नवलाई 4 अंतिम

नवी नवरी

रुटीन सुरू झालं, नवरी चहाचा कप घेऊन नवऱ्याला द्यायला आली आणि त्याच्या शेजारी बसली. मुलाला हे सगळं नवीन होतं, तो लाजायचा आणि घाबरायचाही... तेवढ्यात कविता तिथे आली...

"घाबरतोस काय रे? तुझी बायको आहे ना ती? सकाळी कामाला जातोस ते संध्याकाळीच परत येतोस, तिच्यासोबत वेळ कधी घालवणार? बसा तुम्ही गप्पा मारत, मी जरा चक्कर मारून येते.. नव्या नवलाईचे दिवस आहेत तुमचे, असेच थोडी ना वाया जाऊ देणार??" असं म्हणत कविताने एकदा सासूबाई आणि नवऱ्याकडे पाहिलं...

नवऱ्याला आत्ता सगळी जाणीव होत होती, आपले नव्या नवलाईचे दिवस आईने कसे खराब केले, तो सोनेरी काळ कसा धूसर बनवला...तो सुद्धा आईकडे रागाने कटाक्ष टाकत असे...आणि दुसरीकडे आपण किती मूर्ख होतो याचाही त्याला पश्चाताप होत असायचा...

संध्याकाळी कविताचा मुलगा घरी आला. त्याच्या बायकोने त्याला पाणी दिलं, चहा दिला.. मुलगा तिथेच tv लावून बसला.

कविता आली आणि मुलाला तिने रागवलं,

"आल्या आल्या tv जास्त प्रिय झाला का तुला? जा खोलीत जा..तुझ्या बायकोलाही पाठवते मी...गप्पा मारा मग या जेवायला बाहेर...तुझ्यासोबत वेळ मिळावा म्हणून सुनबाईने तू यायच्या आधी स्वयंपाक बनवून ठेवलाय बघ.."

नवीन नवरी घाबरली, सासूबाईंना कसं समजलं हे?

कविता आपल्या सुनेकडे बघून म्हणाली,

"जा पोरी...जेवायच्या वेळी आवाज देतो तुम्हाला.."

सुनेला खरंच तिच्या नवऱ्यासोबत बोलायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या...आणि कविताने स्वतःहून ते घडवून आणलं..

सासूबाईंना कुठे तोंड लपवू आणि कुठे नको असं झालेलं..नवरा तर स्वतःला दोष देत होता..काहीही न बोलता कविताने कृतीतून सगळं दाखवून दिलं होतं...

कविताच्या नवऱ्याला आता समजलं, त्याच्या बरोबरच्या जोड्यांमध्ये कमालीचं प्रेम, कमालीची बॉंडिंग दिसायची.. ती कविता आणि त्याच्यात नव्हती.. याचं कारण त्याला हळूहळू समजू लागलं...

पण आता वयही निघून गेलेलं,