नात्यातील अंतर... भाग 1
आज तिच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली होती.पण तिचा तो पूर्वीचा आनंद आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह कुठेच दिसत नव्हता.
लग्नाला पाच वर्ष झाली होती,तरीही ती मात्र एकटीच एकाकी होती.सोबत होती ती फक्त तिच्या इवल्याश्या जीवाची तीच पिल्लू जे तीन वर्षाचं होत.त्याच्याकडे बघून ती आपल जीवन जगत होती.
आता ही एकटीच बाहेर बघत बसली होती.तिने किती स्वप्ने बघितली होती,पण सगळी धुळीला मिळाली, असा काय गुन्हा केला होता,ज्याची शिक्षा तिला मिळाली होती.ती कशात कमी पडली म्हणून तिचा नवरा तिच्याशी अस वागत होता.त्यांच्यात दुरावा निर्माण होत होता.
ती एकटक समोर बघत विचार करत आपल्या भूतकाळ आठवत होती.
सोनाल ही मध्यम वर्गीय घरातील साधी मुलगी होती.
बारावी पर्यंत तीच शिक्षण झाल होत.पुढे शिकण्याची तिची खूप इच्छा होती,पण परिस्थिती मुळे तिला शिकता आले नाही,तिच्या पाठीमागे तिचे दोन भावंडे शिकणारी होती.म्हणून तीच शिक्षण थांबल,आणि तीच लग्न करण्यात आला,तिच्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या,फक्त आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी,आणि आपला नवरा आपल्यावर खूप प्रेम करावं,इतकीच काय ती अपेक्षा होती तिची, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होत.

तीच लग्न मयूर पाटील यांच्यासोबत झालं त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती.तो एका मल्टी नॅशनल कंपनीत जॉब करत होता.पगार पण खूप चांगला होता.त्याला हे लग्न करायचं नव्हत,त्याला ही नोकरी करणारी मुलगी बायको म्हणून हवी होती.पण आई बाबांना सोनल आवडली होती.म्हणून त्यांच्या हट्टा पुढे त्याच काहीच चाललं नाही,त्यामुळे त्याने सोनालशी लग्न केलं.
लग्न झाल्यावर त्याने तिला पहिल्याच दिवशी सांगितल की,मी तुझ्याशी लग्न फक्त माझ्या आई बाबांसाठी केलं आहे,तर माझ्या कडून तू कसलीच अपेक्षा करू नकोस.
ते ऐकल्यावर ती पूर्ण तुटून गेली,तिने जी आपल्या सुखी संसाराची स्वप्ने बघितली होती ती एका क्षणात नाहीशी झाली.
तिला त्याच्या बोलण्याचा धक्काच बसला,पण तिने हार मानली नाही,आपल्या प्रेमाने त्याला जिकण्याच तिने मनोमन ठरवल होत.असेच दिवस जात होते,तिच्या सहवासात मयूर पण तिच्याकडे ओढला जात होता.
तिचा लघवी स्वभाव आणि निर्मळ मन यापुढे त्यालाही तिच्या प्रतीची ओढ जाणवू लागली.हळूहळू त्यांचं नात फुलायला लागलं.
दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता.अश्यातच एक दिवस मयूर ने तिच्यासाठी एक सरप्राइज प्लॅन केला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा