नावात काय आहे भाग २
आज ऑफीसला जाताना थोडा नर्व्हस होता . त्यालाही आई बाबांची कळकळ कळत होती काय करू? समोर येईल त्या मुलीला होकार देऊन टाकू का ? कसा होईल असला संसार .. आई बाबांचा आदर्श संसार मी डोळ्याने बघत आलोय जर माझ्या लाईफ पार्टनर बद्दल मला काही फीलींगस नसतीलच तर मी तिला योग्य तो मानसन्मान देऊ शकेन का ? करायचं म्हणून संसार करण्या पेक्षा थोडे थांबून मला जोपर्यंत हीच माझी जोडीदार अशी वाली फिलिग येत नाही तोपर्यत थांबू शकतोच ना मी .
असा विचार करता करता ऑफिसला आला . थोड्या वेळात कामात बिझी झाला तेव्हा सगळ्या विवंचना विसरून गेला .
संध्याकाळी निघणारच होता तर हेड ऑफिसकडून मेल आला होता त्याला पुढील सहा महिन्यासाठी त एका प्रोजेक्ट लीड साठी हेड ऑफिसला बोलावलं होत. एक प्रकारे प्रमोशनचा होतं . खूप आनंद झाला त्याला .त्याचा कलीग समीर त्याचं पण प्रमोशन झाले होते आणि दोघे पुढील आठवड्यात हेड ऑफिसला शिफ्ट होणार होते
त्याने लगेच समीर ला कॉल केला .. तर समीर चा फोन बिझी आला .तुषारला राहवलं नाही तो स्वतः उठून समीरच्या डेस्क जवळ गेला तर त्याच्या लक्षात आलं समीर त्याच्या बायकोशी बोलत होता .एवढी आनंदाची गोष्ट कष्ट करून मिळालेलं फळ म्हणजेच प्रमोशन असते पण समीर पुढे अनेक प्रश्न होते .. त्याची बायको ८ महिने प्रेग्नंट होती . आत्ता नको त्या वेळी प्रमोशन मिळालेय असे झाले होते . बायकोला आनंद झाला होता पण आता जेव्हा नवर्याच्या साथीची गरज आहे तेव्हाच तो आपल्या पासून दूर जाईल म्हणून जरा घाबरली होती .. तो समजूत काढत होता तिची .
समीरच बोलणं संपत नाही म्हणून तो पुन्हा आपल्या डेस्क कडे निघाला होता पण मनातुन एकदम आनंदून गेला .. माझे लग्न झाले नाही म्हणून ह्या संधीचा मला नक्कीच फायदा होईल .. मागे कोणतेही फास नाहीयेत . समीर बहुतेक हे प्रमोशन स्वीकारणार नाही असे दिसतंय .
संध्याकाळी घरी जाताना त्याने पेढे विकत घेतले . आई बाबा आपली हि बातमी ऐकून नक्कीच खुश होतील .. आज संध्याकाळी मस्त फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवायला जाऊ .. असा मनात प्लॅन करतच तो घरी पोहचला
घरी आला बघतो तर घराला कुलूप . कदाचित आई बाबा देवळात गेले असतील म्हणून त्याच्या कडच्या चावी ने घर उघडून आत आला .. मस्त अंघोळ करून फ्रेश झाला देवापुढे दिवा लावलेलाच होता .. त्यापुढे पेढे ठेवले . हात जोडूननमस्कार केला . मग टी व्ही समोर बसला .
बराच वेळ झाला आई बाबा आले नाहीत म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला तर समीर च स्टेट्स दिसले त्याच्या बायको बरोबर डिनर डेट एन्जॉय करताना .त्याने लगेचच आई ला फोन लावला..
आई " तुषार .. आलास का घरी तू ? आम्ही आलोच हा .. अरे ते बाबांचे मित्र जोशी आहेत ना त्यांच्या घरी त्यांच्या नातीचा वाढदिवस होता .. आम्ही इकडेच जेवून येतो आज .. तू ना तुला काहीतरी पिझ्झा ऑर्डर कर .. नको असेल तर दुपारचा आमटी भात आहे .. तो गरम करून खा "
तुषार " ठीक आहे "
बिचारा तुषार !.एवढी आनंदाची गोष्ट पण शेअर करायला म्हणून असे म्हणून हक्काचं असे कोणी नव्हतं .. आई बाबा आहेतच आणि ते थोड्या वेळात येतीलच आणि ते खूप खुश होतीलच ..जसे समीरला त्याचा आनंद शेअर करायला त्याच्या बरोबरचं असे कोणीतरी होते तसे हक्काचं आज कोणी नव्हतं .
तुषारने होता तो आमटी भात जेवला आणि झोपायला गेला .
झोपायच्या आधी आज जरा एकांत मिळाला म्हणून त्याने त्याची कॉलेज मधली डायरी काढली आणि वाचू लागला
जस जशी डायरी वाचली तसे हसू आले चेहऱ्यावर . शाळेत एक मुलगी होती तिचे नावं होते शिवानी .. शिवानी विषयी त्याने खूप काही लिहले होते .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा