोघेही चुकीचं वागणारी नाहीत पण तू ना कधी ऐकली नाही कधी समजली. तुझ माहेर फक्त जयेश आणि जान्हवीच जपू शकतात बाकी कोणी नाही हे चांगल लक्षात ठेव." गोविंद राव(गीताचा नवरा) गीताची पाठ थोपटत बोलले.
"हो, चुकलच माझं इथून पुढे अशी चूक नाही होणार. नात्यांची पारख करायला परत कधीच नाही चुकणार..वचन देते तुम्हाला.."गीता भावाला मिठी मारत बोलते आणि जान्हवीला पण कवेत घेते.
समाप्त....
@श्रावणी लोखंडे...
@श्रावणी लोखंडे...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा