नात्यातला गुंता भाग 3
©️®️शिल्पा सुतार
मधे बरेच महिने गेले. आला दिवस सारखाच होता. अनिकेत, सासू, सासरे, नणंद तिला त्रास देत होते. शुभदा अजून अडचणीत सापडली होती. तिचा छळ वाढला होता.
आता नणंदेकडचं काम शुभदाला करावे लागत होते. ती पण वरचेवर इथून डबा नेत होती. सगळं हिने करायच, बोलणे ही खायचे.
मनीषाकडे पूजा होती. सकाळ पासून शुभदा कामात होती. तरी हे झाल नाही ते झाल नाही अस सुरू होत. शेवटी तिला चक्कर आली. ती घरी आली. जेवायची इच्छा नव्हती. तिला वाटत होत. नक्की काहीतरी आहे. दिवस गेले आहेत. पण ती काही म्हणाली नाही. ती जरा वेळ झोपली.
"आराम झाला असेल तर मनीषा ताईकडे जा. तिकडे पाहुणे येतील." अनिकेत म्हणाला.
"मी जाणार नाही त्यांना त्यांच आवरू द्या." शुभदा म्हणाली.
"हे अस बोलायची तुझी हिम्मत कशी झाली?" तो चिडला होता.
"मी सगळ्यांच काम करणार नाही. तुम्ही ही सारखी त्यांची बाजू घेतात मला समजून घेत नाही. बायको फक्त घरकामासाठी आणली का? तिला प्रेम, माया, आधार काही द्यायचं की नाही?" आज ती अनिकेतला खूप बोलली.
पण काही उपयोग झाला नाही. तीच काही चाललं नाही तिला मनीषाकडे जावून सगळं आवरून यावं लागल.
दुसऱ्या दिवशी तिने टेस्ट घेतली. ती पॉझिटिव्ह निघाली. ती खूप खुश होती. मी आई होणार. किती आनंदाची गोष्ट आहे. दोन दिवसांनी त्यांची पहिली अॅनिर्वसरी होती. त्या दिवशी ही बातमी अनिकेतला सांगून ती सरप्राईज देणार होती. हेच बेस्ट गिफ्ट असेल.
ती खूप खुश होती. संध्याकाळी ती आराम करत होती. शुभदा... आवाज देत अनिकेत आत आला. ती पुढे होवुन त्याला भेटली. त्याने तिला बाजूला केल. "मनीषाताईने आज तुला तिच्याकडे बोलवलं होतं. तू गेली नाही? तिच्याकडे पाहुणे येणार होते. थोडी मदत केली असती."
"अहो आज मी कुठे जाणार नाही. तुमच्या जवळ राहणार." शुभदा प्रेमाने म्हणाली. यांना सांगू का?
अनिकेत बघत होता हिला काय झालं. "जास्त लाडात येवू नकोस शुभदा, मनीषा ताईचा केव्हाचा फोन येतो आहे तिकडे मदतीला जा. "
"माझ्याकडून एवढ काम होत नाही. त्यांना जमत नसेल तर त्यांनी बाहेरून काहीतरी मागवून घ्यायचं. दुसर्याच्या भरोश्यावर पाहुणे कश्याला बोलवायचे." शुभदा म्हणाली.
"थोड काम केल तर तू बारीक होणार आहेस का? काय हे वागणं. उठ ताईकडे जा. " अनिकेत चिडला होता.
तिचा मूड गेला. मी म्हणते ना मला बर नाही तरी हे समजून घेत नाहीत. यांना बाळा बद्दल सांगितल तरी काही फरक पडणार नाही. म्हणतील जगात काय तूच एकटी आई होणार आहेस का? आटोप ताईच्या मदतीला जा. नकोच सांगायला.
" तुम्हाला जमत असेल तर तुम्ही बहिणीची मदत करा. मलाच का सगळं सांगताय. तुम्ही खर तर मला अस वागायला नको. तुम्ही माझी काळजी करत नाहीत. माझा अपमान करतात. सगळ्यांसमोर काहीही बोलतात. त्यांच्या घरी कामाला पाठवतात म्हणून त्यांना ही फावत. आई, बाबा, मनीषा ताई कसे ही वागतात. " आज ती खूप चिडली होती नेहमी असच सुरू राहील तर उद्या बाळ आल्यावर कस होईल?
दोघांच खूप भांडण झालं. त्याने तिला घराबाहेर काढल. ती पोटावर पडता पडता राहिली. बापरे माझ बाळ. कशी तरी उठून ती दीप्ती कडे गेली. ति झोपलेली होती. तिला त्रास होत होता.
" काय झालं ग? " दीप्ती काळजी करत होती.
"वाटत काहीतरी आहे."
" अरे वाह भाऊजींना सांगितल का?"
"नाही, त्यांना सांगून उपयोग नाही. त्यांना मी नको आहे. आता काही नाही माझी मी राहील. माझ्या बाळाला वाढवेल. माझ्यात तेवढी हिम्मत आहे." शुभदाने ठरवल होत.
" अस एकट रहाण कठिण आहे शुभदा."
" याला काही इलाज नाही. मला हे कराव लागेल. अनिकेत समजून घेत नाही. मला आता हा त्रास सहन होत नाही. मला आधी वाटत होत दीप्ती ताई तुम्ही आई बाबांसोबत अस का वागतात. आता समजल तुम्ही करतात तेच योग्य आहे. अश्या खराब स्वभावाच्या लोकांना एकटं राहू दिल पाहिजे. त्यांच्या पासून आपण दूर बर. " शुभदा म्हणाली.
"हो ना अंगात जोर असतो तो पर्यंत सुनेला त्रास देतात. बायकोला त्रास देतात. म्हातारपणी तिच्याच कडून सेवेची अपेक्षा करतात." दीप्ती म्हणाली.
"दीप्ती ताई माझ्यातर मनातून ते उतरले आहेत. अनिकेतला ही इतक आई बाबांच ऐकायचं होत तर त्यांनी लग्न करायच नव्हतं. एवढ आहे तर स्वतः आई बाबांची सेवा करायची ना. स्वतः काही करणार नाही बायकोवर हुकूम चालवणार. रहा म्हणा आता आई बाबा सोबत. " शुभदा चिडली होती.
दुसर्या दिवशी ती सामान घेवून माहेरी निघून गेली. लगेच आईसोबत डॉक्टरकडे गेली. बाळ ठीक होत.
दीप्तीला खूप वाईट वाटत होतं. झाल एक संसार मोडला. का करतात हे लोक असे. का सुनेला सुखाने राहू देत नाही. यांना समजत नाही का सून कामाला येणार आहे. त्यांना फक्त सुनांवर जोर चालवायचा असतो. मुलांचे कान भरतात. कुठे फेडतील हे पाप. ती निरागस मुलगी किती सहन करत होती.
माझ असच झाल. पण माझ्या बाजूने तरी हे होते. शुभदा एकटी पडली.
माझ असच झाल. पण माझ्या बाजूने तरी हे होते. शुभदा एकटी पडली.
******
अनिकेत कडे सगळ्यांचे जेवणाचे हाल होत होते. मनीषा ही डबा देत नव्हती. दोन दिवसातून एकदा काहीतरी आणून द्यायची. दीप्ती तर बघत नव्हती. तिला झालेला त्रास विसरता येत नव्हता. अनिकेत ही बाहेरच खावून कंटाळला होता.
त्याने शुभदाला फोन केला. तिने फोन कट केला. काहीही करा तिकडेच रहा. त्याने तिच्या घरी फोन केला त्यांनी ही उचलला नाही. अश्या अवस्थेत तिला घराबाहेर काढल.
अनिकेतला माहिती होत शुभदाला चक्कर येत होत्या. आठ दिवसापासुन ती नीट जेवत नव्हती. तरी बायकोची काळजी घेतली नाही. तिला वाटेल तस काम दिल. नीट वागता येत नाही का? शुभदाच्या घरचे चिडलेले होते.
आता जेवणाचे हाल होत आहेत तर बायको आठवली का? लग्न झाल तर बायकोकडे कोणी बघायच? एवढे आई बाबा हवे अश्या लोकांनी लग्न करू नये.
******