Login

नात्यातील अंतर..भाग 4

नात्यात विश्वास असणं आवश्यक असतं नाहीतर नात्यात अंतर निर्माण होत.
नात्यातील अंतर...(अंतिम)भाग 4


तिला अस आराम करताना बघून तिचा नवरा तिच्यावर खूप रागावला,त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता,म्हणून तो तिला सुनावत होता.ती बिचारी माझी तब्बेत ठीक नाही म्हणून सांगत होती.पण त्याने तीच काहीच ऐकून घेतल नाही.


असेच त्याचे रोजच भांडण होत होते, रोज ते दोघे भांडत होते,ती या सगळ्याला कंटाळून माहेरी निघून आली,
माहेरी आल्यावर काही दिवसातच तिला ती आई होणार आहे हे कळलं तिला तर खुपचं आनंद झाला होता,आभाळ ठेंगणं झाल्यासारखं तिला वाटत होत.


ती ही बातमी मयूरला सांगण्यासाठी तिने त्याला फोन केला,पण त्याने तिलाच चार शब्द सूनावून त्याने फोन कट केला.


आता तिलाही कळून चुकल होत की,तीच कोणीच काहीच ऐकून घेणार नाही,तिने आपल्या आई बाबांना सगळ काही सांगितल,त्यांनाही ते ऐकून खूप वाईट वाटल.


आपल्या मुलीचा संसार अस अर्धवट राहिल्याने ते ही चिंतेत होते,पण सोनल ने सांगितल की,मी या मुलाला दोघांचं ही प्रेम देईन फक्त तुम्ही दोघे माझ्या पाठीशी रहा,असेच दिवस गेले,सोनल ने एका गोंडस बाळाला जन्म दिला,त्याला बघून ती इतकी खुश झाली ,की,तिच्या आयुष्यातील सगळी दुःख त्या बाळाच्या येण्याने नाहीशी झाली होती.


आज तेच बाळ तीन वर्षाचं झालं होतं,आता कुठे मयूरचे डोळे उघडले होते. तो तिला भेटायला आला होता.पण तिने त्याला जुमानल नाही.


" जेव्हा मला तुमच्या आधाराची,साथीची गरज होती,तेव्हा कुठे होतात तुम्ही ,मी तुम्हाला फोन केला तेव्हा तर तुम्ही मला खूप काही सुनावलं होत,मग आता काय असा चमत्कार झाला की,तुम्हांला आमची आठवण आली,आम्ही मेलो की जिवंत आहोत जे ही तुम्हाला जाणून घ्यायचं नाही,तर आता कोणत्या हक्काने तुम्ही इथे आला आहात !"


" मी तुम्हाला किती समजवण्याचा प्रयत्न करत होते,पण तुम्ही आपल्या नात्यालाच कलक लावला ,आता मी तुमच्यासोबत येणार नाही." सोनल त्यांना ठणकावून सांगितलं.


" सोनल प्लीज मला माफ कर,प्लीज माझ्यासोबत चल मला माझ्या मुलापासून वेगळं करू नकोस,मला तुम्ही दोघेही हवे आहात प्लीज सोनल !" तो हात जोडून विनंती करत होता.


" नाही ते तुमचं बाळ नाही ,ते बाळ फक्त माझ्या एकटीच आहे,तुमचा त्याच्यावर काही एक अधिकार नाही.आणि इथून पुढे तुम्ही आमच्याशी काही एक संबंध ठेवायचा नाही."


" तुम्ही तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला नाही,तर या पुढे काय ठेवणार तुमचं स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही लोकांच्या बोलण्यावर मात्र तुमचा विश्वास आहे,आम्ही दोघं आमच्या आयुष्यात सुखी आहोत,तुम्ही प्लीज आम्हाला एकट सोडा,आणि आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका." सोनल


ती तिच्या निर्णयावर ठाम होती,आणि तिचे आई वडील तिच्या पाठीशी होते,त्याने परत अस केलं तर ती काय करेल म्हणून तिने त्यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेतला.


तो निराश होऊन निघून गेला,त्याच्या एका चुकीने त्याचा संसार मोडला,नवरा बायकोच्या नात्यात अंतर निर्माण झालं.


सोनल आणि तिचा मुलगा दोघेही आपल्या आयुष्यात खूप सुखी होते, फक्त आपल्या जोडीदाराची आठवण मात्र तिला कायम येत होती.पण ती पण त्यातून सावरून पुढे शिक्षण घेऊन आपल्या मुलासाठी नोकरी करू लागली.


एक चुकीचं निर्णय आपल नात्यात अंतर आण्यासाठी पुरेसा असतो.त्यामुळे नात्यात विश्वास असणं महत्वाचं असत.


समाप्त.
0

🎭 Series Post

View all