म्हण : नाव मोठं लक्षण खोटं
थोर समाजसेविका म्हणून तिची ख्याती होती. गरीब गरजू लोकांना ती मदत करते हे ऐकून ते वृद्ध जोडपे मदत मागायला तिच्या घरी गेले. बराच वेळ दाराबाहेरच्या बाकावर बसून राहिल्यावर एक बाई आतून बाहेर आली. तिच्या हातात जेवणाची दोन ताटं पाहून त्याने कोणासाठी म्हणून विचारलं.
“बाहेर गेस्टहाऊसमध्ये राहणाऱ्या त्यांच्या आईबाबांसाठी..”