नात्यातील अंतर...भाग 2
" सोनल sss ए सोनल कुठे आहेस तू !" मयूर हाक मारतच आत येतो.
" अहो काय झालं,तुम्हाला काही हवं आहे का ?" सोनल आपल हातातलं काम सोडून ती धावत बाहेर आली होती.
" पटकन तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे." मयूर अगदी आतुर होऊन बोलत होता.
" अहो पण कुठे जायचं आहे ते तरी सांगा ?" सोनल न समजून म्हणाली.
" तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे चल आवर पटकन." तो तिला तयार होण्यासाठी आत रूम मध्ये पाठवून दिला ,आणि तो तिथेच सोफ्यावर तिची वाट बघत बसला.
थोड्याच वेळात ती छान तयार होऊन बाहेर आली,तिला तयार होऊन आलेलं बघून तो तिच्याकडेच बघत उभा राहिला.ती मात्र लाजून आपली मान खाली घालुन उभी होती.
" अस काय बघताय !" सोनल लाजून म्हणाली.
" बघतोय की, माझी बायको किती सुंदर आहे ,जणू स्वर्गातून अप्सराच उतरली आहे." मयूर तिच्याजवळ जाऊन तीच ते रूप डोळ्यात साठवून घेत होता.तिला इतकं छान तयार झालेलं बघून तो भान हरपून तिच्याकडेच बघत होता.
" अहो आता तुम्हीही तयार व्हा ! की,असेच येणार आहात. " सोनल हसून म्हणाली.तसा तो तयार होण्यासाठी निघून गेला.आणि तो ही तयार होऊन काही मिनिटातच बाहेर आला.दोघेही बाहेर निघून गेले.
मयूर शहरात नोकरीसाठी होता,म्हणून तो सोनलला ही लग्न झाल्यावर सोबत घेऊन आला होता.त्याचे आई वडील गावी राहत होते.
दोघेही एका हॉटेल मध्ये गेले,तिथे त्याने सगळी अरेजमेंट केली होती.ते सजवलेलं टेबल,फुलांचे बुके,बाजूनेही खूप छान सजावट केली होती,ते सगळ बघून सोनल बघतच राहिली,तिला वाटलं ही नव्हत की,मयूर आपल्याला अस काही सरप्राइज देईल.पण ते सगळ बघून ती इतकी खुश होती.की,तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
" हॅपी बर्थडे टू माय ब्युटीफूल वाइफ,अँड आय लव्ह यू." तो खाली गुडघ्यावर बसून तिला गुलाब देत म्हणाला.
ती तर भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती,तिला इतका आनंद झाला होता,तिला तर माहित पण नव्हत आज तिचा वाढ दिवस होता. ती तर तिचा वाढ दिवसच विसरली होती.ती इतकी खुश होती की,तिचे ओठ न बोलता ,आज तिचे डोळे बोलत होते.तिचे अश्रू आज तिचा आनंद व्यक्त करत होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा