Login

नात्यात अहंकार नको...भाग 1

Ahankar aala ki Natyat durava Yeto
नात्यात अहंकार नको...भाग 1

"मी विचार करत होतो की अजंलीच्या ऑफिस मध्ये जॉईन केलं हे ऐकल्यानंतर तु काय रिऍक्ट करशील."

चहाचा कप हातातून ठेवुन अनुजने अंगडाई घेतली, जसा तो स्वतःला तनावरहित करण्याचा प्रयत्न करत होता.


"का? तु मला एवढंच ओळखलंयस?"
कप, ग्लास, केटली ट्रे मध्ये ठेवत आरती अनुजकडे डोळे फिरवत मिश्किलपणे हसली.


"अस नाही ग आरती, तुला ओळखलं नसतं तर तुला बोललो नसतो." थोडं थांबून अनुज उत्तरला.


"असंच मनात विचार आला म्हणुन बोललो कारणं तुला तर माहीत आहे कॉलेज मध्ये असताना अजंली आणि माझे संबध कसें होते. तसंही लग्ना आधी मी तुला सगळं सांगितलं होतं कारण लग्न हे नातं विश्वासावर टिकतं. आपल्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको. आपलं वैवाहिक जीवन छान व्हावं, म्हणुन हा सगळा खटाटोप.
पण हेही तितकंच खरं आहे की अजंली माझा भुतकाळ होती आणि तु माझा वर्तमान काळ आहेस. तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही आरती."

अनुजने आरतीला जवळ घेतलं, तिला मिठी मारली आणि भावुक होऊन बोलला.


"आज पर्यंत मी तुझ्यावर अविश्वास दाखवलाय ?" मोठे मोठे डोळे करत आरतीने अनुजकडे बघितले जणू तिला काही जाणुन घ्यायच होत.


"आजचं हा "विश्वास प्रदर्शन "कशासाठी? आणि आजचं हे "आश्वासन" कशाला?" आरतीने त्याला मिश्कीलपणे विचारलं.

तसा तो ही हसला.
0

🎭 Series Post

View all