नात्यात अंतर नको - भाग २
गेल्या भागात आपण पाहिले की सरलाला लेकीसाठी वाईट वाटत होतं. केतनला देखील पटत नव्हते. आता पाहू पुढे.
कुंदा आणि नरेश दोघांचं लव्ह मॅरेज होतं.
आधी लग्नाला नरेशच्या घरातले तयार नव्हते. नंतर कसबसे तयार झाले. लग्न झालं आणि कुंदा सासरी नांदायला गेली; पण तिचं माहेरी येणं खुपच कमी झालं होतं.
आधी लग्नाला नरेशच्या घरातले तयार नव्हते. नंतर कसबसे तयार झाले. लग्न झालं आणि कुंदा सासरी नांदायला गेली; पण तिचं माहेरी येणं खुपच कमी झालं होतं.
इथे कुंदाच्या आईला सरलाला खूप काळजी वाटत होती.
एक दिवस सरलाच्या बहिणीचा फोन आला.
"सरला, केतनच्या लग्नाचं कधी बघणार आहेस?" माधवी मावशीने फोन केला.
"हो गं यंदा बघायचं आहे."
"त्याला एकदा विचारून घे कुणी मुलगी आवडते का? नाहीतर आपण मुलगी शोधत बसणार आणि हा ऐनवेळी सांगणार."
"मला माहित आहे गं माझा केतन तसा नाही. तसं असतं तर त्याने सांगितले असते."
"अगं एकदा विचारून बघ. म्हणजे आपल्याला रस्ता मोकळा. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. शिकलेली आहे, गोड स्वभाव आहे. कोमल नाव आहे, अगदी नावाप्रमाणे आहे. केतनचं तसं काही नसेल तर विचारून बघ."
"बरं एकदा विचारते."
रात्री केतन कामावरून घरी आला.
जेवत असताना सरलाने विषय काढला.
"केतन, तुझ्या लग्नाचं बघूया. आता ताईच्या लग्नाला वर्षे झाले. यंदा तू देखील २९ चा होशील. चांगली मुलगी बघून लग्न उरकून टाकूया."
लग्नाचा विषय निघताच तो स्मितहास्य करू लागला.
"आई, इतकी काय घाई आहे. थांब थोडे दिवस."
"केतन, तुला कुणी आवडतं का?"
"काय हे आई, तू मला ओळखते आणि तरी हा प्रश्न. तसं असतं तर मी तुला सांगितलं असतं."
"बरं, मावशीच्या मैत्रिणीची मुलगी आहे. शिकलेली आहे. सुंदर आहे. कोमल नाव आहे."
असं म्हणत तिने कोमलचा फोटो त्याला दाखवला.
'खरंच किती गोड दिसतेय.' मनातल्या मनात म्हणाला.
त्याच्या चेहऱ्यारूनच दिसलं की, त्याला ती आवडली.
"उद्या तुला सुट्टी आहे. आपण जाऊया बघायला. तसं मी मावशीला सांगते."
"तुला जे योग्य वाटेल ते कर आई."
केतनने ग्रीन सिग्नल दिला.
कांदेपोहे झाले. केतन देखील कोमलला आवडला.
कोमलचे वडील देखील ती लहान असतांना देवाघरी गेले. ती देखील लवकरच समजदार झाली. हुशार, गुणी एकुलती एक मुलगी.
दोघेही एकेमकांना भेटू लागले. मने जुळली आणि लग्न झालं.
कोमल आयुष्यात आली आणि केतन जणू पूर्ण झाला. दोघेही एकमेकांसाठीच बनले होते.
मावशी म्हणाली होती अगदी तशीच होती, गुणी मुलगी.
सरला देखील तिचे लाड करत होती; पण नंतर तिला काही गोष्टी खटकू लागल्या.
ती गोष्ट नात्यातील अंतर वाढवण्यास पुरेशी होती.
का वाढणार होतं अंतर?
पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा