"टिंग टाँगssss टींग टाँगssss" डोर बेलच्या आवाजाने आसावरीची तंद्री भंग पावली.
"आसावरी दार उघड आम्ही आलो आहोत."
प्रशांतने दरवाजाच्या बाहेरूनच तिला साद घातली. प्रशांत आईबाबांना घेऊन घरी आला होता. आसावरी आपल्या विचारातून बाहेर आली आणि तिने मशीनवत दार उघडले. आगतस्वागत होऊन मंडळी जरा स्थिरावली. खरंतर लांबच्या प्रवासाने त्या दोघांची अंगे थांबून गेली होती जणू. इतक्यात मधुराने येऊन आजी-आजोबांना नमस्कार केला.
प्रशांतने दरवाजाच्या बाहेरूनच तिला साद घातली. प्रशांत आईबाबांना घेऊन घरी आला होता. आसावरी आपल्या विचारातून बाहेर आली आणि तिने मशीनवत दार उघडले. आगतस्वागत होऊन मंडळी जरा स्थिरावली. खरंतर लांबच्या प्रवासाने त्या दोघांची अंगे थांबून गेली होती जणू. इतक्यात मधुराने येऊन आजी-आजोबांना नमस्कार केला.
"ये बाळा इथे बस आमच्या जवळ."
आजीने प्रेमाने मधुराला जवळ घेतलं. मधुराचा दुखावलेला चेहरा आजी-आजोबांना बघवला जात नव्हता.
आजीने प्रेमाने मधुराला जवळ घेतलं. मधुराचा दुखावलेला चेहरा आजी-आजोबांना बघवला जात नव्हता.
"कशाला इतकी काळजी करतेस सगळं नीट होईल."
आजोबा प्रेमाने पाठ थोपटत मधुराला म्हणाले.
आजोबा प्रेमाने पाठ थोपटत मधुराला म्हणाले.
"कशाला उगीच तिची खोटी समजूत काढताय? कसं सगळं व्यवस्थित होणार आहे? 'नीट'ची परीक्षा तिला क्रॅक करता आली नाही. आता मेडिकलला जायचं म्हणजे काही खायचं काम नाही. त्यात आता शहरात किती महागाई झाली आहे तुम्हाला अंदाज नाही. आई, अहो गावापेक्षा इथे प्रत्येक गोष्टीला दुप्पट भाव द्यावा लागतो." मनातले कढ आसावरी त्यांना ऐकवत होती. जणू त्यांनी प्रशांत कडून पैसे घेतले म्हणूनच ही वेळ आली होती.
"अगं आसावरी आल्या आल्या तू हे काय घेऊन बसली आहेस? दुपारी जेवण झाली की आपण सगळे बसून निवांत बोलू." वातावरणातला ताण हलका करायच्या उद्देशाने प्रशांत म्हणाला.
काहीशा अनिच्छेनेचं आसावरी स्वयंपाक घराकडे पानं घ्यायला वळाली.
"थांब सुनबाई!" सासरेबुवांनी तिला थांबायला लावलं तशी तिने त्यांच्याकडे चमकून पाहिलं.
"जेवण स्वयंपाक सगळ राहू दे आधी तुम्ही दोघे इथे माझ्यासमोर बसा." असं म्हणत आजोबा उठले त्यांनी त्यांच्या बागेतून एक पाऊच काढला. परत सर्वांमध्ये येऊन बसत त्यांनी तो पाऊस उघडला त्यातून एक लिफाफा काढला आणि प्रशांतच्या हातावर ठेवला. सगळ्यांची नजर आता प्रशांतच्या हातावर असलेल्या लिफाफ्यावर होती काय असेल यात त्याची उत्सुकता प्रत्येकाला होती.
प्रशांतने अलगद हाताने तो लिफाफा उघडला. आतला पांढराशुभ्र कागद बाहेर काढला. त्यावर नजर पडताचं तो एकदम चमकला.
"बाबा हा कसला चेक?"
प्रशांतच्या डोळ्यात आश्चर्य होतं. आता सगळेजण त्याचेकडे पाहू लागले. प्रशांतच्या हातात वीस लाखाचा चेक होता.
प्रशांतच्या डोळ्यात आश्चर्य होतं. आता सगळेजण त्याचेकडे पाहू लागले. प्रशांतच्या हातात वीस लाखाचा चेक होता.
"हे मधुराच्या ऍडमिशन साठी पैसे आहेत." आजोबा म्हणाले आणि आसावरी खाडकन भानावर आली.
"काय?" ती एकदम मोठ्यांनी म्हणाली. तिच्याबरोबर प्रशांतचा स्वरही त्यात मिसळला होता.
"हो तुम्ही ऐकलं ते खरं आहे. हे पैसे मी आपल्या मधुरासाठीचं आणले आहेत. काल प्रशांतचा फोन आला आणि मधुराचा निकाल कळला. तिच्या काळजीपोटीच आम्ही आज इथे आलो आहे." प्रशांतचे वडील शांतपणे बोलत होते.
"हे सगळं ठीक आहे बाबा, पण हे एवढे पैसे कुठून आणले तुम्ही? गावची शेती विकलीत का?" प्रशांत स्वरात आता मात्र काळजी दाटून आली होती.
"प्रशांत बाळा अरे हे तुझेच पैसे आहेत. तू गेली वीस बावीस वर्ष दर महिन्याला जे पैसे मला पाठवत होतास ते मी हळूहळू जमा करत होतो. जसजसे पैसे जमले तशी तशी त्याची एफडी केली. तुझे इन्क्रिमेंट झालं की माझी FD मधील रक्कम वाढायची. मग मी ते अजून गुंतवायचो. सुरुवातीला FD तीन वर्षांसाठी ठेवली. मग जास्त परतावा मिळाला की अधिक जास्त रक्कम गुंतवत गेलो. हळूहळू नामवंत कंपनीचे काही शेअर्स घेतले आणि त्यामध्ये ही काही रक्कम इन्वेस्ट केली. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तशी गोष्ट झाली. खूप चांगले रिटर्न्स मिळाले. आता हे बरेचसे पैसे जमा झालेत. हे माझ्या नातीसाठीच आहेत. तुला आठवतं का, तुला तरुणपणी डॉक्टर व्हायचं होतं त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे तुला डॉक्टर होता आलं नाही पण त्याचवेळी मी ठरवलं खूप पैसे साठवायचे आपल्या मुलाचं नाही तर किमान नातवंडाचं स्वप्न पूर्ण करायचं. मला पैसे जमवण्याचा ध्यास लागल. तू पाठवत असलेले पैसे आणि माझी रिटायरमेंट वेळीची पुंजी मी गुंतवत गेलो." नं थांबता बाबा बोलतच होते.
ते बोलत असताना प्रशांतने आसावरीकडे एक कटाक्ष टाकला. ती त्याची नजर चुकवत होती. काहीही असो पण आता मधुराचं स्वप्न पूर्ण होणार याचा मात्र तिला आनंद झाला होता.
"मधुरा बाळा इकडे ये." असं म्हणत आजोबांनी तिला आपल्याजवळ बोलवलं.
"हे बघ, हे सगळे पैसे तुझ्यासाठी आहेत. तू सहज डॉक्टर होशील पण मला खरंच वाटतं की तू एक अजून प्रयत्न करावास. म्हणजे हे पैसे आहेतच, पण तू तुझ्या प्रयत्नांनी डॉक्टर व्हावं असं मला आणि तुझ्या आजीला वाटतं." असं आजोबा म्हणाले तसं मधुरा सोबत आसावरीच्या कपाळावर रागाचे जाळ पसरलं.
"मी काय सांगतो ते नीट ऐक, तू एक वर्षाचा ब्रेक घे. या कालावधीत तू पुन्हा परीक्षा दे. मागच्यावेळी बारावीच्या अभ्यासामुळे तुला लक्ष केंद्रित करता आलं नाही पण यावेळी मला नक्की खात्री आहे की तुला यश मिळेल. माझा अनुभव सांगतो."नातीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत आजोबा समजावत होते.
"अहो बाबा काहीही काय सांगता? या सगळ्यांमध्ये तिचं अख्ख एक वर्ष वाया जाईल आणि आता पुन्हा परीक्षा का तिने द्यायची तुम्ही पैसे दिले आहेत ना? त्यात लागले तर अजून काही भर घालून फी भरूया आपण तिची. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करू." आसावरीला आता धीर धरवत नव्हता ती घाई घाईने म्हणाली.
"सुनबाई अग जाऊदे की तिचं एखादं वर्ष वाया. एक वर्ष गेल्यामुळे असा काहीही फरक पडणार नाही. उलट तिचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. मोठ्या जगात उत्तुंग भरारी घ्यायला स्वबळावर ती तयार होईल. मान्य आहे की आपल्याकडे पैसे आहेत पण उद्या हेच पैसे ती डॉक्टर झाल्यावर तिचं स्वतः चं क्लिनिक काढायला आपण वापरू शकतो." शांतपणे आजोबा म्हणाले.
