नात्यातील अंतर...भाग 3
" सोनल मला माफ कर मी तुझ्यातल्या चागुलपणाला मी समजू शकलो नाही,पण आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही." तो तिचा हात हातात घेऊन बोलत होता.
तिची त्याच्या हाताला धरून त्याला उभ करून त्याच्या मिठीत शिरते,दोघेही आज खूप खुश होते. तीच बडे सेलिब्रेशन पण त्यांनी खूप छान साजरा केला,आणि दोघेही जेवण करून घरी आले.
त्या दोघांचा खूप छान संसार चालू होता, बघता बघता त्यांच्या लग्नाला आता दोन वर्ष पुर्ण झाले,तरीही अजून ती प्रेग्नेंट झाली नव्हत,मयूर चे आई बाबा सारखे त्यांच्या पाठीमागे लागायचे आम्हाला नातवंडं हवं आहे,तुम्ही देणार की नाही की,मयूरच दुसर लग्न करू,तुझ्यातच काहीतरी दोष आहे आम्ही मयूरच ऐकायला हवं होत,असे ते सारखे म्हणायचे.
त्यांच्या अश्या बोलण्याने सोनल पूर्णपने खचून गेली होती.थोडे दिवस मयूर ने ही तिची व त्याच्या आई बाबांची समजून काढली,पण नंतर त्यालाही आपल्याला बाळ हवं अस वाटू लागलं,म्हणून तो ही तिच्याच काहीतरी दोष आहे म्हणून त्या दोघांचे त्या विषयावर वाद होत असत.तिने त्याला दवाखान्यात जाऊन आपल्या दोघांचेही टेस्ट करून घेऊ म्हणून सांगितले,दोघांनीही आपले टेस्ट केलं पण कुणाच्यातच दोष नव्हता,पण तरीही ती प्रेग्नेंट होत नव्हती,तिची ट्रीटमेंट चालू झाली,पण काही केल्या तिचे सासू सासरांना धीर धरत नव्हता,शेवटी मयूर या सगळ्याला कंटाळून आपल सगळ लक्ष कामात गुंतवून घेतल.
तो कामात इतका बिझी असायचा की,घरी आपली कुणीतरी वाट बघत आहे याचीही जाणीव त्याला नसायची.आणि आपली इच्छा असेल तेव्हा आपल्या शरीराची भूक भागवायची,एवढीच काय त्याच जीवन झालं होत.तो तिच्याशी ही नीट वागत नव्हता,त्यांच्या नात्यात अंतर निर्माण होऊ लागलं,तिने ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला,पण तो तिलाच दोषी मानत होता.
त्याचे आई वडील ही त्याचे कान भरत होते,आम्हाला वंशाला दिवा देणार नसेल,तर तू दुसर लग्न कर ,असे ते सारखे म्हणायचे.
सोनल ते ऐकून खूप रडायची ती रात्र रात्र जागून त्याच गोष्टीचा विचार करायची गणपती बाप्पा कडे प्रार्थना करायची.रोज त्याला साकड घालायची.
एके दिवशी असच ती स्वयंपाक करत असताना तिला उचलून आलं,तशी ती पळत बाथरूम मध्ये गेली.तिला खूपच अशक्त वाटत होत.म्हणून ती थोडा वेळ आराम करू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा