नववी माळ देवी सिद्धिदात्री
“या देवी सर्वभूतेषु मा सिध्दिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:||”
नवरात्रीचे आठ दिवस बघता बघता सरले. नवरात्रातील नवव्या दिवशी नवदुर्गेतील अखेरचे स्वरूप म्हणजे सिद्धीदात्री देवीचे पूजन केले जाते. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून हो देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते.
ही देवी कमळावर विराजमान असून देवीच्या एका हातामध्ये शंख, दुसर्या हातात गदा, तिसऱ्या सुदर्शन चक्र व चौथ्या हातात कमळाचे फूल आहे.
पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदकावर अचूक नेम साधीत भारतासाठी शानदार कामगिरी करणारी पॅरा पिस्तूल नेमबाज म्हणजेज रुबिना फ्रांसिस देवी सिद्धिदात्रीची अनुभूती देते. देवी सिद्धिदात्रीप्रमाणे रुबिनाच्या एका हातात युद्ध भूमीला टक्कर देणारा शंख, दुसर्या हातात शारीरिक व मानसिक समस्यांना निपचित पाडणारी गदा, आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी सुदर्शन चक्र धारण करणार्या रुबिनाने कीर्ती व यशरूपी कमळही घेतले आहे.
जरी मुडदूस आजाराने ४० टक्के हाडांची गुणवत्ता कमी केली असली तरी ध्येयपूर्तीचा ध्यास हा १०० टक्के आहे आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, मेहनत, समर्पण व निष्ठेने ह्यावर अधिराज्य गाजविले. “चक दे इंडिया” म्हणत रुबिनाने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील तिच्या कर्तृत्वाची उंची दाखवून दिली.
रुबीनाला भेदक नेमबाजीने येणार्या संकटांना पायचित करून फक्त यश व कीर्तीचाच निशाना उत्तुंग लागावा हिच देवी सिद्धीदात्री चरणी प्रार्थना.
“जरी मुद साने हाडाची शक्ति केली कमी
तरी जिद्द व कष्टानी अनेक पदकांची केली कमाई.”
तरी जिद्द व कष्टानी अनेक पदकांची केली कमाई.”
प्राजक्ता जोशी सुपेकर
११|१०|२०२४
११|१०|२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा