Login

नात्यांचे नाजूक बंध भाग १

नात्यांचे नाजूक बंध भाग १
" अग ईश्वरी हे काय ग ? हे कुठले कप ? "

" आई कॉफी चे मग आहेत. छान आहेत ना ?" ईश्वरी ने कौतुकाने त्या मग कडे बघत माधुरी बाईना विचारले.

" छे ग. कसले भडक रंग आहेत. ना त्याला काही नक्षी ना त्याला कोणता आकार."

" आई अहो ते आता नविनच बाजारात आले आहेत." तिने दबलेल्या आवाजात सांगितलं.

"तु कशाला आणलेस. तुला वस्तू खरेदी करायची समजच नाही. पुढच्या वेळी काही खरेदी वगैरे करायची असेल तर अमृताला घेऊन जात जा. तूझ्या पेक्षा तिची या बाबतीतली टेस्ट जास्ती चांगली आहे."

नाक मुरडून कॉफीचा मग हातात घेत माधुरी बाई म्हणल्या. ईश्वरी समोर ट्रे मध्ये ठेवलेले दोन मग कडे बघत राहिली. गेल्या आठवड्यात ती आणि तिचा नवरा ओमकार ने आणले होते.सासू बाईंचं बोलण्याचा विचार करत ती घरातील बाकीची काम आवरत होती.

नवरात्र सुरू झालं होतं. तर ललिता पंचमी च्या दिवशी सासू बाईनी घरात देवीला कुंकुमार्चन करायचं ठरवलं होतं. तर ती त्याचीच तयारी करत होती. तिने तिच्या पसंती नुसार हॉलच्या सजावटी साठी नवीन पडदे आणले होते. तर ती तेच पडदे बदलत होती. तिला असं करताना बघून माधुरी बाई म्हणाल्या.

" हे काय करतेस ईश्वरी ? "

माधुरी बाईंनी तिला टोकल. त्यांचा तो चढा आवज ऐकुन ईश्वरीचे हात काम करायचे थांबले. तिने शांतपणे पाठीमगे वळुन बघितले. मग सासू बाईच्या कडे बघत, हसुन म्हणाली,

" आई ते आम्ही दोघ लास्ट विक मॉल मध्ये गेलो होतो. तेंव्हा आणले. हे पडदे जुने झाले आहेत ना तर बदलत होते. उद्याच्या कार्यक्रमाला छान दिसतील."

जुना काढलेला पडदा घडी करून ठेवत ती बोलतं होती. स्वतःच्या आनंदात होती. उदया देवीचा कार्यक्रम आहे. तर ती घर सजवत होती. तर आनंदी होती.

" काही जूने वगेरे नाहीत हे पडदे. मी आणि अमृता आता गौरी गणपती साठी खरेदी करायला गेलो होतो. तेव्हा आणले आहे. तेच पडदे लाव. दरवेळी नवरात्री मध्ये हेच पडदे लावते मी. तु पण तेच लाव."

जुना काढलेला पडदा उघडुन तिच्या हातात देत माधुरी बाईंनी तिला ऑर्डर दिली. नाराज मनाने ईश्वरी ने ते जुनेच पडदे लावले. ईश्वरी चे काम पूर्ण होई पर्यंत माधुरी बाई तिथेच उभ्या होत्या. त्यांनी स्वतः नवीन पडदे घडी करून पिशवीत ठेवलें. ती पिशवी ईश्वरीच्या हातात देत त्या तिला म्हणाल्या,

" हे बघ ईश्वरी गेल्या वेळीं तु ते रंगी बेरंगी कॉफी चे मग आणले. तेंव्हा मी तुला सांगीतल होत. अमृताला विचारल्या शिवाय काहीही आणत जाउ नकोस."

" उद्याच्या उदया जाऊन हे पडदे दुकानदाराला परत करून ये."

" हो आई." ती मान खाली घालून म्हणाली.

" या घरात मला किंवा अमृताला विचारल्या शिवाय काहीचं केलेलं मला आवडत नाही. हे समजत नाही का हिला ?"

" एक वस्तू खरेदी करायची अक्कल नाही. माझ्या मुलाचे पैसे तेवढे उडवता येतात."

माधुरी बाई तिच्या नावाने बडबड करत त्यांच्या खोलीत गेल्या. काहीशा उदास मनाने तिने पुढच्या कार्यक्रमाची तयारी केली. नवरात्रीच्या पाचव्या माळेला दुपारी श्री सुक्त म्हणायला भजनी मंडळाचा ग्रुप घरी येणारं होता.

तर त्या मंडळातील बायकांना आल्यावर काय अल्पोपहार द्यायचा हे विचारायला ती माधुरी बाईंच्या रूम जवळ आली. तर माधुरी बाई कोणाशी तरी बोलतं होत्या. त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांना त्या विषयी विचारू अस मनाशी म्हणत ती किचनमधे कामाला परत जात होती.

इतक्यात तिच्या कानांवर माधुरी बाईंचा वैतागलेला स्वर पडला. त्यात तिच्या नावाचा उल्लेख होता. तिला वाटलं त्या तिलाच बोलवत आहेत. कदाचित त्यांनी तिला रूम जवळ आलेलं बघितलं असावं. असा अंदाज करत ती मागे वळली.

तर माधुरी बाई खिडकी कडे तोंड करून बोलतं होत्या. मनातला राग आवरण्या साठी त्यांनी खिडकीचे गज हातात गच्च आवळून धरले होते.

" ईश्वरी पण ना कधी कधी डोक्याला ताप देत असते ग ! आता आजचं घे. तिने कसले ते जाळीचे पडदे आणले आहेत.

घराला शोभतील असे तरी आणायचे ना ! तिला ना काहीही खरेदी करायची अक्कलच नाही आहे.

आता मला सांग, या घरासाठी तु किती काही करत असते. नेहमी घराच्या सजावटीचा निर्णय तूच तर घेते ना ! मग काल आलेल्या मुलीला कशाला डोकं चालवयाची गरज आहे ?

मागच्या वेळी पण ते कसले तरी रंगी बेरंगी कॉफी चे कप घेउन आली. ना त्यांना काही एक ठराविक रंग. ना कोणता आकार. सहा रंगाचे सह कप. ते पण हे एवढे हातभर मोठे. तोंडाशी निमुळते. घासायला किती त्रास. पण तिला पटेल तेंव्हा ना !