नात्यातला गुंता भाग 4 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
अनिकेत घरी आला. आईने खिचडी केली होती. ते झोपायची तयारी करत होते.
"आई फक्त खिचडी? तुम्हाला पोळी भाजी लागते ना? शुभदाला एका वेळी दोन दोन भाज्या करायला सांगायचे. ती नाही आवडली तर आणखी एक." तिची नुसती धावपळ होत होती. त्याला आठवलं. आता बर नुसता भात चालतो. तेव्हा थोड एडजेस्ट केल असत तर.
"आई, पोळी भाजी कर. " अनिकेत रागाने म्हणाला.
" मला जमणार नाही तुझ्या बायकोला घरी बोलवून घे. " त्यांनी ही उत्तर दिलं.
मला शुभदा बद्दल किती सांगत होते. पण ती होती तर खरच चांगल वाटत होत. ती माझी काळजी घेत होती. तो घरात नुसता बसला होता.
थोड्या वेळाने तो दीप्तीकडे आला." वहिनी तुमची मदत हवी होती. शुभदा माझा फोन घेत नाही. तुम्ही बोला ना तिच्याशी. अस रागवून जातात का? तुम्ही तिला समजून सांगा ना."
"जावू द्या भाऊजी बर झाल ती माहेरी गेली. तिला इकडे किती त्रास होता. तुमचा ही सपोर्ट नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खात होते. ती घरच करत होती. सासू, सासरे आहेत. अजून नणंदेच करा. परत तुम्ही सगळे नेहमी तिच्या आई वडिलांचा उद्धार करत होते. सारखी कंप्लेंट, नुसते बोलणे ऐका. ती तिकडे शांत असेल. चांगली रहात असेल. मला ही हे सासू सासरे असच करत होते. आमचा ही संसार मोडायचा प्रयत्न केला होता. ते दिवस आठवले तरी त्रास होतो. "दीप्ती म्हणाली.
" आई बाबा शुभदाला असे बोलत नव्हते." अनिकेत म्हणाला.
" हेच तर तुम्हाला समजल नाही. तुम्ही त्यांच्या सोबत शुभदाला त्रास देत होते. विश्वास नसेल तर ठीक आहे. तुम्ही तुमचे आई बाबा आनंदात रहा."दीप्ती म्हणाली.
" वहिनी मदत करा ना. "
"तुम्हाला तुमची चूक समजत नाही मग बोलण्यात काही अर्थ नाही भाऊजी. उगीच मी तिच्याशी बोलेल. शुभदा परत येईल. तुम्ही परत तिला त्रास द्याल. त्यापेक्षा तिला तिकडे राहू द्या. "
दीप्ती फोन मधे बघत होती." हा बघा व्हीडीओ तिने काढला आहे."
अनिकेत बघत होता त्याचे आई बाबा शुभदाला किती बोलत होते. ती बिचारी घाबरून काम करत होती. तीन चार व्हीडीओ त्याने बघितले. मनीषा ही किती त्रास देते ते समजल.
" तुम्ही ही काही कमी नाही अनिकेत भाऊजी. तुमच्या मुळे हे झाल आहे. नवरा सपोर्ट करत नाही त्यामुळे बाकीचे असे वागतात. ती तुम्हाला डिवोर्सची नोटीस देणार आहे. या दिवसात तिला तुमच्या सपोर्टची गरज होती तुम्ही स्वतः हून तिला घराबाहेर काढल. ठकलल."
"म्हणजे?" अनिकेत तिच्या कडे बघत होता.
"शुभदा प्रेग्नंट आहे."
"काय? तिने मला काही सांगितल नाही."
"तिला तुमच्या कडून प्रेम आधार मिळत नाही. तुम्ही मोकळे बोलत नाही. चिडचिड करतात. तिची काळजी घेत नाही. ती कंटाळली होती. तिला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही." दीप्तीने सांगितल.
तो खाली येवून नुसता बसला होता. त्याने शुभदाला फोन केला. तिने घेतला नाही.
" अनिकेतचा फोन होता का? " लता ताई विचारत होत्या.
"हो आई मला तिकडे जायच नाही. "शुभदा म्हणाली.
" काही हरकत नाही. आणि अनिकेत इकडे आला की मी त्यांना सांगणार की मला बाळ नको."
"तुला बाळ हव की नको?" त्यांनी विचारल.
"हव आहे. पण त्यांना द्यायच नाही. ते लोक चांगले नाहीत."
" ठीक आहे. "
अनिकेत शुभदाच्या घरी गेला. ती भेटायला तयार नव्हती.
"तुमचा माझा काहीही संबंध नाही. तुम्हाला भेटले की मला त्रास होतो तुम्ही इथून जा. " तिने सांगितल. तो बळजबरी तिच्या खोलीत आला. ती उठून बसली.
" शुभदा या दिवसात राग राग करू नये. शांत हो. घरी चल." त्याने तिला जवळ घेतल.
"कोणत घर? कोणाच घर? तिथे माझ काही नाही ." शुभदा म्हणाली.
"एवढ काय झालं आहे? "तो मोठ्याने म्हणाला.
" तुम्ही मला त्रास देतात. घराबाहेर काढल अजून म्हणताय काय झालं. वाह किती छान वागताय." शुभदा खूप बोलत होती. अनिकेत गुपचुप ऐकत होता.
"आपल्या बाळाचा तरी विचार कर."
"बायकोशी नीट वागता येत नाही. तिला प्रेग्नंट बर करता येत. तिकडे मी काय सहन केल ते विसरणार नाही आणि मला हे मुल नको आहे." तिने मुद्दाम सांगितल.
" शुभदा काय बोलतेस? हे आपल प्रेम आहे."
" आपल्यात काही प्रेम शिल्लक राहील का? इथे मोठ्याने बोलायच नाही. इथून जा. मी पोलिसांना बोलवेल."
" अस करु नको मला एक चान्स दे. मला हे बाळ हव आहे. " अनिकेत म्हणाला.
" जो माणूस चांगला नवरा होऊ शकला नाही तो बाबा म्हणून काय दिवे लावणार ते समजल. मला काहीच नको. हे लग्न नको. तुमच मुल नको की ते तुमचे आई, बाबा नको. मला थोडी शांती हवी आहे. तुम्ही इथून जा नाहीतर मी वेडी होईल." शुभदा ओरडली.
" जरा सहनशीलता नाही. "
" तुम्ही अस टाॅरचर सहन करून बघा मी लिहून देते आठ दिवसात बंड कराल मी तरी एक वर्ष तुमच्या सोबत राहिले." ती म्हणाली.
तो हॉल मधे बसलेला होता." आई बाबा शुभदाला समजून सांगा. ती बाळ नको म्हणते. "
" तो सर्वस्वी तिचा निर्णय आहे."
" ते माझ ही बाळ आहे. "
" तुम्ही तिला त्रास दिला. ती वैतागली आहे. "
" मी तिच्यावर केस करेल. "
"काही हरकत नाही हव ते करा. " तिचे आई बाबा त्याच्याशी जास्त बोलले नाही.
तो घरी आला. दीप्तीकडे आला. "वहिनी तिला समजून सांगा ना. बाळ नको म्हणते. माझ चूकलं. ती म्हणेल ते मी करेन तुम्ही फोन लावा ना. "
" आता बोलण्यात काही अर्थ नाही भाऊजी. तरी तुम्हाला वाटत तर मी तिला उद्या फोन करेल. " दीप्ती म्हणाली.
" नाही तिने रात्रीतून काही केल तर? आमच बाळ. मला भीती वाटते. "
" एवढ घाबरू नका. ती आई आहे अस काही करणार नाही. रागाने म्हणाली असेल. ती किती चांगली आहे तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही ही आता नीट वागा जरा. आई, बाबांशी नीट वागव पण आंधळी भक्ती नको. जो जिथे चुकतो तिथे सांगायला हव. ते वयाचा फायदा घेवून दुसऱ्यांना त्रास देत असतिल तर ते योग्य नाही. तुमच्या बायकोला मन आहे. ती ही एक माणूस आहे. तिला ही प्रेमाची आधाराची गरज आहे. " दीप्ती खूप बोलली.
दुसर्या दिवशी दीप्तीने शुभदाला फोन केला. ती सगळ सांगत होती. " तुला इकडे यायच का? "
" हो पण काही अटी आहेत. "
" ठीक आहे मी भाऊजींना सांगते. "
अनिकेत भेटायला आला." आपण शांततेत घेवू या शुभदा. माझ चुकलं. "
" तुम्ही ऐकत नाही. परत पाहिले पाढे पंचावन्न होतील. "ती म्हणाली.
" अस होणार नाही. तुला काय वाटत ते बोल. " अनिकेत म्हणाला.
" तुम्ही चिडणार."
" नाही मला तू आणि आपल बाळ हव आहे. "
" मी तुमच्या आई बाबांना दोन वेळा काय चार वेळा जेवायला देईल. माझ कर्तव्य करेन. पण माझ्यावर जोर करायचा नाही. मी करेल ते खायच. तुम्ही डबा खाली नेवून द्यायचा. तुमच्या आई बाबांची सेवा तुम्ही करायची. तू वाढ इकडे जा तिकडे जा अस करायच नाही. "
" ठीक आहे. मान्य."
" मनीषा ताईंच मी काहीच काम करणार नाही. त्यांच काही इतक वय झाल नाही. इकडून सारखा रेडी स्वयंपाक त्यांना मिळणार नाही. आता आपल बाळ येईल. मला इतका वेळ नसेल. आणि वेळ असला तरी मी करणार नाही. मला ही आरामात राहू द्या. पटत असेल तर बघा. "शुभदा म्हणाली.
" चालेल. "त्याने मान्य केलं.
" तुम्ही ही माझ्याशी नीट बोलत नाही. तुम्हाला माझा त्रास समजत नाही. मला या गोष्टीचा खूप त्रास होतो. "
" मी निट वागेन. मला आता समजल कस वागायचं. "
" तुम्ही घरी मदत करत नाही. नुसत हे झाल का? ते झाल का करतात. कोणी माझ्या बद्दल काही सांगितल तर एकदा मला विचारुन खात्री करून घेत जा. घरचे जे म्हणतील तेच खर आहे अस करु नका. " शुभदा आठवून आठवून पॉईंट्स बाहेर काढत होती तिला माहिती होत बोलायचा हाच चान्स आहे.
हो.
" मी दीप्ती ताईशी बोलणार त्या चांगल्या आहेत. "
" चालेल. "
" मला लक्ष्यात आल आहे शुभदा आता तुला तक्रार येणार नाही. " अनिकेत म्हणाला.
शुभदा घरी रहायला आली. अनिकेत एकदम शांत होता. त्याचे आई, बाबा, मनीषा धुसफुस करायचे, आता तो लक्ष देत नव्हता. तो शुभदाकडे लक्ष देवून होता. तिची काळजी घेत होता.
शुभदा आता खुश होती. कस होईल हे वाटत होत. आता परिस्थिती खूप चांगली होती. ती आता तिची अनिकेतची काळजी घेत होती.
तिला गोंडस मुलगा झाला. सगळे खुश होते. आज बारसं होत. दीप्ती बाळाला घेवून बसली होती. "अनिकेत, शुभदा बाळाच नाव काय ठेवायचं?"
"यश ठेवा." शुभदा म्हणाली तिने अनिकेतकडे बघितल. दोघ खुश होते.
"अजिबात नाही. बाळाच नाव मी सांगेल ते असेल." मनीषा म्हणाली.
अनिकेत तिला बाजूला घेवून गेला." इथे तमाशा नको आहे मनीषा ताई. शुभदा म्हणेल ते होईल."
" तू एवढ बायकोच ऐकायला लागला."
"हो तीच बाळ आहे तिचा हक्क आहे. तू उगीच मधे मधे करू नकोस."
मनीषाला समजल इथे आपली डाळ शिजणार नाही. तिने आईला सांगितल.
"सगळे म्हणतात ते ऐक. अनिकेत आता खूप बदलला आहे. आपल ऐकत नाही. नुसत शुभदाच्या पुढे मागे असतो. आपल्याला आता गप्प बसाव लागेल. " सासुबाई म्हणाल्या.
शांततेत कार्यक्रम झाला. शुभदा बाळाला घेवून घरी आली.
आता शुभदा, अनिकेत खूप खुश होते. त्यांच त्यांच राहत होते. शुभदा ही आपल कर्तव्य नीट करत होती. सासू, सासर्यांच नीट करत होती.
******
यासाठी तिला किती मोठा स्टँड घ्यावा लागला. ठीक आहे उशिरा का होईना नीट झाल.
तिला ही थोड समजून घ्या सगळ्यांनी सगळया बाजूने तिच्यावर हल्ला केला तर कस होईल. नात्याचा गुंता होवू देवू नका. तो हळुवार सोडवा .