आपल्या सासऱ्यांचे इतके प्रगल्भ विचार ऐकून आसावरीच्या डोळ्यात गहिवर दाटून आला.
"थँक्यू सो मच आजोबा. मी नक्की पुन्हा प्रयत्न करीन आणि माझी ॲडमिशन कशी होईल याकडे फोकस करेन. लवकरचं मी डॉक्टर होईन पण मग माझ्या क्लिनिकचं नक्की ना?" हसत हसत मधुरा म्हणाली.
"नक्की म्हणजे काय अगदी नक्की. चल तयारीला लाग." असं म्हणत आजोबांनी तिच्या हातात एक गिफ्ट दिलं. गिफ्टवरचा कागद मधुराने दूर केला आणि त्यात पाहिलं तर एक सुंदर सोनेरी नेमप्लेट होती.
"डॉक्टर मधुरा. M.B.B.S.M.D"
"आजोबा मी M.D होणार?" मधुरा आश्चर्याने म्हणाली.
"हो मग तुला सर्जन व्हायचं आहे. चला आता जोरदार अभ्यासाला लागा." आजोबा म्हणाले तशी मधुरा खुशीने हसली तिचं ते निरागस हास्य बघून आता मात्र आसावरीला शांत शांत वाटलं. लेकीवरच्या मायेने तिचे डोळे भरून आले. गेल्या तीन चार दिवसापासून आपल्या घरावर दाटलेलं मळभ दूर झालं होतं.
सासू-सासर्यांबद्दल तिच्या मनात असणारी अढी आज मात्र मनातून पार हद्दपार झाली होती. आता मात्र तिचा त्यांच्यावरचा आदर वाढला होता. मनावरचा ताण हलका झाल्यामुळे प्रशांत आपल्या वडिलांच्या कुशीत लहान मुलासारखा शिरला.
"काय रे बाळा? तुझी पण काही डिमांड आहे का?" गमतीने हसत बाबा म्हणाले तसा प्रशांत लाजला.
"बाबा खरं सांगू का तुम्हाला पैसे पाठवायचो त्यावेळी मला तुमचा खूप राग यायचा. वाटायचं तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन आहे तरी आमचा पैसा तुम्ही घेता आणि आमच्यावर अन्याय करता. गावाकडे आल्यावर सुद्धा मी तुमच्याशी नीट वागलो नाही. खरंच माझं चुकलं मला वडील नात्यानं माफ करा." आपल्या वागण्याचा प्रशांतला खूप पश्चाताप होत होता.
"बाबा माझेही चुकलं मी सुद्धा कधीच तुमच्याशी नीट वागले नाही. तुम्ही मात्र माझ्या मुलीसाठी तिच्या भविष्यासाठी पुंजी जमा करत होतात याची जाणीव मला नव्हती. माझं चुकलं मला मोठ्या मनाने माफ करा." आसावरी पण म्हणाली.
"असू दे रे मुलांनो. आम्ही कधीचं रागावलो नाही तुमच्यावर. खरं तर तुमचं हे वागणं आमच्या नेहमी लक्षात यायचं. ही नेहमी म्हणायची पैसे मागू नका पण त्यावेळी जर मी पैसे मागितले नसते तर आज आपल्या जवळ एवढी मोठी रक्कम उभी राहिली नसती. झालं गेलं गंगेला मिळालं." ते हसून म्हणाले.
"अगदीच बरोबर आहे तुमचं. चला तुम्ही दोघे आता आराम करा. मी आज जेवायला तुमच्या आवडीचा खीर पुरीचा बेत करते." असं म्हणत आनंदाने आसावरी स्वयंपाक घरात गेली.
नात्यांच्या घट्ट विणेची उब तिला आज जाणवत होती. आपण मनात उगीच अडी ठेवून वागत राहिलो याचा तिला पश्चाताप झाला होता मागची सर्व उणीव भरून काढायला आता मात्र ती उत्साहाने सज्ज झाली होती.
...समाप्त
वरील कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी काही संबंध नाही.
भाग : तिसरा (अंतिम)
लेखिका : सायली पराड कुलकर्णी.
Disclaimer : कथा आवडल्यास शेअर जरूर करावी पण लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. ह्या कथेचे सगळे हक्क राखीव.
भाग : तिसरा (अंतिम)
लेखिका : सायली पराड कुलकर्णी.
Disclaimer : कथा आवडल्यास शेअर जरूर करावी पण लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. ह्या कथेचे सगळे हक्क राखीव.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा