नवी आशा जगण्याची... भाग 65
©️®️शिल्पा सुतार
........
सकाळी लवकर उठून सीमा ने आवरल,.. "आदित्य आटोप तू आधी माझ्या सोबत ये शाळेत मग जा ऑफिसला, अशा वर्गात निघून गेली तर मग उद्या भेटाव लागेल तिला ",
"हो पण लवकर बोल तिच्याशी कारण मला दुपारी तिकडे आबां कडे जायच आहे",.. आदित्य
"हो हे आशा च महत्वाच आहे ",.. सीमा
आबा आक्का अनघा जरा वेळाने निघणार होते, अनघा सुमित, शरद राव यांच्याशी फोन वर बोलत होती,
सुमित रहात नव्हता आज ते संध्याकाळी येणार होते दोघ, त्या मुळे अनघा खूप खुश होती,
आदित्य सीमा निघाले घरातून
" आदित्य शरद जिजु, सुमित येत आहे आज आपल्याला जाता येईल का फिरायला, आपण नंतर जावू",.. सीमा
"पुढच्या आठवड्यात कोर्टाची डेट आहे, अस काय सीमा",. आदित्य
"अरे मग ते घरी आपण फिरायला जाणार का?",.. सीमा
"नाही अस बर नाही",.. आदित्य
"तेच म्हणते मी",. सीमा
सीमा आदित्य शाळेत आले ,... "आदित्य आधी तू ऑफिस मधे बस मी बोलते आशाशी, तिला तुला बघून दडपण येईल, ती मोकळ बोलणार नाही",
"बघितला का सीमा माझ इम्प्रेशन कस पडत ते",. आदित्य
"पुरे आदित्य.. आटपू दे मला जरा पटापट तुलाच उशीर होतो ना ऑफिस मध्ये जायला" ,.. सीमा
"हे अस आहे, कौतुक मुळी नाही नवर्याच ",.. आदित्य
सीमा हसत होती, आदित्य हळू कोणी ऐकेन, शाळा आहे ही, आणि तू ऑफिस मध्ये गेल्यावर ती माझी अर्धी केबिन वापरू नको, मी या वीक एंडला तिकडे येणार आहे, माझ्या अर्धा केबिनला वेगळा रंग देईन मी",.. सीमा स्टाफ रूम मध्ये गेली
आदित्य खूप हसत होता,... गेली माझी केबिन
सीमा स्टाफ रूम मध्ये आली , निशा आलेली होती
"निशा ऑफिस मध्ये आदित्य आहे भेट जा, आशा आहे का आलेली?" .. सीमा
"हो आहे बोलून घे पटकन",.. निशा
निशा आदित्यला भेटायला गेली
"आशा एक मिनिट थोडा वेळ आहे का? , काम होत ",.. सीमा
"बोल सीमा",.. आशा
" आदित्य आले आहेत आज शाळेत, त्यांना तुझ्याशी थोड बोलायच आहे येणार का थोडा वेळ ",. सीमा
"काय झालं सीमा? थोड सांग ",.आशा घाबरली होती
"अग तुम्ही रहाता ना तो प्लॉट बद्दल बोलायच आहे",.. सीमा
दोघी ऑफिस मध्ये आल्या, आदित्य केबिन मध्ये बसला होता , निशा बोलत होती, आशा समोर बसली, सीमा उभी होती,
मी जाते.. निशा गेली स्टाफ रूम मध्ये
" आशा तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही रहाता ती जमीन आमच्या मालकीची आहे ",. आदित्य
हो सर..
" त्या बद्दल थोड बोलायच होत, तुम्हाला कोणी सांगितल तिथे राहायच, तिथे भेटायच असेल तर कोणाला भेटता येईल",.. आदित्य
"माझा भाऊ तोच आहे तिथला मेन",.. आशा
"काय सांगताय? मला भेटता येईल का त्यांना ",.. आदित्य
" मी विचारून बघते ",.. आशा
"एक तर तुमचे घर इललिगल आहेत, ती जमीन आमची आहे, आता कोर्टात केस सुरु आहे त्या जमिनीची आणि ति केस आम्ही जिंकू, तुमचा थोडा फायदा होत असेल तर बघा यात, फोन करता येईल का तुमच्या भावाला, काय काम करतो तुमचा भाऊ ",.. आदित्य
" कॉन्टॅक्ट घेतो स्क्रॅपच ",.. आशा
"ओह म्हणजे इथे भेटला असेल याला विक्रम, तेव्हा हे उद्योग केले असतिल त्यांनी दोघांनी ",.. आदित्य
" मी एक काम करू का, मी बोलते आधी माझ्या भावाशी मग सांगते तुम्हाला सर",.. आशा
"लवकर सांगा एक दोन दिवसात, आपल्याला घाई आहे, नाहीतरी अर्धाच्या वरती पुरावे आहेत आमच्या कडे आणि विक्रम ला अटक झाली, ती केस आम्ही जिंकू, आमच्या सोबत राहील तर फायदा आहे तुमचा दोघांचा, तुमचा जॉब हि इथे आहे मॅडम आणि स्क्रॅप बिझनेस मध्ये मी मदत करेन तुमच्या भावाला ",.. आदित्य
"मी सांगते उद्या सीमा तुला, मी जावू का",.. आशा
ठीक आहे...
आशा गेली
सीमा समोर बसली,.." आदित्य उद्या बोलते मी हिच्याशी, ही काम करेल अस वाटत आहे ",.
" हो आणि हिचा भाऊ येत असेल भेटायला तर बोलवून घे त्यांना ऑफिस मध्ये, इथे नको, संध्याकाळी ठेव मीटिंग, तेव्हा तू आशा सोबत या पाच नंतर उद्या ",.. आदित्य
"ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणाल तस होईल, काय जबरदस्त काम सांगतोस तू आदित्य, कमांड आहे तुझी ऑफिस वर",.. सीमा
आदित्य हसत होता
" अॉफीसच इंप्रेशन पडेल आणि आपल्याला हव तस बोलता येईल, आपण करू त्यांची मदत त्यांना घर घ्यायला मदत करू त्यांनी ती वस्ती सोडली तर",... आदित्य
"हो आशा ठीक आहे परिस्थितीने काही गरीब लोक आहेत त्यांना मदत करावी लागेल",.. सीमा
"हो मी जातो आता ऑफिस ला",. आदित्य
"तू तिथुन जाणार का साखर कारखान्यात",.. सीमा
हो..
" मला सांग काय लागला रिजल्ट ",.. सीमा
हो..
" मी लंच ब्रेक मध्ये बघेन, तास सुरू असतिल ",.. सीमा
ठीक आहे,
"इथेच झाला होता माझा इंटरव्यू आदित्य, आबा समोर बसले होते, खूप छान आहे ही केबिन, तू छान दिसतो या खुर्ची वर ",.. सीमा
" हो ना मी माझ्या ऑफिसच्या केबिन मध्ये ही रूबाबदार दिसतो ",.. आदित्य
" पुरे आता आदित्य उशीर नाही का होत, पण आता तुझी अर्धी केबिन लक्ष्यात ठेव ",... सीमा
" ठीक आहे निघतो मी सीमा, काय करणार आता, बायकोने दिली ऑर्डर ",.. आदित्य
" लवकर ये घरी संध्याकाळी आणि आपण रिजल्ट लागल की पार्टी ठेवू आबां साठी ",.. सीमा
" हो तू मी अनघा ताई ठरवू ",. आदित्य
हो..
आदित्य ऑफिस मध्ये आला, लगेच कामाला सुरुवात झाली, थोड्या वेळाने वकीलांचा फोन आला की विक्रमला जामीन मंजूर झाला, गुन्हा झाला नाही त्या मुळे समज दिली आता पुरती,
" ठीक आहे केस तर आपण लढवणार आहोत त्याच्या विरोधात, बघु ना काय करतो तो, लाव म्हणा पैसे किती लावतो ते, सोडणार नाही त्याला " ,.. आदित्यने फोन ठेवला, तो वैतागला होता, सचिन आत आला
"सचिन येतो का माझ्या सोबत साखर कारखान्यावर, येवू दोन तासात",.. आदित्य
ठीक आहे..
जरा वेळाने आदित्य सचिन साखर कारखाना वर जायला निघाले,.." विक्रम ला जामीन मंजूर झाला, काय वैताग आहे हा ",
" आता काय पुढे? ",.. सचिन
" त्याच्यावर डबल केस करणार आहे मी , लढ म्हणा किती जोर आहे तेवढा वापर, इंस्पेक्टर साहेबांना फोन लाव सचिन ",.. आदित्य
"इन्स्पेक्टर साहेब विक्रमला जामीन मंजूर झाला असं समजलं, त्याच्याकडून व्यवस्थित लिहून घ्या की आमच्या फॅमिलीला काही त्रास झाला तर पहिल्यांदा त्यालाच अटक होईल",.. आदित्य
" हो साहेब तुम्ही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित लिहून घेतो",. इंस्पेक्टर
" त्याला दम द्या थोडा सा",.. आदित्य
ठीक आहे...
मत मोजणी सुरू झाली होती, आबा पुढे होते, थोड्या वेळाने रिजल्ट लागला, आबा जिंकले, सगळीकडे उत्साहाचा वातावरण होत, आदित्य पोहोचत आला होता तिकडे, तेवढ्यात जिंकल्याचा फोन आला, तुमच खूप अभिनंदन आबा..
"धन्यवाद... सीमाला सांगून दे, तिला केला होता फोन ती बहुतेक वर्गात असेल",.. आबा
"हो आबा मी मेसेज टाकतो",. आदित्य
आदित्य पोहोचल, आबा खूप खुश होते, सगळ्या लोकांमधे उत्साहाचा वातावरण होत, आदित्यने मोठा हार त्यांना घातला, पाया पडला, पेढा खाऊ घातला, आबांनी त्याला मिठी मारली,..." आबा मी खूप खुश आहे आज, मला आधी पासून वाटायच तुमच्या सारख बनाव, तुम्ही खूप हुशार आणि प्रेरणादायी आहात",
आदित्य जावून आक्का अनघाला भेटला, सगळे खुश होते
लंच ब्रेक झाला, सीमा पटकन स्टाफ रूम मध्ये आली, तिने फोन बघितला, आबा जिंकले होते तिने लगेच फोन केला
" आबा तुमच खूप अभिनंदन ",..
धन्यवाद बेटा..
" मी खूप खुश आहे आबा, तुमच्या साठी काहीही अश्यक नाही, आबा तुमच्या कडून शिकण्यासारख खूप आहे, आबा मला तुमची असिस्टंट करा" ,.. सीमा
"सीमा अग किती तारीफ",.. आबा
"चांगल्या लोकांना चांगल बोलणार आबा, आता पार्टी हवी",.. सीमा
"करू आपण",.. आबा
"लवकर घरी या सगळे",.. सीमा
ठीक आहे...
मिरवणूक काढली होती तिकडे, आबा उत्साहात होते, आदित्य त्यांच्या कडे लक्ष देवून होता, आक्का अनघा भारावून गेल्या होत्या,
" बर झाल मी आली आज इकडे, खूप छान वाटत आहे",.. अनघा
विक्रम दुपार नंतर बाहेर आला, त्याला त्याच्या वस्तू फोन सगळ मिळाल्या, काका होते सोबत, वकिलांचे पैसे दिले, मामा नी दिलेले बरेच पैसे खर्च झाले होते या वकीलावर, परवडत नाही आता असे खर्च
"मी ऑफिसला जातो जरा पप्पा , खूप काम राहिले आहे ",.. विक्रम
"ठीक आहे मी जातो घरी" ,... काका
काका घरी जायला निघाले
विक्रम ऑफिस मध्ये आला, सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते, खूप काम पेंडींग आहेत, त्याने बघितल दोन तीन दिवसात एकदा ही पूजाचा फोन आला नव्हता , त्या मामा पूजा वर तर मी चांगला राग काढणार आहे, आणि पैसे ही हवे आहेत मला, थोड पूजा वर चिडलो की मामा घाबरतो तो लगेच पैसे घेवुन येईल मला भेटायला, अस करु
त्याने लगेच प्रशांतला फोन केला, प्रशांतने विक्रमचा फोन आलेला बघितला त्याला आश्चर्य वाटल.. हा कसा काय फोन करतो आहे, याला जामीन मंजूर झाला का?
त्याने फोन उचलला,.. "कुठे आहेस विक्रम?",
"आत्ता आठवण आली का माझी?",.. विक्रम
" मग काय करणार होतो मी तुझ्याबरोबर, मी ही अटकून गेलो असतो, मी तुला कधीच सांगतो आहे असं करू नको काय मिळाल आता तुला विक्रम? दोन दिवस जेलची हवा खाल्ली, ते त्यांचे त्यांचे नीट आहेत, हे सांगत होतो मी तुला विक्रम, नको घेऊ त्यांचे नाव",.. प्रशांत
" हे बघ प्रशांत तू अति घाबरट आहे, तुझं भाषण बंद कर आणि मला मदत करायला इकडे ये ",.. विक्रम
"काय काम आहे बोल पटकन",.. प्रशांत
" माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, ते तिकडे जाऊन आधी आदित्य च्या कंपनीत भरून ये स्क्रॅप घोटाळ्याचे",.. विक्रम
" किती भरायचे होते तुला",.. प्रशांत
" दोन तीन लाख रुपये भरायचे आहेत आता माझ्याकडे दीड लाख आहेत तेवढे आधी भरून दे तोपर्यंत मी घेतो मामाकडून पैसे",.. विक्रम
" विक्रम तू आधी घरी फोन करून बघ ना आणि मग बोल माझ्याशी",.. प्रशांत
" म्हणजे काय प्रशांत? काही झाल का घरी? ",.. विक्रम
"काही नाही तू एकदा घरी काकूंना फोन कर आणि मग माझ्याशी बोल, मग मी येतो तुझ्या कंपनीत ",.. प्रशांत
" काही झालं आहे का प्रशांत? ",.. विक्रम
" मी थोडा कामात आहे विक्रम मी करतो नंतर फोन, तू घरी फोन करून बघ",.. प्रशांत मी फोन ठेवला
काय झालं आहे या प्रशांत ला? त्याने घरी आईला फोन लावला
" कुठे आहेस तू विक्रम ",.. काकू
" आई मी ऑफिसला आलो आहे ",.. विक्रम
"तुला जामीन मिळाला का",.. काकू
"हो, पप्पा नाही आले का अजून घरी ",.. विक्रम
" नाही आता वेळ लागतो ना यायला ",.. काकू
म्हणजे
"आता आपल्याला बाजूच्या गावाच्या रस्त्याने आपल्याला घरी यावं लागणार आहे , या बाजूने आपल्या घरापासून आदित्यने कंपाउंड टाकून घेतलं आहे",.. विक्रम
"काय बोलते आहेस तु आई, तुम्ही लोकांनी विरोध नाही केला का? तो आपला हि रस्ता आहे ",..विक्रम चिडला होता
"नाही तो आपला रस्ता नाही, मुळात तो रस्ताच नाही, तो आबांनी त्यांच्या शेतातुन स्वतःसाठी तयार करून घेतलेला रस्ता आहे, ती त्यांची जागा आहे",... काकू
" मग आता पूर्णच बंद करून टाकली आहे का त्यांनी ती बाजू आपल्या साठी ",.. विक्रम
"हो आपण आपल्या बाजूने मेन रोड वर जायचं आणि बाजूच्या गावातुन जिथे जायचं असेल तिथे जायचं, आता येतील तुझे पप्पा, त्या मुळे उशीर होतो ",.. काकू
" हे चांगल नाही झाल आई",.. विक्रम
"आता काही बोलू नकोस तू विक्रम, मला आधीच खूप राग येतो आहे ह",.. काकू
" प्रशांत काय सांगत होता की घरी फोन करून बघ काय झालं? मामा येऊन गेले का? ",.. विक्रम
" तू घरी आल्यावर बोलू ना ",.. काकू
"पण काय झालं आहे नीट सांग आई? मला आदित्य च्या कंपनीत पैसे भरायचे आहेत, थोडे पैसे लागत आहेत मी मामांना फोन करणार होतो",.. विक्रम
" आत्ता नको करू त्यांना फोन",.. काकू
"का नाही? काय झाल आहे? ",.. विक्रम
" मामा मामी पूजा आले होते ",.. काकू
" मग त्यांना तू सांगितलं का काय झालं ते",.. विक्रम
" त्यांना माहिती होतं आधीच, बहुतेक त्यांना आबांनी फोन करून सांगितलं असणार ",.. काकू
" हे लोक आपल्या वाईटावर टपलेले आहेत",.. विक्रम
"हे तू बोलतोस का विक्रम, तू पण कशाला नाव घ्यायला जातो त्या लोकांचं हे मला समजत नाही, किती व्यवस्थित होत आलं होतं सगळं, तुझं लग्न जमलं होतं पूजा शी, मामा तुला मदत करायला तयार होता, तुला सुखासुखी जगता येत नाही ",.. काकू
"लग्न होणार होतं म्हणजे काय आई ",.. विक्रम
"काही नाही तुझ्या मामाने हे लग्न मोडलं",.. काकू
" एवढे झाल आणि मला कोणीच काही का नाही सांगितलं आणि मला दोन-तीन दिवस कोणीच भेटायला आलं नाही नाही, मी कोणाला सोडणार नाही ",.. विक्रम
" पुरे झाला आता विक्रम भांडण, आता जरा शांततेत जगू दे आम्हाला, कंटाळा आला आहे आम्हाला तुझ्या भांडकुदळ स्वभावाचा आणि मारामारीचा, बाकीचे मुलं कसे आई-वडिलांना सुखी शांत ठेवतात तसं आमचं आयुष्य का नाही? किती वेळा विचार केला मी की नको बोलायला तुला, पण तुला समजूनच घ्यायचं नाही आहे, आता जरा नीट वागण्याचा प्रयत्न कर",.. काकू
"आई तू काळजी करू नको मी ठेवतो फोन ",.. विक्रम डोकं धरुन बसलेला होता, उगीच नाव घ्यायला गेलो त्या सीमाचं, काय करू आता? एकेक नीट करावं लागेल, मामाला फोन करून बघू का की आधी पूजा ला फोन करू, माफी मागून घेवू, काय वेळ आली माझ्यावर..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा