नवा जन्म घेई विजेता.
दर वर्षी प्रमाणे यंदाही ईरा चॅम्पियन्स ट्रॉफीचे वारे वाहू लागले आणि त्यात भाग घेण्याचा मोह काही आवरला नाही. ह्या स्पर्धेत भाग घेण्याचा महत्वाचा उद्देश होता तो म्हणजे नवीन काही तरी शिकायला मिळेल. अगदी तसंच झालं स्पर्धा सुरू झाल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेगवेगळे अनुभव आले आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
स्पर्धेसाठी संजना मॅमकडे नाव दिले. उत्सुकता होती आपल्या टीममध्ये कोण असणार? शेवटी तो दिवस आला आणि चिठ्याद्वारे कोण कोणत्या ग्रुपमध्ये जाणार हे कळले. माझं नाव ज्या ग्रुपमध्ये आलं ते पाहून सकारात्मक वाटलं कारण त्या ग्रुपमध्ये सगळ्याच लेखकांनी स्वतःच्या लिखाणाने वाचकांवर वेगळी छाप सोडली आहे. खरं तर तेव्हाच मनातून आवाज आला आपली टीम नक्की जिंकणार. स्पर्धा होती म्हणून थोडी धाकधूक होती, पण तरीही शेवटपर्यंत एक विश्वास होता विजय माझ्या संघाचा होणार.

संजना मॅमनी ग्रुप बनवले. कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न मनात होता. शिल्पा सुतार, जानकी कटक, सर्वेश सर ह्यांनी कॅप्टन पद स्वीकारावे म्हणून सांगितले. बाकीचे संघातील सदस्यांनी देखील मी कॅप्टन व्हावे म्हणून वोट केला. खरंतर तेव्हाच एक डोक्यावर जबाबदारी आली आणि माझ्याकडून शंभर टक्के देण्याचा प्रयत्न मी करत होते. ही स्पर्धा वयक्तिक नसून सामूहिक होती, त्यामुळे थोडा विचार करावा लागत होता. विद्या, हेमा ताई, सर्वेश सर आणि मी चौघेही ग्रुपमधील प्रत्येक कथा तपासून देत होतो. तिघांनी देखील ही जबाबदारी स्वखुशीने घेतली. जलद, लघुकथा,सुविचार, अलक ह्या फेऱ्या आणि ग्रुपमध्ये तेरा सदस्य होते.
सर्वांचे लिखाण बारकाईने तपासून पुढे जावं हाच उद्देश होता. प्रत्येक फेरी होत गेली आणि सर्वांनीच छान छान लिखाण दिलं.
सर्वांचे लिखाण बारकाईने तपासून पुढे जावं हाच उद्देश होता. प्रत्येक फेरी होत गेली आणि सर्वांनीच छान छान लिखाण दिलं.
शिल्पा सुतार, शिल्पा परुळेकर, चेतन सर, सुशांत सर, ऋतुजा, मीनाक्षी ताई, जानकी मॅडम, हेमा ताई, विद्या, सर्वेश सर, खुशी, रेखा ताई प्रत्येकाने संघ जिंकावा म्हणून शेवट पर्यंत प्रयत्न केले.
शिल्पा सुतार - बस नामही काफी है, शिल्पाला कोण ओळखत नाही? ईरावर शिल्पाने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. शिल्पाच्या कथांची जादूच वेगळी. तिनेही स्पर्धेसाठी सुंदर कथा दिल्या.
शिल्पा परुळेकर - ईरावर नवीन असल्या तरी त्यांनी ज्या कथा लिहिल्या त्या कथा वाचून अंगावर काटा आला. खरंच वास्तववादी लिखाण केले आहे. सामाजिक लिखाण उत्तम प्रकारे हाताळलं आहे.
चेतन सर - चेतन सरांचे वैशिष्ट्य हे की स्पर्धेबाबतीत ते खूप उत्साही होते. सर्व फेऱ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या लेखणीची वेगळी जादू दाखवली. अलक, लघुकथा अनेक फेरीत त्यांना पारितोषिक मिळाले. खरंच उत्साह असावा तर असा. सतत शिकत राहण्याची वृत्ती मनाला भावली.
सुशांत सर - सुशांत सरांनी देखील सामाजिक विषय सुंदररित्या मांडले आहे. त्यांच्या लिखाणात ग्रामीण भाषेचा जो गोडवा आहे तो अप्रतिम आहे. सरांनी देखील सर्व फेऱ्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. खरंच आशयपूर्ण लिखाण केले आहे.
ऋतुजा - ऋतुजाची लेखणी देखील कमी नाही. वेगवेगळ्या विषयावर लिखाण सुंदररित्या केले आहे. सुरवातीच्या काळापासून ईरावर ऋतुजाने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. ऋतुजा देखील टॉप लेखकांच्या यादीत आहे.
मीनाक्षी ताई - ताईंचा उत्साह देखील जबरदस्त होता. अगदी डोळ्याचा प्रॉब्लेम असून सुद्धा त्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. शांत आणि समजूतदार असं व्यक्तिमत्व आहे. वेळोवेळी ग्रुपमध्ये त्या उत्साह वाढवत होत्या. सकारात्मक अश्याच आहेत.
जानकी कटक - जानकी मॅडम देखील स्पर्धेत सामील झाल्यापासून स्पर्धा कशी जिंकता येईल ह्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांचं लिखाण देखील जबरदस्त आहे. सुंदररीत्या कथा मांडणी आणि आशय वाचकांपर्यंत पोहोचवतात. स्पर्धेसाठी ज्या कथा दिल्या त्या देखील जबरदस्त होत्या.
हेमा ताई - हेमा ताईंनी प्रत्येक वेळी मदत केली. व्याकरण तपासण्यापासून ते अनेक गोष्टी त्यांनी मनापासून केल्या. प्रत्येक फेरीत त्यांनी लेखणीची जादू काय असते हे दाखवून दिले. शांत आणि समजुतदार अश्याच आहेत ताई. वेळोवेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.
विद्या कुंभार - विद्याने स्वतःच्या लेखणीची वेगळी छाप सोडली आहे, व्याकरण तपासणी असो वा स्पर्धेच्या इतर गोष्टी विद्याने पुढाकार घेतला आणि मन लावून सगळ्या गोष्टी केल्या.
वेगवेगळे विषय उत्तम पद्धतीने मांडले आहे.
लघुकथा,जलद कथा, अलक सर्वच फेऱ्यामध्ये
विद्याने सुंदर कथा दिल्या. शेवटपर्यंत कार्यरत राहिली.
वेगवेगळे विषय उत्तम पद्धतीने मांडले आहे.
लघुकथा,जलद कथा, अलक सर्वच फेऱ्यामध्ये
विद्याने सुंदर कथा दिल्या. शेवटपर्यंत कार्यरत राहिली.
सर्वेश सर - सरांचे लिखाण देखील वेगळीच छाप सोडणारे आहे. सर्व प्रकारचं लिखाण छान पद्धतीने हाताळतात. सामाजिक विषय आणि मांडणी सुंदररीत्या हाताळली आहे. सर्वेश सरांनी देखील व्याकरण तपासणीसाठी पुढाकार घेतला. स्पर्धेसाठी त्यांचीही मोलाची मदत झाली. वेळोवेळी मार्गदर्शन केले.
खुशी - उत्साहाचा झरा म्हणजे खुशी. सतत कार्यरत राहणारी अशी खुशी. बोलकी, हसरी आणि तितकीच तडफदार आहे. खुशीच्या लिखाणाचे वैशिष्ट्य हे की तिची लेखणी ही प्रेरणा देणारी अशीच आहे. स्पर्धेसाठी सुंदर कथा दिल्या. तिचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे.
रेखा ताई- रेखा ताई शांत आणि नदीप्रमाणे आहेत. नदी जशी आपला मार्ग शोधते अश्याच आहेत त्या. सर्व फेरीमध्ये त्यांनी भाग घेतला. लघुकथा,जलद कथा, विडिओ. सर्वात आधी त्यांनीच विडिओ बनवला. खरंच क्रियाशील कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं. कामात सातत्यपूर्ण कसं राहावं हे त्या जाणतात.
तर असे हे माझ्या संघातील सदस्य. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, प्रत्येकाची लिखाणाची शैलीही वेगळी, पण एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे " ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५." आपणच जिंकायची हा ध्यास.
शेवटी तो दिवस आला.
७ जानेवारी रात्री ९:३० ला संजना मॅम निकाल सांगणार होत्या.
शांत झालेला ग्रुप पुन्हा किलबिल करू लागला. आम्ही एक एक मिनिटं मोजू लागलो. कधी एकदाचे साडे नऊ होतात ही वाट बघत बसलो. शेवटी तो क्षण आला.
संजना मॅम प्रत्येक फेरीमध्ये कोण कोण जिंकलं हे सांगू लागल्या, चेतन सर,हेमा ताई,विद्या, सुशांत सर फेरी विजेते ठरले. त्यांचं नाव ऐकून आनंद झाला.
तेव्हाच वाटलं आपणच एक नंबर वर असणार.
मॅम वेगवेगळे पारितोषिक देत होते. सर्वांचीच नावं आली. संजना मॅमनी शब्द रत्न पुरस्कार दिला आणि त्यांनी जे कौतुक केलं त्याने मन भारावून गेलं, ते कायम लक्षात राहील.
तेव्हाच वाटलं आपणच एक नंबर वर असणार.
मॅम वेगवेगळे पारितोषिक देत होते. सर्वांचीच नावं आली. संजना मॅमनी शब्द रत्न पुरस्कार दिला आणि त्यांनी जे कौतुक केलं त्याने मन भारावून गेलं, ते कायम लक्षात राहील.
आता वेळ आली होती
"ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५" विजेता घोषित करण्याची. ह्रदय जोरजोरात धडधड करत होतं. श्वास दोन मिनिटासाठी थांबले जणू.
आणि.
.
.
.
"ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता टीम ठरली "टीम अश्विनी"
"ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५" विजेता घोषित करण्याची. ह्रदय जोरजोरात धडधड करत होतं. श्वास दोन मिनिटासाठी थांबले जणू.
आणि.
.
.
.
"ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता टीम ठरली "टीम अश्विनी"
हो आमची टीम जिंकली. अंगातून जणू वीज चमकून गेली असंच झालं. डोळ्यात आनंदाश्रू होते. आमच्या टीम मधील प्रत्येकाने केलेली मेहनत सफल झाली. आम्ही सगळेच खुश होतो. ग्रुपवर सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत होते. खरंच हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. काही आनंद हा शब्दापलीकडील असतो. तो फक्त अनुभवता येतो. त्यांना काही केल्या शब्दात गुंफता येणार नाही.
बरं एक जाता जाता सांगते.
एक दिवस आधी सहा तारखेला रिल्सवर प्रेरणादायी गाणं ऐकलं "हार जीत ही लपंडाव रे, जिद्द राहू दे मनी झुंझायची पुन्हा." हे गाणं स्वतःलाच फॉरवर्ड केलं कारण मला खात्री होतं की आमची टीम जिंकणार आणि ते गाणं टीम अश्विनी सदस्यांच्या फोटोमागे बॅकग्राउंडला लावायचं. हो आणि तसंच झालं, टीम जिंकली आणि ते गाणं मी बॅकग्राऊंडला लावलं आणि आमच्या ग्रुपवर पाठवलं. काय भारी वाटत होतं काय सांगू?

खरंच हा अतिविश्वास नव्हता, हा विश्वास होता माझ्या ग्रुपमधील प्रत्येकावर, त्यांनी केलेल्या दिवस रात्र मेहनतीवर.
माझ्या मैत्रिणी प्रज्ञा,स्मिता ह्या तर सुरुवातीलाच बोलल्या होत्या की, अश्विनी तुझीच टीम जिंकणार. आपलं जवळचं कोणी जेव्हा आपल्यावर विश्वास दाखवतं तेव्हा अजून बळ येतं. बरोबर ना?
मीनाक्षी, नामदेव सर, स्मिता,प्रज्ञा आणि सर्वच मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या.

मला स्पर्धेसाठी जबरदस्त टीम लाभली आणि त्यामुळेच हे यश आम्ही संपादन करू शकलो.
हा विजय अविस्मरणीय आहे.
हा विजय अविस्मरणीय आहे.
तर अशी ही वर्ष २०२६ ची सुरवात जबरदस्त झाली आहे.
महत्वाचं म्हणजे संजना मॅम, त्यांनी ईरासारखा इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिला, सर्व लेखकांना एकत्र आणले. विविध स्पर्धा राबवून, ट्रॉफी,सर्टिफिकेट देऊन सर्वांना स्वतःविषयी आत्मविश्वास दिला. ईरामुळे लाखो वाचकापर्यत पोहोचण्याची संधी दिली. मानधन दिलं.
ह्या सर्व गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद संजना मॅम, आणि संपूर्ण ईरा टीम.
_________
समाप्त - अश्विनी ओगले.
१०-१-२०२६.
१०-१-२०२६.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा