नात्यात अंतर नको - भाग ३
पूर्वार्ध
केतन आणि कोमलचं लग्न झालं. सुरवातीला सगळं चांगलं चाललं होतं; पण नंतर सरलाला कोमलची गोष्ट खटकू लागली. आता पाहू पुढे.
केतन आणि कोमलचं लग्न झालं. सुरवातीला सगळं चांगलं चाललं होतं; पण नंतर सरलाला कोमलची गोष्ट खटकू लागली. आता पाहू पुढे.
कोमलचं माहेरी जाणं तिला पटत नव्हतं.
कोमलच्या आईची तब्येत बरी नव्हती, ती ऑफिसवरून तिथे गेली.
"केतन, कोमलचं काय चालू आहे?"
"काय झालं आई?"
"सारखं माहेरी जाते."
"आई, सासूबाईची तब्येत बरी नाही म्हणून गेली आहे."
तो त्याच्या आईला चांगला ओळखून होता. कोणत्या गोष्टीचे वाईट वाटतं,राग येतो हे त्याला चांगलं माहीत होतं.
अचानक कुंदा आणि नरेश आले.
असं अचानक आल्याने सरला भलतीच खुश झाली.
"कशी आहेस कुंदा." सरला.
"आई, मी बरी आहे गं. तू कशी आहेस?"
"मी ठीक आहे."
तिने केतनला मिठी मारली.
"कसा आहेस केतन? " त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
"ताई मी फर्स्ट क्लास."
तिने इथे तिथे नजर फिरवली.
"कोमल कुठे आहे?"
"ती माहेरी गेली आहे."
"बरं."
"तिला माहेर सुटतं का?"सरला दबक्या आवाजात बोलली; पण केतनने ते ऐकले. त्याला फार राग आला.
"आई, तू आजी होणार आहेस. केतन तू मामा." कुंदाने गोड बातमी दिली.
हे ऐकून सरला आणि केतन खूप खुश झाले.
किती दिवसानी घरात आनंदाची बातमी आली होती.
"कुंदा, आता काळजी घ्यायची हं. जास्त दगदग करू नको. काळजी घे स्वतःची. अश्या वेळेस आराम करायचा असतो. तब्येतीला जपायचे असते."
सरला तिला सांगायला लागली.
बघता बघता महिने सरले आणि कुंदा बाळांतपणासाठी माहेरी आली.
कोमल देखील खुश झाली. घरात लहान बाळ येणार होतं. ती कुंदाचे डोहाळे पुरवू लागली. तिला जे खायची ईच्छा होत ते ती बनवून देत. कोमल जे देखील करत होती त्याने कुंदा आणि तिचे नाते बहरले.
कुंदा आल्यापासून ती माहेरी जायची; पण राहायची नाही.
"कोमल, किती दिवस झाले आईकडे गेली नाही." केतन.
"एकदा कुंदा ताई सासरी गेल्या की जाईन. आईंना कामं होत नाहीत. मी गेले तर कसं होणार?"
"कोमल, खरंच नशीबवान आहे मी."
"मी नशीबवान आहे. तुमच्यासारखा समजूतदार नवरा भेटला."
केतन आणि कोमल दोघांचे नाते दिवसेंदिवस बहरत होते.
कुंदाने बाळाला जन्म दिला. मुलगी झाली होती.
घरात आनंदाचे वातावरण.
कोमल तर तिला खूप जीव लावत होती.
तिला लहान मुलं खूप आवडायची.
कसल्याच गोष्टीची कमी केली नाही.
सरला देखील लेकीमध्ये आणि नातीमध्ये रमली.
बघता बघता सवा महिना झाला आणि कुंदाची निघायची वेळ झाली.
सरलाला तर खूपच रडायला येत होतं. तिला माहीत होतं तिची सासू आता काही लवकर पाठवणार नाही.
कुंदा गेली.
इथे केतनला सरलाचं कोमलसोबत वागणं बघून त्रास होत होता.
क्रमशः
अश्विनी ओगले.
काय होईल पुढे? पुढचा भाग जरूर वाचा.
अश्विनी ओगले.
काय होईल पुढे? पुढचा भाग जरूर वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा