चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
लघुकथा
काव्या बेडवर वेफर्स खात बसली होती कुरूम कुरूम आवाज करतं इतक्यात तिची आई तिथे आली.
" हे..हे आवाज करणं बंद कर गं अगोदर काव्या. लहान राहिली आहे का तू आता?
कितीवेळा सांगायचं की जरा स्वतःकडे लक्ष दे, योगा कर पण नाही हे दिवसभर असं चरत बसायचं कानात हेडफोन टाकून म्हणूनच दिवसेंदिवस त्या शेजारच्या मालू काकू सारखी होत आहेस". आई ओरडते.

"अगं नलिनी हे कायं बोलणं झालं का? आपली लेक आहे तू कसं बोलत आहेस तिच्याशी आणि त्या मालन काकूंशी कायं तुलना करत आहेस आपल्या काव्याची" बाबा लेकीची बाजू घेतात.
" बघा ना बाबा आता मालन काकूंशी कुठे तुलना करतेय आई माझी? " काव्या लगेच बारीक चेहरा करून बोलते.
" हो मगं तुला कायं विद्या बालन म्हणू की सोनाक्षी सिन्हा? " आई तिरकसपणे बोलते तेव्हा काव्या म्हणते,
" अगं आई हळू बोल त्या दोघींचा असा अपमान केलास तर त्या दोघी जेलमध्ये टाकतील ना तुला? "
" अगं आई हळू बोल त्या दोघींचा असा अपमान केलास तर त्या दोघी जेलमध्ये टाकतील ना तुला? "
" मी कुठे अपमान केला?"
" बघा ना बाबा आता मला सोनाक्षी सिन्हा आणि विद्या बालन म्हणणं म्हणजे त्या दोघींचा अपमान केल्यासारख आहे की नाही?" काव्या मिश्किलपणे बोलते तेव्हा
बाबा काव्याला टाळी देतात.
बाबा काव्याला टाळी देतात.
" अहो टाळी कायं देताय तिला तुम्ही? " नलिनी जोरात ओरडतात तसे बाबा आणि काव्या हात खाली घेतात. आईच्या बोलण्यावर काव्या हाताची घडी घालून बसते)
" अहो तुम्हाला काही कळतं की नाही? हसताय कायं? आणि काव्या तू गं अठ्ठावीस वर्षाची घोडी झाली आहेस आजच पंचवीसाव स्थळ होतं कितीवेळा सांगते डाएट कर, जीमचे पैसे भरले पण कंटाळा करायचा, आणि दिवसभर हे असं चरत बसायचं. तुझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न होऊन मुलं झाली आणि तु बघ फक्त कमरेवर चरबीचे हेअर वाढवत आहेस दिवसेंदिवस " आईचे बोलणे ऐकून काव्या चिडून रूममध्ये निघून जाते.
" नलिनी आज जरा जास्तच बोललीस तू तिला अगं आपली मुलगी आहे ती आणि तुलाही माहित आहे लाखात एक आहे ती" काव्याला दुःखी पाहून बाबा तिच्या आईला बोलतात.
" हो मला माहित आहे पण तुम्ही वडील आहात तिचे मी आई आहे अहो आपल्या काव्याचे मन कितीही निर्मळ असले, ती स्वभावाने कितीही गुणी असली तरीही हल्ली समाजात फक्त मुलीचे सौंदर्य पाहिलं जातं हल्ली जिथे मुली झिरो फिगर बनवून अभिनेत्री सारख्या दिसायला पहातात तिथे आपल्या काव्याला कोण पसंत करणार? " आईचे बोलणे ऐकून घरांत स्मशान शांतता पसरते.
दोन दिवसांनंतर काव्याला पहायला मुलाकडचे येतात. काव्या रूममध्ये तयार होत असते.
" काव्या खूप छान दिसतेय तू " काव्याची मैत्रीण प्रिया तिला उद्देशून बोलते.
" काव्या खूप छान दिसतेय तू " काव्याची मैत्रीण प्रिया तिला उद्देशून बोलते.
" हो का पण मला माहित आहे आजही ज्या मुलाला भेटणार आहे तो नकारच देईल मला" काव्या म्हणते तशी प्रिया साशंकतेने पाहते तिच्याकडे.
" कमॉन काव्या तू निगेटिव्ह का विचार करतेस दरवेळी हे बघं तुझं मन जाणणारा मुलगा नक्की भेटेल तुला पाहते." प्रिया काव्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते.
" होप सो चल मी निघते उशीर झाला तर आई ओरडेल " काव्या रूमबाहेर निघते तशी प्रिया देखील तिच्या पाठोपाठ बाहेर येते आणि तिच्या घरी जाते.
काव्या ऑटोमधून भेटायचे ठरलेल्या कॅफेमध्ये पोहचते. ती आतमध्ये जाऊन एक रिकामी जागा पाहून तिथे बसते. इतक्यात तिच्या आईचा तिला फोन येतो.
फोनवरून आई तिला ती पोहचली की नाही हे विचारते तेव्हा काव्या तणतणतच म्हणते,
"हो आई मी पोहचले आहे कॅफेमध्ये हे बघं आणि काही खायचे ऑर्डर ही केले नाही पण तुमचा तो विवाह संस्थेतील मुलगा कधी येणार? मला येऊन पंधरा मिनिटे झाली"

"काव्या येईल गं तो तू जरा ही चिडचिड कमी कर आणि शांत बस बघू" आई तिला शांत व्हायला सांगते.
"आई आला वाटतं तो मुलगा बहूतेक मी ठेवते फोन " काव्या पट्कन फोन ठेवते आणि स्वतःचे केस व्यवस्थित करते.
समोरून एक तिच्याच वयाचा तरूण येऊन खुर्चीवर बसतो.
" हॅलो.. सॉरी मला ट्रॅफिक मुळे लेट झाला थोडा " असे म्हणत तो काव्याकडे पाहतो तशी काव्या चेहर्यावर बळजबरीने हसू आणतं" इट्स ओके.. " एवढेच म्हणते.
" हॅलो.. सॉरी मला ट्रॅफिक मुळे लेट झाला थोडा " असे म्हणत तो काव्याकडे पाहतो तशी काव्या चेहर्यावर बळजबरीने हसू आणतं" इट्स ओके.. " एवढेच म्हणते.
अमित चेअर वर बसतो.. पुढचे पाच मिनिट कोणीच काहीही बोलत नाही. शेवटी शांततेचा भंग करत अमित म्हणतो, "आपण काही ऑर्डर करूयात का? "
काव्या होकारार्थी मान दर्शवते. अमित वेटरला दोन कॉफी घेऊन यायला सांगतो आणि तो आता काव्याकडे वळतो.
काव्या होकारार्थी मान दर्शवते. अमित वेटरला दोन कॉफी घेऊन यायला सांगतो आणि तो आता काव्याकडे वळतो.
" बाय द वे एक बोलू का?"
" हो बोला..." काव्या मोजकेच बोलते.
"तुमचा जो फोटो पाठवला होता त्यामध्ये तुम्ही खूपच वेगळ्या दिसत होत्या " अमित काचरतच बोलतो. त्यावर काव्याचा आवाज वाढतो जरासा.
"वेगळ्या नाही तुम्हाला मी फोटोमध्ये थोडीशी बारीक दिसतेय असं म्हणायचं आहे तुम्हाला हो ना?
हे बघा मिस्टर.. " काव्या पुढे काही बोलणार इतक्यात अमित म्हणतो,
" माझं नाव अमित आहे आणि मला तसं नाही म्हणायचं म्हणजे.."

अमितचे बोलणे मधेच तोडतं काव्या म्हणते,
" हे बघा तुमचं नाव अमित किंवा अजून काही असू दे. तुम्हाला म्हणायचं नसेल तरी आहे तसचं. तो फोटो सहा महिन्यांपूर्वीचा आहे आणि आत्ता माझं वजन वाढलं आहे चार - पाच किलोने त्यामुळे वेगळी तर मी दिसणारच आणि तुम्हाला नकार द्यायचा असेल द्या बिनधास्त मला सवय आहे पण मी अशीच आहे मला खायला आवडतं खूप आणि प्रत्येक मुलीने झिरो फिगर मेंटन करायला हवी असं थोडीच आहे. प्रत्येक मुलाला वाटतं आपली बायको सुंदर हवी पण मी सुंदर नाही आय नो आणि तुम्हा मुलांच्या ज्या अपेक्षा असतात त्यात मी फीट बसत नाही सो इट्स बेटर आपण कॉफी पिऊन निघूयात "
काव्या एकसारखे बोलून मोकळे होते. ती शांत झालेली पाहून अमित म्हणतो,
" मिस काव्या तुमचं बोलून झालं असं समजतो मी.. किती बोलता तुम्ही बापरे! प्रोफाईल मध्ये मुलगी स्वभावाने बोलकी आहे लिहिलं होतं पण मुलगी एवढी बडबड करते माहित नव्हतं "

अमितचे बोलणे ऐकून काव्या हसते.
" हे बघा काव्या फक्त आम्ही मुलं अपेक्षा करतो असा गैरसमज आहे पण हल्ली अपेक्षा तर तुम्ही मुली कायं कमी करता कायं?
तुम्ही मला कायं सांगता नकाराची सवय आहे म्हणून मला पन्नास नकार आले आहेत आत्तापर्यंत " अमित बोलतो तेव्हा काव्या त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते आणि ती ओरडतेच.

"कायं? अहो पण तुम्हाला का कोणी नकार देईल म्हणजे फिगर मेन्टेन आहे.. वेल एज्युकेटेट आहात तुम्ही जॉब पण छान आहे की "
काव्याचे बोलणे ऐकून अमित म्हणतो," हो जॉब छान आहे, शिक्षण छान आहे पण स्वतःच घर नाही, कार नाही शिवाय मी माझ्या आई वडिलांना नाही सोडू शकतं म्हणून आत्तापर्यंत पन्नास मुलींनी मला नकार दिला आहे
तुम्हाला कायं वाटतं नकार फक्त तुम्हा मुलींनाच दिला जातो नाही हल्ली सगळ्यात जास्त नकार आम्हा मुलांना मिळतो
तुम्हाला कायं वाटतं नकार फक्त तुम्हा मुलींनाच दिला जातो नाही हल्ली सगळ्यात जास्त नकार आम्हा मुलांना मिळतो
तुम्हा मुलींकडून सुंदर आणि थोडेफार घरकाम येणे आवश्यक या व्यतिरिक्त कायं अपेक्षा केली जाते? पण आम्हा मुलांकडून मात्र मुलगा वेट सेटल हवा, शहरात घर, गाडी हवं, मोठा पगार हवा
म्हणजे लग्नासाठी वर शोधताय की एखादी वस्तू घेताय एवढ्या सगळ्या अपेक्षा ठेवायला? "
म्हणजे लग्नासाठी वर शोधताय की एखादी वस्तू घेताय एवढ्या सगळ्या अपेक्षा ठेवायला? "
अमितचे परखड बोल ऐकून काव्याचे डोळे उघडतात.
" खरंय तुमचं. संसार हा मुलगा आणि मुलगी दोघांचाही असतो मगं जबाबदारी वाटून घ्यायला हवी एकावर भार देऊन कसे चालेल? "
" खरंय तुमचं. संसार हा मुलगा आणि मुलगी दोघांचाही असतो मगं जबाबदारी वाटून घ्यायला हवी एकावर भार देऊन कसे चालेल? "
" हो ना पण हल्ली ते पटतय कुठं? मान्य आहे तुम्ही मुली आपलं घर सोडून येता तेव्हा, आई बाबांना काळजी असते त्यामुळे एक सुरक्षितता हवी पण आयुष्यभराच्या सोबतीची सुरक्षा महत्त्वाची की त्यापेक्षा मुलाजवळ घर, कार असणं महत्त्वाचं? " अमित बोलतो तेव्हा त्याल दुजोरा देत काव्या म्हणते,
" हो बरोबर आहे मलाही तेच म्हणायचं आहे. सौंदर्य महत्त्वाचे की एखाद्या मुलीचा स्वभाव कारण सौंदर्य कायं तात्पुरतं असतं पण स्वभाव तो आयुष्यभर तसाच राहतो" आणि संसार हा सौंदर्यावर नाही तर स्वभावावर करता येऊ शकतो आयुष्यभर
सौंदर्य पाहून लग्न केले तर तो व्यवहार होईल पण मला आजपर्यंत नकार, मी सुंदर नाही हे कारण सांगून दिले गेले " तेव्हा अमित म्हणतो,
सौंदर्य पाहून लग्न केले तर तो व्यवहार होईल पण मला आजपर्यंत नकार, मी सुंदर नाही हे कारण सांगून दिले गेले " तेव्हा अमित म्हणतो,
" एक मिनिट लोक कायं म्हणतात त्याकडे तुम्ही का लक्ष देताय? आणि कोण म्हणतं तुम्ही सुंदर नाही"
" म्हणजे?... " काव्या गोंधळून विचारते.
" हे पहा सौंदर्य हे बघणारी व्यक्ती असते ना तिच्या दृष्टीकोणावर अवलंबून असतं आणि मला विचारालं तर तुम्ही खूप सुंदर आहात कारण जाड असण्याचा आणि सुंदर दिसण्याचा काहीच संबंध नाही " अमि च्या बोलण्यावर काव्या खळखळून हस्ते.
" काव्या एक विचारू?.."
"हो विचारा नाss " काव्या होकार दर्शवते.
" तुम्हाला लग्न करायला आवडेल का माझ्याशी? " अमितचे बोलणे ऐकून काव्या अवाक् होऊन एकसारखे त्याच्याकडे पाहते. एक दीर्घ श्वास घेऊन ती म्हणते,
"खरंतर मी इथे मला नकार येईल हेच समजून आलेले पण तुम्हाला भेटले आणि माझा एकूणच या विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला खरंय शेवटी आपण प्रत्येक गोष्टीकडे कुठल्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्त्वाचं आहे" अमित काव्याच्या हातावर हात ठेवतो तशी काव्या लाजते.
"काव्या आपण जसे आहोत तसे सुंदर आहोत त्यामुळे स्वतःला कमी लेखू नये लोकांच्या चष्म्यातून स्वतःकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या नजरेतून एकदा स्वतःकडे पहा आणि स्वतःला सांगा की
तुम्ही खूप सुंदर आहात " अमितचे बोलणे ऐकून काव्या हसते.
तुम्ही खूप सुंदर आहात " अमितचे बोलणे ऐकून काव्या हसते.
*समाप्त*
©ऋतुजा कुलकर्णी - सावजी✍️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा