कथेचा पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की, प्रियाची नणंद येणार होती.
प्रिया एकत्र कुटुंबात वाढली होती. पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा हे तिला माहीत होतं. आता पाहू पुढे.
गेल्या भागात आपण पाहिले की, प्रियाची नणंद येणार होती.
प्रिया एकत्र कुटुंबात वाढली होती. पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा हे तिला माहीत होतं. आता पाहू पुढे.
घरातल्या मुलांवर संस्कार होतात ते घरातील मोठ्यांचं वागणं बघून आणि प्रिया अशाच संस्कारात वाढलेली मुलगी होती. तिचं लग्न झालं तेव्हा आईने आणि काकीने तिला हाच कानमंत्र दिला होता की, माणसं जोडून ठेवणं हे घरच्या स्त्रीच्या हातात असतं.
तिची मोठी नणंद माधवी नवऱ्यासोबत आणि मुलीसोबत येणार हे कळताच ती पाहुणचार करण्यास सज्ज झाली.
महेश ऑफिसवरून आला.
"ताई इथे पहिल्यांदा येत आहेत, तर त्यांना छान साडी घेऊया का? मनोज भाऊंना कपडे आणि मानसीला सुंदर फ्रॉक."
"प्रिया, कशाला? असंही ताईला मी भाऊबीजेला साडी घेतोच."
"हो पण इथे पहिल्यांदा येत आहेत. एक आठवण." प्रिया.
"बरं ठीक आहे. तुला जे योग्य वाटतं ते कर."
प्रियाने बाजारात जाऊन सर्वांसाठी कपडे विकत घेतले.
त्यांच्या पाहुणचारामध्ये कसलीच कमी नको, ह्याची ती काळजी घेत होती.
दुसऱ्या दिवशी माधवी तिचा नवरा मनोज आणि मुलगी मानसी आली. प्रिया आणि महेशने तिघांचं छानपैकी स्वागत केलं. प्रियाने त्यांना आल्यावर लगेच चहा दिला आणि सोबतच कांदा भजी.
प्रियाने सगळा स्वयंपाक करूनच ठेवला होता.
पुरणपोळीवर साजूक तूप, कटाची आमटी बरंच काही केलं होतं.
मनोजने प्रियाचं कौतुक केलं.
पुरणपोळीवर साजूक तूप, कटाची आमटी बरंच काही केलं होतं.
मनोजने प्रियाचं कौतुक केलं.
महेशला प्रियाचे फार कौतुक वाटले. सगळं काही व्यवस्थित केलं होतं.
माधवी निघू लागली तर महेश आणि प्रियाने माधवीला एक रात्र तरी रहा म्हणून आग्रह केला.
असंही प्रिया आणि महेश दोघांना दुसऱ्या दिवशी सुट्टी होती.
माधवी राहिली. प्रियाने तिला एकाही कामाला हात लावू दिला नाही आणि माधवी देखील निवांत राहिली.
दुसऱ्या दिवशी माधवीचे कुटुंब निघून गेले.
"प्रिया, थँक्स." महेश तिचा हात अलगद हातात घेत म्हणाला.
"कशासाठी थँक्स?"
"ताई, भाऊजी आले तेव्हा मनापासून पाहुणचार केला."
"तुम्ही पण ना. ह्यात थँक्स काय? आपल्या घरी आले होते तर आपणच त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करणार."
प्रिया आणि महेश दोघेही एकमेकांना समजून घेत. दोघांचे बंध मजबूत होत गेले.
महेशला प्रियाचा स्वभाव कळला होता. स्वतःला नशीबवान समजत होता की, प्रियासारखी गुणी मुलगी त्याच्या आयुष्यात आली.
घरात चैतन्य होतं ते प्रियामुळे.
एक दिवस महेश ऑफिसमधून आला.
नेहमीच उत्साहाने भरभरून बोलणारी प्रिया आज शांत होती.
"प्रिया, काय झालं? तब्येत ठीक नाही का? तुझा चेहरा असा का उतरला आहे?"
महेशने असं विचारताच ती रडू लागली.
"प्रिया, सांग काय झालं?" महेश काळजीच्या सुरात म्हणाला.
का रडत होती प्रिया?
पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा