आज आशाताईंची सकाळपासूनच गडबड सुरू होती. खरतर आज त्या खूप आनंदात होत्या. कारण त्यांची मुलगी साक्षी पण ह्यावर्षी दिवाळीला घरी येणार होती. त्यांचा मुलगा केदार आणि सून केतकी नेहमीच दिवाळीला येत असत पण साक्षीला मात्र दरवर्षी यायला जमत नसे.खरतर अजून दिवाळीला ५ ६ दिवस बाकी होते पण आज केतकी आणि केदार येणार होते. त्यांचा केतकीवर विशेष जीव होता. केदारच्या लग्नाच्या वेळी तशा त्यांच्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या. पण सुनेने केदारला जपलं पाहिजे. घर सांभाळलं पाहिजे अस त्यांना वाटायचं आणि केतकीपण तशीच होती. केदारची नोकरी गावापासून जवळच्या शहरात असल्यामुळे सुरुवातीला सगळे एकत्र राहायचे. पण २ वर्षांनी त्याची बदली झाली आणि केदार आणि केतकी दुसऱ्या शहरात राहायला गेले. अगदी सुरुवातीला केतकीला आशाताईंबरोबर जमवून घेणं जड गेल. पण तिच्या लाघवी स्वभावामुळे तिने लवकरच सगळ्यांना आपलस करून घेतले. त्या दोघींच्या नात्याची वीण इतकी घट्ट होती की गावात सगळ्यांना ह्या सासू सुनेचा हेवा वाटायचा. त्या दोघींचा एकमेकींवर इतका जीव होता की जेंव्हा दुसऱ्या शहराच्या जागी केदार आणि केतकी रहायला गेले तेंव्हा मुलीची पाठवणी करताना जितके मुलीच्या आईला दुःख होते तेवढेच आशाताईंना वाटले होत. पण प्रत्येक सणाला आशाताईंच्या ओढीने आणि त्यांच्यावरच्या प्रेमाने केतकी आधीच त्यांच्या मदतीला यायची.
आशाताईंना खरी काळजी होती ती त्यांच्या मुलीची साक्षीची. ती घरात लहान असल्यामुळे तिचे खूप लाड झाले होते. आशाताईंचे यजमान म्हणजेच अण्णा होते तिथपर्यंत त्यांनी तिला घरातली कोणतीही कामे करायला दिली नाहीत. तिला थोड ओरडलेलं सुद्धा अण्णांना चालत नसे. अण्णा गेल्यानंतर आशाताईंनी साक्षीला जरा शिस्त लावायचा प्रयत्न केला. परंतु तिला ते काही आवडायचे नाही. लहानापासून ती लाडात वाढल्यामुळे तशी तिला कामाची काही सवय नव्हती. साक्षीला कामाची काही आवड नसल्याने साक्षी नेहमी म्हणायची, ‘ मी अशा घरात लग्न करणार जिथे मुलगा एकटाच असेल. आणि घरात कामाला माणसे असतील.’ थोडक्यात तिला अगदी राणीसारखे राहायचं होते. मुळात तिला लग्नानंतर सासू सासऱ्यांबरोबर राहायचे नव्हते. तिला स्वतंत्र आयुष्य जगायला आवडत असे. तिला कोणीही प्रतिप्रश्न केलेला आवडत नसे. खरतर साक्षीचे असे विचार आशाताईंना आवडत नसत. पण त्यांना वाटलं मुलगी लहान आहे हळू हळू जशी ती मोठी होईल तसे तिचे विचार बदलतील.
साक्षी कॉलेज मध्ये जायला लागली आणि तिच्या मित्र मैत्रिणींचा एक चांगला ग्रुप झाला. कॉलेजनंतर साक्षी आणि तिच्याच ग्रुपमधील समीरला एकाच कंपनीमध्ये नोकरी लागली. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री अजून वाढली. दोघे एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हे दोघांनाही कळले नाही. समीर एकुलता एक मुलगा होता. काही महिन्यांनी एकमेकांनी एकमेकांना नात्याची कबुली दिली. आणि साक्षीने घरी ह्याबद्दल सांगितले. आशाताईंना समीर पसंत होता. समीर स्वभावाने खरच खूप छान आणि मनमिळावू होता. साक्षीच्या अपेक्षेत बसणारे आणि अनुरूप असे हे स्थळ होते. त्यामुळे आशाताईंनी सुद्धा ह्या लग्नाला परवानगी दिली. काही महिन्यांनी छानसा मुहूर्त बघून घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. आता आशाताईंना वाटले की साक्षीच्या लग्नानंतर असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे तिच्यात नक्कीच चांगला फरक पडेल. समीरचे आई बाबा गावाला राहत असत परंतु काही दिवसांनी समीर म्हणाला की आता आई बाबांनी खूप कष्ट केले आहेत तर आता मला वाटते की आपण त्यांना आराम द्यावा आणि त्यासाठी त्यांना इकडे बोलावून घ्यावे. सुरुवातीला साक्षीने त्याला पाठिंबा दिला. आशाताईंना ही ऐकून आनंद वाटला. त्यांना वाटले समीरच्या सहवासाने आणि प्रेमाने आपली मुलगी सुधारत आहे. काही दिवसांनी समीर आई बाबांना गावावरून घेऊन आला. सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. परंतु नंतर अगदी छोट्या छोट्या कारणावरून सासू सुनेचे खटके उडू लागले. समीरच्या आई ह्या गावावरून आलेल्या असल्यामुळे त्यांचे विचार हे शहरात वाढलेल्या साक्षीला पटत नसत व ती आपण कसे सुधारलेले आहोत हे दाखविण्याच्या नादात घरात भांडणे होऊ लागली. आणि सासुबाईसुद्धा आपलं मुद्दा पटवण्यासाठी सतत तिच्या मागे लागत असत.
एक दिवस साक्षी ऑफिसमधून लवकर घरी आली. आल्यावर जरा शांत चहा पित होती. तिच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट आल्यामुळे तीच काम खूप वाढलं होत. समीरसुद्धा जरा काम असल्यामुळे उशिरा येणार होता. त्यामुळे तिला सुद्धा जरा कंटाळा आला होता. तेवढ्यात तिच्या सासूबाई देवळात कीर्तन ऐकायला गेल्या होत्या त्या आल्या. त्या आल्यावर तिला म्हणाल्या, ‘ साक्षी मी आज आपल्या सोसायटीमधील मैत्रिणींबरोबर कीर्तनाला गेले होते. तर मी त्या सगळ्यांना पुढच्या आठवड्यात आपल्या घरी बोलावल आहे. तर त्यांच्यासाठी जरा काहीतरी छान खायला कर हो.’ हे ऐकून आधीच दमून आलेली साक्षी अजून वैतागली आणि त्यांना म्हणाली, ‘ तुम्ही त्यांना परस्पर का बोलावल? मला ऑफिसमध्ये खूप काम आहे पुढच्या आठवड्यात. मी काही करू शकत नाही त्यांच्यासाठी. तर त्यांना सांगा येऊ नका म्हणून. आणि उगीच घरात कोणालाही बोलावू नका मला आवडत नाही उगीच त्या बायका येऊन इकडच तिकडच्या गोष्टी सांगत बसणार.’ हे ऐकून सासूबाईंना राग आला आणि त्या तिला म्हणाल्या, ‘ त्या माझ्या मैत्रिणी आहेत मी त्यांना बोलावणार आणि त्या येणार पण आहेत. आणि तुला जमत नसेल तर तसं सांग. मला जमेल तसं मी करेन त्यांच्यासाठी.’ आणि खरच सासूबाईंनी त्या मैत्रिणींसाठी फराळाच्या अनेक गोष्टी केल्या. जेव्हा त्यांच्या मैत्रिणी आल्या त्यावेळी त्या सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. पण साक्षीला मात्र राग आला होता कारण तिने तर त्यांना मदत केली नव्हती पण तरीपण सासूबाईंनी त्यांच्या मैत्रिणींना बोलावल आणि सगळ केलं होतं. हे सगळ तिने समीरला सांगितलं तर तो म्हणाला, ‘जाऊदे केलं ना तिने तू उगीच आता त्रागा करून घेऊ नको. आणि तुझं म्हणणं जरा वेगळ्या चांगल्या भाषेत सांगायचा प्रयत्न कर कदाचित तुमचं नातं सुधारेल. आणि तिलापण तुझा मुद्दा पटेल.’ हे ऐकून तिला अजून वाईट वाटलं. कारण तिला असं वाटलं की आपल्या नवऱ्याला सुद्धा आपणच चुकीचे वाटतो. त्याच दिवशी समीरने आशाताईंना फोन करून हे सगळ सांगितलं आणि साक्षीला जरा समजावायला सांगितले त्याला अस वाटलं की कदाचित साक्षीला आशाताईच समजावू शकतात. आशाताईंनी साक्षीला समजावले. परंतु साक्षीच्या वागण्यात बदल झाला नाही.
त्यामुळे आता ह्या दिवाळीच्या वेळी त्यांनी आग्रहाने मुलीला बोलावून घेतले की सणाच्या वेळी सगळे एकत्रपण येतील आणि ह्यावर काही तोडगा सुद्धा काढता येईल. मुलगा केदार आल्यावर त्यांनी हे सगळे त्याच्या कानावर घातले. केदार आणि केतकीने आशाताईंना आधार दिला व काळजी न करण्यास सांगितले. खूप दिवसांनी सासू सून भेटत असल्यामुळे गप्पा आणि घरातली कामे पटापट होत होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी साक्षी घरी आली. तिने आल्या आल्या मस्त चहा आणि पोह्याचे वहिनीला फर्मान सोडले. वाहिनी सुद्धा आनंदाने कामाला लागली. घरात खूप छान वातावरण होते. दिवाळी खूप उत्साहात आणि आनंदात साजरी झाली. त्यानंतर केदार आणि केतकी साक्षीला म्हणाले आपण सगळे अजून 4 दिवस राहू एकत्र तेवढीच मज्जा येईल. साक्षीनेसुद्धा आनंदाने ते मान्य केले.
दिवाळीनंतर आपल्याच घरात आपली आई आणि बहिणीच्या सुंदर नात्याचा साक्षीला जाणीव झाली आणि एक दिवस ती तिच्या दादाला म्हणाली ‘ दादा, आई आणि वाहिनी किती आनंदाने एकत्र राहतात ह्यांच्यात कधीच रुसवे फुगवे होत नाहीत. आई फोनवर कधीसुद्धा मला वहिनीच्या तक्रारी सांगत नाही. वाहिनीसुद्धा आईला खूप मानते.’ हे ऐकून दादा म्हणाला ‘ हो त्यांच्यात हे नातं आहे ते त्यांनीच तयार केलं आहे. सुरुवातीला त्यांच्यात सुद्धा रुसवे फुगवे होते परंतु दोघीनीही एकमेकींना समजून घेतले. सुरुवातीला नवीन घर नवीन माणसे ही समजून घ्यायला वेळ हा लागतोच आणि तो वेळ प्रत्येक माणसाने एकमेकांना दिलाच पाहिजे. आता मला सांग जर तुझ्या वहिनीने तुमची आई गावातली आहे मी त्याचं काही ऐकणार नाही अस म्हटलं असत तर किंवा आईनेसुद्धा आपलं तेच खरं करायची सुरुवात केली असती तर हे नातं निर्माण झालं असत का?. आता काही गोष्टी ज्या आई सांगते त्या गावातल्या तिच्या अनुभवावरून सांगते त्या चुकीच्या असतील तर त्या भांडण करून तिला सांगण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले तर तिला ते लवकर पटेल असा विचार तुझ्या वहिनीने केला आणि आईने पण आता हळू हळू आपण नवीन गोष्टींना मान्यता दिली पाहिजे हे समजून घेतले. म्हणून तर त्यांच्या नात्याची वीण घट्ट झाली. मला आई म्हणाली की तुझीसुद्धा ह्या गोष्टींवरून चिडचिड होते. पण एकदा प्रयत्न तर करून बघ शांतपणे समजावून सांगायचा. तुझ्या सासूबाई सुद्धा घेतील समजून.’ दादाचे हे बोलणे ऐकून ती विचार करू लागली की खरच आपण असा विचार कधीच केला नाही.
केदार आणि केतकीचा हा संवाद चालेला असतानाच आतून केतकी आणि आशाताईंचा हसण्याचा आवाज ऐकायला आला. केदार आणि साक्षी आत काय झाले ते पहायला गेले. तर केतकी साक्षीला म्हणाली, ‘आज आपल्याला खूप काम आहेत हा. मी जरा बाहेर जाऊन येते.’ ती गेल्यावर साक्षीने आशाताईंना काय झालं असा विचारल्यावर आशाताई म्हणाल्या, ‘ अगं आज तुम्ही सगळे एकत्र आलात आणि बऱ्याच दिवसात आपल्याकडे मीपण माझ्या मैत्रिणींना बोलावल नव्हत तर मी केतकीला म्हटलं आज माझ्या मैत्रिणींना बोलावते. तर तिला सुद्धा ते पटलं आणि म्हणाली मी सगळी तयारी करते त्यासाठी समान आणायला गेलीय ती. खरच खूप लाघवी मुलगी आहे मी अस अचानक ठरवलं पण तरीही काहीही बोलली नाही. उलट उत्साहाने कामाला लागली. तुला सांगते असा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार ठेवायला हवा नाही का?’ आशाताई कशाविषयी बोलतायत हे साक्षीला चांगलेच कळले होते. नंतर तिने केतकीला त्या सगळ्या कार्यक्रमात मदत केली. आशाताईंच्या सगळ्या मैत्रिणींनी केतकी आणि साक्षीचसुद्धा खूप कौतुक केलं. हे बघून साक्षीने ठरवले की आता घरी जाऊन आपण असाच वागायचा प्रयत्न करूया. ४ दिवसांनी साक्षी आपल्या सासरी गेली. साक्षीने घरी आल्यावर सासूबाईंची माफी मागितली आणि समीरला पण इथून पुढे नीट बोलण्याच वचन दिले. साक्षीने ठरवले होते की सगळ्या गोष्टींचा सकारात्मक विचार करायचा. हळू हळू तिने शांतपणे बोलायला सुरुवात केली. यामुळे तिच्या सासूबाई आणि तिच्यातील नाते सुधारू लागले.
एके दिवशी साक्षीचा आशाताईंना फोन आला की आता तिचे सासूबाईंशी असलेले नाते सुधारत आहे. आपले केतकीबरोबरचे नाते बघून आपली मुलगी शिकली ह्याचा आनंद जास्त होता.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा