Login

नावात काय आहे भाग 3

Importance Of Name
नावात काय आहे भाग ३
शिवानी आणि त्याची अशी कधी मैत्री झालीच नाही . नुसता लांबून लांबून बघायचा तिच्याकडे . शाळेतली मॉनिटर असायची ती . सगळ्या शिक्षकांची लाडकी असायची . तुषार राहायचा त्याच्या पुढच्या गल्लीतच राहायची . तुषार मात्र मितभाषी होता . फार कोणाशी बोलायचा नाही .. तो बोलत नाही म्हटल्यावर मॉनिटर असूनहि ती कधी तुषारशी बोलली नाही .. होमवर्क चेक करायची तेव्हाच काय ते बोलणे . तिला आपले नाव कळावे म्हणून तुषार ने एक दोनदा मुद्दामून होमवर्क केला नव्हता . म्हणजे ती आपले नाव विचारेल आणि ज्यांनी होमवर्क केला नाही त्यांचे नाव ती विचारून फळ्यावर लिहून ठेवायची .. त्या निमित्ताने तरी तिला आपले नाव कळेल अशी वेड्याची आशा .

पुढे दहावीत तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती कायमची तुषारच्या आयुष्यातून नसलेली एकमेव मैत्रीण निघून गेली होती .

कालांतराने त्याला तिचा विसर पडला होता . पण जेव्हा फेसबुकला अकऊंट ओपन केलं तेव्हा त्याने सर्वात पहिले तीच नाव टाकून तिला शोधण्याचा प्रयन्त केला होता . हे आठवून तुषार आता हसू लागला .

खोल कुठेतरी मनात शिवानी घर करून बसलेली त्यामुळे कोणत्याच मुलीकडे त्याने बघितले नाही . किंवा त्याला आवडलीच नाही . आणि हि त्याची नसलेली असेलेली मैत्रीन फक्त त्यालाच माहिती होती . ना त्याने तिच्या बद्दल कोणाला सांगितले होते .. फक्त त्याची डायरी च काय ती एकमेव साक्षीदार होती.

पुढे तुषार हेड ऑफिसला शिफ्ट झाला . सहा महिने म्हणता म्हणता एक वर्ष तिकडेच राहिला .
त्याचे आई वडील मात्र अजूनही काळजीत होते . तिशी उलटून गेली कधी ह्या मुलाचं लग्न होयच ? कधी संसार रुळावर येईल या काळजीने आईने अंथरूण धरले .

हेड ऑफिसच्या सिटी मध्ये आई बाबा कंपनीच्या फ्लॅटवर येऊन जाऊन असायचे . ह्यावेळी बाबांनी त्याला आता लग्नाला तयारच करायचं असे ठरवूनच आले होते . येताना त्यांनी वधू वर सूचक मंडळातून चार पाच स्थळं घेऊन आले होते .

इकडे सगळ्या कामासाठी त्याने बाईचं लावली होती आणि बाबा सुद्धा आवडीने खायचे .

जेवण झाल्यावर "
बाबा " तुषार , आता बस झाले ? तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे मला कळलाच पाहिजे ? का लग्न करत नाहीस तू ? नक्की काय अपेक्षा आहे तुझी ? कशी मुलगी पाहिजे ? कोणी दुसऱ्या जातीची मनात आहे का ? जे काही असेल ते स्पष्ट बोल .. जोपर्यंत तुझे लग्न होत नाही तोपर्यंत आई वडील म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडतोय असे वाटत राहतं आम्हाला "

आई डोळ्यांत अश्रू आणून " माझ्या मुलाच्या वाट्याला असे का? माझा एकुलता एक मुलगा लग्नच करायला मागत नाही . कोणत्या देवाला नवस करू असे झालंय मला "

तुषार आईजवळ गेला " आई .. सॉरी ना .. प्लिज रडू नकोस ना "

बाबा " हे बघ .. हि स्थळं आहेत .. सगळ्या मुली एकास एक आहेत . शिकलेल्या आहेत . कमावत्या आहेत , हुशार आहेत , दिसायलाही सुंदर आहेत . ह्यातली कोणी पसंत आहे का ती बघ "
तुषार उठून जायला निघाला तसा आईने त्याचा हात पकडला" तुषार .. नाही नको म्हणूस.. मी काही आता फार दिवस जगेल असे वाटत नाही मला .. मी मरायच्या आधी तुझं सगळं व्यवस्थित झालेलं बघायचंय मला "

बाबा चिडूनच " काय बोलतेस सुलभा .. अग मरायच्या कसल्या गोष्टी करतेस ?"

शेवटी तुषार ने समोरचा मुलींच्या प्रोफाइलचा गठ्ठा हातात घेतला

त्यातल्या सगळ्यात शेवटच्या मुलींचे प्रोफाइल त्याने बाजूला काढले आणि आई जवळ दिले

तुषार " हि मुलगी मला पसंत आहे "

बाबांनी आनंदाने ते प्रोफाइल हातात घेतले .. सगळ्यात शेवटची म्हणजे बाबांना कमी पसंत असे ते स्थळ होते . दिसायलाही थोडी निम गोरी होती . म्हणावं तशी खूप काही शिकलेली पण नव्हती . पण आता आपल्या मुलाला हे स्थळ आवडले ह्यातच त्या दोघांना आनंद होता .

लगेचच पुढल्या महिन्यात बघण्याचा कार्यक्रम झाला . त्यांच्याकडून पण होकार आला . लग्नाची तारीख पण काढली .. पत्रिका छापल्या .. मुलगी तुषार पेक्षा लहान होती . पण एकदम चुणचुणीत होती . हसतमुख होती त्यामुळे त्यांच्या सर्व नातेवाईकांना पण ती आवडली होती .

जसे लग्न ठरले त्याने त्याच्या शाळेच्या मित्रांना फेसबुक ला शोधून शोधून ऍड केले ..काहींचे नंबर मिळाले. त्यातल्या एकाने त्याला त्यांच्या शाळेच्या ग्रुप मध्ये ऍड केले .

जसा तो व्हाट्स अप ग्रुप मध्ये ऍड झाला तेव्हा त्याला कळले कि शाळेतले सगळे ह्या ग्रुप वर खूप गप्पा मारतात , मज्जा करतात ..

इतके दिवस कुणीकडे होतास .. कोणाच्याच टच मध्ये नव्हतास असे प्रश्न त्याला सर्वच विचारत होते . तुषारला आता मज्जा वाटू लागली इतके दिवस तो आणि त्याच काम या व्यतिरिक्त काहीच माहित नव्हते त्याला .

व्हाट्स ग्रुप वर त्याला कळले कि शिवानी इथेपण आहे.. तिचं लग्न झालंय .. आता मोठी वकील झालीय .. तिच्या बद्दलची बरीच माहिती त्याला मिळाली .

शिवानी च्या स्वभावानुसार तिनेही त्याला ग्रुप चॅट मध्ये विचारले होते .. काय रे ? कसा आहेस? काय करतोस .. वगैरे फॉर्मल गप्पा झाल्या होत्या.

जशी लग्नाची डेट जवळ आली तेव्हा त्याने त्याच्या लग्नाची पत्रिका ग्रुप वर पाठवली . सर्व मित्र मैत्रिणीना आग्रहाचे आमंत्रण दिले . ज्यांना शक्य आहे ते येणारही होते लग्नाला .

तुषार वेड्स शिवानी !!

असे पत्रिकेवर लिहिले होते .

समाप्त!!

🎭 Series Post

View all